________________
दान
11
दादाश्री : दान तर उत्तम आहे. जेथे दुःख असेल तेथे दुःख कमी करा आणि दुसरे सन्मार्गावर खर्च करा. लोक सन्मार्गावर जातील असे ज्ञानदान करा. या दुनियेत उच्च असे ज्ञानदान आहे ! तुम्ही जरी एक वाक्य जाणले (शिकले) तरी किती लाभ होतो! तेव्हा हे पुस्तक लोकांच्या हातात आले तर कितीतरी लाभ होईल.
प्रश्नकर्ता : आता नीट लक्षात आले....
दादाश्री : हो, म्हणून ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, त्याने मुख्यतः ज्ञानदान केले पाहिजे.
तर आता हे ज्ञानदान कसे असावे ? लोकांना हितकारी होईल असे ज्ञान असावे. हो, पण लुटारुंच्या कथा ऐकण्यासाठी नव्हे. ते तर खाली पाडतात. ते वाचल्यावर आनंद तर होतो, पण खाली अधोगतीत जात राहतात.
सर्वात उच्च अभयदान
आणि चौथे आहे अभयदान. अभयदान म्हणजे आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र त्रास होऊ नये. अशा प्रकारे वागावे. तेच अभयदान.
प्रश्नकर्ता : अभयदान जरा सविस्तर समजवा.
दादाश्री : अभयदान म्हणजे आमच्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये. त्याचे एक उदाहरण देतो. मी सिनेमा बघायला जात असे, लहान वयात, बावीस पंचविसाव्या वर्षी. तर परत येतांना रात्रीचे बारा-साडेबारा वाजत असत. पायी चालत येत होतो तर बुटांचा आवाज होत असे. आम्ही बुटांना घोड्याची लोखंडी नाळ लावून घेत असत म्हणून खटखट आवाज होत असे. रात्री आवाज जास्त येत असे. रात्री कुत्री बिचारी झोपलेली असत, आरामात झोपलेली असत, ते कान टवकारुन बघत. तेव्हा आम्ही समजून जात असत की तो बिचारा आमच्यामुळे