Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 29
________________ १८ वाणी, व्यवहारात... नाही, म्हणून बेजबाबदारीने बोलू नका. बेजबाबदारीने वागू नका. बेजबाबदारीने काहीच करू नका. सर्वकाही पॉजिटिव घ्या. कोणाचे चांगले करायचे असेल तर करा. पण वाईटामध्ये पडूच नका, वाईट विचारही करू नका, कोणाचे वाईट ऐकूही नका. खूप जोखिमदारी आहे. नाहीतर एवढे मोठे जग, यात मोक्ष तर स्वत:च्या आतच पडलेला आहे, पण स्वतःला सापडत नाही! आणि कित्येक जन्मांपासून भटकतच राहिलो आहोत. घरात पत्नीला दटावतो पण त्याला काय वाटते की हे तर कोणी ऐकलेच नाही ना! हे तर आपसातलेच आहे! लहान मुले असतील तेव्हा त्यांच्या समोर पति-पत्नी वाटेल तसे बोलतात. त्यांना वाटते की ह्या लहान मुलाला काय समजणार आहे ? अरे, पण आत टेप होत आहे, त्याचे काय? मग जेव्हा तो मोठा होईल तेव्हा सर्व बाहेर पडेल! सामान्य व्यवहाराचे बोलण्यास हरकत नाही. पण देहधारींसाठी जर काही उलट-सुलट बोलले गेले तर आत ते टेप होऊन जाते. या जगातील लोकांची टेप उतरवायची असेल तर कितीसा वेळ लागेल? फक्त थोडेसे डिवचले तर समोर प्रतिपक्षी भाव टेप होतच राहतील. तुझ्यात इतकी निर्बलता आहे की डिवचण्या आधीच तू बोलायला लागशील. प्रश्नकर्ता : वाईट बोलायचे तर नाही, पण मनात वाईट भाव सुद्धा येऊ नये ना? दादाश्री : वाईट भाव येऊ नये, ही गोष्ट खरी आहे. पण जे भावात असेल, ते बोलण्यात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून बोलणेच जर बंद झाले ना, तर भाव सुद्धा बंद होतील. भाव हा तर बोलण्या मागचा प्रतिध्वनी आहे. प्रतिपक्षी भाव तर उत्पन्न झाल्याशिवाय राहणारच नाहीत ना! आम्हाला प्रतिपक्षी भाव होतच नाहीत आणि त्या स्थितीपर्यंत तुम्हालाही पोहोचायचे आहे. आपली कमजोरी इतक्या प्रमाणात तर जायलाच हवी की प्रतिपक्षी भाव उत्पन्नच होणार नाहीत. आणि जर कदाचित तसे झाले तर आपल्याजवळ प्रतिक्रमणाचे हत्यार आहे, त्याच्याने पुसून टाकायचे. पाणी

Loading...

Page Navigation
1 ... 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88