Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
जैनविद्येचे विविध आयाम ( स्फुट - चिंतनात्मक लेख)
भाग
-
१
* लेखन व संपादन
डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन
सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ
ऑगस्ट २०११
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन,
पुणे विद्यापीठ
जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख)
* लेखन व संपादन *
डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन
ऑगस्ट २०११
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
* जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट - चिंतनात्मक लेख)
* लेखक व संपादक डॉ. नलिनी जोशी
* प्रकाशक
फिरोदिया प्रकाशन एच्.एन्.जैन अध्यासन, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ
* सर्व हक्क स्वाधीन
* प्रथमावृत्ति : जुलै २०११
* खाजगी वितरणासाठी
पुस्तक उपलब्ध होण्याचे स्थान : सन्मति - तीर्थ
८४४, शिवाजीनगर, बी.एम्. सी. सी. रोड, फिरोदिया हॉस्टेल, पुणे - ४११००४ फोन नं. (०२०) २५६७१०८८
* मुद्रक :
कल्याणी कॉर्पोरेशन
१४६४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३० फोन : (०२०) २४४७१४०५
* अक्षर संयोजन : श्री. अजय जोशी
*
मुखपृष्ठ आणि पृष्ठ संरचना : कु. प्राची म्हस्के
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
पुणे विद्यापीठातील सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्राध्यापिका डॉ. श्रीमती नलिनी जोशी यांचा ‘जैनविद्येचे विविध आयाम' हा प्रस्तुत लेखसंग्रह (खंड - १) मला अनेक कारणांसाठी महत्वाचा वाटतो. मुळात जैन धर्म आणि तत्त्वज्ञान अत्यंत प्राचीन काळापासून किमान वेदकाळापासून कदाचित् वेदपूर्व काळापासून सुद्धा अस्तित्वा आहे. त्याने मानवी जीवनाच्या व संस्कृतीच्या अनेक अंगोपांगांना नुसता स्पर्श केला असे नसून त्यात प्रविष्ट हेऊन आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यामुळे अभ्यासकांना 'जैनविद्या' नावाची स्वतंत्र विद्याशाखाच निर्माण करावी लागली. डॉ. जोशी यांनी शोधबुद्धीने व चौकसपणाने जैनविद्येच्या या बहुविध आयामांचा धांडोळा घेत जैन धर्म, तत्त्वज्ञान आणि आचार यांचे विविध पैलूंचे दर्शन या लेखांमधून घेतलेले आहे. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वालाही, त्यांची मदत घेत पुरेसा वाव दिला आहे. डॉ. के.वा. आपटे यांच्या जैनांच्या बहात्तर कला (किंवा अधिक) कलांवर प्रकाश टाकणाऱ्या दीर्घ लेखाचा समावेश करून जैनविद्येला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, हे औचित्यपूर्णच म्हणावे लागेल. दुसरे असे की या लेखांमधील विवेचनामुळे जैन धर्माचे पालन करणाऱ्यांना मार्गदर्शन होऊ शकते तसेच जैनेतर बांधवांच्या जैनधर्मासंबंधीच्या जिज्ञासेचे समाधानही होऊ शकते. अर्थात् याचा अर्थ हे केवळ माहिती देणारे, प्राथमिक व बोळबोध लेखन आहे असा मात्र नाही. डॉ. जोशी યાંના સન્મતિ-તીર્થ વ માંડારા પ્રાવિદ્યા સંસ્થા યેથીહ શોધાર્યાના પ્રદ્દીર્ધ અનુમવ આહે. ત્યામુઝે ત્યાંવ્યા लेखांतून संशोधनाचे नवेनवे मुद्दे ठायीठायी डोकावताना दिसतात. त्यांनी फक्त त्याचे अवडंबर माजवण्याचे व संशोधकीय शिस्तीच्या नावाखाली क्लिष्टता आणण्याचे कटाक्षाने टाळले आहे.
मध्यपूर्वेतील यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे तीन धर्म एकाच सेमिटिक परंपरेत वाढले. त्याचप्रमाणे भारतात वैदिक (हिंदू), जैन आणि बौद्ध धर्म हे एकाच सांस्कृतिक पार्श्वभूमीवर विकसित झाले. किंबहुना आजची भारत संस्कृती या तीन धर्मांच्या परस्पर प्रभावातून निर्माण झाली आहे, असे म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे या धर्मात आपणास साम्यभेदांची व संघर्षसमन्वयाची अनेक स्थळे आढळून येतात. व्यापक आणि तटस्थ दृष्टिकोन असल्याशिवाय ती लक्षात येणार नाही. डॉ. जोशी यांच्या लेखामधून हा दृष्टिकोन आढळतो. त्यामुळे प्रस्तुत लेखसंग्रह वाचल्यानंतर जैनजिज्ञासेचे समाधान तर होतेच परंतु एकूणच भारतीय संस्कृतीविषयीची आपली जाणीव समृद्ध होते.
जैनविद्या या विषयाचा आवाकाच व्यापक असल्यामुळे त्यात जैन तीर्थंकर, ग्रंथ, इतिहास, समाज इ. अनेक बाबींवरील लेखन समाविष्ट झालेले आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण ज्या काळात वावरत आहोत त्या काळाचे भान कोठेही सुटलेले दिसत नाही. किंबहुना जैनांची प्रत्येक गोष्ट डॉ. जोशी आधुनिक संदर्भात उजळून घेतात. साहजिकच पुस्तक वाचल्यानंतरची वाचकांची प्रतिक्रिया पुराणवस्तुसंग्रहालय पाहून होत असते, तशी न होता, ‘वर्तमान वास्तवाशी आपण जोडले गेलो आहोत', अशीच होते. विशेषतः सद्य:काळातील युवक-युवतींची भूमिका, अवस्था व अपेक्षा यांची दखल घेऊनच डॉ. जोशी मांडणी करताना दिसतात. विशेष म्हणजे या मांडणी पुरेशी स्पष्टता आहे. अनावश्यक गौरवाची व उदात्तीकरणाची त्यांना कोठेही आवश्यकता वाटलेली दिसत नाही.
डॉ. जोशी यांचे हातून अशा प्रकारचे लेखनसंशोधन यापुढेही विपुल होत राहो, अशा शुभेच्छा देण्यात माझ्यासारख्या जिज्ञासू वाचकाचा फायदाच आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हांला विनासायास समजतील.
सदानंद मोरे तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, ३ ऑगस्ट २०११
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
मनोगत
सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाची स्थापना १७ जुलै १९७६ रोजी झाली. अध्यासनाच्या मूळ उद्दिष्टात नोंदवल्याप्रमाणे, 'जैनविद्येच्या विविध शाखांमध्ये मूलगामी संशोधन' हे उद्दिष्ट जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विविध व्याख्याने, पुस्तिका, चर्चासत्रे, स्पर्धा इत्यादींच्याद्वारे 'जैनविद्येविषयी लोकजागृति'-हे उद्दिष्टही महत्त्वाचे आहे.
२ जुलै २००७ रोजी माझी मानद नियुक्ती, 'जैन अध्यासन प्राध्यापिका' म्हणून पुणे विद्यापीठातर्फे करण्यात आली. २००७ ते २०१० या कालखंडात अध्यासनाच्या अंतर्गत झालेले संशोधनकार्य प्रकाशित केले आणि देशीपरदेशी अभ्यासकांना यथाशक्ती वितरितही केले.
_ 'जैनविद्येचे विविध आयाम' या पुस्तकाद्वारे अध्यासनाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या उद्दिष्टाच्या पूर्तीचा आनंद अनुभवीत आहे. भांडारकर-प्राच्य-विद्या-मंदिर आणि सन्मति-तीर्थ या संस्थांशी विशेष निगडित असल्याने जैन समाजाशी आणि विशेषत: जैन महिलावर्गाशी माझा संपर्क गेल्या २५ वर्षांपासून राहिला आहे. पर्युषणपर्व आणि महावीरजयंती या दोन विशेष प्रसंगी स्थानकात, मंदिरात, स्वाध्यायी शिबिरात, सामाजिक संस्थांत, मासिक पत्रिकंस, वृत्तपत्रांत आणि आकाशवाणीवर अनेक भाषणे, व्याख्याने, लेख, चर्चासत्रे घडून आली. जैन अध्यासनाच्या द्वारे व्याख्यान-मालिका आणि ‘फाउंडेशन कोर्सेस' घेतले. विशेष खबरदारी अशी घेतली की जैनविद्येची विविध अंगे त्यातून लोकांसमोर यावीत. महाराष्ट्रातल्या जैन समाजाने व्याख्याने आणि लेखमालांना उदंड प्रतिसाद दिला. स्फुट-चिंतनाचा हा रंगीबेरंगी पुष्पगुच्छ त्यातुनच तयार झाला.
या पुस्तकात एकूण २१ लेखांचा समावेश आठ विभागात करून दिला आहे. जैनविद्येचा विचार येथे मुख्यतः तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, समाज आणि तौलनिक चिंतनाच्या द्वारे मांडला आहे. लोकप्रिय पद्धतीचे लेखन असल्याने अर्थातच संदर्भक्रमांक, ग्रंथसूची, क्लिष्ट पारिभाषिक संकल्पनांचा वापर हेतुपूर्वक टाळला आहे. परंतु यातील चिंतन मूलगामी आधारांना सोडून असणार नाही याची काळजी घेतली आहे.
मला याची पूर्ण जाणीव आहे की जैनविद्येची कितीतरी अंगे अगर आयाम या पुस्तिकेत समाविष्ट नाहीत. जैन मंदिरे व शिल्पे, शिलालेख, हस्तलिखिते, जैन न्याय, जैन पंथोपंथांचा इतिहास - ह्या आणि अशा अनेक आयामांनी जैनविद्येचे देशी-परदेशी अभ्यासक आजमितीस जैनविद्येच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य करीत आहेत.
कालिदासाच्या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे हा प्रयत्न म्हणजे, 'छोट्या होडीने समुद्र तरून जाण्याचे साहस' करण्यासारखे आहे. तरीही आत्तापर्यंत लेख-व्याख्यानांना मिळालेल्या प्रतिसादावरून असे वाटते की जैन व जैनेतर जिज्ञासू वाचक या प्रयत्नाची नक्की दखल घेतील.
वेगवेगळे विषय वेळोवेळी सुचवून चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या महाराष्ट्रातील जैन समाजाला मन:पूर्वक धन्यवाद
जय जिनेंद्र
नलिनी जोशी जैन अध्यासन-प्रमुख
पुणे विद्यपीठ
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
विभाग १ : कोशासाठी विशेष लेख (१) जैन परंपरा
( संस्कृति - दर्शन कोश, पुणे)
(२) जैन परंपरेतील स्त्रीविचार (समाज विज्ञान कोश, पुणे)
विभाग २ : तत्त्वज्ञान
(३) 'चिंतन' (भाग १ ते ४ ) : आकाशवाणी पुणे केंद्र (४) जैन दर्शनातील 'पुनर्जन्म' संकल्पना
विभाग ३ : भगवान् महावीर (५) महावीरांच्या दृष्टीने 'वीर' कोण ? (६) महावीरवाणीतून भेटलेले महावीर
अनुक्रमणिका
विभाग ४ : जैन साहित्य
(७) जैन साहित्याची संक्षिप्त ओळख
(८) 'प्राकृत' म्हणजे काय ? जैनांनी 'प्राकृत' का शिकावे ?
(९) जैन साहित्यातील कथाभांडार
(१०) जैन प्राकृत साहित्य : काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे
(११) जैनांनी जपलेली ऋषिवचने
विभाग ५ : जैन इतिहास (१२) जैन ऐतिहासिक साहित्य (१३) जैन पुराणातील राजे
विभाग ६ : जैन समाजदर्शन
(१४) जैन तत्त्वज्ञान आणि जैन समाजातील परिवर्तने (१५) जैन चातुर्मास : काही निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा (१६) जैन धर्मग्रंथात 'स्त्री'चे स्थान
विभाग ७ : जैन धर्म आणि आधुनिकता (१७) जैन धर्मातील वैज्ञानिकता
(१८) भ. महावीरांचे तत्त्वज्ञान : आधुनिक संदर्भात
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
विभाग ८ : तौलनिक विचार (१९) जैन आणि हिंदू धर्म : साम्यभेदात्मक निरीक्षणे (२०) उत्तराध्ययन आणि धम्मपद (२१) जैनधर्म आणि शीखधर्म : काही तुलनात्मक निरीक्षणे (२२) जैनांच्या आगमग्रंथांतील बहात्तर कला
(डॉ.के.वा.आपटे, सांगली)
**********
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
१. जैन परंपरा ('संस्कृति-दर्शन' या संस्कृतिकोषासाठी प्रदीर्घ लेख, मे २०११)
(१) प्राक्कथन :
जैनधर्म हा केवळ तत्त्वज्ञान अथवा आचारपद्धतीपुरता मर्यादित नाही. जीवन जगण्याची ती एक पूर्ण स्वतंत्र शैली आहे. ब्राह्मण अथवा वैदिक परंपरेइतकी किंबहुना त्याच्याही पूर्वी प्रचलित असलेल्या श्रमण परंपरेची ही एक शाखा आहे. जैन परंपरेला स्वत:चा स्वतंत्र असा एक इतिहास आहे. दार्शनिक दृष्ट्या जैनधर्म हा निरीश्वरवादी, बहुतत्त्ववादी आणि वास्तववादी आहे. अहिंसा, कर्मसिद्धांत आणि अनेकांतवाद हे जैन तत्त्वज्ञानाचे आधार आहेत. जैन आचार्यांनी विविध प्रकारच्या प्राकृत बोलीभाषांमध्ये लेखन करून भारतीय साहित्याला अनमोल योगदान केले आहे. आचाराच्या दृष्टीने साधुआचार आणि गृहस्थांचा आचार अशी नियमबद्ध आखीव-रेखीव आचारपद्धती जैन समाजात प्राचीन काळापासून चालत आली आहे. आजही बऱ्याच अंशाने ती जशीच्या तशी पाळली जात आहे.
