Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 38
________________ वाणी, व्यवहारात... दादाश्री : त्या बिचाऱ्याच्या हातात सत्ताच नाही. टेपरेकॉर्ड वाजत राहते. लगेच आमच्या लक्षात येते की ही टेपरेकॉर्ड वाजत आहे. जोखिमदारी समजली असती तर तो बोललाच नसता ना! आणि टेपरेकॉर्ड पण वाजणार नाही. __कोणी आपल्याला असे शब्द म्हटले की 'तुम्ही गाढव आहात, मूर्ख आहात' तर ते आपल्याला विचलीत करता कामा नये. 'तुम्हाला अक्कल नाही' असे जर कोणी मला म्हटले तर मी म्हणेन की, 'ही गोष्ट तुला कळली, ते चांगलेच झाले. मला तर हे पूर्वीपासूनच माहित आहे. तुला तर आज समजले.' आणि मग मी म्हणतो, चल 'आता दुसरी गोष्ट कर, त्यामुळे मग समाधान होईल की नाही? ह्या अकलेला जर तोलायला बसलो तर तराजू कोठून आणायचा? वजने कोठून आणायची? वकील कोठून आणायचा? त्याऐवजी आम्ही सरळ सांगतो की, 'भाऊ, हो अक्कल नाही, हे तुला तर आज समजले पण आम्ही तर आधीपासूनच हे जाणतो. चल, आता पुढचे बोलूया.' तर याचे निराकरण होईल. समोरच्याची गोष्ट मनात धरुन ठेवण्यासारखी नाही आणि हे सर्व शब्द तर टेपरेकॉर्ड बोलत असते. आणि कारण शोधल्यामुळे काय झाले? हे कारण शोधल्यामुळेच जग उभे राहिले आहे. कशातच कारण शोधू नका. हे तर 'व्यवस्थित' आहे. 'व्यवस्थित शक्ति'च्या बाहेर कोणी काही बोलणार नाही. विनाकारण त्याच्यासाठी तुम्ही जे मनात धरुन बसता, ती तुमची चूक आहे. संपूर्ण जग निर्दोष आहे. निर्दोष पाहून मी तुम्हाला सांगत आहे की निर्दोष आहे. कशामुळे निर्दोष आहे जग? शुद्धात्मा निर्दोष आहे की नाही? तेव्हा दोषित कोण वाटतो? हा पुद्गल. आता पुद्गल उदय कर्माच्या आधीन आहे, आयुष्यभरासाठी. म्हणून उदयकर्मात जसे असेल तसे तो बोलतो, यात तुम्ही काय कराल?! पाहा तरी, दादाजींनी किती सुंदर विज्ञान दिले आहे की कधी भांडणच होणार नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88