Book Title: Bhagawan Mahavir Smaranika 2009
Author(s): Mahavir Sanglikar
Publisher: Jain Friends Pune

View full book text
Previous | Next

Page 25
________________ माणूस स्वतःशीच लढून क्षीण होतो. जो क्षीण होतो. जो आपल्या डाव्या व उजव्या हाताची लढाई लावून देतो, तो कोणाचे यश चिंतणार? आपण स्वतःच आकर्षित होतो, पुन्हा तो स्वतःच स्वतःला परावृत्त करतो. पुन्हा आपणच आपल्या विरुद्ध जातो. त्यामुळे त्याचे व्यक्तित्व दुभंगते. अशा दुभंगलेल्या व्यक्तित्वाला मनोचिकित्सक सिजोफ्रेनिया म्हणतात. खंडित व्यक्तिमत्वाचे स्वरूप स्वतः स्वतःच्या विरुद्ध वागणे याला खंडित व्यक्तिमत्व म्हणतात. कषायोद्रेकाच्या भरात माणूस अनुचित बोलतो वागतो. मागाहून त्याला त्याबद्दल खंत वाटते. कधी कधी तो खोटे बोलतो. पण आतून त्याला ते बरे वाटत नाही. कधी तो कुणाशी कपट करतो. कुणावर अन्याय करतो. पण त्याबद्दल मन टोचत रहाते. अशा अंत: कलहाला खंडित व्यक्तित्व म्हणतात. पाप कशाला म्हणायचे? ज्या क्रियेमुळे मनाला टोचणी लागते तेच पाप. मग जिथे दमनामुळे, त्यागामुळे मन सतत अस्वस्थ राहते. आपण हे सोडले, ते सोडले असा विचार येऊन मनाला रुखरुख लागते, तो कसला त्याग ? अन् अशा त्यागात पुण्य कोणते? खरे तर ज्या वस्तूचा आपण कृतीने त्याग करतो त्या वस्तूबद्दल नंतर आपल्याला मनातून ओढ वाटता कामा नये. कोणत्याही त्यागामध्ये मन, वचन, कृतीची एकवाक्यता असेल तरच तो त्याग आहे. अन् तरच ते पुण्य आहे. एरव्ही मनाची असंतुष्टता ही पापकारकच आहे. - आहे हे ज्याला मनापासून पटले असा माणूसच शांत समाधानी असू शकतो. कारण त्याला आता आपल्या मनाशी झगडावे लागत नाही. व्रत उपवासांनी इंद्रियांची शक्ती त्याला मुद्दाम क्षीण करावी लागत नाही. खरे तर वासना क्षीण करण्यासाठी इंद्रियांची शक्ती क्षीण करावी लागत नाही. खरे तर वासना क्षीण करण्यासाठी इंद्रियांची शक्ती क्षीण करणे हा मनोविजयाचा मार्ग नव्हे. दीर्घकाल आजारी असलेल्या माणसाच्या मनातही कामवासना जागृत होत नाही. म्हणून त्याने काम जिंकला असा त्याचा अर्थ नाही. पण व्रत-उपवासांनी शरीर क्षीण करणारा साधक मात्र असा भ्रम बाळगतो की मी वासनांचे निर्मूलन केले. पण असे वासनांचे निर्मूलन होत नाही. फक्त त्या क्षीण होऊन योग्य संधीची वाट पहात मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसतात. तशा जन्मजन्मदेखील त्या दडून बसतात. पण शरीर पूर्ण समर्थ आहे अन् तरीही ज्याचा आपल्या मन, इंद्रियावर ताबा आहे तो खरा संयमी. महावीरांच्या दृष्ट म्हणजे आत्मवान संयमी म्हणजे ज्याचा विवेक सतत जागृत आहे तो. ज्याचे चित् शांत, निष्कंप झाले आहे, तो. संयमाचा शरीराशी, शरीर क्षीण करण्याशी काहीएक संबंध नाही. संयमाची सारी प्रक्रिया शरीरमनाच्या पलीकडे जाण्याची आहे. आमचे इंद्रमय जीवन - आम्ही द्वंद्वांत जगत असतो. म्हणून आमचे मन एका अतिकडून दुसऱ्या अतिकडे तत्काळ धाव घेते. इकडे आम्ही कुणाशी मैत्री करतो तोच दुसरीकडे शत्रुत्व निर्माण होते. कुणावर प्रेम करतो, तर त्याचवेळी कुणाचा तिरस्कार वाटू लागतो. दोन्हीपैकी एक गोष्ट निवडली की दुसरी गोष्ट अपरिहार्यपणे आपल्याला चिकटते. आपल्या इच्छा, अनिच्छेचा हा प्रश्न नाही, तर जीवनाचा मुळी हा नियमच आहे. म्हणून महावीरांनी एक असंबंधित भाव स्वीकारला. हे सत्य लक्षात घेऊन आपण त्यांच्या वचनांचा अर्थ लावला पाहिजे. जेव्हा ते म्हणतात, माझा सर्वांशी भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | २३ संयमाचा परंपरागत अर्थ असा चालत आला आहे की, जो स्वतःच्या वासना, विकारांशी झगडत असतो, तो संयमी पण जो अशा मार्गाने मनोनिग्रह साधतो तो साधक वृत्तीने कठोर बनतो. कारण विकारांना दडपण्यात मनातील कोमल भावनांचा निपटारा सहजच होतो. असा साधक दुसऱ्यांच्या प्रमादाकडे क्षमाशील दृष्टीने पाहू शकत नाही. वास्तविक संयम म्हणजे समज. अंडरस्टँडिंग. वासनाचे कोड पुरवणे व्यर्थ मैत्रीभाव आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा की, ना कोणी माझा मित्र आहे, ना कोणी शत्रू आहे. हे दोन्ही भाव वगळता एक तटस्थभाव, मध्यस्थभाव शिल्लक उरतो. म्हणून द्वंद्वातीत झालेल्या महावीरांसारख्या विभूतींचे आकलन होणे आम्हा सामान्यांना फार कठीण पडते. आम्ही ज्या भाषेचा शब्दांचा उपयोग करतो. तीच भाषा, तेच शब्द त्यांना वापरावे लागतात. पण त्यामागील भावार्थ वेगळा असतो. हे लक्षात घेऊन आम्ही संयम या शब्दाचा अर्थ लावायला हवा, संयम म्हणजे मनाची स्थिरता, ज्या स्थितीमध्ये मन कोणत्याही अतिकडे झुकत नाही. ना भोगाकडे ना त्यागाकडे ना वासनेकडे ना दमनाकडे. ज्या अवस्थेमध्ये मन वचन कृतीची एकवाक्यता असते. ज्या स्थितीमध्ये मन विवेकाधिष्ठित असते. ज्या स्थितीमध्ये स्वभावाची सतत जाणीव असते, अशा नित्य जागरूक अवस्थेचे नाव आहे, संयम With Best Compliments From Paras Gandhi Jayesh Gandhi 9822442882 Gandhi Plywood Dealers in Plywood, Flashdor, Lipping Patti and allied products | Shop No. 6, 774, Bhawani Peth, Navin Hindi High School Premises, Pune, Maharashtra, Ph. : 020-66023846

Loading...

Page Navigation
1 ... 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84