सामान्यतः निवृत्तिगामी अथवा मोक्षलक्षी मानल्या गेलेल्या या जैन परंपरेने धर्मप्रभावनेसाठी म्हणून कलेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गुंफा, चैत्य, स्तूप, मूर्ती, मंदिरे, चित्रकला, स्तंभलेख आणि शिलालेख व शिल्पे यांच्या रूपाने भारतीय कलेला जैनांनी मोठेच योगदान दिलेले आहे. गेल्या काही दशकामध्ये जैनॉलॉजी अर्थात जैनविद्या ही अभ्यासशाखा देशात व परदेशात झपाट्याने वृद्धिंगत होत आहे. आरंभापासून आतापर्यंत अल्पसंख्यांक असूनही या समाजाने एकाचवेळी आपली पृथगात्मकताही जपली आहे आणि भारतीय संस्कृतीशी एकात्मकताही साधली आहे.
(२) 'जैन' शब्दाचा अर्थ :
'जैन' हा शब्द 'जिन' शब्दावरून साधलेला आहे आणि जिन हा शब्द संस्कृतमधील 'जि' या क्रियापदापासून बनलेला आहे. जिन म्हणजे जेता, जिंकणारा. राग अथवा आसक्ति जिंकतो तो जिन. जिन हा शब्द चोवीसही तीर्थंकरांचे बाबतीत समानपणे वापरला जातो. या जिनांनी प्रणीत केलेले ते 'जैनदर्शन' होय. जिनांनी सांगितलेल्या मार्गामध्ये रत असणारा, जिनप्रणीत मार्गाचे आचरण करणारा तो 'जैन' होय. जिनांनी प्रणीत केलेले मत अथवा तत्त्वज्ञान म्हणजे 'आर्हत मत' अथवा 'आर्हत दर्शन' होय.
(३) जैनधर्माची उत्पत्ती व प्रारंभिक विकास :
जैनधर्माची उत्पत्ती आणि विकास पाहण्यासाठी प्रथम जैन तत्त्वज्ञानातील कालचक्र ही संकल्पना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने विचार केला तर ते अनादि-अनंत आहे. व्यावहारिक दृष्टीने २० कोडा-कोडी (२० कोटी X २० कोटी) सागरोपम वर्षे हा प्रदीर्घ काळ कालचक्राच्या एका परिवर्तनाचा आहे. ज्या संख्यांची गणती करता येत नाही अशा संख्यांना जैनशास्त्रात उपमेच्या द्वारे (सागरोपम, पल्योपम) स्पष्ट करण्याचा प्रघात आहे. कालचक्राची अशी अनंत आवर्तने होऊन गेली आहेत व पुढेही होणार आहेत.
प्रत्येक कालचक्राचे अवसर्पिणी (वरून खाली येणारा) व उत्सर्पिणी (खालून वर जाणारा) असे दोन अर्धभाग असतात. प्रत्येक अर्धभागामध्ये समान असे सहा-सहा आरे असतात. वर्तमान कालचक्राच्या अवसर्पिणी भागाच्या तिसऱ्या आऱ्याच्या शेवटी प्रथम तीर्थंकर ऋषभदेव' अथवा 'आदिनाथ' हे होऊन गेले. चौथ्या आऱ्याच्या प्रारंभी चावीसावे तीर्थंकर भ. महावीर होऊन गेले. या दोन काळांच्या दरम्यान मधील बावीस तीर्थंकर होऊन गेले.
२४ तीर्थंकरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) ऋषभदेव (२) अजितनाथ (३) संभवनाथ (४) अभिनंदन (५) सुमतिनाथ (६) पद्मप्रभ (७) सुपार्श्वनाथ (८) चन्द्रप्रभ (९) सुविधिनाथ (१०) शीतलनाथ (११) श्रेयांसनाथ (१२) वासुपूज्य (१३) विमलनाथ
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
(१४) अनंतनाथ (१५) धर्मनाथ (१६) शांतिनाथ (१७) कुन्थुनाथ (१८) अरनाथ (१९) मल्लिनाथ (२०) मुनिसुव्रतनाथ (२१) नमिनाथ (२२) नेमिनाथ (२३) पार्श्वनाथ (२४) महावीर (वर्धमान)
वर्तमान कालचक्रात जैनधर्माचा आरंभ प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांच्या उपदेशापासून झाला. पारंपारिक मान्यतेनुसार ऋषभदेव लक्षावधी वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांच्या उंची, आयुर्मान हे सर्व कल्पनातीतपणे प्रदीर्घ वर्णिलेले दिसते. वैदिक परंपरेचा सर्वात प्राचीन उपलब्ध ग्रंथ जो 'ऋग्वेद' त्यात ऋषभदेवांविषयीचे उल्लेख व गौरवोद्गार दिसतात. 'भागवतपुराणा'त तर त्यांचे समग्र चरित्रच वर्णिलेले दिसते.
__ अभ्यासकांनी ज्यांची ऐतिहासिकता मान्य केली आहे असे चार तीर्थंकर दिसतात. त्यांपैकी ऋषभदेव हे पहिले होत. काळाचा टप्पा सामान्यत: लक्षात येण्यासाठी असे म्हणता येईल की रामायणकाळापूर्वी विसावे तीर्थंकर 'मुनिसुव्रत' होऊन गेले. एकविसावे तीर्थंकर नमि' हे विदेहाचे राजे जनक यांच्या वंशातील पूर्वज राजर्षि अण्याची शक्यता आहे. बाविसावे तीर्थंकर नेमि' (अरिष्टनेमि) हे महाभारतातील वासुदेव कृष्णाचे ज्येष्ठ चुलतबंधू होते. तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ' हे भ. महावीरांपूर्वी २५० वर्षे होऊन गेले. भ. 'महावीर' हे चोविसावे तीर्थंकर इ.स.पूर्व ६ व्या शतकात होऊन गेले. पार्श्वनाथ आणि महावीर यांची ऐतिहासिकता आता वादातीत मानली जाते.
(४) तीर्थंकर :
નૈનવર્શનાનુસાર માનવી માયુષ્યાને સર્વોન્ચ ધ્યેય મોક્ષ અથવા નિર્વાણપ્રાપ્તી મહે. મોક્ષપ્રાપ્તીસાડી ત્રિરત્નાવી (सम्यक्दर्शन, सम्यक्ज्ञान, सम्यक्चारित्र) उपासना करून सर्वश्रेष्ठ ज्ञान अर्थात् केवलज्ञान प्राप्त करावे लागते. केवलज्ञानाची प्राप्ती आध्यात्मिक विकासाची सर्वोच्च अवस्था आहे. कालचक्राच्या ओघात केवलज्ञानाची प्राप्ती झालेले अनंत आत्मे होऊन गेले. केवलज्ञानाच्या प्राप्तीनंतर जे आत्मे मानवी देहाचे धारक असतात त्या सर्वांना 'अरिहंत' (अर्हत्) नावाने संबोधले जाते. या अरिहंतांपैकी ज्या व्यक्ती आपल्या प्रभावी धर्मोपदेशाने समाजाची नैतिक आणि आध्यात्मिक उन्नती करतात त्यांना तीर्थंकर' म्हणतात. सर्व तीर्थंकरांनी आपले उपदेश त्या काळातील व त्या त्या प्रदेशातील प्रचलित बोलीभाषांमध्ये केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांना अतिशय जवळचे वाटले. या प्रभावी व्यक्तींचा ठसा कित्येक सहस्रके टिकून राहतो. वर्तमानकाळात भ. महावीर या तीर्थंकरांचा शासनकाळ चालू आहे. त्यांनी उपदेशलेली जी वाणी कालांतराने अर्धमागधी भाषेत ग्रंथबद्ध करण्यात आली तिला 'महावीरवाणी' असे संबोधण्याचा प्रघात आहे. ___ 'तीर्थंकर' शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे, 'तीर्थाचे कर्ते'. 'तीर्थ' शब्दाचा जैन परिभाषेनुसार मुख्य अर्थ आहे 'धर्म'. संसारसमुद्रातून आत्म्याला तारून नेणाऱ्या अहिंसा, सत्य आदि सद्गुणांचे जे प्रभावीपणे प्रवर्तन करतात, ते 'तीर्थंकर' होत. धर्मसंघाची सुदृढ स्थापना करणे, हे देखील या महापुरुषांचे कार्य असते.
भ. महावीरांनी पार्श्वनाथप्रणीत धर्मामध्ये काळाला अनुरूप असे काही बदल करून जैन अथवा निग्रंथधर्माची पुन्हा एकदा उत्कृष्ट प्रभावना केली. २६०० वर्षे होऊन गेली तरीही भ. महावीरांच्या या कर्तृत्वाचा ठसा जैन समाजावर स्पष्टपणे उमटलेला आहे.
तीर्थंकर हे तुमच्या-आमच्या सारखेच मानवी जन्मास येऊन आपल्या तपस्येने व साधनेने तीर्थंकर पदाला पोहोचलेले आत्मे आहेत. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण यासाठी खास करून अवतरित झालेले कोण्या परमात्म्याचे अथवा परमेश्वराचे अंश अथवा अवतार नव्हेत. केवलज्ञान प्राप्त केलेले सर्वच आत्मे निर्वाणानंतर लोकाकाशाच्या अग्रभागी सदैव सिद्धरूपाने विराजमान राहतात. त्यांचे चैतन्यमय अस्तित्व तेथे असते परंतु विश्वात पुनरागमन होत नाही.
__ जैन धर्मात पूजनीय मानलेले हे सर्व तीर्थंकर क्षत्रिय कुळात जन्मलेले राजे होते. प्रत्येकांचे माता-पिता, जन्मस्थल, निर्वाणस्थल, त्यांच्या संघातील साधु-साध्वींची आणि श्रावक-श्राविकांची संख्या - इत्यादि तपशील जैन साहित्यात नोंदवलेले दिसतात. राज्यवैभव आणि राजपरिवाराचा स्वेच्छेने त्याग करून त्यांनी तपस्यामय जीवनाच
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
अंगीकार केला. सर्वोच्च ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणार्थ धर्मोपदेश दिला. प्रत्येक तीर्थंकरांचे प्रमुख शिष्य ‘गणधर' या नावाने संबोधले जातात. त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी ही निर्ग्रथ परंपरा अव्याहतपणे जपली. प्रत्येक तीर्थंकरांची विशिष्ट चिह्ने (जसे ऋषभदेवांचा वृषभ, महावीरांचा सिंह इ.), यक्ष-यक्षिणी आणि चैत्यवृक्ष (जसे वृषभदेवांचा वटवृक्ष, महावीरांचा शालवृक्ष इ.) यांची जैन इतिहास पुराणात नोंद केलेली दिसते. यक्ष-यक्षिणी तीर्थंकरांच्या रक्षक देवता आहेत. तीर्थंकरांविषयीच्या स्नेहाने त्या विविध आपत्तीत त्यांचे रक्षण करतात. विविध चित्रे आणि मंदिरांवर कोरलेली शिल्पे यांमध्ये त्या त्या तीर्थंकरांच्या यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती कोरलेल्या असतात.सर्व तीर्थंकरांना त्या त्या विशिष्ट वृक्षाखाली ध्यानस्थ असताना केवलज्ञानाची अर्थात् बोधीची प्राप्ती झाली. या अर्थाने हे चैत्यवृक्ष बोधिवृक्षच होत. सर्व तीर्थंकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या घटना पंचकल्याणक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे गर्भावतरण, जन्म, दीक्षा, केवलज्ञान व निर्वाण या सर्वांच्या तिथी जैन इतिहासात नोंदविलेल्या आहेत. हे सर्व प्रसंग उत्सवरूपाने साजरे करण्याचा प्रघात आहे.
(५) चार तीर्थंकरांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य :
(१) ऋषभदेव : निष्क्रिय भोगभूमीत जीवनक्रम व्यतीत करणाऱ्या मानवी समाजाला ऋषभदेवांनी सक्रिय कर्मभूमीत जगण्यासाठी अनेक कला व विद्यांचे शिक्षण दिले. शेती, अन्न शिजविणे, वस्त्रे विणणे, ग्राम-नगर निर्माण, विवाह पद्धती, अपत्यांचे पालन-पोषण यांचे योग्य मार्गदर्शन करून मानवाला सुसंस्कृत बनविण्याचे काम केले. गुणानुसारी वर्णव्यवस्थेचा सूत्रपात, हेही ऋषभदेवांच्या महान कार्यातील एक कार्य होय. सुमंगला नावाच्या स्त्रीच्या पतिनिधनानंतर तिच्याशी विवाह करून, विवाहाचा वेगळाच आदर्श घालून दिला.
ब्राह्मी व सुंदरी या आपल्या कन्यांना त्यांच्या रुचीनुसार लिपी व गणिताचे शिक्षण दिले. म्हणजेच स्त्री शिक्षणाचाही आदर्श त्यांनी घालून दिला. ऋषभदेवांच्या अनेक पुत्रांपैकी भरत आणि बाहुबली हे पुत्र अतिशय पराक्रमी व प्रख्यात होते. भरत हे भारताच्या इतिहासातील पहिले चक्रवर्ती होऊन गेले. त्यांच्या नावावरूनच आपल्या भारतवर्षाला ‘भारत' हे नाव पडले. द्वितीयपुत्र बाहुबली हे आरंभी महान योद्धा व नंतर खडतर तपस्वी होते. त्यांची ‘श्रवणबेळगोळ' येथे असलेली भव्य प्रतिमा भारतीय मूर्तिकलेचा प्रकर्ष दर्शविते.
उत्तर आयुष्यात संसार व राज्यकारभारातून पूर्ण निवृत्त होऊन ऋषभदेवांनी एक वर्षभर निरंतर - निराहार राहून संयमयोगाची साधना केली. साधु-साध्वी- श्रावक-श्राविका या सर्वांना व्रत-नियम- सदाचाराचा उपदेश केला. भ. ऋषभदेवांचे मौलिक जीवनकार्य जैन आणि वैदिक या दोन्ही परंपरांनी गौरवपूर्वक अंकित केले आहे.
