Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 12
________________ वाणी, व्यवहारात... [1] दुःखदायी वाणीचे स्वरुप प्रश्नकर्ता : ही जीभ अशी आहे की, घटक्यात असे बोलून टाकते, घटक्यात तसे बोलून टाकते. दादाश्री : त्याचे असे आहे, या जीभेत असा कोणताही दोष नाही. ही जीभ तर आत जे बत्तीस दात आहेत ना, त्यांच्यासोबत राहते, रात्रंदिवस काम करते परंतु भांडत नाही, झगडत नाही. म्हणजे जीभ तर खूप चांगली आहे पण आपण वाकडे आहोत. आपण ऑर्गनाइजर (व्यवस्थापक) वाकडे आहोत. चूक आपलीच आहे. जीभ तर खूप चांगली आहे, या बत्तीस दातांमध्ये राहते तरी ती कधी चावली जाते का? ती केव्हा चावली जाते? तर जेवतांना आपले चित्त दुसरीकडे गेले असेल तेव्हा जरा चावली जाते. आणि जर आपण थोडेसे वाकडे असू तरच चित्त दुसरीकडे जाते. नाहीतर चित्त दुसरीकडे जात नाही, आणि जीभ तर खूप छान काम करते. ऑर्गनाइजरने असे जरा तिरके पाहिले की जीभ दातात चावली गेली समजा. प्रश्नकर्ता : जीभेवर माझा ताबा राहील असे करा ना! कारण मी जास्त बोलतो. दादाश्री : तसे तर मी सुद्धा दिवसभर बोलतच असतो. तुमच्या बोलण्यात असे काही वाक्य तर येत नाही ना, की ज्यामुळे कोणी दुखावले जाईल? तोपर्यंत बोलणे वाईट म्हटले जात नाही. प्रश्नकर्ता : पण या शब्दांमुळे खूप भांडणे होतात.

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88