________________
गेला तरीही ते तुमची जमा रक्कम. तुम्ही आणि तुमच्या मुलांनी खाल्ले ती सर्व तुमची जमा रक्कम नव्हे. ते सर्व गटारीत गेले, पण तरीही गटारीत जाणे थांबवू शकत नाही, कारण ते तर अनिवार्य आहे. त्यात काही सुटका आहे का? पण त्याचबरोबर समजले पाहिजे की परक्यांसाठी खर्च केले नाही, ते सगळे गटारीतच जाते. ___माणसाला जरी खाऊ घातले नाही पण शेवटी कावळ्याला घातले, चिमण्यांना घातले, या सर्वांना खाऊ घातले तरी देखील ते इतरांसाठी खर्च केलेले मानले जाईल. माणसाच्या ताटाची किंमत तर आता फार वाढली आहे ना? पण चिमण्यांच्या ताटाची किंमत तर खास नाही ना? तेव्हा तुमचे जमा पण तेवढे कमीच होईल ना?
मन बिघडले आहे म्हणून.... प्रश्नकर्ता : काही काळापर्यंत मी माझ्या कमाईतून तीस टक्के धार्मिक कार्यासाठी देत होतो, पण आता ते सगळे थांबले आहे. जे-जे काही देत होतो, ते आता देऊ शकत नाही.
दादाश्री : ते तर तुम्हाला करायचे आहे तर ते दोन वर्षानंतरही येईलच! तेथे काही तोटा नाही. तेथे तर भरपूर आहे. तुमचे मन बिघडले असेल तर मग काय होईल?
आल्यानंतर देऊ की दिल्यानंतर येतील? मी एका माणसाच्या बंगल्यात बसलो होतो, तेव्हा तेथे चक्रीवादळ आले. म्हणून दारे खडखड-खडखड आपटू लागली. त्याने मला विचारले, 'हे चक्रीवादळ आले आहे, सगळी दारे बंद करु का? मी म्हणालो सगळी दारे बंद करु नकोस, आत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा उघडा ठेव आणि बाहेर निघण्याचे दरवाजे बंद करुन टाक, मग आत किती हवा येईल? भरलेली रिकामी होईल तेव्हाच हवा आत येईल ना? नाहीतर कितीही मोठे चक्रीवादळ असले तरी आत येणार नाही.' नंतर त्याला अनुभव घडवून दिला. तेव्हा तो म्हणाला, 'आता आत शिरत नाही.'