Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 80
________________ वाणी, व्यवहारात.... त्यांच्या ‘शुद्धात्म्याची' परवानगी घ्यावी लागते की त्यांना अनुकूल येईल अशी वाणी बोलण्याची मला परम शक्ति द्या. नंतर तुम्हाला दादांची परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी घेऊन बोलाल तर साधी-सरळ वाणी निघेल. असेच फटकळ बोलत राहिलात तर सरळ वाणी कशी निघेल ? ६९ प्रश्नकर्ता : असे प्रत्येक वेळी कुठे त्यांची परवानगी घेत बसणार ? दादाश्री : प्रत्येक वेळी तशी गरज भासतच नाही ना ! जेव्हा अशी चिकट (वाकडी) फाईल समोर आली तेव्हाच गरज पडते. चिकट फाईलसोबत काही बोलायचे असेल त्यावेळी, सर्वात आधी त्याच्या शुद्धात्म्याला पाहून घ्यायचे, नंतर मनात विधि बोलायची की, (1) हे दादा भगवान... (फाईलचे नाव) च्यासोबत त्याच्या मनाचे समाधान होईल अशी वाणी बोलण्याची शक्ति द्या. (2) नंतर आपल्या मनात बोलावे लागते की, 'हे चंदुभाऊ (फाईलचे नाव) च्या मनाचे समाधान होईल अशी वाणी बोला. ' आणि (3) नंतर बोलायचे की, 'हे पद्मावती देवी (फाईलचे नाव) च्या मनाचे समाधान होवो, त्यात येणारी सर्व विघ्ने दूर करा. ' प्रश्नकर्ता : कित्येक वेळा असे नाही का घडत की आपल्याला समोरच्याचा व्हयू पॉइंटच चुकीचा वाटत असतो, त्यामुळे आपली वाणी कर्कश निघते ? दादाश्री : तसे दिसते म्हणूनच बिनसते ना ! हे पूर्वग्रह वगैरे सर्व नडतात. ‘खराब आहे, खराब आहे' असा पूर्वग्रह झालेला आहे म्हणून मग जी वाणी निघते ती तशी खराबच निघेल ना ! ज्याला मोक्षाला जायचे असेल, त्याला 'असे केले पाहिजे आणि असे नाही केले पाहिजे' असे सर्व नसते. कसेही करून, वाटल्यास तडजोड करूनही चालायला लागायचे. मोक्षाला जाणारा धरुन ठेवत नाही. कसेही करून निकाल लावतो.

Loading...

Page Navigation
1 ... 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88