________________
वाणी, व्यवहारात...
जागृतीत राहत असेल तर समोरचा माणूस वाटेल तसे बोलला तरीही आपल्यावर त्याचा जरासुद्धा परिणाम होणार नाही, आणि हे वाक्य कल्पित नाही. जे 'एक्जेक्ट' आहे, तेच सांगतो. मी तुम्हाला असे सांगत नाही की माझ्या शब्दाचा मान ठेवून चला. तंतोतंत असेच आहे. हकीकत न समजल्यामुळे तुम्ही मार खाता.
__ प्रश्नकर्ता : समोरचा उलट-सुलट बोलतो तेव्हा आपल्याला ज्ञानामुळे समाधान राहते, पण मुख्य प्रश्न हा राहतो की जेव्हा आमच्याकडून कडवटपणा निघतो, त्यावेळी जर आम्ही या वाक्याचा आधार घेतला तर आम्हाला चुकीचे लाईसन्स मिळते का?
दादाश्री : तेव्हा या वाक्याचा आधार घेऊच शकत नाही ना! त्यावेळी तर तुम्हाला प्रतिक्रमणाचा आधार दिलेला आहे. समोरच्याला दु:ख होईल असे बोलले गेले असेल तर प्रतिक्रमण करून घ्यावे. आणि जेव्हा समोरचा वाटेल तसे बोलेल, तेव्हा वाणी पर आहे आणि पराधीन आहे, याचा स्वीकार केला. म्हणून मग तुम्हाला समोरच्याकडून दुःख होणारच नाही ना?
आता तुम्ही स्वतः उलट-सुलट बोललात आणि नंतर त्याचे प्रतिक्रमण केले, म्हणून मग तुम्हाला तुमच्या बोलण्याचे दुःख राहिले नाही. म्हणजे अशा प्रकारे सर्व निराकरण होते.
प्रश्नकर्ता : बरेचदा बोलायचे नसते तरी बोलले जाते. नंतर पश्चाताप होतो.
दादाश्री : वाणीने जे काही बोलले जाते त्याचे आपण 'ज्ञाता-दृष्टा.' परंतु त्यामुळे ज्याला दुःख झाले असेल, त्याचे प्रतिक्रमण 'आपल्याला' 'बोलणाऱ्या'कडून करवून घ्यावे लागते.
आम्हाला कोणी शिवी दिली तरी आम्ही जाणतो की हा 'अंबालाल पटेल'ला शिव्या देत आहे. पदगलला शिव्या देत आहे, आत्म्याला तर जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही ना! म्हणून आम्ही स्वीकारत नाही, 'आम्हाला' स्पर्शत नाही. आम्ही वीतराग राहतो. आम्हाला त्याच्यावर राग-द्वेष होत नाही.