________________
वाणी, व्यवहारात...
४९
सर्व जसे आहे तसेच राहू द्यायचे का? घरात पुष्कळ माणसे असली तरी?
दादाश्री : तसेच राहू द्यायचेही नाही आणि दखल सुद्धा करायची नाही.
प्रश्नकर्ता : हे कसे शक्य आहे ?
दादाश्री : दखल करायची असते का कधी? दखल म्हणजे अहंकाराचा वेडेपणा!
प्रश्नकर्ता : घरात काही काम असेल तर सांगू शकतो की हे जरा इतके करा?
दादाश्री : पण सांगण्या-सांगण्यात फरक असतो.
प्रश्नकर्ता : इमोशन शिवाय सांगायचे. इमोशनल झाल्याशिवाय सांगायचे, असे?
दादाश्री : तशी तर किती गोड वाणी बोलता की बोलण्यापूर्वीच ती समजून जाते!
प्रश्नकर्ता : कडक वाणी-कर्कश वाणी असेल, तर तिथे काय करावे?
दादाश्री : कर्कश वाणी, तेव्हाच तर दखल होते ना! कर्कश वाणी असेल तर त्यात एवढे शब्द जोडावे लागतील की 'मी विनंती करतो, जरा इतके करा ना.' 'मी विनंती...' एवढे शब्द जोडून बोला.
प्रश्नकर्ता : म्हणजे आपण जर असे बोललो की, 'एय हे ताट इथून उचल' आणि आपण हळूवार बोललो 'तू हे ताट इथून उचल ना.' म्हणजे हे जे बोलण्याचे प्रेशर आहे...
दादाश्री : त्यास दखल नाही म्हणत. पण जर त्याच्यावर रुबाब केला तर ती दखल म्हटली जाते.
प्रश्नकर्ता : म्हणजे हळूवारपणे बोलावे.