________________
वैचारिक क्षेत्रातही दुराग्रहाचे वातावरण वाढण्याऐवजी समंजसपणाचे वातावरण वाढले. त्यांनी जातीव्यवस्थेवर हल्ला चढविला आणि सर्व जातीजमातीच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले.
सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा म्हणून अशी भावना असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला. त्यांचे विचार गणधर म्हटल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रमुख शिष्यांनी ग्रंथ रूपाने संकलित केले होते. परंतु नंतर ते लुप्त झाले. महावीरांनंतर सुमारे एक हजार वर्षांनी (इ.स. सुमारे ४५४ मध्ये ) या ग्रंथाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तत्त्वज्ञानातील क्लिष्ट कल्पना स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत असत. त्यांना गणित, भूमिती व ग्रहताऱ्यांच्या हालचाली विषयीच्या ज्योतिष या शास्त्रातही रस होता आणि या विषयावर त्यांनी आपले विचारही मांडले होते.
'महावीर चरित्र' म्हणजे साधुचरित्राचा प्रथम आदर्श असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इ. गुणांची परमावधी महावीरांच्या ठायी झाली होती असे ते म्हणतात. स्वाभाविकच भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये महावीरांचा अंतर्भाव होता. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. काही लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात. अश्विन वद्य अमावस्येला मध्यरात्री महावीरांना राजगृहाजवळील पावा वा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवतला सुरुवात झाली. '
डॉ. आ. ह. साळुंखे यांचं हे लेखन बहुतांशी श्वेतांवर ग्रंथांवर आधारित असून
त्यांनी श्री अमरचंदा, मुनीरत्नप्रभ विजय, श्री. जगदीशचंद्र जैन, सरी विजयेंद्र अशांच्या भ महावीरांवरील अनेक ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. डॉ. साळुंखे यांनी त्यांच्या लेखनात काही लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात' असे जे एक विधान केलेले आहे ते अपुऱ्या माहितीवर आधारलेले आहे. श्वेतांबर जैन पर्युषण पर्वात आचार्य भद्रबाहू यांच्या यांच्या 'कल्पसूत्र' या ग्रंथाचे वाचन करत असतात. या ग्रंथातील भ. महावीरांच्या जीवन चरित्राचे जे वाचन होते त्यातील त्यांच्या जन्मोत्सवाचा भाग पर्युषण पर्वातील पाचव्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला होत असते. हा पाव दिवस म्हणजे महावीर जयंती नव्हे तर भ. महावीरांच्या 'जन्म कल्याणका'चं वाचन, चिंतन, मनन करण्याचा हा दिवस. ही एक गोष्ट वगळली तर डॉ. आ. ह. साळुंखे यांनी भ. महावीर व त्यांनी प्रसारित केलेला जैन धर्म यांचा परिचय तसा मोजक्या व नेटक्या शद्वात शक्यतो सुसंगतपणे करून दिलेला आहे. त्यांचा हा लेखन प्रपंच भ. महावीर व जैन धर्म याविषयी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथात जी जी विधाने केलेली आहेत त्या बहुतेक सर्वांना केवळ छेद देणारा नसून त्यावर यथार्थ प्रकाश टाकणारा आहे. एवढ्यासाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी 'मराठी विश्वकोश', खंड तेरावा, यामध्ये जे सांगितले आहे ते सर्वच येथे दिलेलं आहे. वाचकांना नीटसे पडताळून पाहता यावं यासाठी हा एवढा प्रपंच.
लक्ष्मणशास्त्री जोशी यांना आता विचारावा, तर आज ते हयात नाहीत.
हरमन याकोबी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भ. महावीर व जैन धर्म यावर विपुल लेखन व संशोधन झालेलं आहे. त्या पूर्वीच्या काळी तसं ते तुलनेने कमी होतं. तथापि जर्मन पंडि हरमन याकोबी या संशोधकानं अति प्राचीन जैन आगमांचा व ग्रंथांचा सर्वांगीण व सखोल अभ्यास यथाशक्ती निष्ठेनं व अविरतपणे करून जैन धर्माला त्याचं वेगळं स्वतंत्र स्थान व अस्तित्व असल्यानं सप्रमाण प्रतिपादलं, हे तसं एक अद्वितीय ऐतिहासिक कार्य झालेलं आहे. वैदिक व बौद्ध धर्माचा त्याचा अभ्यासही असाच अथक होता. जैनचार्यांनीही असं महान कार्य या आधी यानंतरही केलं. पण जितकं जावं तितकं लक्ष याकडे गेलं नव्हतं व नाही. याकोबीनं जे काही संशोधन केलं ते पुढं कुणा ना कुणा विद्वानाकडूनन झालंही असतं. पण याकोबीनं केलेलं संशोधन स्वातंत्र्यपूर्व काळात केलं व स्वातंत्र्योत्तर काळातील संशोधनाला त्याची दिशा मिळाली. यासाठी याकोबीच्या संशोधनाचं महत्त्व कमी लेखता येणार नाही व नाकारताही येणार नाही. पाश्चात्यविषयी वाटणारी ही अवास्तव कळकळ अथवा अप्रिय मानसिकता मानून ही वस्तुस्थिती जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पूर्णतः धुडकावता वा दुर्लक्षिता येणार नाही. याकोबीचं हे संशोधन तसं असाधारण आहे. कारण याने प्रस्थापित वैदिक निष्कर्ष बाजूला सारून सत्य उजेडात आणण्याचा सर्वात अधिक प्रयत्न केलेला आहे. यासाठी जैनांना या तत्त्वचिंतकाचं व इतिहास संशोधकांचं ऋण विसरता येणार नाही!
'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथाचे लेखक व 'मराठी विश्वकोश' या महाप्रकल्पाचे संपादक एकच आहोत ही गोष्ट तशी येथे लक्षणीय आहे. 'संपादक लेखकांच्या मताशी' सहमत नसतात अशी प्रकारची टीप अनेक नियतकालिकातून व संपादित ग्रंथातून वाचावयास मिळते. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या निवेदनाशी आपण सहमत आहात काय असा प्रश्न तर्कतीर्थ
भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३१