Book Title: Bhagawan Mahavir Smaranika 2009
Author(s): Mahavir Sanglikar
Publisher: Jain Friends Pune

View full book text
Previous | Next

Page 20
________________ पाले येथे एक प्राचीनतम गृहाभिलेख आढळून येतो व या गृहाभिलेखाची सुरुवात 'नमो अरहंताणम्' या शब्दांनी झालेली आहे. महाराष्ट्रात जैन धर्म इ.पूर्व तिसऱ्या व चौथ्या शतकापासून मध्ययुगापर्यंत अविकल्प रूपाने लोकप्रिय राहिलाआहे. जैन कला व साहित्याचे विविध प्रकाराचे आयाम या कालखंडामध्ये दृष्टिगोचर होतात. एलोरा येथील गुंफांची कलात्मकता व विस्तार या दोन गोष्टी इतिहासाची अनुपम देणगी आहे. अनेक गण गच्छ यांची स्थापना करण्याचे व त्यांचा विकास करण्याचे श्रेय महाराष्ट्राच्याच वाट्याला जाते. जैन आचार्यांचे कर्मक्षेत्रदेखील महाराष्ट्र हेच आहे. भट्टारक संप्रदायाचा विकासही येथे उल्लेखनीय आहे. मध्ययुगातच येथे ग्रंथ भांडारांची स्थापना केली गेली. भित्तीचित्रांची संरचना झाली आहे. काही संप्रदायांच्या हिंसक व्यवहारामुळे जरी जैन संघाला अनेक आघात सहन करावे लागेल तरी ते जैन संघाचे अस्तित्व समाप्त करू शकले नाहीत. मुस्लिम आक्रमणांच्या काळात जैन धर्मावर आघात झाले. तरी सक्षमतेने जैन धर्माने आपले अस्तित्व राखले. मराठी भाषेच्या विकासाकरिता प्राकृताचे फारच योगदान राहिलेले आहे. मराठी साहित्याचा आरंभदेखी जैन कवीपासूनच झाला आहे. त्यांनी इ.स. १६६९ पासून या क्षेत्रात अधिक कार्य केले आहे. जिनदास, गुणराज मेघराज, कामराज, सुरीराज, गुणनदि, पुष्पसागर, महीचंद्र, महाकितीं, जिनसेन, देवेंद्रकिर्ती, कलप्पा, भामापन व इतर जैन साहित्यकारांनी मराठी साहित्यनिर्मीती केली आहे. हे साहित्य बहुतांशी अनुदित दिसून येते. जनजातींच्या सर्वेक्षणाने से समजते की महाराष्ट्रात जैन धर्म पुष्कळच लोकप्रिय होता. जैन कलार, कासार व काही जनजाती ज्या एका वेळेस जैन धर्मामध्ये परिवर्तत झाल्या होत्या परंतु नंतर पुन्हा या जातींचा वैदिक धर्माकडे कल झुकत गेला. आजही या जातीच्या आचाराविचारात जैन धर्माचीच " झलक दिसून येते. जातीमध्ये जैन धर्माचा आग्रह राहिला असता ते लोक जैन जातींचे म्हणून गणले गेले असते. महाराष्ट्रात जैन समाज विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात विखुरला गेला आहे. सध्या दिगंबर, श्वेतांबर हे दोन्हीही संप्रदाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. दिगंबर संप्रदाय येतील मुख्य संप्रदाय म्हणून दिसून येतो. श्री. केतकर यांच्या 'महाराष्ट्री जीवन' या ग्रंथावरून हे स्पष्ट होते. ग्रामीण भागात यांची संख्या जास्त आहे. शेती व व्यापार हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. वैदिक संस्कृतीशी मिळताजुळता त्यांचा आचारविचार आहे. तरी जैन सांस्कृतिक वारशाला ते धरूनच आहेत. म्हणूनच त्यांची स्वतंत्र ओळख आहे. ज्ञानेश्वरी तसेच महानुभाव पंथ साहित्यामध्ये जैनांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारावर हे स्पष्टपणे म्हणता येते की महाराष्ट्रात जैनांची संख्या अन्य प्रदेशांपेक्षा जास्त आहे. जवळजवळ १० लाख जैन महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात २९.४२ टक्के जैनांची लोकसंख्या आहे. मुंबई, बेळगाव व कोल्हापूरमध्येच सुमारे सात लाख जैन आहेत. यानंतर सांगली, ठाणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, नागपूर, पुणे इत्यादी शहरांची नावे येतात. महाराष्ट्र या दृष्टिने एक महत्त्वपूर्ण प्रदेश म्हटला जातो. जिथे आजसुद्धा जैन संस्कृती सर्वाधिक समृद्ध असलेली दिसून येत आहे. साहित्य, कला, संस्कृती व इतर विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला जैन समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान आढळून येते. रमशाळा रसवंती गुलकंद शतावरी क BRAHY PRASH चंदनयुक्त उटणे पूर्ण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बाह्योपचारार्थ रसवंती- दातांच्या आरोग्यासाठी, आयुर्वेद शाळा वर्शक असले नारीसाठी उत्तम मराठी नेली -सर्वांनी आरोग्यासाठी ब्रह्मविद्या मित्र गुलकंद-शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी पाददारी मन-पायांच्या भेगांसाठी, शतावरी कल्प-शकीवर्धक सर्व केमिस्ट व आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध आयुर्वेद रसशाळा * २५ करोड पुणे ४. फोन : ०२०-२५४४०८९३/२५४४००१६. फॅक्स : ०२०-२५४४०७९६. e-mail : ayurrasa@vsnl.net १८ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ रसशाळा

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84