Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 83
________________ ५५ वाणी, व्यवहारात... दादाश्री : वाणी आपोआप सुधारु शकत नाही, ती टेपरेकॉर्ड झालेली आहे. प्रश्नकर्ता : हो, म्हणूनच ना! म्हणजे व्यवस्थित झालेले आहे. दादाश्री : व्यवस्थित झालेले आहे, ते जर आता येथे 'ज्ञानी पुरुषां'ची कृपा उतरली तर त्यात परिवर्तन होते. कृपा उतरणे हे कठीण आहे. ___ ज्ञानींच्या आज्ञेमुळे सर्वकाही सुधारु शकते. कारण की भवामध्ये (संसारात) दाखल होण्यासाठी ती कुंपणासारखी आहे. भवाच्या आत दाखल होऊ देत नाही. प्रश्नकर्ता : भवाच्या आत म्हणजे काय? दादाश्री : भवामध्ये घुसू देत नाही. भवामध्ये म्हणजे संसारात आपल्याला शिरू देत नाही. मालकी नसलेली वाणी जगात असू शकत नाही. अशी वाणी सर्व आवरणे तोडून टाकते, पण त्याला ज्ञानींना खुष करता आले पाहिजे, राजी करता आले पाहिजे. ज्ञानी सर्वकाही (पापं) भस्मीभूत करून टाकतात. जर एका तासातच एवढे सारे, लाखो जन्मांचे भस्मीभूत होते, तर मग दुसरे काय नाही करू शकणार? कर्ताभावच नाही. अशी मालकी नसलेली वाणी असूच शकत नाही आणि मालकी नसलेल्या वाणीत कोणीही अशी ढवळाढवळ करू नये की 'असे होऊ शकत नाही'. खरेतर हा अपवाद नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. नंतर हिशोब काढायचा असेल तर तेही व्यवस्थित, तेही व्यवस्थित, तेही व्यवस्थित, तेही व्यवस्थित काढून मग निघेल. पण मग त्याचा हवा तसा लाभ मिळू शकणार नाही. प्रश्नकर्ता : दादाजी, पुढच्या जन्मात हे सर्व आमच्या आठवणीत आणा. दादाश्री : हो. तुम्ही निश्चय करा की मला दादा भगवानांसारखीच वाणी पाहिजे. आताची माझी ही वाणी मला आवडत नाही. म्हणजे मग त्यानुसार होईल. तुमच्या निश्चयावर अवलंबून आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 81 82 83 84 85 86 87 88