Book Title: Bhagawan Mahavir Smaranika 2009
Author(s): Mahavir Sanglikar
Publisher: Jain Friends Pune

View full book text
Previous | Next

Page 41
________________ भ. पार्श्वनाथांचे मूर्तिशास्त्र : एक अभ्यास प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासामध्ये कला आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे गतकालीन श्रद्धा, जीवनमूल्ये आणि मानवी संस्कृतीचे अनेकविध पैलू उलगड शक्य होऊ शकते. या प्रकारच्या सांस्कृतिक अध्ययनामध्ये जैन विद्या हा प्राच्यविद्यांमधील एक उपेक्षित पैलू होय. श्री श्रेयांसप्रसाद जैन म्हणतात, 'जैन धर्म हा पूर्णपणे विकसित झालेला धर्म असून त्याची स्वयंभू सांस्कृतिक प्रतिमा आहे.' त्यामुळे जैन मूर्तिशास्त्राचा अभ्यास करतानाही हाच दृष्टीकोन समोर ठेवावा लागतो. समाजशास्त्रीय दृष्टीकोन : डॉ. विलास संगवे यांनी जैन समाजाचे समाजशास्त्रीय आकलन करून त्यांच्या आचारविचारावर नवा प्रकाश टाकला आहे. लोकांच्या श्रद्धा आचार-विचार आणि त्यांच्या जीवनशैलीचे आकलन करताना नवा समाजशास्त्रीय दृष्टीकोन पोषक ठरू शकतो. " प्रा. ई. एच. लाँगहर्स्ट म्हणतात, " जैन लोकांनी निसर्गरम्य परिसरात लेणी कोरण्याची परंपरा विकसित केली. कारण त्यांना नागरी वस्तीपासून दूर आणि ध्यानधारणेस पोषक अशा स्थळांची निवड करावयाची होती. ' पार्श्वनाथांची गुहा मंदिरे कोरतानाही हाच दृष्टीकोन कलाकरांनी ठेवला आहे. सत्य शिव व सुंदर या भारतीय कला उद्दिष्टांशी सुसंगत अशी जैनांनी आपली उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. उत्कर्ष, सौंदर्य व विवेकाची अभिव्यक्ती करणे ही भारतीय जैन कलेची मूलभूत उद्दिष्टे आहेत. मूल्यप्रधान अभिव्यक् हे जैन कला व मूर्तिशास्त्राचे वैशिष्ट्य होय. जेव्हा उत्कर्ष व सौंदर्याला विवेकाची जोड लाभते, तेव्हा कलात्मक अभिव्यक्तीचा आविष्कार होतो, असे जैन परंपरा मानते. पार्श्वनाथांच्या मूर्तिशास्त्रामध्ये या तीनही मूल्यांची अभिव्यक्ती होत असल्याचे दिसून येते. पार्श्वनाथांचे स्थान : तीर्थंकर म्हणजे मानवाला मुक्तीचा मार्ग दर्शविणारा तत्त्वचिंतक असतो. जैन परंपरा ही २४ तीर्थंकर मानते. २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आदिनाथ, २३ वे पार्श्वनाथ आणि भगवान महावीर हे २४ वे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. पुरातत्त्वज्ञांच्या मते या तीन महामानवांचे कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचे सबळ पुरावे भारत वर्षात आढळून येतात. पार्श्वनाथ जीवन व कार्य : पार्श्वनाथ ह्या तीर्थंकराच्या मूर्ती भारतभर अनेक लेणी मंदिरात आहेत. वेरूळ येथील सर्व ५ जैन लेण्यांमध्ये ह्या मूर्ती आहेत. वेरूळच्या लेणे क्र. ३०मध्ये मुख्य गर्भगृहाच्या बाजूस पार्श्वनाथांच्या प्रतिमा आहेत. त्यावर ७ फण्यांचा नाग रक्षण करत असल्याचे नोंदविले आहे. पार्श्वनाथ व महावीर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ऐतिहासिक महापुरुषांनीच जैन धर्मास निश्चित आकार प्राप्त करून दिला. पार्श्वनाथांच्या माता-पित्याचे नाव राणी वामादेवी व राजा अश्वसेन असे होते. पार्श्वनाथांचा जन्म काशीनगरीत झाला. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३९ - डॉ. वि. ल. धारूरकर महावीरांपूर्वी २५० वर्षे म्हणजे इ.स.पू. ८५०च्या सुमारास पार्श्वनाथ होऊन गेले. अयोध्येचा राजा प्रसेनजीत यांच्या प्रभावती नामक कन्येशी त्यांचा विवाह केला होता. तरुण वयातच संसारत्याग करून त्यांनी संन्यासधर्म स्वीकारला. पार्श्वनाथ तप करत असताना पूर्वजन्मी वैरी असलेल्या व आता असूर झालेल्या कमठाने त्यांच्यावर दुष्ट बुद्धीने पाण्याचा भयंकर वर्षाव केला. परंतु पूर्वीच्या जन्मात उपकृत झालेल्या नागराजाने पार्श्वनाथांवर आपल्या ७ फणांची छत्री धरली व त्यांचे रक्षण केले. पार्श्वनाथ या तीर्थंकरांचे चिन्ह सप्तफणाधारी नाग असून त्यांच्या मूर्तीच्या डोक्यावर तो कोरलेला असतो. केवळ ज्ञान प्राप्तीनंतर पार्श्वनाथांनी धर्मोपदेश आरंभीला व आपल्या अनुयायांची संघटना उभारली. साधू-साध्वी, श्रावक श्राविका असा चतुर्विध संघ त्यांच्या अनुयायी वर्गात होता. पार्श्वनाथ वयाच्या १०० व्या वर्षी बिहारमधील सम्मेद शिखरावर मोक्षास गेले. ती जागा आज पारसनाथ टेकडी या नावाने ओळखली जाते. पार्श्वनाथांच्या अनेक मूर्तीवरून त्यांचे वेगळेपण सिद्ध होते. त्यांच्या अनेक मूर्ती देशभर आढळतात. पार्श्वपंथीय म्हणजे पासावचिज्ज नावाचा साधू संघ महावीराच्या काळातही होता. महावीरांचे माता-पिता हे याच संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांनी व त्यांचा पुत्र महावीरानेही या संप्रदायाची दीक्षा घेतली होती. महावीरांच्या सुधारित संप्रदायाला जिन

Loading...

Page Navigation
1 ... 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84