Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 61
________________ ५० वाणी, व्यवहारात... दादाश्री : नाही, हळूवारपणे बोलले तरी चालेल. पण हा तर हळूवार बोलला तरी दखल करून टाकतो. म्हणून तुम्ही असे म्हणायचे की, 'मी विनंती करतो, तू इतके कर ना!' त्यात शब्द जोडावा लागतो. प्रश्नकर्ता : कित्येकदा घरात मोठे भांडण होते तर तेव्हा काय करावे? दादाश्री : समंजस माणूस असेल ना, तर लाख रुपये दिले तरी भांडण करणार नाही! आणि हे तर बिन पैश्याचे भांडण करतात, तर ते अनाडी नाहीत तर आणखी काय? भगवान महावीरांना कर्म खपविण्यासाठी साठ मैल चालून अनाडी क्षेत्रात जावे लागले होते आणि आजचे लोक तर पुण्यवान आहेत की घरातच अनाडी क्षेत्र आहे ! किती भाग्यवान ! कर्म खपण्यासाठी तर हे अत्यंत लाभदायी आहे, जर सरळ राहिलात तर. __घरात कोणी विचारे ल, सल्ला मागेल तरच उत्तर द्यावे. विचारल्याशिवाय सल्ला देणे त्यास भगवंतांनी अहंकार म्हटले आहे. नवरा विचारेल, 'हा पेला कुठे ठेवायचा?' तर बायको उत्तर देते की, 'अमक्या जागी ठेवा.' तर आपण तेथे ठेवून द्यावे. त्याऐवजी तो म्हणेल की, 'तुला अक्कल नाही, इथे कुठे ठेवायला सांगतेस तू?' त्यावर मग बायको म्हणेल की, 'अक्कल नाही म्हणून तर मी तुम्हाला असे सांगितले, मग आता तुमच्या अकलेने ठेवा.' आता याचा कधी अंत येईल? हे संयोगांचे संघर्षच आहेत फक्त! प्रश्नकर्ता : पण सर्वांची बुद्धी एकसारखी कुठे असते, दादा! एकसारखे विचार नसतात. आपण चांगले केले तरी देखील कोणी समजत नाही, त्याचे काय करावे? दादाश्री : असे काहीच नाही. विचार सर्व समजतात. पण सर्वजण स्वतःला असे मानतात की माझे विचार खरे आहेत आणि बाकी सर्वांचे विचार खोटे आहेत. विचार करता येत नाही. भानच नाही तर. माणसासारखे भान पण नाही. हे तर मनात मानून बसले आहेत की मी बी.ए. झालो आणि ग्रेज्युएट झालो. पण माणूस म्हणून भान असेल तर क्लेश होणारच

Loading...

Page Navigation
1 ... 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88