________________
वाणी, व्यवहारात...
दादाश्री : काही सुद्धा वाटत नाही. पुष्कळ वेळा मी खोटे पकडतो. मी जाणतो की हे असेच असते. याहून जास्त आशा आम्ही कशी ठेवू शकतो?
अनंत जन्मांपासून खोटेच बोलले आहे. खरे बोललेच कुठे? आपण विचारले 'कुठे गेला होता?' तर 'रस्त्यावर फिरायला गेलो होतो' असे सांगतो, आणि गेलेला असतो सिनेमाला. हो, पण मग त्याची माफी मागून घ्यावी.
प्रश्नकर्ता : परमार्थासाठी थोडे खोटे बोलले तर त्याचा दोष लागतो का?
दादाश्री : परमार्थ म्हणजे आत्म्यासाठी जे काही पण करण्यात येते, त्याचा दोष लागत नाही. आणि देहासाठी जे काही करण्यात येते, चुकीचे करण्यात आले तर दोष लागतो आणि चांगले करण्यात आले तर गुण लागतो. आत्महेतू असेल, त्यासाठी जी जी कार्ये असतील, त्यात काही दोष नाही. पण समोरच्याला आपल्या निमित्ताने दुःख झाले तर त्याचा दोष लागतो!
खोटे बोलूनही आत्म्याचे करत असाल तर हरकत नाही आणि खरे बोलूनही देहाचे हित करत असाल तर हरकत आहे. खरे बोलून भौतिक हित कराल तरीही अडचण आहे. पण खोटे बोलून आत्म्यासाठी कराल ना, तरी हितकारी ठरते.
प्रश्नकर्ता : कोणाचे चांगले काम करून देण्यासाठी आम्ही खोटे बोललो तर कोणाला दोष लागतो? असे करू शकतो का?
दादाश्री : जो खोटे बोलतो त्याला दोष लागतो.
प्रश्नकर्ता : खोटे बोलण्यासाठी कोणी दडपण आणले तर? दुसऱ्या कोणाचे चांगले होत आहे त्यासाठी तुम्ही खोटे बोला, असे कोणी दडपण आणले तर?
दादाश्री : तर असे म्हणावे की, 'भाऊ, मी तुमच्या दबावामुळे