________________
५४
वाणी, व्यवहारात...
पडू तेव्हा मग तो सर्व उकरून काढतो. म्हणजे हे जग वैऱ्यांचे आहे. निसर्गाचा नियम असा आहे की प्रत्येक जीव आत वैर भाव ठेवतातच. आत परमाणू साठवून ठेवतात. म्हणून त्या केसचा आपण पूर्णपणे निकाल लावला पाहिजे.
प्रश्नकर्ता : आपण समोरच्याला अबोला तोडण्यासाठी जर असे म्हटले की माझी चूक झाली, आता मी माफी मागतो, तरीही तो आखडून बसला असेल तर काय करावे?
दादाश्री : तर आपण सांगणे सोडावे. त्याचा स्वभाव वाकडा आहे असे समजून आपण बंद करायचे. त्याला असे काही चुकीचे ज्ञान प्राप्त झाले असेल की 'बहुत नमे नादान' तिथे मग दूरच राहिले पाहिजे. नंतर जो हिशोब होईल, तो खरा. पण जी माणसं सरळ असतील ना, तिथे तर समाधान आणून टाकावे. घरात कोण कोण सरळ आहेत आणि कोण कोण वाकडे आहेत, हे आपल्याला समजत नाही का?
प्रश्नकर्ता : समोरचा सरळ नसेल तर आपण त्याच्याशी व्यवहार तोडून टाकावा?
दादाश्री : तोडू नये. व्यवहार तोडल्याने तुटत नाही. व्यवहार तोडल्याने तुटेल असे नाहीच. म्हणून आपण तेथे मौन राहावे की एखाद्या दिवशी तो चिडेल म्हणजे आपला हिशोब संपेल, आपण मौन राहिलो की मग एखाद्या दिवशी तो चिडेल आणि तो स्वत:च बोलेल की 'तुम्ही बोलत का नाही, किती दिवसांपासून मुके फिरत आहात!' असा चिडला म्हणजे मग आपला हिशोब संपला. आणखी काय मग? हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंड असतात, आम्ही सर्वांना ओळखतो. कित्येकांना खूप गरम केले तर वळतात. कित्येकांना भट्टीत ठेवावे लागते, नंतर पटकन दोन हातोडे मारल्याबरोबर सरळ होतात. हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंड आहेत! यात आत्मा हा आत्मा आहे, परमात्मा आहे आणि लोखंड हे लोखंड आहे, हे सर्व दुसरे धातू आहेत.
__ तुम्ही एकदा तरी सांगून पाहा की 'देवी' आज तर तुम्ही खूप छान जेवू घातले,' इतके बोलून तर बघा.