________________
वाणी, व्यवहारात...
४७
म्हणून त्याला वाईट तर वाटेल, पण त्याचे सतत प्रतिक्रमण करत राहाल तर सहा महिन्यानंतर, बारा महिन्यानंतर तुमची वाणी अशी निघेल की समोरच्याला गोड वाटेल.
प्रश्नकर्ता : आम्हाला कित्येकदा समोरच्याला त्याच्या हितासाठी टोकावे लागते, थांबवावे लागते. त्यावेळी त्याला दु:ख झाले तर?
दादाश्री : हो. सांगण्याचा अधिकार आहे. पण सांगायला जमले पाहिजे. हा भाऊ आला, की त्याला पाहताच म्हणेल की 'तू असा आहेस आणि तू तसा आहेस' तेव्हा ते अतिक्रमण म्हटले जाते. समोरच्याला दुःख होईल असे जर घडले तर आपण सांगावे, 'हे चंदुभाऊ, प्रतिक्रमण करा, अतिक्रमण का केले? पुन्हा असे बोलणार नाही आणि हे बोललो त्याचा मी पश्चाताप करतो.' इतकेच प्रतिक्रमण करावे लागते.
प्रश्नकर्ता : पण ते चुकीचे बोलत असतील किंवा चुकीचे करत असतील तरीही आपण काहीही बोलू नये?
दादाश्री : बोलावे. 'असे केले नाही तर बरे, हे असे नाही झाले तर उत्तम.' असे सांगू शकतो. पण आपण त्याचे बॉस (वरिष्ठ) आहोत, अशा प्रकारे बोलत असतो ना, म्हणून वाईट वाटते. कडक शब्द असतील, ते विनयपूर्वक सांगायला हवेत.
प्रश्नकर्ता : कडक शब्द बोलताना विनय ठेऊ शकतो?
दादाश्री : ठेऊ शकतो, यालाच तर विज्ञान म्हणतात. कारण 'ड्रामेटिक'(नाटकीय) आहे ना! असतो लक्ष्मीचंद आणि म्हणतो, 'मी भतृहरि राजा आहे, या राणीचा नवरा आहे, नंतर भिक्षा दे ना मैया पिंगळा.' असे बोलून डोळ्यांमधून अश्रू काढतो. तेव्हा, 'अरे, तू तर लक्ष्मीचंद आहेस ना? तू खरं रडतोस? तेव्हा म्हणेल, 'मी कशाला खरं रडू? मला हा अभिनय करावाच लागतो. नाहीतर माझा पगार कापून घेतील.' असा अभिनय करायचा आहे. ज्ञान प्राप्तिनंतर हे तर नाटक आहे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण करायचे, ते मनाने करायचे की वाचून किंवा बोलून करायचे?