(२) नेमिनाथ (अरिष्टनेमि ) : महाभारतात सुप्रसिद्ध असलेल्या वासुदेव कृष्णाचे ज्येष्ठ चुलतबंधू अरिष्टनेमि हे होते. ते जैनधर्माचे बावीसावे तीर्थंकर होत. त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या पुशक्ष्यांचे करुण आक्रंदन ऐकून नेमिकुमारांच्या मनात अहिंसा व करुणाभाव विशेष जागृत झाले. त्यांनी सर्व पशुपक्ष्यांना बंधनमुक्त केले. मांसनिवृत्तीच्या रूपाने अहिंसेचा संबंध भोजनाशी जोडण्याचे ऐतिहासिक काम नेमिनाथांनी केले. छांदोग्य उपनिषदातील उपदेशानुसार देवकीपुत्र कृष्णाला घोर अंगिरस ऋषींनी अहिंसाधर्माचा उपदेश दिला. बौद्ध दर्शनाचे विद्वान स्व. धर्मानंद कौशाम्बी यांच्या मतानुसार अहिंसाधर्माचे हे उपदेशक जैन तीर्थंकर भ. नेमिनाथच होते.
(३) पार्श्वनाथ : ईसवीसनापूर्वी सुमारे आठव्या शतकात होऊन गेलेल्या पार्श्वनाथ या तेविसाव्या तीर्थंकरांचा काळ, ‘तापसयुगा’चा काळ होता. भयंकर कायक्लेशांना महत्त्व देणाऱ्या अनेक प्रकारच्या तपश्चर्या व क्रियाकांडे अस्तित्वात होती. अहिंसा, दया, क्षमा आणि शांतीचे अवतार असलेल्या पार्श्वनाथांनी विवेकशून्य क्रियाकांडाला विरोध केला. कमठ तापसाने धुनीसाठी जमविलेल्या जीर्ण लाकडाच्या ओंडक्यातून त्यांनी एका प्रचंड नागाला
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
आवाहन करून बाहेर काढले. पार्श्वनाथांच्या चरित्रकारांनुसार विवेकशून्य क्रियाकांडाला विरोध करणाऱ्या अनेक धर्मचर्चामध्ये पार्श्वनाथ त्यांच्या गृहस्थावस्थेपासूनच तत्पर होते. केवलज्ञानाच्या प्राप्तीनंतर पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह अशा चार महाव्रतांचा उपदेश केला. त्यांचा धर्म 'चातुर्यामधर्म' होता, असे बौद्धग्रांसही नमूद केलेले दिसते. महावीरांचे मातापिता पार्श्वनाथप्रणीत संप्रदायाचे अनुयायी होते. पार्श्वनाथ अनुयायी केशक्कुिमार
आणि महावीर शिष्य गौतम यांच्यातील वैचारिक आदान-प्रदान प्राचीन जैनग्रंथात नमूद केलेले दिसते. जैन परंपरेरील पार्श्वनाथांचा प्रभाव अतुलनीय आहे. पार्श्वनाथांच्या मूर्तीची आणि स्तोत्रांची संख्या महावीरांपेक्षाही विपुल असल्यो दिसते.
(४) महावीर :आजच्या जैन समाजावर ज्यांच्या उपदेशाचा, साहित्याचा आणि साधनेचा सखोल परिणाम झालेला दिसतो, ते चोविसावे म्हणजे अंतिम तीर्थंकर भ. महावीर होत. ते 'ज्ञातृवंशा'त जन्मले असा उल्लेख जैन व बौद्ध परंपरांनी नोंदविलेला दिसतो. त्यांच्या आयुष्यातील तीन प्रमुख अवस्था विशेष लक्षणीय आहेत. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत ते गृहस्थावस्थेत वर्धमान' या नावाने ओळखले जात होते. माता-पित्यांच्या मृत्यूनंतर राजम्मेवाचा त्याग करून त्यांनी श्रमण जीवनाचा अंगीकार केला. बारा वर्षे कठोर तपस्या करून ते ‘महावीर' बनले. केवलज्ञान प्राप्तीनंतर तीस वर्षे सतत विहार आणि धर्मोपदेशाचे काम केले. त्यांच्या प्रमुख शिष्यांनी अर्थात् गणधरांनी अर्धमाधी भाषेतील त्यांच्या उपदेशाचे संकलन अकरा ग्रंथांमध्ये केले. या अकरा ग्रंथांच्या अवलोकनातून असे दिसते की स्थळ, काळ व व्यक्तींच्या पात्रता बघून त्यांनी आपल्या उपदेशाचा आशय व शैली यात विविधता आणली. त्यानंतर होऊन गेलेल्या आचार्यांनी जैनधर्माच्या प्रसाराचे कार्य साहित्यनिर्मिती व प्रवचने यांच्याद्वारा केले. अतिमतः 'ज्ञातृपुत्र वर्धमान श्रमण भगवान महावीर' अशी त्यांची ओळख प्रचलित झाली.
महावीरांचे कार्यकर्तृत्व सारांशाने पुढीलप्रमाणे सांगता येईल -
* पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि वनस्पती यांची ‘सजीवता' आणि 'एकेंद्रियत्व' महावीरांनी विशेष अधोरेखित केले. त्यांच्या रक्षणावर आणि मर्यादित वापरावर भर दिला. त्यामुळे पशुपक्षी इ. तिर्यंचच नव्हे तर एकेंद्रियांच्या रक्षणाच्या उपदेशातून अहिंसेचा सूक्ष्मतम विचार केला. पर्यावरण रक्षणाच्या आधुनिक संकल्पनेचा उगम महावीरांच्या मूळ उपदेशात स्पष्टत: अनुस्यूत असलेला दिसतो.
___ * पार्श्वनाथप्रणीत धर्मात काळानुरूप बदल करून अपरिग्रह हे चौथे व्रत ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशा दोन महाव्रतात विभक्त केले. अशाप्रकारे साधुआचारात ब्रह्मचर्याला अनन्य स्थान दिले.
__ * ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण जन्मावर आधारित नसून व्यक्तींच्या गुणांवर आधारित आहेत हे स्पष्ट नोंदवून ठेवले. सामाजिक उच्चनीचतेचा निषेध केला. ___* यज्ञीय कर्मकांडाचा हिंसा-अहिंसेच्या दृष्टीने विचार केला आणि यज्ञाचा आध्यात्मिक दृष्टीने अहिंसक आणि सकारात्मक अर्थ स्पष्ट केला. ___* जैन परंपरेत आरंभीपासूनच साधूंच्या जोडीने साध्वींना आणि श्रावकांच्या जोडीने श्राविकांना स्थान होते. महावीरांचे वैशिष्ट्य असे की आर्या 'चंदनेला' स्वत: दीक्षा देऊन त्यांनी साध्वीसंघाचे प्रवर्तिनीपद देऊ केले. जयंती, अग्निमित्रा इ. श्राविकांशी महावीरांनी केलेल्या संवादावरून स्त्रियांचे जैनसंघातील महत्त्व विशेष स्पष्ट हेते. ___ अर्धमागधी आगम साहित्यात महावीरांशी संबंधित असलेल्या अनेक शहरे, गावे, नदी-नाले, पर्वत, अरण्ये, वस्त्या यांचा उल्लेख येतो. ही भौगोलिक सामग्री महावीरांच्या विहाराचा आणि कर्तृत्वाचा प्रमाणित आलेख तयार करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. प्राचीन बौद्ध वाङ्मयात नातपुत्त निग्गंथ' अशा शब्दात महावीरांचा उल्लेख अनेकदा आढळतो. परंतु तात्त्विक विचारधारा जपणाऱ्या उपनिषदांमध्ये अथवा पुराण साहित्यात वर्धमान महावीरांचा उल्लेख अपवादात्मक रीतीने सुद्धा आढळत नाही. याउलट 'ऋषिभाषिता'सारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथात मात्र वैदिक, वेदोत्तरकालीन आणि बौद्ध ऋषींच्या विचारांचा संग्रह केलेला दिसतो.
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
(६) जैनांचे पवित्र ग्रंथ अर्थात् (आम्नाय) : ___ जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायांनी वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांना ‘आगम' अगर ‘आम्नाय' संबोधून पूजनीयतेचा दर्जा दिलेला दिसतो. आगम अगर आम्नायाने संबोधलेले ग्रंथ संख्येने अनेक आहेत. श्वात्मरांनी ते ४५ अगर ३२ मानलेले आहेत. दिगंबरांनी सुमारे १५-२० प्राचीन शौरसेनी ग्रंथांना आम्नायाचा दर्जा दिला आहे गीता, धम्मपद, कुराण, बायबल अगर गुरुग्रंथसाहेबसारखा सर्वमान्य लोकप्रिय असा एक ग्रंथ जैन परंपरेत नाही. आचार्य उमास्वामीकृत तत्त्वार्थसूत्र' हा संस्कृत सूत्रबद्ध दहा अध्यायात्मक ग्रंथ दोन्ही परंपरांना मान्य आहे. तथपि संपूर्ण दार्शनिक स्वरूप असलेला हा ग्रंथ लोकप्रिय ग्रंथांच्या वर्गवारीत बसू शकत नाही. समग्र श्वेतांबरीय साह्मिाकडे नजर टाकली असता 'उत्तराध्ययन' हा गाथाबद्ध ग्रंथ विषय व शैलीच्या दृष्टीने 'धम्मपदा'शी अतिशय जवळचा आहे असे दिसते. दिगंबरीय संप्रदायात 'षट्खंडागम' हा आद्य शौरसेनी ग्रंथ पूजनीय व पवित्र तर मानला गेला आहे परंतु लोकप्रियतेचे निकष त्याला लागू शकत नाहीत. 'कुंदकुंद' नावाच्या आचार्यांचे ‘समयसार', 'अष्टपाहुड' आणि द्वादशानुप्रेक्षा' हे ग्रंथ दिगंबर स्वाध्यायींकडून वाचले जातात. जैन तत्त्वज्ञान आणि आचाराचे समग्र आकलन नेटकेपणाने होण्यासाठी मात्र 'तत्त्वार्थसूत्र' या ग्रंथाला पर्याय उपलब्ध नाही.
सामान्यतः ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या पर्युषणपर्वा'त श्वेतांबर संप्रदायात ‘कल्पसूत्र' व 'अंतगडदशासूत्र' वाचण्याचा प्रघात आहे. तर दिगंबर संप्रदायाचे लोक तत्त्वार्थसूत्रा'चा पाठ करतात. प्रथमानुयोग યા નાવાને પ્રસિદ્ધ બસસ્ટેન્ડી તીર્થકર કાઢીંવી પુરાણે વ વરિત્રે વાવMાવી પ્રથા સ્વાધ્યાયી નિરાંમધ્યે રૂદ્ધ માટે. श्वेतांबरांमध्ये सामायिक, प्रतिक्रमणाचा नित्यपाठ करण्याची रूढी आहे. दिगंबरांमध्ये देवपूजा, गुरूपास्ति,स्वाध्याय, संयम, तप आणि दान या सहा गोष्टींना नित्य आवश्यक मानले आहे. ___जैनांमध्ये काळानुसार अनेक संप्रदाय व उपसंप्रदाय निर्माण झाले. श्वेतांबर व दिगंबर हे दोन मुख्य संप्रदाय आहेत. वस्त्र, पात्र, आहारग्रहणाची पद्धत, पवित्र ग्रंथांसंबंधीची मान्यता इ. अनेक मुद्यांवरून, इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या सुमारास हे संप्रदाय एकमेकांपासून स्पष्टत: भिन्न झाले. श्वेतांबरांमध्ये काळाच्या ओघात विरमार्गी, स्थानकवासी व तेरापंथी हे उपसंप्रदाय निर्माण झाले. दिगंबरांमध्ये तेरापंथी, बीसपंथी, तारणपंथी आणि कांजवसमीपंथी आदि उपसंप्रदाय निर्माण झाले. विशेष असे की हे सर्व संप्रदाय व उपसंप्रदाय बाह्य आचारपद्धती व कर्मकांडावर आधारित आहेत. षद्रव्ये, नवतत्त्वे, कर्मसिद्धांत, अनेकान्तवाद, पंचमहाव्रते अशा तात्त्विक मुद्यांबाबत सर्व पंथोपपंथांची समान मान्यता आढळते.
(७) जैन तत्त्वज्ञानाची संक्षिप्त ओळख : (अ) प्रस्तावना : ___भारतीय तत्त्वज्ञानांच्या प्रणालींना 'दर्शन' असे संबोधण्याचा प्रघात आहे. सांख्य-योग इत्यादी सहा दर्शने परंपरेने 'आस्तिक' मानली जातात. जैन आणि बौद्ध ही दोन दर्शने 'नास्तिक' आहेत. ती अशा अर्थाने की जगन्निम्या ईश्वराचे अस्तित्व त्यांनी मानलेले नाही. तसेच वेदवचनांचे अर्थात् श्रुतींचे प्रामाण्यही त्यांना मान्य नाही. भारतीय विद्येचे (Indology) अभ्यासक असे प्रतिपादन करतात की आर्यांच्या दुसऱ्या दलाचे भारतात आगमन होण्यापूर्वी भारतवर्षात वैराग्य, संन्यास व कठोर तपश्चर्येला महत्त्व देणारी श्रमण-परंपरा अस्तित्वात होती. जैन आणि बौद्ध धर्म त्या परंपरेतून विकसित झालेले धर्म आहेत. भ. महावीर आणि भ. गौतम बुद्ध यांचा कार्यकाळ इसवी सनापूर्वीचे सहावे शतक आहे. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म नव्याने विकसित केला. ते बौद्ध धर्माचे आद्य प्रवर्तक होते. याउलट भ. महावीर हे जैन धर्माचे २४ वे म्हणजे या युगातील अखेरचे तीर्थंकर होऊन गेले. त्यांच्या आधीच्या तेवीस तीर्थंकंकडून त्यांना प्रदीर्घ परंपरेने जैन धर्म, तत्त्वज्ञान आणि आचाराचा वारसा मिळाला होता. काळानुरूप योग्य ते बदल करून तो वारसा भ. महावीरांनी आपल्या धर्मोपदेशातून पुढे चालवला.
