________________
XX
वाणी, व्यवहारात...
'चंदुभाऊ'ला सांगावे, 'प्रतिक्रमण करून घ्या' खोटे बोलणे हा प्रकृति गुण आहे, म्हणून बोलल्याशिवाय राहणार नाही. खोटे बोलण्यासाठी मी विरोध करत नाही, खोटे बोलल्यानंतर जर प्रतिक्रमण केले नाही, तर मात्र मी विरोध करतो. खोटे बोललो आणि प्रतिक्रमणाचे भाव झाले, त्यावेळी जे ध्यान वर्तत असते, ते धर्मध्यान आहे. लोक धर्मध्यान म्हणजे काय, हे शोधत असतात. खोटे बोलले गेले, तर तेव्हा 'दादां 'जवळ माफी मागून घ्यावी आणि पुन्हा खोटे बोलले जावू नये, यासाठी शक्ति मागावी.
प्रश्नकर्ता : समजा जीभेने मी काही बोललो, तर त्याला माझ्याकडून तर दुःख झाले, असेच म्हटले जाईल ना?
दादाश्री : हो, पण ते दु:ख तर आपल्या इच्छेविरुद्ध झाले आहे ना, म्हणून आपण प्रतिक्रमण केले पाहिजे. हाच त्याचा हिशोब असेल, जो फेडला गेला.
प्रश्नकर्ता : आपण काही बोललो तर त्याला मनात खूप वाईट सुद्धा वाटते ना?
दादाश्री : हो, वाईट तर वाटते. चुकीचे झाले असेल तर वाईट वाटेलच ना. हिशोब फेडावा लागतो, तो तर फेडावाच लागतो ना, त्यातून सुटकाच नाही ना!
प्रश्नकर्ता : अंकुश राहत नाही म्हणून वाणीद्वारे निघून जाते.
दादाश्री : हो. ते निघून जाते. पण निघून गेल्यावर त्याचे आपण प्रतिक्रमण करावे, बस, दुसरे काही नाही. पश्चाताप करावा आणि 'पुन्हा असे करणार नाही' असा निश्चय सुद्धा केला पाहिजे.
नंतर रिकाम्या वेळी त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रतिक्रमण करतच राहायचे. म्हणजे मग सर्व नरम पडते. ज्या ज्या कठिण फाईली आहेत, तेवढ्याच नरम करायच्या आहेत, तशा दोन-चार फाईलीच कठिण असतात, जास्त नसतात ना!