________________
वाणी, व्यवहारात...
बाहेरचे तर तुम्ही पाहाल ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा तुमच्याच आत असलेले सर्व तुम्ही पाहत राहाल, त्यावेळी तुम्ही केवळज्ञान सत्तेत असाल. पण ते अंश केवळज्ञान आहे, सर्वांश नाही. आत वाईट विचार येतात त्यांना पाहावे, चांगले विचार येतात त्यांनाही पाहावे. वाईटावर द्वेष नाही आणि चांगल्यावर राग नाही. आपल्याला चांगले-वाईट पाहण्याची गरज नाही. कारण मुळात ती सत्ताच आपल्या ताब्यात नाही.
____7. सत्य-असत्यामध्ये वापरली वाणी
प्रश्नकर्ता : मस्का मारणे, हे सत्य आहे ? हो ला हो मिळवणे, हे सर्व?
दादाश्री : त्यास सत्य म्हणता येणार नाही. मस्का मारण्यासारखी वस्तुच नाही. हा तर स्वतःचाच शोध आहे, स्वत:च्या चुकीमुळे तो दुसऱ्याला मस्का मारत राहतो.
प्रश्नकर्ता : कोणासोबत गोड बोलले तर त्यात फायदा आहे का? दादाश्री : हो, त्याला सुख वाटते !
प्रश्नकर्ता : पण मग नंतर जेव्हा त्याला माहित पडते तेव्हा तर खूप दुःख होत असेल. कारण काही खूप गोड बोलणारे असतात आणि काही सत्य बोलणारे असतात, तर आपण असे म्हणतो ना, की हा गोड बोलतो पण त्यापेक्षा तो जरी खराब बोलतो पण तो चांगला माणूस आहे.
दादाश्री : सत्य बोलणारा कोणास म्हणता येईल? एक भाऊ त्याच्या आईला खरं बोलला, एकदम सत्य बोलला. तो आईला काय म्हणतो? 'तू माझ्या बापाची बायको आहेस' असे म्हणतो, हे सत्य नाही का? तेव्हा आईने काय म्हटले? पुन्हा कधी तुझे तोंड दाखवू नकोस, चालता हो येथून! मला तुझ्या बापाची बायको म्हणतोस.
अर्थात सत्य कसे असले पाहिजे? प्रिय वाटेल असे असले पाहिजे. फक्त प्रिय वाटेल असे असले तरी देखील चालणार नाही. तर ते हितकारी सुद्धा असले पाहिजे, एवढ्यानेही भागणार नाही. मी सत्य, प्रिय आणि