Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 62
________________ वाणी, व्यवहारात... ___ ५१ नाहीत. सर्व ठिकाणी स्वतः एडजेस्टेबल होत राहील. ही दारे आपटली तेही आपल्याला आवडत नाही. वाऱ्यामुळे दरवाजे आपटतात, ते तुम्हाला आवडते का? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : मग माणसं भांडतील ते कसे आवडेल? कुत्री भांडत असतील तरीही आवडत नाही आपल्याला. हे तर कर्माच्या उदयाने भांडणे चालत राहतील, पण जीभेने वाईट बोलण्याचे मात्र बंद करा. गोष्टींना पोटातच ठेवा, घरात किंवा बाहेर बोलायचे बंद करा. बऱ्याच स्त्रिया म्हणतात, 'दोन थोबाडीत माराल ते चालेल, पण तुम्ही जे शब्द बोलता त्याने माझ्या हृदयाला घाव लागतो!' घ्या आता! स्पर्श सुद्धा करत नाही आणि तरीही घाव लागतात ! स्वतः वाकडा आहे. आता रस्त्यात छपरावरुन एक एवढासा दगडाचा तुकडा पडला, आणि रक्त निघाले तर तेथे का बोलत नाही? हे तर जाणून-बुजून तिच्यावर रुबाब दाखवायचा आहे. अशाप्रकारे नवरेपणा दाखवयाचा आहे. मग म्हातारपणी ती तुम्हाला चांगलेच(!) देणार. पतीने जर काही मागितले तर ती म्हणेल 'उगाच अशी कटकट का करता, चूपचाप झोपा ना' म्हणून मग गपचूप पडून राहावे लागते, म्हणजे अब्रूच जाते ना. त्याऐवजी मर्यादेत राहा. घरात भांडण का करता. लोकांना सांगा, समजवा की घरात भांडण करू नका. बाहेर जाऊन करा, आणि भगिनींनो तुम्ही पण करू नका हं! प्रश्नकर्ता : वाणीने काहीही क्लेश होत नसेल. पण मनात क्लेश उत्पन्न झाला असेल, म्हणजे वाणीने म्हटले नसेल, पण मनात बरेच काही साठलेले असेल, तर त्यास क्लेशरहित घर म्हणायचे का? दादाश्री : त्यास तर अधिक क्लेश म्हणतात. मन बेचैनी अनुभवते त्यावेळी क्लेश असतोच आणि नंतर आपल्याला सांगेल, 'मला चैन पडत नाही.' हीच क्लेशाची निशाणी. हलक्या प्रकारचे असेल किंवा उग्र प्रकारचे असेल. उग्र प्रकारची भांडणं तर अशी असतात की हार्ट सुद्धा फेल होऊन

Loading...

Page Navigation
1 ... 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88