________________
६८
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : मस्करी करण्यात कोणकोणत्या जोखिम आहेत? कोणत्या प्रकारचे जोखिम आहेत?
दादाश्री : असे आहे ना, की कोणाला चापट मारली आणि त्याचे जे जोखिम असते त्याहीपेक्षा या मस्करीत अनंत पटीने जोखिम आहे. त्याला बुद्धी कमी आहे म्हणून तुम्ही तुमच्या लाईटने (अधिक बुद्धिने) त्याला ताब्यात घेतले. तेव्हा मग तेथे भगवंत म्हणतील, 'याला बुद्धी नाही, त्याचा हा फायदा घेतो?' तेथे प्रत्यक्ष भगवंतालाच तुम्ही प्रतिपक्षी बनवले. तुम्ही त्याच्या थोबाडीत मारले तर ते त्याला समजले असते म्हणून तो स्वतःच मालक झाला असता. पण ही तर त्याची बुद्धी पोहचतच नाही, म्हणून आपण त्याची मस्करी करतो, तेव्हा तो स्वतः मालक होत नाही. परंतु भगवंत ओळखतात की 'ओहोहो, ह्याला बुद्धी कमी आहे, म्हणून तू तावडीत घेतोस?! तर घे आता.' त्याच्या जागी मग भगवंतच प्रतिपक्षी बनतात, तेव्हा मग तुम्ही खूप अडचणीत याल..
12. सुमधुर वाणीच्या कारणांचे असे करा सेवन
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्यानंतर आमची वाणी खूपच चांगली होईल का, याच जन्मात?
दादाश्री : त्यानंतर तर काही वेगळ्याच प्रकारची असेल. आमची वाणी सर्वोत्कृष्ट श्रेणीची निघते, त्याचे कारणच प्रतिक्रमण आहे. व्यवहार शुद्धीशिवाय स्यावाद वाणी निघत नाही. आधी व्यवहार-शुद्धी झाली पाहिजे.
प्रश्नकर्ता : वाणी बोलताना कशी जागृती ठेवली पाहिजे?
दादाश्री : जागृती अशी ठेवायची की ही वाणी बोलताना कोणा कोणाचे प्रमाण कशा प्रकारे खंडित होत आहे, हे पाहायचे.
प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तिबरोबर बोलताना कोणती काळजी घ्यायला हवी?
दादाश्री : एकतर 'त्यांच्या बरोबर बोलायचे असेल तर तुम्हाला