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
जैन दर्शनातील सर्वात महत्त्वपूर्ण विचारधारा पुढीलप्रमाणे व्यक्त करता येते. :
या समस्त विश्वाच्या मुळाशी दोन मुख्य तत्त्वे आहेत. जीव (consciousness) आणि अजीव (matter). ही दोन्ही तत्त्वे अनादि काळापासून अस्तित्वात आहेत. ती सतत एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्या संपर्कातून विशिष्ट 'बंधने' अथवा 'शक्ती'ची निर्मिती होते. त्यामुळे प्रत्येक जीवाला (आत्म्याला) अनेक अवस्थांमधून जावे लागते. ही संपर्काची धारा जर रोखली आणि उत्पन्न झालेली बंधने जर्जरित करून क्षयाला नेली तर तो जीव आपल्या शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा नैसर्गिक स्व-स्वरूपात विराजमान होतो. हीच जैन दर्शनातील सात नैतिक-आध्यात्मिक तत्त्वे अथवा पदार्थ होत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
___ 'जीव' आणि 'अजीव' या दोन तत्त्वांचे विस्तृत व सूक्ष्म वर्णन हा जैन तत्त्वज्ञानाचा मुख्य विषय आहे. 'आस्रव' आणि बंध' यांचे विवेचन जैनांच्या सुप्रसिद्ध कर्म-सिद्धांता'त येते. जैनांचे सारे मानसशास्त्र यात समाष्टि आहे. संवर' आणि 'निर्जरा' हे चारित्रा'शी अर्थात् आचारशास्त्राशी निगडित आहेत. 'मोक्ष' ही जीवाची सर्वोत्कृट अवस्था असून ती प्राप्त करणे हे सर्व धार्मिक क्रियांचे आणि आचरणाचे अंतिम ध्येय आहे.
लोकाकाशात समाविष्ट असणाऱ्या विश्वाला 'लोक' अशी संज्ञा जैन दर्शन देते. हे विश्व म्हणजे महास्कंध आहे. या विश्वाच्या आकाराबद्दल जैनांचे म्हणणे लक्षणीय आहे. एखादा पुरुष आपले दोन्ही हात दोन बाजूंनी कमरेवर ठेवून, दोन पाय आडवे पसरून जर उभा राहिला तर त्याचा आकार जसा दिसेल तसा या विश्वाचा (लोकाचा) आकार आहे.
(ब) विश्वाचे सहा मूळ घटक अर्थात् ‘षड्-द्रव्ये' :
आपल्या सभोवताली आपल्याला सातत्याने जाणवणारे विश्व (की ज्याचा आपणही एक घटक आहोत) हे सहा खऱ्याखुऱ्या द्रव्यांनी बनले आहे. त्या Realities म्हणजे वास्तविकता' आहेत. हे सहा घटक सतत अस्तित्वात आहेत. त्यांच्यात परिवर्तने होत असली तरी त्यातील एकही घटक नव्याने निर्माण झालेला नाही व कधीही पूर्णपणे नष्ट होणारा नाही. द्रव्य म्हणजे 'विश्वाचा असा वास्तव घटक की जो सतत परिवर्तन पावत असूनही कायम टिकून आहे.' आत्यन्तिक 'शाश्वतता' आणि आत्यन्तिक क्षणभंगुरता' या दोन्ही परस्परविरूद्ध टोकांचा समन्वय जैनांच्या 'द्रव्य' या संकल्पनेत दिसतो.
द्रव्यांमधला जो बदलणारा धर्म आहे त्याला पर्याय' (अवस्थांतर) म्हटले आहे. जो न बदलणारा धर्म आहे त्याला 'गुण' म्हटले आहे. प्रत्येक द्रव्य गुण-पर्यायांनी युक्त असते. 'अस्तित्व'रूप समान गुणधर्म असणारी द्रव्ये एकूण सहा आहेत. त्यामुळे जैन विचारधारा एकतत्त्ववादी (monistic) नसून बहुतत्त्ववादी (pluralistic) आहे. एकूण सहा द्रव्यांपैकी जीव, पुद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश या पाच द्रव्यांना ‘अस्तिकाय' म्हणतात. कारण या द्रव्यांचे भाग किंवा प्रदेश' आपण कल्पनेने वेगळे करू शकतो. 'काल' हे सहावे द्रव्य मात्र एकामागून एक येणग्या क्षणांचे बनलेले असल्याने त्यांचा एकजिनसी प्रचय म्हणजे समूह बनू शकत नाही. म्हणून काल ‘अस्तिकाय' नाही. 'अनस्तिकाय' आहे.
(१) पहिले द्रव्य आहे 'जीव' अर्थात् 'आत्मा'. चैतन्य किंवा जाणीव हे जीवाचे लक्षण आहे. विश्वात अनंत जीव आहेत व ते स्वतंत्र आहेत. कोण्या एका ईश्वराचे, परमात्म्याचे अंश नाहीत. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सौख्य आणि अनंत वीर्य (पुरुषार्थ, सामर्थ्य) हे जीवाचे खरे स्वरूप आहे. कर्मांमुळे ते झाकोळले जाते. जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले की हे चार गुण प्रकट होतात. 'जीव' तत्त्वाची अनेक दृष्टींनी केलेली चिकिसा हे जैन दर्शनाचे वैशिष्ट्य आहे. इतकी विविधांगी चिकित्सा दुसऱ्या कोणत्याही धर्माने केलेली नाही. इंद्रियांच्या संख्येनुसार केलेली जीवांची वर्गवारी बरीचशी शास्त्रीय आहे. एकंदर १४ मुद्यांनी 'जीवां'चा शोध घेतला आहे. तो मुळातूनच पहाण्यासारखा आहे. पृथ्वी, आप (जल), तेज, वायू व वनस्पती हे सर्व स्थावर जीव आहेत. ती केवळ जड महाभूते नाहीत. पृथ्वी, खनिजे, पाणी, अग्नि, वनस्पती, वायू इ. सर्वांना सजीव मानल्याने जैनांची अहिंसा
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
अतिशय सूक्ष्म बनली. एकेंद्रियांच्या रक्षणाचा खूप विचार केल्याने पर्यायाने पर्यावरणरक्षणाचाही विचार अंतर्भूत झाला आहे.
___ (२) दुसरे महत्त्वाचे द्रव्य आहे पुद्गल अर्थात् जडद्रव्ये किंवा भौतिक द्रव्ये. पुद्गलांचे परमाणू असतात व स्कंधही असतात. प्रत्येक परमाणूवर रंग, चव, गंध आणि स्पर्श हे चार गुणधर्म रहातात. विश्वातील सर्व दृश्यमान (मूर्त) पदार्थ, जीवांची स्थूल आणि सूक्ष्म शरीरे पुद्गलांपासूनच बनलेली असतात. 'कर्मा'चे सुद्धा परमाणू असतात. ते अतिसूक्ष्म' असतात. ते जीवाला चिकटल्यामुळेच मुळात उर्ध्वगामी असलेला जीव 'जड' होतो. जैनांचे परमाणुविज्ञान वैशेषिकांपेक्षा वेगळे आणि अधिक मूलगामी आहे असे अभ्यासकांचे मत आहे. 'तत्त्वार्थाधिगमसूत्र' नावाच्या जैन दार्शनिक ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात जैनांचे परमाणु-विज्ञान सूत्रबद्ध करून मांडले आहे. (३)(४) तिसरे द्रव्य आहे 'धर्म' (धर्मास्तिकाय) आणि चौथे आहे 'अधर्म' (अधर्मास्तिकाय). येथे 'धर्म' आणि 'अधर्म' हे शब्द रूढ अर्थाने वापरलेले नाहीत. पारिभाषिक अर्थाने वापरलेले आहेत. धर्म हे द्रव्य गतिशील अशा जीव व पुद्गलांच्या गतीस सहाय्य करते. गती निर्माण करीत नाही परंतु गतीस मदत करते. पाणी जसे माशाला पोहोण्यास मदत करते तसे हे द्रव्य आहे. हे द्रव्य अमूर्त आहे. पूर्ण लोकाकाशात व्याप्त आहे. 'अधर्म' द्रव्य स्थिर राहणाऱ्या जीव व पुद्गलांच्या स्थितीस सहाय्य करते. स्वत:हून त्यांना रोखत मात्र नाही. पृथ्वी जशी पदार्थांना स्थि राहण्यास आधार, आश्रय देते तसे 'अधर्म' द्रव्य आहे. याबाबत छाया-पथिकाचाही दृष्टान्त दिला जातो. हे द्रव्यही अमूर्त असून सर्व लोकाकाशात व्याप्त आहे. विश्वातील ग्रहगोल, तारे यांची एकाच वेळी दिसून येणारी गतिशीलत आणि त्याच वेळी त्यांच्या गतीची नियमितता यांच्या निरीक्षणातून जैन विचारवंतांना 'धर्म' आणि 'अधर्म' ही दोन तत्त्वे स्फुरली असावी. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचेही सूचन त्यातून होते. सृष्टीचा कर्ता, धर्ता, नियंता असा ईश्वर जैन दर्शनास मान्य नसल्याने 'गति' आणि 'स्थिति' यांना उदासीनपणे सहाय्य करणाऱ्या स्वतंत्र तत्त्वांची अवधारणा त्यांनी केली असावी.
(५) पाचवे अस्तिकाय द्रव्य आहे 'आकाश'. ते सर्व जीवांना आणि जड द्रव्यांना राहण्यासाठी वाव देते. सर्वांना सामावून घेते. हे आकाश अनंत आहे. या आकाशाच्या ज्या भागात जीव आणि पुद्गल राहतात, तो आकाशाचा भाग मात्र ‘सान्त' म्हणजे मर्यादित आहे. या भागाला जैनांनी 'लोकाकाश' म्हटले आहे. त्यापलिकडील अनंत पोकळीत जीव, पुद्गल, धर्म, अधर्म-यापैकी कशाचेही अस्तित्व नाही. त्या आकाशाला 'अलोकाकाश' म्हटले आहे. मोक्ष प्राप्त केलेला जीव (आत्मा) त्याच्या स्वभावानुसार लोकाकाशाच्या वरच्या टोकास जाऊन 'सिद्धशिले'वर स्थिरावतो.
(६) सहावे 'काल' हे अजीव द्रव्य ‘अस्तिकाय नाही. तो एकप्रदेशी आहे. अमूर्त आहे. वर्तना' हे कालद्रव्याचे लक्षण आहे. आजुबाजूच्या जीव आणि पुद्गलांमध्ये जे बदल, परिणाम, अवस्थांतरे घडून येतात, त्यामुळे अनुमानाने आपल्याला कालाचे अस्तित्व जाणवते. इतर द्रव्यात बदल घडवून आणणारे ते सहकारी कारण आहे. 'वर्तना' लक्षणाने युक्त असा 'काल' हा मुख्य अथवा पारमार्थिक काल होय. ____समय, मुहूर्त, निमिष, क्षण, अहोरात्र, महिना, ऋतू, संवत्सर इ. प्रकारांनी व्यक्त केला जाणारा, चंद्र-सूर्य इत्यादींच्या गतींनी व्यक्त होणारा आणि मोजला जाणारा काल हा ‘गौण' अथवा 'व्यावहारिक काल' आहे. मनुष्यलोकातील हा व्यावहारिक काल, भूत-वर्तमान-भविष्य - असा तीन प्रकारचा दिसून येतो.
जैनांचा द्रव्यविचार विस्तृत आणि सूक्ष्म आहे. त्यांनी केलेली परमाणुवादाची मांडणी वैशेषिकांच्या तसेच डेमोक्रिट्सच्या परमाणुवादाच्या तोडीस तोड किंबहुना काही बाबतीत त्यापेक्षाही सरस आहे असे मानले जाते. संख्यात, असंख्यात, अनन्त, अनन्तानन्त आणि 'उपमित काळ' या परिमाणांचा जैनांनी केलेला विचार ही प्राचीन गणितशास्त्राला दिलेली मोलाची देणगी मानली जाते. आकाश, काल या द्रव्यांचा त्यांनी केलेला विचार त्यांच्या सूक्ष्म विज्ञानाभिमुख दृष्टिकोणाचा द्योतक आहे.
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
(क) नऊ अथवा सात तत्त्वे :
जीव आणि अजीव ही दोन द्रव्ये एकमेकांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या एकत्र येण्याने अथवा विभक्त होण्याने नऊ अथवा सात नैतिक, मानसिक किंवा आध्यात्मिक तत्त्वे कार्यरत असतात. जीव आणि पुद्गलकर्म यांच्या संयोग-वियोगाने जीवाला बंध व मोक्ष कसे प्राप्त होतात हे सांगण्याचे काम नऊ अगर सात तत्त्वांनी केले आहे. म्हणून या तत्त्वांना जीव आणि अजीव यांचे विशेष प्रकार मानले आहेत. त्यापैकी 'जीव' आणि 'अजीव' यांचा विचार द्रव्यसंकल्पनेखाली केला. आता पुण्य, पाप, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष यांचा संक्षेपाने विचार करू.
पुण्य-पाप यांचा समावेश 'आस्रव' अथवा 'बंध' तत्त्वात होऊ शकतो. शुभ कर्म म्हणजे पुण्य. त्याची अनेक कारणे व उदाहरणे दिली आहेत. अशुभ कर्म म्हणजे पाप. त्याचीही अनेक कारणे व उदाहरणे दिली आहेत. शुभ व अशुभ भाव हे भावपुण्य व भावपाप होतात. आत्म्याशी जोडले गेलेले जड कर्मपुद्गल हे द्रव्य-पुण्य-पाप होतात. पारमार्थिक दृष्टीने पाप व पुण्य दोन्ही बंधनकारकच आहे. ह्यापलिकडचा 'शुद्ध' भाव धारण करणाराच आत्मिक विकास करू शकतो. ___आस्रव/आश्रव म्हणजे कर्मपुद्गलांचा आत्म्यात शिरणारा प्रवाह. शारीरिक-मानसिक-वाचिक क्रिया, मिथ्यात्व आणि कषाय (क्रोध, लोभ इ.) इत्यादी अनेक कारणांनी कर्मपुद्गल आत्म्यात (जीवात) स्रवू लागतात. हा आस्रव प्रत्येक जीवात निरंतर चालू असतो.
