________________
वाणी, व्यवहारात...
म्हणजे हिशोब नाही, तर कोणी शिव्या देणारच नाही ना! आणि हिशोब आहे, तर कोणी सोडणारही नाही. ____ आता आपला इतका पुरुषार्थ शेष उरला आहे की 'हसत मुखाने विष पिऊन टाका.' एखाद्या दिवशी मुलासोबत काही मतभेद झाला, मुलगा विरोध करत असेल, तर मग तो जो 'पेला' देईल, तो प्यावा तर लागेलच ना! रडून रडून सुद्धा प्यावा तर लागेलच ना? तो 'पेला' काय त्याच्या डोक्यावर थोडाच मारु शकतो? प्यावा तर लागेलच ना?
प्रश्नकर्ता : बरोबर, प्यावाच लागतो.
दादाश्री : जग रडून रडून पीते. आपण हसून प्यावे! बस, एवढेच सांगितले आहे.
समोरचा काय बोलला, कठोर बोलला, त्याचे आपण ज्ञाता-दृष्टा. आपण काय बोललो, त्याचेही 'आपण' ज्ञाता-दृष्टा.
एखाद्याने तुम्हाला शिवी दिली तर ते काय आहे? त्याने तुमच्यासोबत असलेला व्यवहार पूर्ण केला. समोरचा जे काही करतो, नमस्कार करत असेल, किंवा शिव्या देत असेल, तर ते सर्व तुमचाच, तुमच्यासोबत असलेला व्यवहार तो ओपन(उघडा) करत आहे. अशावेळी व्यवहाराला व्यवहाराने छेदावे. आणि व्यवहार एक्सेप्ट(मान्य) करावा. तेथे तू न्याय शोधू नकोस. न्याय शोधशील तर गुंता वाढवशील.
प्रश्नकर्ता : आणि जर आपण कधी शिवी दिलीच नसेल तर?
दादाश्री : जर शिवी दिली नसेल तर समोरुन शिवी मिळणार नाही. पण हा तर मागचा पुढचा हिशोब आहे, म्हणून दिल्याशिवाय राहणारच नाही. वहीत जमा असेल तरच समोर यईल. कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला, तो हिशोबाशिवाय होत नाही. परिणाम, हे पेरलेल्या बीजाचे फळ आहे. इफेक्ट (परिणाम)चा हिशोब, तो व्यवहार.
व्यवहार म्हणजे काय? तर नऊ असेल त्यास नऊने भागावे. नऊला जर बाराने भागले तर व्यवहार कसा चालेल?