________________ प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्ति द्या ___ ** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे. सामायिक करण्यापूर्वीची विधि हे दादा भगवान ! हे श्री सीमंधर स्वामी प्रभू! मला शुद्ध उपयोगपूर्वक, संपूर्ण आयुष्यात झालेल्या ** दोषांचे, सामायिक, प्रतिक्रमण करण्याची शक्ति द्या. मी मन-वचन-काया, माझ्या नावाची सर्व माया, भावकर्म-द्रव्यकर्मनोकर्म, आपण प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूच्या श्रीचरणात समर्पित करीत आहे. मी मन-वचन-काया, माझ्या नावाची सर्व माया, भावकर्म-द्रव्यकर्मनोकर्मांपासून मुक्त असा शुद्धात्मा आहे. मी शुद्धात्मा आहे. (3) मी विशुद्धात्मा आहे. (3) मी परमज्योती स्वरूप सिध्द भगवंत आहे. (3) मी अनंत ज्ञानवाला आहे. (3) मी अनंत दर्शनवाला आहे. (3) मी अनंत शक्तिवाला आहे. (3) मी अनंत सुखाचा धाम आहे. (3) मी शुद्धात्मा आहे. (3) आता आपल्या आतमध्ये खोलवर उतरायचे. ** ज्या दोषांसंबंधी सामायिक करायची असेल, उदाहरणार्थ विषयविकार संबंधी दोष, क्रोध संबंधी दोष, लोभ संबंधी दोष इत्यादि.. -दादाश्री