कर्मपुद्गलांचा आत्म्यात आस्रव झाला की दोहोंचे प्रदेश एकमेकात मिसळतात. आत्मा कर्मपुद्गलांनी बांधला जातो. यालाच 'कर्मबंध' म्हणतात. यासंबंधी अधिक विचार जैनांनी 'कर्मसिद्धांत' अथवा 'कर्मशास्त्रात' केला आहे.
जीवामध्ये शिरणाऱ्या कर्मांचे आगमन थांबवणे अथवा रोखणे म्हणजे 'संवर' होय. कर्मांचा आत्म्यात शिरणारा प्रवाह निरुद्ध करण्यासाठी जैन आचारशास्त्राने अनेक उपायांचे दिग्दर्शन केले आहे. पाच महाव्रते, पाच समिति (नियंत्रित हालचाली), तीन गुप्ति (मन-वचन-कायेचा संयम अथवा गोपन), ऋजुता-मृदुता आदि दहा सद्गुण, बारा प्रकारच्या भावना (सर्व काही क्षणभंगुर आहे, मी एकटा आहे, माझे कोणी नाही इत्यादि विचार), बावीस प्रकारच्या प्रतिकूल स्थिती सहन करणे, पाच प्रकारचे चारित्र - या सर्वांच्या सहाय्याने संवर साधता येतो.
'निर्जरा' म्हणजे जीवात प्रविष्ट झालेली कर्मे जीर्ण करणे, झटकून टाकणे, दूर करणे. कर्मे आत्म्यापासून दूर होण्याची प्रक्रिया सहजपणे होत असते (अकाम निर्जरा) अथवा तपस्येने विचारपूर्वकही करता येते (सकाम निर्जरा). निर्जरेचे मुख्य साधन आहे तप'. आंतरिक आणि बाह्य मिळून ते तप बारा प्रकारचे असते. जैन धर्मात तपांचे व विशेषतः अनशन (उपवास) तपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बेला, तेला, अठाई असे निरंकार उपवास करणारे हजारो लोक आजही जैन समाजात आहेत. उपवासाचे उद्यापन अथवा पारणे उत्सवी थाटामाटात मिरवणुकीसह करण्याचाही प्रघात आहे. ____ अनादि काळापासून जीवाच्या संपर्कात राहून जीवाला बद्ध करणाऱ्या सर्व कर्मांची पूर्ण निर्जरा झाली की आत्मा बंधनमुक्त होतो. त्याचे शुद्ध रूप प्रकट होते. आपल्या ऊर्ध्वगामी स्वभावानुसार हा जीव विश्वाच्या माथ्यावर नित्य वास करतो. त्याची जन्ममरणचक्रातून कायमची सुटका होते. याचेच नाव मोक्ष अथवा निर्वाण.
(ड) रत्नत्रयात्मक मोक्षमार्ग :
श्रीमद्-भगवद्-गीता हा रूढ अर्थाने हिंदुधर्मीयांचा प्रातिनिधिक पवित्र ग्रंथ मानला जातो. ज्ञानमार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग, निष्काम-कर्म-मार्ग - अशी मार्गांची विविधता गीतेत वेगवेगळ्या अध्यायात प्रतिपादिलेली दिसते. गीतेचा अभिप्राय असा आहे की वरीलपैकी कोणत्याही मार्गाचे निष्ठेने पालन केले की मोक्षप्राप्ती होऊ शकते. म्हणजे मार्गांची विविधता सांगितली आहे.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
जैन तत्त्वज्ञानात मोक्षमार्ग एक आणि एकच आहे. तो तीन घटकांनी अथवा तीन मौल्यवान रत्नांनी बनलेला आहे. त्यांची आराधना एकापाठोपाठ एक करावयाची नसून एकत्रितच करावयाची आहे. आरंभी षड्द्रव्ये, नवतत्त्वे इत्यादींचे माहितीवजा ज्ञान असणे अपेक्षित आहे. खरे “देव - गुरु- धर्म” यांवर आणि द्रव्य - तत्त्वांवर सम्यक् श्रद्धा म्हणजे ‘सम्यक् दर्शन' अथवा 'सम्यक्त्व'. पक्षपातरहित उचित श्रद्धा दृढ झाली की प्राप्त केलेल्या ज्ञानालाही ‘सम्यक्त्व' येऊ लागते. हे 'सम्यक् ज्ञान' होय. जिनांनी घालून दिलेल्या आचारनियमांचे प्रत्यक्षात पालन करणे हे 'सम्यक् चारित्र' होय. चारित्र अगर आचारधर्म दोन प्रकारचा दिसतो. साधु-आचार आणि श्रावकाचार. अनेक जैन आचारप्रधान ग्रंथात पंचमहाव्रते, समिति, गुप्ति यांच्यावर आधारलेला 'साधुधर्म' आणि पाच अणुव्रते, गुणव्रते व शिक्षाव्रते यांच्यावर आधारलेला 'श्रावकधर्म' विस्ताराने वर्णिलेला दिसतो. दिगंबर परंपरेत '११ प्रतिमां' च्या सहायाने श्रावक, उपासक अगर गृहस्थाला मार्गदर्शन केलेले दिसते. हे तीन स्वतंत्र मार्ग नाहीत. मोक्षप्राप्तीसाठी तिन्हींची यथायोग्य आराधना अपेक्षित आहे. 'त्रिरत्न' संकल्पना श्रमण परंपरेचे वैशिष्ट्य दिसते. कारण बौद्ध धर्मातही सम्यक् प्रज्ञा- शील-समाधि यांना 'त्रिरत्न' म्हटले आहे.
(इ) आध्यात्मिक विकासाच्या श्रेणी अर्थात् गुणस्थान :
आत्मिक विकास हा रत्नत्रयाच्या शुद्धीनुसार होत असतो. हा विकास क्रमिक असतो. मार्गदर्शनार्थ त्याचे चौदा टप्पे, श्रेणी, स्थाने अथवा पायऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. एका बाजूने कर्मनिर्जरेशी त्याची जोड घालण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूने धर्मध्यान आणि शुक्लध्यानाशी सांगड घातलेली दिसते. गुणश्रेणीवर उत्तरोत्तर विकास करणाऱ्या जीवाला प्राप्त होणाऱ्या ऋद्धी-सिद्धी - अतिशय यांचे वर्णनही जैनांच्या आध्यात्मिक ग्रंथात मिळते. याबाबत पातंजल योग- सूत्रांशी जैन सूत्रे खूपच मिळती-जुळती दिसतात. एकाक्षरी ध्यानासाठी ॐ हेच अक्षर त्यांनीही पवित्र मानले आहे. ॐ, स्वस्तिक आणि कमळ ही भारतीय संस्कृतीची प्रतीकात्मक चिह्ने जैनांनीही तपशिलाच्या थोड्या भिन्नतेसह मानलेली दिसतात.
(फ) कर्मसिद्धांत आणि कर्मशास्त्र :
चार्वाक अथवा बार्हस्पत्यांचा अपवाद वगळता सर्व भारतीय दर्शनांनी जे मुद्दे एकमुखाने मान्य केले आहेत, त्यापैकी मुख्य आहे तो कर्मसिद्धांत.
प्राण्यांच्या सुखदुःखभोगात ईश्वरी कर्तृत्व न आणता त्यांची उपपत्ती तर्कसंगत रितीने लावावयाची असल्याने जैनांनी कर्मचिकित्सा इतकी सूक्ष्मतेने व अनेकदा क्लिष्टतेने केली आहे की भल्या-भल्या अभ्यासकांची मती कुंठित व्हावी. तो केवळ एक सिद्धांत न राहता परिपूर्ण ज्ञानशाखाच तयार केली. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत प्राकृत- संस्कृत भाषांत कर्मसिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अक्षरश: शेकडो ग्रंथ लिहिलेलेसितात. जैनांच्या सूक्ष्म कर्मसिद्धांताचे सार पुढीलप्रमाणे सांगता येईल
स्वयं कर्म करोत्यात्मा, स्वयं तत्फलमश्नुते ।
-
स्वयं भ्रमति संसारे, स्वयं तस्माद् विमुच्यते ||
जीव स्वत:च्या कर्मांचा स्वतःच कर्ता व भोक्ता आहे. तो स्वत:च कर्मयोगाने बांधला जातो आणि स्वप्रयत्नानेच त्यातून सुटणार आहे. ईश्वर, ईश्वरेच्छा, ईशकृपा इ. ला यामध्ये स्थान नाही.
‘बंध' नावाच्या तत्त्वात विवेचन केल्याप्रमाणे कर्मपुद्गल (अथवा परमाणू ) आत्मप्रदेशांशी निगडित होणे म्हणजे कर्मबंध होय. हा कर्मबंध चार प्रकारचा असतो. प्रकृति, स्थिति, अनुभाग आणि प्रदेश. प्रकृति म्हणजे स्वभाव. कर्माच्या मूळ प्रकृती आठ आणि उत्तरप्रकृती १४८ आहेत. येथे फक्त मूळप्रकृती नोंदविणेच शक्य आहे. प्रत्येकाचे अनेक उपप्रकार कर्मशास्त्रात नोंदवले आहेत.
(१) ज्ञानावरणीय कर्मामुळे आत्म्याच्या ज्ञानगुणावर आवरण निर्माण होते. (२) दर्शनावरणीय कर्म आत्म्याच्या
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
'दर्शन' नामक चैतन्यगुणाला आवृत करते. (३) वेदनीय कर्म जीवाला सुख-दुःखरूप वेदन (जाणीव) निर्माण करते. (४) मोहनीय कर्म विवेकशक्ती मूर्च्छित करते. अनेक विकार निर्माण करते. बुद्धी भ्रष्ट करते (५) आयुकर्माच्या योगाने जीवाचे त्या त्या गतीतील आयुष्याचे निर्धारण होते. (६) नामकर्माने जीवांची शारीरिक व मानसिक लक्षणे ठरत असतात. याचे पुष्कळ उपप्रकार आहेत. (७) गोत्रकर्माच्या योगाने जीव लोकपूजित अथवा लोकनिंदित कुळात जन्मतो. (८) अंतराय कर्मामुळे जीवाच्या भोगोपभोगांमध्ये बाधा उत्पन्न होते.
कर्माचा बंध' ही जशी एक अवस्था आहे तशीच सत्त्व, उदय, उदीरणा इत्यादी दहा अवस्थांचा जैन शास्त्रात विचार केलेला दिसतो. वरील आठ कर्मांची ‘अत्यंत घातक' आणि कमी घातक' अशीही वर्गवारी केलेली दिसते.
जैनांच्या कर्मसिद्धांताच्या एकंदर मांडणीवरून असे दिसते की ह्यातून कार्य-कारण संबंध स्पष्ट होतो. हा सिद्धांत पूर्ण नियतिवादीही नाही आणि सर्वथा स्वच्छंदवादीही नाही. मनुष्याला त्यांनी पूर्वकृत कर्मांचे उत्तरदायित्व स्वीकारायला भाग पाडले आहे. वर्तमान परिस्थितीत पुरुषार्थाला वाव देऊन परिस्थितीत बदल घडवून आणण्यासही वाव दिला आहे. खऱ्या अर्थाने कर्मसिद्धांत जैन धर्माचा कणा आहे.
(ग) अनेकांतवाद-नयवाद-स्याद्वाद :
जैनांनी काया-वाचा-मनाने अहिंसेचा पुरस्कार केला आहे. सैद्धांतिक विवेचन करतानाही सर्वसमावेशक, सौम्य दृष्टिकोण स्वीकारला आहे. विरोधकांचा दृष्टिकोण कठोरपणे धुडकावून न लावता, तो एका मर्यादित अर्थाने कसा खरा आहे, हे दाखवण्याकडेच जैन आचार्यांचा कल होता. त्यातूनच जैनांनी नयवाद, स्याद्वाद आणि अनेकांवाद हे तीन परस्परसंबंधित असे सिद्धांत सांगितले. हे तीनही एकमेकांना पूरक आहेत. परंतु एकरूप नाहीत. या सर्वांमधला समान धागा असा की हे वैचारिक सामंजस्य स्थापण्याचे प्रयत्न आहेत. ____ विश्वातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना ‘अनंतधर्मात्मक' असते. शिवाय त्याकडे बघणाऱ्याच्या दृष्टीही भिन्न भिन्न असतात. 'नय' म्हणजे नेणारा ; वस्तू, व्यक्ती किंवा घटनेच्या स्वरूपाकडे' नेणारा दृष्टिकोण अथवा अभिप्राय. तत्त्वत: वस्तू इ. जशा अनंतधर्मात्मक आहेत तसेच 'नय'ही तत्त्वत: अनंत आहेत. सामान्य व्यक्तीच्या मार्गदर्शनासाठी सात प्रकारचे 'नय' अथवा 'अभिप्रायाच्या दृष्टी' सांगितल्या आहेत.
