________________
वाणी, व्यवहारात...
जाते. कित्येक तर असे शब्द बोलतात की हार्ट लगेचच रिकामे होऊन जाते. समोरच्याला घर खालीच करावे लागते, घरमालक येतो, मग!!
प्रश्नकर्ता : कोणी जाणून-बुजून वस्तू फेकून दिली तर तिथे एडजस्टमेन्ट कशा प्रकारे घ्यायची?
दादाश्री : हे तर फेकून दिले, पण मुलगा जरी फेकून दिला तरी सुद्धा आपण 'पाहत' राहायचे. बापाने मुलाला फेकून दिले तरी आपण पाहात राहायचे. नाहीतर काय आपण नवऱ्याला फेकून द्यायचे? एकाला तर हॉस्पिटलमध्ये भरती केले. आता परत दोघांना हॉस्पिटलमध्ये पाठवायचे आहे का?! आणि नंतर जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो आपल्याला पछाडून टाकेल. मग तिसऱ्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.
प्रश्नकर्ता : तर मग काही सांगू नये का?
दादाश्री : सांगावे, पण सम्यक्पणे सांगावे, जर बोलता येत असेल तर. नाहीतर कुत्र्यासारखे भुंकत राहण्यात काय अर्थ आहे ? म्हणून सम्यक् बोलावे.
प्रश्नकर्ता : सम्यक् म्हणजे कशा प्रकारे?
दादाश्री : ओहोहो! तुम्ही या बाळाला का फेकले? त्याचे काय कारण? तेव्हा तो म्हणेल की मी काय मुद्दाम फेकेल? तो माझ्या हातून निसटला आणि पडला.
प्रश्नकर्ता : हे तर तो खोटे बोलला ना?
दादाश्री : तो खोटे बोलला हे आपण पाहायचे नाही. खोटे बोलेल की खरे बोलेल ते त्याच्यावर अवलंबून आहे. हे आपल्यावर अवलंबून नाही. तो त्याच्या मनात जसे येईल तसे करेल. त्याला खोटे बोलायचे असेल किंवा आपल्याला मारून टाकायचे असेल हे त्याच्या ताब्यात आहे. रात्री आपल्या माठात विष टाकून आला तर आपण तर मरूनच जाऊ ना! म्हणून जे आपल्या हातात नाही ते आपल्याला पाहायचे नाही. सम्यक् बोलता आले तर ते कामाचे की, 'भाऊ, यात तुम्हाला काय फायदा