________________
दान
तर या वादळाचे असे आहे. लक्ष्मीला जर तुम्ही अडवली तर येणार नाही, जेवढी असेल तेवढी भरलेलीच राहील. आणि एकीकडून जाऊ
द्याल तर दुसरीकडून येत राहील. आणि अडवून ठेवली तर तेवढीच्या तेवढीच राहील. लक्ष्मीचे काम हे सुद्धा असेच आहे. म्हणून आता कोणत्या मार्गाने जाऊ द्यावी हे तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे की बायको मुलांच्या मौज-मजेसाठी जाऊ द्यावी की कीर्तीसाठी जाऊ द्यावी, किंवा ज्ञानदानासाठी जाऊ द्यावी, किंवा मग अन्नदानासाठी जाऊ द्यावी? कशासाठी जाऊ द्यावी ते तुमच्यावर अवलंबून आहे, पण जाऊ द्याल तर दुसरी येईल. जाऊ दिली नाही, तर त्याचे काय होईल? जाऊ दिली तर दुसरे नाही का येणार? हो येईल.
बदललेल्या प्रवाहाच्या दिशा किती प्रकारचे दान आहेत हे माहित आहे का तुम्हाला? दानाचे चार प्रकार आहेत. बघा, एक आहारदान, दुसरे औषधदान, तिसरे ज्ञानदान आणि चौथे अभयदान.
पहिले आहारदान
पहिल्या प्रकारचे जे दान आहे ते आहे अन्नदान. या दानासाठी तर असे म्हटले जाते की, भाऊ, एखादा मनुष्य आमच्या घरी येऊन म्हणेल की 'मला काही खायला द्या, मी उपाशी आहे.' तेव्हा म्हणावे 'बैस येथे जेवायला. मी तुला वाढतो.' हे झाले आहारदान. तेव्हा अक्कलवाले काय म्हणतील? या तगड्या माणसाला आता खाऊ घालाल पण मग परत संध्याकाळी खायला कसे घालाल? तेव्हा भगवंत म्हणतात तु अशी अक्कल वापरु नकोस. या व्यक्तिने त्याला खाऊ घातले तर तो आजचा दिवस तरी जगेल. मग उद्या जगण्यासाठी परत त्याला कोणी तरी दुसरे भेटेल. उद्याचा विचार आपण करायचा नाही. आपल्याला दुसऱ्या भानगडीत पडायचे नाही, की उद्या तो काय करेल? उद्या त्याला परत मिळेल. यात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की आपण नेहमी देऊ शकू की नाही.