एकाच वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोणातून, भूमिकेतून बघतो त्यावर आपली मते ठरत असतात. यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांचा दृष्टांत सुप्रसिद्ध आहे. या दृष्टांतात ते आंधळे आहेत म्हणून त्यांची मते एकांगी आहेत. कित्येकदा आपण डोळस, बुद्धिमान असूनही केवळ आपलीच मते योग्य मानतो. इतरांच्या मतांची उपेक्षा करतो. आपल्या सीमित बुद्धीने एकांगी मताचा आग्रह न धरता 'रिअॅलिटी'कडे विविध पैलूंनी बघण्याचे सामर्थ्य आपल्यात विकसित करणे म्हणजे अनेकांतवादी' बनणे होय. ___'अनेकांतवाद' शब्दातील 'वाद' म्हणजे सिद्धांत. 'अंत' शब्द 'टोक, दृष्टी, मत, अभिप्राय' या अर्थांचा सूचक आहे. 'एकांतवाद' म्हणजे हठाग्रही, पक्षपाती दृष्टी. अनेकांतवादी व्हावयाचे असल्यास प्रथम हे लक्षात ठेवावे की विश्वातील कोणतीच गोष्ट निरपेक्षपणे 'सत्' अगर 'असत्' नसते. अनेकांतवादी निर्दोष दृष्टीने मतप्रदर्शन करताना प्रत्येक विधानाला ‘स्यात्' (कदाचित्, कथंचित्, संभवत:) असे पद जोडावे लागते. 'स्यात्' हे पद संशयवाचक नसून सापेक्षतादर्शक आहे. आपल्याला वस्तूचे वर्णन करताना ‘स्यात् अस्ति', 'स्यात् नास्ति' आणि 'स्यात् अवक्तव्यम्' ही तीन पदे आणि त्यांच्या परम्युटेशनने बनणारी एकूण सात पदे उपयोजित करावी लागतात. त्याला स्याद्वाद म्हणतात. या सात आणि सातच भंगांनी (प्रकारांनी) वस्तूचे समग्र स्वरूप व्यक्त होते असे जैन दार्शनिकांचे आणि तार्किकांचे मत आहे. __काही अभ्यासकांनी 'नयवाद' आणि 'स्याद्वाद' हे ‘अनेकांतवादा'चे दोन पंख आहेत असे म्हटले आहे.
मी स्याद्राद' व 'अनेकांतवादा'ला एकाच नाण्याच्या दोन बाज म्हटले आहे. अनेकांताच्या द्वारे जैनांनत्रैयक्तिक, कौटुंबिक, धार्मिक व सामाजिक-सांस्कृतिक सहजीवनात सामंजस्य स्थापण्याचा प्रयत्न केला. जगभरातील
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
विचारवंतांनी या सिद्धांताची दखल घेतली. 'सापेक्षतावादाचा सिद्धांत' वैज्ञानिक क्षेत्रात मांडणाऱ्या आईन्स्टाइनने जैनांच्या अनेकांतवादाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. 'विभज्यवाद' व 'मध्यममार्गा'चा अवलंब बुद्धानेही केला ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति' या ऋग्वेदवचनातूनही वैचारिक उदारतेचेच द्योतन होते. परंतु जैन दर्शनाने व न्यायशास्त्राने हा विचार नयवाद, स्याद्वाद व अनेकांतवादाच्या रूपाने नीट विकसित करून सिद्धांतरूप बनविला. परिणामी ‘अनेकांतदर्शन' हे जैन दर्शनाचे पर्यायी नाव बनले.
(८) जैन महामंत्र :
सर्व जैन संप्रदाय-उपसंप्रदायांना एकमताने शिरोधार्य व पवित्र असलेला जैनधर्मातील प्रभावी मंत्र म्हणजे 'नमस्कार' अथवा 'नवकार मंत्र' होय. तो मंत्र याप्रमाणे -
नमो अरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं
नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमोक्कारो सव्वपावप्पणासणो मंगलाणं च सव्येसिं पढमं हवइ मंगलं ।।
हा मंत्र अर्धमागधी भाषेत आहे. जैनधर्मानुसार हा सर्व मंत्रांचा राजा व तत्त्वज्ञानाचे सार आहे. यात विश्वातील सर्व अरिहंत (अर्हत्), सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांना नमस्कार केला आहे. जैनधर्मानुसार हे पंच परमेष्ठी आहेत. म्हणजेच सर्वोत्कृष्ट आदर्शाची प्रतिके आहेत. पंच परमेष्ठींना हा नमस्कार असला तरी त्यात निजस्वरूप परमात्म्याचे गुणगान आहे.
आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने अरिहंत आणि सिद्ध हे समान आहेत परंतु अरिहंत हे सशरीरी आहेत व सिद्ध हे अशरीरी आहेत. आचार्य, उपाध्याय आणि साधू हे तिघेही मोक्षमार्गाचे आराधक असून त्यांच्यात बाह्य व आभ्यंतर निग्रंथता असते. परंतु व्यावहारिक दृष्टीने त्यांच्या कार्यांमध्ये भेद असतो. आचार्य हे संघावर शासन करतात आणि जैनशासनाचा महिमा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. उपाध्याय हे समग्र आगमांचे व प्रायश्चित्त शास्त्राचे ज्ञाते असतात. साधु-साध्वीवर्गाच्या अध्यापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
नमस्काराच्या रूपाने या पाचांच्या अंगी असलेल्या गुणांची आराधना केली जाते. पंच परमेष्ठींच्या नमस्कारानंतर या मंत्रातच असे निर्दिष्ट केले आहे की यांची गुणपूजा ही सर्व पापांचा नाश करते. जैनांच्या मते विश्वातील सर्वात मंगलप्रद गोष्ट म्हणजे नमस्कारमंत्र होय.
(८ अ) जैन ध्वज :
___ जैन शासनात ध्वजाची प्रथा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी जैन ध्वज केशरी रंगाचा स्वस्तिक चिह्नांकित असा, त्रिकोणी आकाराचा होता. महावीरांच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवाच्या वेळी मुनीश्री विद्यानंदजी यांनी पंच परमेष्ठींचे व पंच महाव्रतांचे प्रतिक असलेला पंचरंगी ध्वज प्रचलित केला. श्वेत रंग अहिंसेचा आणि अरिहंतांचा आहे. लाल रंग सत्याचा आणि सिद्धांचा आहे. पीत रंग अचौर्याचा आणि आचार्यांचा आहे. हरित रंग ब्रह्मचर्याचा आणि उपाध्यायांचा आहे. नील रंग अपरिग्रहाचा आणि साधूंचा द्योतक आहे. हा पंचरंगी ध्वज सर्व जैनधर्मीयांमध्ये बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करतो.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
(८ ब ) जैन प्रतीकचिह्न :
जैन प्रतीकचिह्न बनवताना जैन दृष्टीने विश्वाच्या आकाराची बाह्य प्रतिकृती बनवितात. त्यावर वरच्या बाजूस चार गतींचे प्रतीक असलेले स्वस्तिक व खालच्या बाजूला १२, १६ अगर २४ आऱ्याचे धर्मचक्र दर्शविलेले असते. या प्रतीकचिह्नाच्या अग्रभागी सिद्धशिलादर्शक एक अर्धचंद्राकार रेघ व ज्ञान - दर्शन - चारित्रदर्शक तीन बिंदू दर्शविले जातात. बऱ्याच वेळा प्रतिकाच्या खालच्या बाजूस हाताच्या बाह्याकृतीवर धर्मचक्र दर्शविलेले दिसते.
(९) जैन मंदिरे व तीर्थक्षेत्रे :
आज भारतात स्तिमित करणारे जे प्राचीन कलाविष्कार आहेत त्यातील वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रकला यांमधील जैनांचे योगदान लक्षवेधक आहे. गुंफानिर्मिती या कलाविष्काराचा पहिला टप्पा असून तो मंदिरे, मूर्ती व चित्रकलेच्या स्वरूपात अधिकाधिक सौंदर्यपूर्ण होत गेला. जैन वास्तुकलेचा विकास स्तूप, गुंफा, चैत्य आणि अखेर मंदिर या क्रमाने झालेला दिसतो. परंतु आज उभ्या असलेल्या स्वतंत्र, संरचनात्मक (स्ट्रक्चरल), सर्वोत्कृष्ट अखंड मंदिरांचा काळ दहाव्या शतकाच्या मागे जात नाही.
मौर्यकालीन जैन मंदिरांचे अवशेष पटण्याजवळ लोहानीपुर येथे सापडले. 'ऐहोळे' येथील 'मेघुटी' मंदिर (इ.स.६३४) त्यातील शिलालेखामुळे महत्त्वाचे ठरते. हे मंदिर ' द्राविडी' शैलीत आहे. धारवाड जिल्ह्यातली दोन मंदिरे (१२ वे शतक) याच शैलीत आहे. 'होयसाळ' राजवटीतील (१४ वे शतक) 'मूडबिद्री'चे मंदिर, स्तंभांवरील कमळांच्या शिल्पांनी चिरस्मरणीय ठरते. प्राचीनतम जैन ग्रंथांच्या ताडपत्रीय हस्तलिखित प्रतीही मूडबिद्रीच्या ग्रंथभांडारात आहेत.
झाशी जिल्ह्यातील‘देवगड' पहाडीवरील जैन मंदिर-समूहांवर 'नागर' शैलीचा प्रभाव दिसतो. मध्य प्रदेशातील अतिप्रसिद्ध 'खजुराहो' मंदिरांमधील आदिनाथ, शांतिनाथ आणि पार्श्वनाथ यांची मंदिरे अप्रतिम आहेत. मध्य प्रदेशातीलच 'मुक्तागिरि' मंदिरसमूह पर्वतराजी आणि धबधब्याच्या पार्श्वभूमीमुळे नयनरम्य झाला आहे. यावर मुघल शैलीचा प्रभाव आहे. राजस्थान आणि मारवाडमध्ये तर 'देवालयांची नगरे' आहेत. जोधपुरजवळील 'राणकपुर' येथील चतुर्मुखी मंदिर वास्तुकलेचा अजोड नमुना आहे. अर्बुदाचल अर्थात् आबूच्या पहाडातील 'दिलवाडा' येथील पाच प्रमुख मंदिरे तर अवघ्या भारतीय वास्तुकलेला ललामभूत आहे. त्यांचा इतिहास, दंतकथा आणि अप्रतिम कारागिरी केवळ अद्भुत आणि कल्पनातीत आहे. संगमरवरातून कोरून काढलेली छताची झुंबरे पाहून रसिकांची मने अननुभूत सौंदर्यानुभूतीने भारून जातात.
सौराष्ट्रातील शत्रुंजय (पालीताणा) आणि गिरनार हे मंदिरसमूह तसेच बिहारमधील 'सम्मेदशिखर' ही तीर्थंकरांच्या इतिहासाशी संलग्न पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत.
जैन मुनींच्या सिद्धींशी संबंधित असलेल्या स्थलांना 'अतिशय क्षेत्रे' म्हणतात. ही क्षेत्रे भारतभर विखुरली आहेत. याखेरीज, 'नष्ट झालेल्या, नष्ट केलेल्या आणि परिवर्तित केलेल्या जैन मंदिरांची संख्याही शेकड्यात मोजावी लागते'-असे पुरातत्त्वविद् म्हणतात. 'अखिल भारतीय दिगंबर तीर्थोद्धार समिती' ने प्राचीन तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या दशकात हाती घेतले आहे.
आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी - आणि जेथे जेथे जैन श्रावकवर्ग पोहोचला आहे तेथे तेथे संप्रदायवाद बाजूला ठेवून मंदिरे व स्थानके उभारली गेली आहेत व जात आहेत. भारतातही जैन समाज मंदिर-निर्मितीच्या कमी अतिशय उत्साही आहे. मंदिरे, मूर्तिप्रतिष्ठा आणि दीक्षामहोत्सव यामधे खर्च होणारा अमाप पैसा हा शिक्षण, आरोग्य, आपत्तिनिवारण, रोजगारसंधी आणि अनेक समाजोपयोगी उपक्रमांकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील असलेला एक जैनवर्ग गेल्या दोन-तीन दशकांपासून क्रियाशील झालेला दिसतो.
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
(१०) जैन धार्मिक उत्सव आणि व्रते :
* आषाढ शुद्ध चतुर्दशीपासून (अथवा पौर्णिमेपासून) कार्तिक शुद्ध चतुर्दशीपर्यंतचा (अथवा पौर्णिमेपर्यंतचा) काळ पवित्र 'चातुर्मास्य काळ' समजला जातो. हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे सगळीकडे तृण, बीज, अंकुर इ. उगवलेल्या असतात. तसेच दमटपणामुळे जीवजंतूंचाही पुष्कळ प्रादुर्भाव होतो. जैनधर्मात अतिशय प्राचीन काळापासूनच या चार महिन्यात साधु-साध्वी विहार न करता एके ठिकाणी मुक्काम करतात. साधूंचे सान्निध्य लाभल्यामुळे श्रावकवर्ग त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक उत्सव साजरे करतात.
* चातुर्मास्यातील महत्त्वाचा पर्वकाळ म्हणजे 'पर्युषणपर्व' होय. श्वेतांबरीय समाज हे पर्व श्रावक कृष्ण द्वादशी (अथवा त्रयोदशी) पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी (अथवा पंचमी) पर्यंत साजरे करतो. दिगंबरीय समाज भाद्रपद शुद्ध पंचमी पासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे पर्व, 'दशलक्षणपर्व' या नावाने साजरे करतो. पर्युषणपर्वात सामान्यतः प्रवचन, तप, जप, स्वाध्याय, उपवास यांची प्रधानता असते. पर्युषणपर्वातील शेवटचा दिवस 'संवत्सरी' या नावाने साजरा केला जातो. स्थानकात अथवा मंदिरात या दिवशी जैन समाज बहुसंख्येने एकत्रित येऊन उपासना करताना दिसतो. संवत्सरीनंतरचा दुसरा दिवस 'क्षमापना ' 'म्हणून साजरा करतात. 'बोले चाले मिच्छामि दुक्कड' असे म्हणू क्षमा मागण्याचा प्रघात आहे.
* चैत्र शुद्ध त्रयोदशीला प्राय: सर्व जैन संप्रदाय - उपसंप्रदाय एकत्रित होऊन 'महावीर जयंती' साजरी करतात. कृष्णाष्टमीप्रमाणेच जन्म, पाळणा इ. विधी करून काही संप्रदायांनी याचे रूप उत्सवी केले आहे. या दिवशी प्रायः उपवास न करता गोडाधोडाचे जेवण करण्याचा प्रघात आहे.
