Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 28
________________ वाणी, व्यवहारात... करता? म्हणून आपण असे म्हणावे की, 'नाही, नाही. हे तर लाभदायी आहे.' तेव्हा मग हे सर्व भाव शांत होतात. हे टेपरेकॉर्ड आणि ट्रान्समीटर अशी कित्येक साधने आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मोठमोठ्या माणसांना सतत भीती वाटत असते की कोणी काही रेकॉर्ड करून घेतले तर? आता या टेपरेकॉर्डरमध्ये तर फक्त शब्द टेप होतील इतकेच आहे. पण या मनुष्याचे शरीर-मन हे सर्वच टेप होईल असेच आहे. याची लोकांना जरासुद्धा भीती वाटत नाही. समोरचा जरी झोपेत असेल आणि तुम्ही म्हणाल की 'हा नालायक आहे' तर ते त्याच्या आत टेप होऊन गेले. ते मग त्याला फळ देते. म्हणून कोणी झोपलेला असतानाही बोलू नये, एक अक्षरही बोलू नये. कारण की सर्व टेप होत असते, अशी ही मशीनरी आहे. बोलायचे असेल तर चांगले बोला की 'साहेब, तुम्ही खूप चांगले आहात.' चांगला भाव ठेवा तर त्याचे फळ तुम्हाला सुख मिळेल. पण सहज जरी उलटे बोलाल, अंधारात जरी बोलाल, की एकटे असतानाही बोलाल तरी त्याचे फळ विषासारखे कडू येईल. हे सर्वच टेप होणार आहे म्हणून चांगले टेप होईल असे करा. जेवढे प्रेममय डीलिंग (व्यवहार) होईल तेवढीच वाणी या टेप रेकॉर्डमध्ये परवडेल अशी आहे, त्याचे यश चांगले मिळेल. न्याय-अन्याय बघणारा तर पुष्कळ लोकांना शिव्या देत असतो. हे तर बघण्यासारखेच नाही. न्याय-अन्याय तर एक थर्मामीटर आहे या जगाचे, की एखाद्याचा ताप किती उतरला आणि किती चढला?! जग कधीच न्यायी बनणार नाही आणि अन्यायी सुद्धा होणार नाही. म्हणजे हा गोंधळ असाच चालत राहणार. हे जग जेव्हापासून आहे, तेव्हापासून असेच्या असेच आहे. सत्युगात थोडे कमी बिघडलेले वातावरण असते, परंतु आता तर जास्त बिघडलेले आहे. श्रीरामाच्या काळात जर सीतेचे हरण करणारे होते, तर आता नसतील का? असे तर चालतच राहणार. पूर्वीपासून ही मशीनरी अशीच आहे. आणि त्यांना काही सुचत नाही, स्वत:च्या जबाबदारीचे भान

Loading...

Page Navigation
1 ... 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88