________________
18
दान
गेले आहे. नुसत्या मोहाचे, मोहाचा बाजारच आहे ना! झपाट्याने धन निघून जाते. धनच खोटे आहे ना, धन पण खरे नाही. खरे धन असले तर ते चांगल्या मार्गाने खर्च होते.
सध्या संपूर्ण जगाचे धन गटारीत जात आहे. या गटारीचे पाईप रुंद केले आहे. ते कशासाठी, तर धन जाण्यासाठी जागा पाहिईजे ना? कमावलेले सर्व धन खाऊन-पिऊन गटारीत वाहून जाते. एक पैसाही खऱ्या मार्गावर जात नाही, आणि जे पैसे खर्च करतात, कॉलेजमध्ये दान दिले, अमके दिले ते सर्व इगोइजम (अहंकार) आहे. इगोइजमशिवाय पैसा दिला जाईल तर तो खरा म्हटला जातो. बाकी हे तर अहंकाराला पोषण मिळत राहते; कीर्ती मिळत राहते. आरामात! पण कीर्ती मिळाल्यानंतर त्याचे फळ मिळते. मग ती कीर्ती जेव्हा उलटते तेव्हा काय होते? अपकीर्ती होते. तेव्हा उपाधीच उपाधी होते. त्याऐवजी कीर्तीची अपेक्षाच ठेवू नये. कीर्तीची अपेक्षा ठेवली तर अपकीर्ती येईल ना? ज्याला कीर्तीची अपेक्षाच नाही त्याला अपकीर्ती येईलच कशी?
चांगल्या मार्गाने खर्च करा पैसे तर संपतातही आणि घटक्याभरात भरुनही निघतात. चांगल्या कामासाठी वाट बघू नये. चांगल्या कामात खर्च करा, नाहीतर गटारीत तर गेलेच आहे लोकांचे धन. मुंबईत करोडो रुपये गटरीत गेले, लोकांचे. घरात खर्च केला पण परक्यांसाठी खर्च केला नाही तो सर्व गटारीत गेला. तर आता पश्चाताप करत आहेत. मी म्हणतो की गटारीत गेले, तेव्हा म्हणतात की, 'होय, असेच झाले.' मग मुर्खा! आधीच सावध रहायला हवे होते ना? आता परत येईल तेव्हा सावध रहा. तेव्हा म्हणतील, 'हो, आता मात्र कच्चा पडणार नाही.' परत तर येणारच आहे ना. धन तर कमी जास्त होत राहील. कधी दोन वर्ष वाईट गेले, तर परत पाच-सात वर्ष चांगले येतील, असे चालतच राहते. पण चांगल्या मार्गाने खर्च केले ते तर कामी येणारच ना? तेवढेच आपले, बाकी सगळे परके.