________________
दान
एवढे सारे कमावले, पण कुठे गेले ? गटारीत !! धर्मासाठी दिले ? तेव्हा म्हणाले ते पैसे तर मिळतच नाही, गोळा होताच नाही, तर देऊ कसे ? तेव्हा धन कोठे गेले? हे तर कोण पिकवतो आणि कोण खातो ? जो कमावतो, त्याचे धन नाही. जो खर्च करतो त्याचे धन. म्हणून नवीन ओवरड्राफ्ट पाठवाल तेवढे तुमचे. नाही पाठवले तर तुमचे तुम्ही बघा. दान म्हणजेच पेरुन मग कापा
19
प्रश्नकर्ता : आत्मा आणि दान, यांचा काहीही संबंध नाही, तर मग दान करणे आवश्यक आहे की नाही ?
दादाश्री : दान म्हणजे काय, तर दिलेले घेणे. हे जग प्रतिध्वनी स्वरुप आहे. म्हणून जसे तुम्ही कराल तसा प्रतिध्वनी ऐकायला मिळेल; त्याच्या व्याजासकट मिळेल. म्हणून तुम्ही द्या व घ्या. हे सगळे मागच्या जन्मी दिले, चांगल्या कार्यासाठी पैसे खर्च केले होते, असे जे केले होते त्याचे आम्हाला फळ मिळाले. आणि आता परत तसे केले नाही, तर सगळे धुळीत जाईल. आपण शेतातून चारशे मण गहू तर आणले पण त्यातले पन्नास मण जर पेरायला गेलो नाही तर काय होणार ?
प्रश्नकर्ता : तर उगवणार नाहीत.
दादाश्री : असे आहे हे सर्व, म्हणून द्यावे. त्याचा प्रतिध्वनी उमटेलच, परत येईल अनेक पटीने येईल. मागत्या जन्मी दिले होते म्हणून तर अमेरिकेला आलात, नाहीतर अमेरिकेला येणे सोपे आहे का ? किती पुण्य केलेले असते तेव्हा विमानात बसायला मिळते. कित्येक लोकांनी तर विमान बघितलेले सुद्धा नाही.
लक्ष्मी तिथेच परत येते
पूर्वी तुमचे घर श्रीमंत होते ना ?
प्रश्नकर्ता : असे सगळे पूर्वकर्माचे पुण्य !