Book Title: Bhagawan Mahavir Smaranika 2009
Author(s): Mahavir Sanglikar
Publisher: Jain Friends Pune

View full book text
Previous | Next

Page 29
________________ आर्थिक स्थिती भक्कम आहे. अशी कोणतीच नोकरी, पद, धंदा, संपत्ती सुरक्षित व अबाधित नाही. देशाचे पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, लक्षाधीश असो, बँकेतील नोकरी वा अगदी दाऊद इब्राहिम असो कोणाला कायमची स्थिरता आहे काय? असे असताना आणखी एक मृगजळ म्हणजे सुरक्षितता. स्थिरता याच्या मागे आपण उगाचच पळत असतो. दरवेळेला कोणासारखे तरी व्हायलाच पाहिजे काय? क्रिकेट आनंदासठी खेळायचा की फक्त सचिन तेंडुलकर होण्यासाठी हे सुद्धा एका महिन्याच्या क्लासमध्ये. सचिन तेंडुलकर, आईन स्टाईन, न्यूटन, वालचंद हिराचंद, बिल गेटस्, नारायण मूर्ती, बेथोवेन, ओबामा या सर्व मंडळीनी स्वतःला आवडेल तेच केले. त्यांना स्वत:वर ठाम विश्वास होता. प्रचंड मेहनत केली व जगत विख्यात झाले. त्यांना आयुष्याचा सूर गवसला. आपण जर मुलांकडून दरवेळेला अभ्यासात १०० टक्क्यांची अपेक्षा करत असू तर त्यांचीही अपेक्षा आपल्याकडून सर्वात जास्त श्रींमत असण्याची का असू नये ? जर विचारले की आपल्याकडे दहा गाड्या, दहा बंगले, स्वतः चे विमान का नाही तर त्याला आपल्याकडे उत्तर आहे काय? अपेक्षा करणे सोपे आहे पण मग त्यांच्या अपेक्षेला आपल्याकडे उत्तरे आहेत काय? दरवेळेला मुलांनी कसोटीला उत्तमच उतरायला पाहिजे. या स्पर्धेत त्याच्या आपल्याकडून अपेक्षेचे काय याचे प्रामाणिकपणे आपण उत्तर देऊ शकतो का? उत्तम आरोग्य, सत्याचे महत्त्व, नीतीमूल्ये, श्रद्धा आणि चांगले संस्कार याची खरी गरज जास्त आहे. एक वेळ अतिशय उंचीवर पोहोचणे सोपे आहे. पण तिथे टिकणे अतिशय अवघड असते. पतंग उंच उडू शकतो पण त्याला टिकवून ठेवते ती दोरी. आयुष्यात त्या दोरीचे काम आपल्यावरचे झालेले 'संस्कारच' करते. जैन तत्त्वज्ञान संयम, समताभाव ठेवणे व अपरिग्रही असणे शिकवते. पूर्व जन्माच्या केलेल्या कर्मामुळे या जन्मी मेहनतीचे फळ मिळू शकत नाही तेव्हा थयथयाट न समताभावनेने श्रम करत राहणे ही शिकवण देते. व्यवहारात अशा अनेक व्यक्तिची उदाहरणे दिसतात की ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात जैन धर्माच्या तत्त्वांचे पालन करून, स्वाध्याय करून ती तत्त्वे अंगी उतरवली व त्यानुसार आचरण करून कठीण परिस्थितीत न डगमगता उलट संयमाने, समताभावाने त्या कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांचे, कुटुंबियांचे व स्वत:चे सफल, सार्थक जीवन घडविले. शिक्षण असे असावे, जे स्वतःच्या आवडीचे व निवडीचे असेल आणि ज्यातून ज्ञान मिळेल, फक्त मार्क नाही. असे करिअर म्हणजे नोकरी किंवा धंदा जी आवडीची किंवा निवडीची आहे आणि त्यात खूप भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! जितेंद चुडीवाल ९४२१६८५७७७ ९४२१३१२७२६ विक्रेते : सिमेंट, फर्शी, कडप्पा, जालीदार पत्रे बिल्डिंग मटेरीअल इत्यादी. मु.पो. शिऊर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद मेहनत पडली तरीही काम केल्यानंतरही शीण पडणार नाही व त्यातून उत्तम ज्ञान मिळेल. श्रम पडतील पण ताणतणाव जाणवणार नाही. आरोग्य चांगले राहील व पाल्य एक सुसंस्कृत नागरिक बनेल. पैसा समृद्धी येईलच पण बरोबर समाधान व सुख असेल व स्वतः सर्वांगीण सक्षम असाल तर निश्चितच 'सिक्युरिटी' पण येईल. या लेखाचा उद्देश, पालकांना व पाल्यांना विचार करायला लावणे, त्यांच्यातील तृष्णा जागी करणे आहे. याला उत्तर ज्याचे त्यांनी विचार करून शोधायचे आहे. अनेकान्तवादाच्या नजरेने आयुष्य पाहिले व नुसतेच तो पळत आहे म्हणून मी पळायचे असे नाही केले तर ही जीवघेणी स्पर्धा थांबेल व ही तीन पायांची शर्यत थांबून एक सुंदर आणि आनंददायी अशा दोन पायांची शर्यंत सुरू होईल. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | २७ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! में. पल्लवी जितेंद्र ट्रेडर्स ट्रेडिंग कंपनी ܀܀ प्रो. कैलाश दिपचंद लोहाडे ९४२१४१७३४० निरज ९८६००४८३४३ जनरल मर्चंट अॅण्ड कमिशन एजंट मार्केट यार्ड, शिऊर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. (महाराष्ट्र) फोन : ०२४३६- (दु.) २८४३९१, (नि.) २८४२६७

Loading...

Page Navigation
1 ... 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84