Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 31
________________ वाणी, व्यवहारात... म्हणून आम्ही दुसरा मार्ग दाखवतो की टेप झाले की लगेच पुसून टाकायचे, तरीही चालेल. प्रतिक्रमण हे पुसायचे साधन आहे. यामुळे एखाद्या जन्मात फेरबदल होऊन बोलायचे सर्व बंद होऊन जाईल. हा 'सच्चिदानंद' शब्द बोलल्याने खूप इफेक्ट(प्रभाव) होतो. समजल्याशिवाय बोलले तरीही इफेक्ट होतो. जर समजून बोलले तर खूपच फायदा होतो. हे शब्द बोलल्याने स्पंदने उभी होतात आणि आत मंथन होते. हे सर्व सायन्टिफिक आहे. प्रश्नकर्ता : 'काम करायचे नाही' असे बोलले, तर यात काय घडते? दादाश्री : मग आळस येतो. आपोआपच आळस येतो आणि 'करायचे आहे' असे म्हटल्यावर सर्व आळस कुठल्या कुठे पळून जातो. मी 'ज्ञान' होण्या आधीची गोष्ट सांगतो. मी पंचवीस वर्षाचा होतो, तेव्हा जर माझी तब्येत चांगली नसली आणि कुणी विचारले की, 'कशी आहे तुमची तब्येत?' त्यावर मी म्हणायचो की, 'खूप चांगली आहे.' आणि दुसऱ्या कोणाची तब्येत जरी चांगली असली आणि आपण त्याला विचारले की, 'कशी आहे तुमची तब्येत?' तेव्हा म्हणतो, 'ठीक आहे.' अरे बाबा, 'ठीक आहे' असे म्हणतो, म्हणून पुढे जाणार नाही. म्हणून मग मी 'ठीक' शब्दच उडवून टाकला. हा शब्द नुकसान करतो. आत्मा 'ठीक' होऊन जातो मग. त्याऐवजी 'खूप चांगले' म्हटल्यावर आत्मा 'चांगला' होऊन जातो. बाकी, लोकांना वाटते की दादा खोलीत जाऊन निवांत झोपतात. पण ह्या गोष्टीत काही तथ्य नाही. पद्मासन घालून एक तासापर्यंत बसतात आणि ते सुद्धा सत्त्याहत्तराव्या वर्षी पद्मासन घालून बसणे. पाय सुद्धा सहजच वळतात आणि त्यामुळे डोळ्यांची शक्ति, डोळ्यांचा प्रकाश, हे सर्व आज पण सुरक्षित राहिले आहे. कारण मी कधीही प्रकृतिची निंदा केली नाही. तिची तक्रार कधीही केली नाही. अपमान केला नाही. लोक तक्रार करून अपमान

Loading...

Page Navigation
1 ... 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88