________________
वाणी, व्यवहारात....
६५
दुसऱ्यांसोबत बोलताना सांगते, 'सासऱ्यात जरा अक्कल कमी आहे.' आता त्यावेळी आपण तेथे उभे असू आणि ते जर आपण ऐकले, तर आपल्या आत तो रोग शिरला. म्हणून तेथे आपण असा हिशोब काढायचा, की जर आपण दुसऱ्या खोलीत बसलो असतो तर काय झाले असते ? तर कोणताच रोग उत्पन्न झाला नसता. म्हणजे येथे आलो तीच आपली चूक, त्याचाच हा रोग आहे! आपण ती चूक संपवून टाकायची. तुम्ही असे समजा ना की, मी दुसऱ्या खोलीतच बसलो होतो, आणि हे मी ऐकलेच नाही असे करून ती चूक संपवून टाकावी.
आपला मुलगा मोठा झाला असेल आणि आपल्याला उलट उत्तर देत असेल तर समजायचे की हे आपले 'थर्मामीटर' आहे. तुमच्यात धर्म किती परिणमित झाला आहे, हे जाणण्यासाठी 'थर्मामीटर' कोठून आणायचे? घरातच ' थर्मामीटर' मिळाले तर बाहेरुन विकत आणायला जावे लागत नाही !
मुलाने आपल्याला थोबाडीत मारली, तरीही आपल्याला कषाय उत्पन्न होत नसेल, तेव्हा समजायचे की आता आम्ही मोक्षाला जाणार आहोत. दोन-तीन थोबाडीत मारल्या तरीही कषाय उत्पन्न होत नसतील, तेव्हा समजून जायचे की हा मुलगाच आपला थर्मामीटर आहे. असे दुसरे थर्मामीटर आणायचे तरी कुठून ? दुसरा तर कोणी मारत नाही. म्हणून हाच थर्मामीटर आहे आपला.
हे तर नाटक आहे! नाटकात बायका-मुलांना नेहमीसाठी स्वतःचे करून घेतले तर चालेल का ? नाटकात बोलतो तसे बोलण्यास हरकत नाही, की 'हा माझा मोठा मुलगा, शतायु हो !' पण सर्व वरकरणी, 'सुपरफ्लुअस', नाटकीय. ह्या सर्वांना खरे मानले त्याचेच प्रतिक्रमण करावे लागते. खरे मानले नसते तर प्रतिक्रमण करावे लागले नसते. जिथे सत्य आहे असे मानण्यात आले तिथे राग आणि द्वेष सुरु होऊन जातात आणि प्रतिक्रमणानेच मोक्ष आहे. 'दादा' दाखवतात त्या आलोचना - प्रतिक्रमणप्रत्याख्यानाने मोक्ष आहे.
एकदा एका माणसासोबत माझे डोके जरा तापले होते, रस्त्यात मी