Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 23
________________ वाणी, व्यवहारात... एकता आहे, तोपर्यंत त्याची शक्ति आहे. म्हणून सांभाळावे लागते. आपण ज्या प्रयोगशाळेत बसलो आहोत, तेथील सर्व प्रयोग पाहावे लागतात ना! प्रश्नकर्ता : हे अंतराय कसे पडतात? दादाश्री : हा भाऊ कोणाला तरी नाश्टा देत असेल, तेव्हा तुम्ही म्हणाल की, 'आता राहू दे ना, उगाच वाया जाईल.' त्यास अंतराय (विघ्न) पाडले असे म्हणतात. कोणी दान देत असेल तेथे तुम्ही म्हणाल की, 'याला कशाला देता? हा तर हडपून टाकेल असा आहे.' तर इथे तुम्ही दान देण्याचे अंतराय पाडले. मग तो दान देईल किंवा नाही देणार, ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही मात्र अंतराय पाडला. त्यामुळे तुम्हाला दुःखातही कोणी दाता मिळणार नाही. ___ तुम्ही ज्या ऑफीसमध्ये नोकरी करत असाल तेथे तुमच्या असिस्टंन्टला 'बेअक्कल' म्हणालात तर तुमच्या अकलेवर अंतराय पडले! बोला, आता या अंतरायात फसत-फसत हा मनुष्य जन्म असाच वाया घालवला आहे! तुम्हाला अधिकारच नाही समोरच्याला बेअक्कल म्हणण्याचा. तुम्ही असे बोलल्यावर समोरचा सुद्धा वाईट बोलतो, म्हणून त्यालाही अंतराय पडतात! सांगा आता, या अंतरायापासून हे जग कसे बरे थांबेल? तुम्ही जर कोणाला नालायक म्हटले, तर तुमच्या लायकी वर अंतराय पडतो. तुम्ही जर त्याचे लगेचच प्रतिक्रमण केले तर अंतराय पडण्याअगोदरच धुतले जातील. प्रश्नकर्ता : वाणीने अंतराय पाडले नसतील, परंतु मनाने अंतराय पाडले असतील तर? दादाश्री : मनाने पाडलेले अंतराय जास्त परिणामकारक असतात, त्याचा परिणाम तर दुसऱ्या जन्मात होतो. आणि हे वाणीने बोललेले तर ह्या जन्मातच परिणाम करते. प्रश्नकर्ता : ज्ञानांतराय, दर्शनांतराय कशामुळे पडतात? दादाश्री : धर्मात उलट-सुलट बोलतात, 'तुम्ही काहीच समजत

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88