* 'अक्षयतृतीये'चा दिवस हा जैन परंपरेप्रमाणे ऋषभदेवांच्या वर्षीतपाच्या पारण्याचा दिवस असतो. या दिवशी श्रेयांस राजाने ऋषभदेवांना उसाचा रस दिला म्हणून आजही साधर्मिक जैन एकमेकांना उसाचा रस देतात. वर्षीतप केलेले अनेक साधक या दिवशी आपल्या उपवासाचे पारणे करतात.
* दिगंबरीय लोक ज्येष्ठ शुद्ध पंचमीला 'श्रुतपंचमी'चे व्रत करतात. त्या दिवशी 'षट्खंडागम' या ग्रंथाची पूजा अर्थात् श्रुतपूजा व सरस्वती पूजा केली जाते. 'ज्ञानपंचमी' हे एक व्रत असून त्याचा आरंभ कार्तिक महिन्यातील शुद्ध पंचमीपासून करतात. दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला विधियुक्त उपवास करून हे व्रत पाच वर्षे, पाच महिने एवढ्या कालावधीसाठी करतात. त्यानंतर उद्यापनात ज्ञानोपकरणांचे दान केले जाते.
* कार्तिक कृष्ण अमावस्येला महावीरांचा निर्वाणोत्सव साजरा केला जातो. जैन दृष्टीने हीचदीपावली होय. या दीपावलीतील पहिल्या दिवशी महावीरांच्या निर्वाणानिमित्त शुभसूचक दीपप्रज्वलन केले जाते. दुसऱ्या दिवशी महावीर शिष्य गौतम गणधर यांच्या केवलज्ञान प्राप्तीच्या प्रीत्यर्थ पाडवा साजरा केला जातो. तिसऱ्या दिवशी महावीरांच्या बहीण आपले बंधू नंदीवर्धन यांच्या भेटीला येते, तो दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.
* याखेरीज अष्टाह्निकाउत्सव, सिद्धचक्र पूजन, नवपद ओळी (आयंबिल ओळी) इ. अनेक प्रकारची विधि-विधाने साजरी केली जातात. रत्नत्रय व्रत, पंचमेरु व्रत, सोळाकारण व्रत, भक्तामर व्रत, मौनएकादशी व्रत, सर्व तीर्थंकरांची पंचकल्याणके, अष्टमी-चतुर्दशी इ. महत्त्वपूर्ण तिथींना पौषध व्रत अशी अनेक प्रकारची व्रते करण्याची प्रथा आहे. त्या त्या प्रदेशामध्ये जैन समाजातील लोक इतरही स्थानिक व्रते करताना दिसतात.
(११) जैन धर्माची व्याप्ती :
पूर्वी म्हटल्याप्रमाणे वर्तमान कालचक्रात आदिनाथ ऋषभदेवांनी जैनधर्मास आरंभ केला. वेळोवेळी सर्व तीर्थंकरांनी त्या धर्माचे पुनरुज्जीवन केले. वर्तमान जैनधर्म हा चोविसावे तीर्थंकर भ. महावीरांची देणगी मानला जातो. बिहार, गुजरात आणि कर्नाटक ही प्राचीन काळापासूनच जैनधर्माची सुदृढ केंद्रे मानली जातात. सामान्यतः उत्तर भारतात श्वेतांबरीयांचे आणि दक्षिण भारतात दिगंबरीयांचे प्राबल्य असलेले दिसते. आचाराच्या काटेकोर नियमावलीमुळे इसवी सनाच्या १८ व्या शतकापूर्वी भारताबाहेर जैनधर्माचा प्रसार झाला नाही. १८-१९ व्या
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
शतकापासून आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. खंडातील देशांमध्ये जैनधर्मीय श्रावक व्यापारानिमित्त जाऊ लागले. त्यांनी त्या त्या देशात आपला जैनधर्म बऱ्याच प्रमाणात अबाधित ठेवला. आज जगभरात शाकाहार हे जैनांचे वैशिष्ट्य मानले जाते. २० व्या शतकात अगदी अपवादाने का होईना जैन साधु-साध्वीवर्ग परदेशगमन करू लागला. इतर धर्मातून धर्मांतरित होऊन जैनधर्मीय होण्याची प्रक्रिया मात्र १२ - १३ व्या शतकानंतर पूर्णत: कुंठित झालेली दिसते. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता जैनधर्मीयांची संख्या, शीखधर्मीयांपेक्षाही कमी आहे. अल्पसंख्याक असलेला जैन समाज भारतातल्या कोठल्याही एका विशिष्ट प्रांतात एकवटलेला नसून सर्वत्र विखुरलेला आहे. छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत पोहोचलेला जैन समाज, स्थानिकांच्या भाषा, वेष, चालीरिती सहजतेने आत्मसात करूनही आपल्या धार्मिक प्रथा कसाशीने पाळतात.
(१२) उपसंहार :
अनेक कारणांनी हिंदू धर्माची शाखा मानला गेलेला जैन धर्म वस्तुत: अवैदिक श्रमण परंपरेचे प्रतिनिधित्व करतो. जैनधर्मीय लोक आरंभापासूनच अल्पसंख्याक आहेत. दृढ धर्मश्रद्धा आणि कडक आचरण यामुळे हिंदूधर्मीयांबरोबर मिसळून गेले तरी हरवून गेले नाहीत. स्वतंत्र प्राचीन इतिहास, पृथक् तत्त्वज्ञान, बोली भाषेतले अमाप साहित्य, कठोर चारित्रपालन आणि अनुपमेय कलाविष्कार - या वैशिष्ट्यांमुळे आज जगभरातल्या प्रमुख विद्यापीठांमध्ये 'जैनविद्या' (Jainology) एक स्वतंत्र अभ्यासशाखा बनली आहे.
अर्थहीन क्रियाकांड आणि अतिरिक्त अवडंबर यापासून मुक्त होऊन जैन धर्मातील शाश्वत मूल्ये उजागर करण्यासाठी जैन युवक-युवती अग्रेसर होऊ लागले आहेत. ही एक मोठीच आशादायी घटना मानली पाहिजे.
संदर्भ-ग्रंथ-सूची
१) भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान : डॉ. हीरालाल जैन, मध्यप्रदेश शासन साहित्य परिषद, १९६२ २) दर्शन और चिन्तन (खण्ड १, २) : पं. सुखलालजी संघवी, गुजरात विद्यासभा, अहमदाबाद
३) तत्त्वार्थसूत्र : पं. सुखलाल संघवी, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९७६
४) जैनधर्म : राजेन्द्रमुनि शास्त्री, संजय साहित्य संगम, आगर, १९७१
५) प्राकृत साहित्य का इतिहास : डॉ. जगदीशचन्द्र जैन, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, १९८५ ६) जैन विचारधारा : डॉ. नलिनी जोशी, सन्मति - तीर्थ प्रकाशन, पुणे, २०१०
७) जैन तत्त्वज्ञान : डॉ. के.वा. आपटे, जैन अध्यासन, फिरोदिया प्रकाशन, पुणे विद्यापीठ, २०११
**********
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
२. जैन परंपरेतील स्त्रीविचार
('समाज-विज्ञान-कोशा'साठी लिहिलेली विशेष नोंद, पुणे, एप्रिल २००९)
हिंदू, बौद्ध व जैन हे तीनही धर्म भारतात उद्भवलेले, रुजलेले व परिवर्धित झालेले आहेत. या तीन परंपरांनी भारतीय संस्कृतीचे सलग वस्त्र विणलेले आहे. जैन परंपरेतील स्त्रीविचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानात से की जैन स्त्री ही समकालीन हिंद किंवा बौद्ध स्त्रीपेक्षा फारशी वेगळी नाही. सामान्यतः जैन स्त्रीचे कौटंबिक. आकि आणि सामाजिक वातावरण तिच्या समकालीन इतर स्त्रियांसारखेच आहे. पुरुषप्रधान संस्कृती, विवाहाचे वय व प्रकार, बहुपत्नीत्वाची पद्धती इ. बाबत भारतात प्राचीन आणि मध्ययुगीन कालात जी स्थित्यंतरे झाली त्यानुसारच जैन स्त्रीमध्येही स्थित्यंतरे दिसून येतात. प्राचीन काळापासून आजपर्यंत हिंदू कायदेपद्धतीच जैन समाजालाही लागू होत आली आहे. जैन स्त्रीचे वेगळेपण दिसून येण्याचे विशेष क्षेत्र म्हणजे धार्मिक क्षेत्र होय. समकालीन हिंदू अगर बौद्ध स्त्रीपेक्षा तिला धार्मिक अधिकार व स्वातंत्र्य निश्चितच अधिक आहे. म्हणून येथे जैन स्त्रीच्या धार्मिक स्थानावर आधारित अशी निरीक्षणे नोंदविली आहेत.
१) स्त्रियांची कर्तव्ये, अधिकार इ. चे विवेचन करणारा म्हणजेच स्त्रीधर्मावर आधारित असा स्वतंत्र ग्रंथ जैन साहित्यात आढळत नाही. आचारधर्म सांगणाऱ्या ग्रंथाचा एक भाग म्हणूनही पतिव्रता, गृहिणी यांची कर्तव्येही सीतली नाहीत. परंतु साध्वी आणि श्राविका यांची आचारसंहिता सांगणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातही साधू आणि श्रावक असे पुरुषवाचक उल्लेखच येतात. ते साध्वी आणि श्राविकेसाठी आहेत असे दुय्यमतेनेच जाणावे लागते. या आचाहतेतून केवळ धार्मिक मार्गदर्शन मिळते.
धार्मिक आचाराबाबत प्राचीन काळापासून आजपर्यंत जैन स्त्रियांचा पुढाकार विशेष दिसून येतो. परंतु स्त्रियांनी लिहिलेला ग्रंथ मात्र आढळून येत नाही. जैन इतिहासात अनेक धर्मपरायण दानी स्त्रियांचे उल्लेख मात्र दिसतात.
२) जैन स्त्रियांना धार्मिक संघात नव्याने प्रवेश देण्याचा प्रश्न जैन परंपरेत उद्भवला नाही. कारण आरंभीपासूनच हा धर्म चतुर्विध संघावर प्रतिष्ठित आहे. त्यामध्ये साधंबरोबर साध्वींना आणि श्रावकांबरोबर श्राविकांना स्थानदसते.
प्रत्येक तीर्थंकरांच्या संघात किती साध्वी आणि किती श्राविका होत्या याची संख्या नोंदविलेली दिसते. (समवाया, त्रिलोकप्रज्ञप्ति)
३) तीर्थंकरांचे समवशरण, आचार्य-गुरुंचे प्रवचन इ. प्रसंगी स्त्रियांचा बरोबरीने सहभाग असलेला दिसतो.
महावीरांच्या धर्मसभेत महावीरांबरोबर प्रश्नोत्तरे करण्याइतकी बुद्धीची प्रगल्भता आणि सामाजिक मोकळे वातावरण जैन परंपरेत दिसते. (भगवतीसूत्र, उपासकदशा) जैन धर्मोपदेशकांनी उपदेशासाठी प्राकृत बोलीभाषांचा वापर केल्यामुळे स्त्रिया धर्मचर्चेत सहजपणे सामील होऊ शकत.
४) प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांनी स्त्रियांसाठी ६४ आणि पुरुषशंसाठी ७२ कलांचे प्रणयन केले असे उल्लेख येतात. (आदिपुराण) त्यांच्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांनी लिपिविज्ञान आणि गणित यात प्राविण्य मिळविले होते. भारतातील मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहासात स्त्रियांच्या औपचारिक शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था नसावी. त्यामुळेच या युगातील जैन स्त्रियांच्या औपचारिक शिक्षणाचे उल्लेख आढळत नाहीत. विवाहाचे घटते वय हेही याचे कारण असावे.
दोन दशकांपूर्वी सामान्यत: जैन समाजातील स्त्रियांना उच्च शिक्षणाची संधी सहजपणे मिळत नसे. परंतु आधुनिक काळात त्या उच्च शिक्षणाकडे वळताना दिसतात. एक गोष्ट विशेष नोंदविण्यासारखी आहे की, स्त्रीसाक्षरतेचे प्रमाण मात्र जैन समाजात अन्य समाजापेक्षा कितीतरी अधिक आहे असे सामाजिक सर्वेक्षणावरून दिसते. ऋषभदेवांनी
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
स्त्रीशिक्षणाचे जे आदर्श घालून दिले होते ते स्त्रीसाक्षरतेच्या रूपाने जैन समाजाने आधुनिक काळापर्यंत पुढे चावलेले दिसतात.
५) स्थानांगसूत्रात दीक्षाग्रहणाची १० कारणे नोंदविलेली आहेत. त्यात उत्कट वैराग्यभावना हे एक कारण असून बाकीची कारणे कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक आहेत. विनापत्य, निराधार, निर्धन, परित्यक्त्या अथवा विधवा अशा स्त्रियांना जैन धर्माने श्राविका अथवा साध्वी बनून धार्मिक जीवन जगण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला दिसतो. त्यामुळे त्यांना समाजात एक आदरणीय स्थान मिळत असे.
६) मध्ययुगीन आणि अर्वाचीन जैन साहित्यात जैन स्त्रीने पतीच्या चितेवर आरूढ होण्याचे उल्लेख अपवादात्मक रीतीने सुद्धा आढळत नाहीत. 'अहिंसाव्रत' केंद्रस्थानी असलेल्या जैन परंपरेने या निघृणतेला कधीच थारा दिला न्ही. जैनांनी 'सती' हा शब्द वेगळ्याच अर्थाने वापरला. अत्युच्च कोटीचे धार्मिक जीवन जगणाऱ्या स्त्रियांचा 'सती' म्हणून गौरव केलेला दिसतो. जैन परंपरेत अशा १६ सती सुप्रसिद्ध आहेत.
७) स्वेच्छा व निर्धारपूर्वक धार्मिक मृत्यू अर्थात् संलेखनेचे (संथाऱ्याचे) उल्लेख सर्व जैन साहित्यात विपुलतेने दिसतात. असे मरण स्वीकारण्याचा अधिकार जैन साध्वींना आणि श्राविकांनाही आजतागायत आहे असे आढळून
येते.
