________________
वाणी, व्यवहारात...
___६७
कशात होतो? कमी बुद्धी असलेल्याची मस्करी करण्यात! हे जोखिम जेव्हापासून मला समजले, तेव्हापासून मस्करी करणे बंद झाले. मस्करी करायची असते का? मस्करी हे तर भयंकर जोखिम आहे, गुन्हा आहे! मस्करी तर कोणाचीही करू नये.
पण तरी अशी मस्करी करण्यास हरकत नाही की ज्यामुळे कोणाला दु:ख होणार नाही आणि सर्वांना आनंद होईल. त्याला निर्दोष गंमत म्हटली जाते. तशी मस्करी तर आम्ही आजसुद्धा करत असतो, कारण मूळ जात नाही ना! पण त्यात मात्र निर्दोषताच असते!
आम्ही 'जोक' (विनोद) करतो, पण निर्दोष 'जोक' करतो. आम्ही त्याचा रोग काढतो आणि त्याला शक्तिवंत बनविण्यासाठी 'जोक' करतो, थोडी गंमत वाटते, आनंद होतो, आणि तो पुढे प्रगतिही करत जातो. बाकी तो 'जोक' कोणाला दुःख देत नाही. अशी गंमत हवी की नको? तो देखील समजतो की हे गंमत करत आहेत, मस्करी नाही.
आता आम्ही जर कोणाची गंमत केली, तर त्याचेही आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते. आम्हाला सुद्धा प्रतिक्रमण केल्याशिवाय चालेल असे नाही.
बाकी, मी तर सर्व प्रकारची मस्करी केली होती. सर्व प्रकारची मस्करी कोण करतो? ज्याचा खूप टाईट ब्रेन असेल तो करतो. मी तर लहरीने मस्करी करीत होतो सर्वांचीच, चांगल्या चांगल्या माणसांची, मोठ-मोठ्या वकिलांची, डॉक्टरांची मस्करी करायचो. आता हा अहंकार तर चुकीचाच आहे ना! हा आपल्या बुद्धिचा दुरुपयोग केला ना! मस्करी करणे ही बुद्धिची निशाणी आहे.
प्रश्नकर्ता : मला तर अजूनही मस्करी करण्याचे मन होते.
दादाश्री : मस्करी करण्यात खूप जोखिम आहे. बुद्धिमुळे मस्करी करण्याची शक्ति असतेच आणि त्याची जोखिमही तेवढी असते. म्हणजे आम्ही संपूर्ण जीवन जोखिम ओढवून घेतलेली, जोखिमच ओढवून घेत होतो.