Book Title: Spirituality in Speech Marathi Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ संपादकीय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा वाणीचा व्यवहार अविरतपणे चालतच असतो. अरे! कित्येक जण तर झोपेत सुद्धा बडबडत असतात!! वाणीचा व्यवहार दोन प्रकारे परिणमीत होत असतो, कडू नाहीतर गोड! गोड तर आरामात गळ्याखाली उतरते, परंतु कडू गळ्याखाली उतरत नाही! कडू-गोड दोन्हींमध्ये समभाव राहील, दोन्ही सारख्याच पद्धतिने उतरावे याची समज ज्ञानी देतच असतात! या काळाला साजेसे व्यवहारातील वाणीविषयी सर्व स्पष्टीकरण पूज्य दादाश्रींनी दिले आहे. त्यांना लाखो प्रश्न विचारले गेले आहेत, सर्व प्रकारचे, स्थूलतमपासून ते सूक्ष्मतमपर्यंतचे, उलट-सुलट सर्वच प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत पण तरीही ते त्याचक्षणी, सचोटीने व संपूर्ण समाधानकारक उत्तरे देत असत. दादाश्रींच्या वाणीत प्रेम, करूणा आणि खरेपणाचा संगम झळकताना दिसतो! परम पूज्य दादाश्री नेहमी सर्वांनाच प्रेमाने सांगायचे. 'विचारा, विचारा, तुमच्या सर्व प्रश्नांचे खुलासे करून घ्या, (मोक्षाचे) काम काढून घ्या.' तुम्हाला समजले नाही तर पुन्हा-पुन्हा विचारा, जोपर्यंत पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत विचारत रहा. संकोच न करता विचारा! आणि तुम्हाला जर समजले नाही तर त्यात तुमची चूक नाही, समजवणाऱ्याची अपूर्णता, कमतरता आहे! ही अतिसूक्ष्म गोष्ट आहे, 'तुम्हाला नाही समजणार' असे सांगून तुमच्या प्रश्नाला उडवून द्यायचे नसते. असे केले तर ते कपट केले म्हटले जाईल! स्वतः जवळ उत्तर नसेल, तर समोरच्याची समजून घेण्याची कमतरता आहे, असे म्हणून उडवून देणे हे साफ चुकीचे आहे ! दादाजींची वाणी ज्यांनी ऐकली असेल किंवा सूक्ष्मतेने वाणीचे वाचन केले असेल त्यांच्यावर, मन-वचन-कायेची एकता असलेल्या, आणि कथनीसोबत करणी असलेल्या खऱ्या ज्ञानींची इमेज(प्रभाव) पडल्याशिवाय राहणार नाही! त्यांना मग दुसऱ्या सर्व जागी नकली इमेज आहे हे सुद्धा जाणिवेत आल्याशिवाय राहणार नाही! प्रस्तुत 'वाणी व्यवहारात' या पुस्तकात वाणीने उत्पन्न होणारे संघर्ष आणि त्या संघर्षावर कशा प्रकारे समाधानकारकPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88