Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 40
________________ वाणी, व्यवहारात... उच्च जातीत लोक काठ्या घेऊन मारामारी करीत नाहीत. तिथे तर सर्व वाणीचेच धमाके! पण आता याला जिंकल्यावर काही उरते का? म्हणून मी असा खुलासा केला की वाणी ही रेकॉर्ड आहे, असे बाहेर खुलासा करण्याचे कारण काय? तर तुमच्या मनातून वाणीची किंमत निघून जाईल. आम्हाला तर कोणी वाटेल ते बोलले ना, तरी त्याची जरा सुद्धा किंमत नाही. मी जाणतो की हा बिचारा कसे काय बोलणार आहे? तो स्वतःच भोवरा आहे ना! आणि ही तर रेकॉर्ड बोलत आहे. तो तर भोवरा आहे, त्याच्यावर दया करण्यासारखी आहे! प्रश्नकर्ता : ‘हा भोवरा आहे' हे त्यावेळी लक्षात राहत नाही. दादाश्री : नाही, सर्व प्रथम तर 'वाणी रेकॉर्ड आहे' असे ठरवा. नंतर 'हा बोलत आहे ते 'व्यवस्थित' आहे. ही फाईल आहे, तिचा समभावे निकाल करायचा आहे.' हे सर्व ज्ञान अगदी त्याचवेळी हजर राहिले ना, तर आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. जे काही बोलत आहे ते 'व्यवस्थित'च आहे ना? आणि रेकॉर्डच बोलत आहे ना? तो स्वतः तर बोलत नाही ना आज? म्हणूनच कोणताही मनुष्य मुळीच जबाबदार नाही आणि भगवंतांना असे दिसले आहे की, कोणताही जीव कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीच. कोणी गुन्हेगारही नाही, हे भगवंतांनी पाहिले होते. या दृष्टीमुळे भगवंत मोक्षाला गेले. आणि लोकांनी गुन्हेगार आहे असे बघितले, त्यामुळे जगात भटकत राहतात. बस एवढाच दृष्टीचा फरक आहे! प्रश्नकर्ता : हो, पण ही जी दृष्टी आहे ती आतमध्ये फीट होऊन जावी, यासाठी काय पुरुषार्थ करावा? दादाश्री : पुरुषार्थ काहीच करायचा नाही. यात तर 'दादाजी'ची ही गोष्ट' एकदम खरी आहे. आणि यावर जसजसा उल्हास येत जातो तसतसे फीट होत जाते आत. म्हणून आता असे ठरवून टाका की दादाजींनी जसे सांगितले आहे तसेच आहे, ही वाणी टेपरेकॉर्डच आहे. आता याचा अनुभव घ्या. तो धमकावत असेल त्यावेळी आपल्याला मनात हसायला येईल, असे काहीतरी करा. कारण की खरेतर वाणी टेपरेकॉर्डच आहे आणि हे आता

Loading...

Page Navigation
1 ... 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88