________________
वाणी, व्यवहारात...
तरी तुझ्याशिवाय मला करमत नाही.' असे सांगायचे. एवढा गुरुमंत्र बोलावा. असे तर कधी बोलतच नाही, असे बोलायला काय हरकत आहे तुम्हाला? मनात तर प्रेम असतेच, पण ते थोडे व्यक्त पण करावे.
म्हणजे, आमचा सर्व ड्रामा (नाटक)च असतो. हीराबा (दादाश्रींच्या धर्मपत्नी) ७३ वर्षांच्या, तरी देखील त्या मला म्हणतात, 'तुम्ही लवकर परत या.' तेव्हा मी म्हणतो, मला सुद्धा तुमच्या शिवाय करमत नाही! असा ड्रामा केला तर त्यांना किती आनंद होईल. 'लवकर या, लवकर या' असे त्या सांगतात. ही त्यांची भावना आहे म्हणूनच सांगतात ना! म्हणून आम्ही सुद्धा असे बोलतो. बोलणे हितकारी असले पाहिजे. बोललेले शब्द जर समोरच्यासाठी हितकारी नसतील तर आपण बोललेले काय कामाचे?
एक तास जरी नोकराला, मुलाला किंवा बायकोला दटावले तर ते मग नवरा बनून किंवा सासू बनून तुम्हाला आयुष्यभर तुडवत राहतील! न्याय तर हवा की नको? यालाच भोगणे म्हणतात. तुम्ही जर कोणाला दुःख दिले तर तो आयुष्यभरासाठी तुम्हाला दुःख देईल. एकच तास दुःख दिले तरी त्याचे फळ आयुष्यभर मिळेल. मग ओरडत राहा की 'बायको माझ्याशी अशी का वागते?' बायकोला असे वाटते की, 'ह्या नवऱ्यासोबत माझ्याकडून असे का वागले जाते?' तिला पण दुःख होते, पण काय करणार? नंतर मी त्यांना विचारले की, 'बायकोने तुम्हाला शोधून आणले होते की तुम्ही बायकोला शोधून आणले होते!' तेव्हा तो म्हणतो की, 'मी शोधून आणले होते.' तेव्हा त्या बिचारीचा काय दोष? घेऊन आल्यानंतर खराब निघाले, त्यात ती काय करेल, कुठे जाणार मग?
जगात कोणाला काहीही, एक अक्षरही सांगण्यासारखे नाही. सांगणे, हा रोग आहे एक प्रकारचा! सांगायचे झाले ना तर तो सर्वात मोठा रोग आहे! सर्व आपापला हिशोब घेऊन आलेले आहेत. मग ही दखल करायची गरजच काय? एक अक्षर सुद्धा बोलण्याचे बंद करून टाका. आणि म्हणूनच आम्ही हे 'व्यवस्थित शक्ति'चे ज्ञान दिले आहे.
म्हणजे जगात एकच गोष्ट करण्यासारखी आहे. कोणालाही काही