Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 22
________________ वाणी, व्यवहारात... समोरच्यासाठीही विरोधकर्ताच आहे. कारण समोरचा आपल्यासोबत एकता अनुभवू शकत नाही. प्रश्नकर्ता : जर कधी स्थूलपणे झिडकारले गेले असेल तरीसुद्धा लगेच प्रतिक्रमण होऊनच जाते. दादाश्री : हो, झिडकारल्यानंतर त्याचे प्रतिक्रमण करायचे. आणि दुसरे म्हणजे, पुन्हा त्याच्याशी चांगले बोलून गोष्ट वळवून घ्यावी. आम्हाला मागच्या जन्मांचे आत दिसते तेव्हा आश्चर्य वाटते की ओहोहो, झिडकारण्याचे किती भयंकर नुकसान आहे ! म्हणून मजुरांचा सुद्धा तिरस्कार वाटू नये असे आम्ही वागतो. शेवटी साप बनूनही चावेल, तिरस्काराचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. प्रश्नकर्ता : कोणता उपाय करावा की ज्यामुळे झिडकारण्याचा परिणाम भोगण्याची पाळीच येऊ नये? __दादाश्री : यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही, मात्र सतत प्रतिक्रमण करतच राहायचे. जोपर्यंत समोरच्याचे मन बदलत नाही तोपर्यंत प्रतिक्रमण करत राहायचे. आणि तो प्रत्यक्ष भेटल्यावर गोड बोलून त्याची माफी मागावी की, 'भाऊ, माझी तर फार मोठी चूक झाली. मी तर मूर्ख आहे, बेअक्कल आहे.' असे म्हटल्याने समोरच्या व्यक्तिचे घाव भरतात. आपण स्वत:ला कमी लेखले म्हणजे समोरच्याला बरे वाटते, तेव्हा त्याचे घाव भरुन निघतात. प्रश्नकर्ता : पाया पडूनही माफी मागून घ्यावी. दादाश्री : नाही. पाया पडलो तर गुन्हा ठरेल. तसे नाही, दुसऱ्या प्रकारे वाणीने वळवा. वाणीने घाव लागले असेल तर वाणीनेच फिरवा. पाया पडल्यामुळे तो जर माथेफिरु असेल तर परत त्याचा चुकीचा अर्थ घेईल. मला अनेक प्रकारचे लोक भेटतात. पण मी त्यांच्यासोबत एकता तुटू देत नाही. एकता तुटली तर त्याची शक्ति उरत नाही. जोपर्यंत माझी

Loading...

Page Navigation
1 ... 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88