________________
दान
तुमच्याकडे आला आहे तेव्हा तुम्ही त्याला द्या. जे काही देता येईल ते
द्या, आज तरी तो जगला, बस! मग उद्या त्याचा दुसरा काही उदय असेल. तुम्हाला फिकीर करण्याची गरज नाही.
प्रश्नकर्ता : अन्नदान श्रेष्ठ मानले जाते?
दादाश्री : अन्नदान श्रेष्ठ मानले जाते परंतु अन्नदान किती देऊ शकता? नेहमीसाठी देत नाहीत ना लोकं. एक प्रहर खाऊ घातले तरी फार झाले. दुसऱ्या प्रहरी परत दुसरे मिळेल. पण आजचा दिवस, एक प्रहर तरी जिवंत राहिला ना? आता यातही लोक उरले-सुरलेच देतात की, नवे बनवून देतात?
प्रश्नकर्ता : उरलेलेच देतात. स्वत:चा पिच्छा सोडवतात. उरलेच आहे तर आता काय करावे?
दादाश्री : तरीही त्याचा सदुपयोग करतात, माझ्या भावा! पण जर नवीन बनवून दिले तर मी म्हणेल की ते करेक्ट आहे. वीतरागांकडे काही नियम असतील की थापा मारलेल्या चालतील?
प्रश्नकर्ता : नाही, नाही असे थापा मारुन कसे चालेल? दादाश्री : वीतरागांकडे तसे चालत नाही, इतर ठिकाणी चालेल.
औषधदान
आणि दुसरे आहे औषधदान, ते आहारदाना पेक्षा उत्तम मानले जाते. औषधदानाने काय होते? साधारण परिस्थिती असलेला मनुष्य जर आजारी पडला, तर तो इस्पितळात जातो. आणि तेथे कोणी तरी म्हणतो की, 'अरे डॉक्टरांनी सांगितले आहे, पण माझ्याजवळ औषध आणायला पन्नास रुपये नाहीत. म्हणून मी औषध कसे काय आणू? तेव्हा आपण म्हणायचे की, हे घे पन्नास रुपये औषधसाठी आणि दहा रुपये आणखी घे. किंव्हा मग कुठून तरी औषध आणून आपण त्याला मोफत द्यावे. आपण स्वतः पैसा खर्च करुन औषधे आणून त्याला फ्री ऑफ कॉस्ट