Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 37
________________ वाणी, व्यवहारात... कोणी म्हणणार नाही. हा प्रतिध्वनी आहे कशाचा तरी. हा माझा स्वत:चाच प्रतिध्वनी आहे. म्हणून उपकार मानतो. हे जग प्रतिध्वनी स्वरुप आहे. काहीही समोर आले तरी ते तुमचेच परिणाम आहेत, याची शंभर टक्के गॅरन्टी लिहून देतो. म्हणून आम्ही उपकारच मानतो. तेव्हा तुम्ही सुद्धा उपकार मानले पाहिजे ना? आणि तरच तुमचे मन खूप चांगले राहील. हो, उपकार नाही मानलेत तर त्यात तुमचा पूर्ण अहंकार वर येऊन द्वेष उत्पन्न होईल. त्यात समोरच्याचे काय नुकसान होणार आहे ? तुम्ही तुमचे दिवाळे काढले. 5. वाणी, आहेच टेपरेकॉर्ड वाणीचीच तर सर्व झंझट आहे. वाणीमुळेच तर ही सर्व भ्रांती जात नाही. म्हणेल ‘हा मला शिव्या देतो.' म्हणून तर वैर संपतच नाही ना! प्रश्नकर्ता : इतकी सर्व भांडणे होतात, शिव्या देतात तरीही लोक मोहामुळे सर्व विसरुन जातात आणि मला तर कोणी दहा वर्षांपूर्वी काही बोलले असेल तरीही लक्षात राहते आणि मग मी त्याच्यासोबत नातंच तोडून टाकतो. दादाश्री : पण मी काही नातं तोडूत टाकत नाही. मी जाणतो की याची नोंद(अत्यंत राग किंवा द्वेषासहित दिर्घकाळापर्यंत आठवणीत ठेवणे. नोंदून ठेवणे) ठेवण्यासारखी नाही. जणू रेडिओ वाजत आहे असेच मला वाटत असते. उलट मनात हसू येते. म्हणून मी उघडपणे संपूर्ण जगाला सांगितले की, ही ओरिजिनल टेपरेकॉर्ड बोलत आहे. हे सर्व रेडिओ आहेत. मला जर कोणी सिद्ध करून दाखवले की 'ही टेपरेकॉर्ड नाही' तर हे सर्व ज्ञानच खोटे आहे. करूणा कशाला म्हणतात? समोरच्याच्या मूर्खपणावर प्रेम राखणे त्यास, आणि मूर्खपणावर वैर ठेवणे, ते तर संपूर्ण जग ठेवतच असते. प्रश्नकर्ता : पण तो जेव्हा बोलत असतो, तेव्हा तर असे वाटत नाही की, तो मूर्खपणा करत आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88