८) शासनदेवता, प्रत्येक तीर्थंकरांच्या यक्ष आणि यक्षिणी, सोळा विद्यादेवता, ५६ दिक्कुमारी, सर्व देवलोकातील देवी, कुलदेवता, डाकिनी-शाकिनी इ. दुष्ट देवता, श्रुतदेवी, सरस्वती अशा अनेकविध रूपांनी जैन परंपरेत खतांचा समावेश केलेला दिसतो. या देवतांना मान्यता देण्यामुळे जैनांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास, स्त्रीचे सामर्थ्य व गौरधावना व्यक्त झालेली दिसते. प्रत्यक्ष आचारव्यवहारात आणि विविध चित्रे व शिल्पांमध्ये विशिष्ट देवतांना सन्मानपूर्वक स्थान दिलेले आढळते.
९) जैन कथासाहित्यात स्त्रीअपत्य जन्माला आल्याचे दुःख व्यक्त केलेले दिसत नाही. कन्यांचा जन्मोत्सव इ. विधीही उत्साहपूर्वक पार पाडलेले दिसतात. अपत्यहीन स्त्रीपुरुष नवस बोलताना मला अगर कन्या होऊ दे' अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात.
“मृत्यूनंतर पुत्राने केलेल्या पिंडदान, श्राद्ध, तर्पण इ. विधींनी पितर मुक्त होतात' अशी जी दृढ हिंदू धारणा अनेक धर्मग्रंथातून व्यक्त झालेली दिसते, त्यामुळे हिंदू परंपरेत पुत्रप्राप्तीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. जैन सिद्धांतानुसार मात्र प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. तो स्वत: विवेक व निर्धारपूर्वक स्वत:च स्वत:ची आध्यात्मिक प्रगती करून घेतो. त्यासाठी त्याला पुत्राचे प्रयत्न उपयोगी पडत नाहीत. या सैद्धांतिक मान्यतेमुळे जैन परंपरेत पुत्रप्रप्तीचे महत्त्व, त्यासाठी केलेले प्रयत्न यांना स्थान दिसत नाही. अर्थातच स्त्री व पुरुष दोन्हीही अपत्यांचा समानतेने आनंपूर्वक स्वीकार केलेला दिसतो.
१०) जैन साधुसंघात आचार्य, उपाध्याय इ. पदाधिकारी दिसतात. जैन साध्वीसंघात मात्र प्रवर्तिनी, आर्या, आर्यिका, गणिनी, महत्तरा अशी पदे दिसतात. साध्वी स्त्रियांचा उल्लेख आचार्या, उपाध्यायिनी अशा प्रकारे केलेला दिसत नाही. व्यवहारसूत्र, कल्पसूत्र इ. ग्रंथांमधून वंदनेविषयीचे नियम सांगताना स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान अशिय स्पष्टतेने दिसते. तेथे म्हटले आहे की, 'पाच वर्षे दीक्षापर्याय असलेल्या साधूलाही साठ वर्षे दीक्षापर्याय असलेल्य साध्वीने वंदना केली पाहिजे. कारण सर्व तीर्थंकरांच्या तीर्थात धर्म हे पुरुषप्रधान असतात.' आजही जैन साधुसाध्वं
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
संघातील सर्व व्यवहार या नियमानुसार चाललेले दिसतात. गेल्या काही वर्षात मात्र या दुय्यम स्थानाविषयी साध्वीसा जागृतीची चिह्ने दिसू लागली आहेत.
११) २४ तीर्थंकरांपैकी ‘मल्ली' ही श्वेतांबर परंपरेनुसार एकमेव स्त्री- तीर्थंकर होऊन गेली. दिगंबर मान्यतेप्रमाणे मल्लीनाथ हे पुरुष-तीर्थंकर आहेत. याबाबत श्वेतांबरीयांचा स्त्रीविषयक उदार दृष्टिकोण दिसतो.
१२) मल्लीसकट सर्व तीर्थंकरांचे 'गणधर' मात्र पुरुषव्यक्ती आहेत...
१३) स्त्रियांना स्त्रीजन्मातून मोक्षप्राप्ती होते अगर नाही याबाबत जैन परंपरेत दोन भिन्न विचारधारा दिसतात. स्त्रियांच्या मोक्षाच्या अधिकाराबाबत श्वेतांबरीय विचारधारा अधिक उदार आहे. त्यांच्या मते स्त्रीवेद (स्त्रीलिंग) मोक्षाच्या आड येणारी गोष्ट नाही. प्रथम तीर्थंकरांची माता मरुदेवी, मल्ली, कृष्णाच्या पत्नी इ. स्त्रियांच्या तपश्र्चा आणि मोक्षगमनाचा स्पष्ट उल्लेख आहे. (अंतगडसूत्र, चउप्पन्नमहापुरिसचरिय) उत्तराध्ययनसूत्रात पुरुष अथवा स्त्रियांनाच नव्हे तर नपुंसक व्यक्तींना सुद्धा मोक्षाचा अधिकार सांगितला आहे. यावरून स्पष्ट दिसते की श्वेतांबर विचारधोनुसार कोणतेही लिंग हा मोक्षाचा अडथळा असू शकत नाही.
માવાન મહાવીરાનંતર સુમારે રૂ00 વર્ષોંની શ્વેતાંવ-વિયંવર મેત અધિષ્ઠાધિજ સ્પષ્ટ હોત ોછે. શ્વેતાંવર-ાિંવર मतभेदाचे अनेक मुद्दे आहेत. (Outlines of Jainism, S. Gopalan. Pg. No. 21-27) परंतु त्यातील प्रमुख मुद्दे दोन आहेत. त्यापैकी पहिला आहे - नग्नत्व आणि संपूर्ण अपरिग्रह आणि दुसरा - स्त्रियांना स्त्रीजन्मातून मुक्ती. दिमीयांच्या मते, मोक्षप्राप्तीसाठी संपूर्ण अपरिग्रह अत्यावश्यक आहे. वस्त्र हा एक प्रकारचा परिग्रहच आहे. वस्त्राचा संपूर्ण त्या करून नग्नत्व स्वीकारल्याखेरीज मोक्ष संभवत नाही. स्त्रियांना स्वाभाविक लज्जा आणि सामाजिक मर्यादा यामुळे संपूर्ण वस्त्रत्याग करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मोक्षगती संभवत नाही. दिगंबरीयांच्या दृष्टीने स्त्रीच संहनन उत्कृष्ट ध्यानास असमर्थ आहे. (सूत्रपाहुड, कुंदकुंद गाथा क्र. २२ ते २७)
श्वेतांबरीयांनी ‘संपूर्ण अपरिग्रह' या शब्दाचा संबंध नग्नत्वाशी जोडला नसून 'संपूर्ण अनासक्ती'शी जोडला आहे. ‘संपूर्णपणे अनासक्त अशी स्त्री मोक्षास पात्र ठरते' असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु श्वेतांबर ग्रंथात स्त्रीप्राप्त होण्याची जी कारणे दिली आहेत त्यात, 'पूर्वजन्मी कपटव्यवहार करणे', असे कारण नोंदविलेले दिसते. (ज्ञातीकथा) स्त्रियांविषयीच्या पूर्वग्रहापासून श्वेतांबरीय सुद्धा संपूर्णत: मुक्त नाहीत असे दिसते.
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख)
भाग - २
* लेखन व संपादन *
डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन
सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन
फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ
ऑगस्ट २०११
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
३. जैन तत्त्व चिंतन (१ ते ४)
(आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
१. तीर्थंकरप्रणीत धर्म आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून तीन धर्म प्रचलित आहेत. हिंदु किंवा वैदिक धर्म. जैन धर्म आणि बौद्ध धर्म. जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे की हिंदू धर्माची शाखा आहे, या वादविवादात आज आपल्याला शिरायचं नाही. हिंदू परंपरेपेक्षा आपल्या वेगळ्या तत्त्वज्ञानानं आणि आचरणानं उठून दिसणारी जैन परंपरा, श्रमण परंपरेतीलएक मुख्य विचारधारा आहे. जी मनुष्य म्हणून जन्मली, राग-द्वेष इत्यादी विकारांवर ताबा मिळवला आणि शुद्ध आचरणानं श्रेष्ठ आध्यात्मिक सामर्थ्यानं भूषित झाली, त्या व्यक्तीस 'जिन' म्हणतात. अशा जिन भगवंतांनी सर्व प्राणिमात्रांच्या
ल्याणाच्या इच्छेनं प्ररित होऊन, जो उपदेश दिला. जी आचारसंहिता पालन दिली व जे तत्त्वज्ञान सांगितले. ते सर्व जैन धर्माच्या अंतर्गत येते.
जैन परंपरेनुसार, जैन धर्म अनादि आहे. जैन धर्माच्या प्रवर्तक पुरुषांना 'तीर्थंकर' म्हणतात. ऋषभदेव पहिले तीर्थंकर असून भ. महावीर हे २४ वे तीर्थंकर आहेत. तीर्थंकर हे हिंदू संकल्पनेत असलेल्या अवतारांपेक्षा वेगळे हेत. महावीरांचा सर्वमान्य काळ इ.स.पू.५०० आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रभावी आचार्यांनी हा धर्म आपल्यापर्यंत पोहोचविला. वेगवेगळे जैन आचार्य आपल्या ग्रंथात ‘धर्म म्हणजे काय ?' हे अनेक प्रकारे समजावून सांगतात.
____धर्म हा मंगल व उत्कृष्ट आहे कारण अहिंसा, संयम व तप ही प्रमुख तत्त्वे समजावून सांगतो. जो धर्माला सदैव मनात ठेवतो, त्याला देवही वंदन करतात. वस्तूच्या मूळ स्वभावाला धर्म म्हणतात. क्षमा, मार्दव, ऋजुता, सत्य, शुचिता, संयम, तप, इ. १० प्रकारच्या गुणांनाही आत्म्याचे गुण मानतात. हे गुण धार्मिक व्यक्तीत सहजच प्रकट होतात. जीवांच्या रक्षणालाही धर्म म्हणतात. धर्म दयाप्रदान असतो. धर्म, देव अगर गुरू यांच्या नावाखाली केलेल्या हिंसेला धर्मात कधीच थारा नसतो. जास्त काय सांगावे ? जे आपल्याला प्रतिकूल आहे ते दुसऱ्यांच्या बाबतीत चुकूनसुद्धा न करणे हाच धर्म. गाजावाजा, अवडंबर न करता धर्माचरण शांततेने व सतत करीत रहावे. धर्मरूपी मृाचे 'विनय' हे मूळ असून, 'मोक्ष' हे फळ आहे. धर्माचा पाया श्रद्धा आहे. ती श्रद्धा नीट पारखून ठेवलेली असेल तरच 'सम्यक्’ बनते. धर्मपालनासाठी व्रते ग्रहण करणे आवश्यक आहे. व्रतांचे पूर्ण पालन केले की ती 'महाव्रते'होतात. 'अहिंसा' हे सर्वात प्रमुख महाव्रत आहे. इतर व्रते त्याच्या रक्षणासाठी सांगितली आहेत. जैन आचार्य आत्मचिंतनाला नवीनच खाद्य देतात. ते म्हणतात, “जीववध हा आत्मवध असून जीवदया ही वस्तुत: आपल्यावरच केलेली दया
आहे."
**********
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
(आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
२. जीव-विचार
विश्वातला कोणताही धर्म घ्या, त्याची दोन अंगे असतात. एक अंग तत्त्वज्ञानाचे असते तर दुसरे आचरणाचे. हा संबंध शरीर आणि चैतन्य यांच्या दृष्टांताने स्पष्ट करण्यात येतो. आचरण हे शरीर असले तर तत्त्वज्ञान हा प्राण. बाह्य आचरणात देश-काल-परिस्थितीनुसार काही ना काही बदल अपरिहार्य आहे. तत्त्वचिंतनाची धारा मात्र सतत अक्षुण्णच रहाते. प्रत्येक भारतीय दर्शनानं आपापल्या विशिष्ट तत्त्वप्रणाली निश्चित केल्या आहेत. तत्त्वांची अगर पदार्थांची गणना केली आहे. जैन धर्मानेही ७ अगर ९ तत्त्वांच्या रूपाने ही मीमांसा केली आहे.
___ मुख्यत: सर्व सृष्टी ही दोन विभागात विभागता येते. जीव व अजीव म्हणजेenergy & matter. नऊ तत्त्वांपैकी पहिले तत्त्व जीव अगर आत्मा आहे. अजीव अगर जीव यांना तत्त्वे म्हणून समान दर्जा दिला आहे. जीव हे अनंत आहेत. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. ज्ञानचेतना अगर बोधशक्ती हे जीवाचे असाधारण लक्षण आहे. त्याला उपयोग' हा पारिभाषिक शब्द दिला आहे. आज आपण जीवतत्त्वाचा अधिक विस्ताराने परामर्श घेऊ.
जीवांचे मुख्य प्रकार दोन. संसारी आणि मुक्त. संसारी म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात सरत जाणारे. मुक्त म्हणजे जन्म-मृत्यू चक्रातून सुटलेले. सिद्ध आणि अर्हत् दोन्ही मुक्त जीवच आहेत. परंतु त्यांच्या कार्यात फरक्आहे. अर्हत् किंवा तीर्थंकर हे जीवनकालात काही काळ तरी उपदेश व मार्गदर्शन करतात. संसारी जीवांचे त्रस व स्थावर म्हणजे हालचाल करू शकणारे (अर्थात् जागा सोडू शकणारे) व जागा सोडू न शकणारे असे दोन भेद असतात. शावर जीव पाच प्रकारचे असतात. पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक. याचा अर्थ आपण नीट समजून घेऊ. गैरसमज असा आहे की जलकायिक जीव म्हणजे पाण्यातील जंतू इ. होत. जैन धर्मातील हे पाण्यातले जीव नसून, ज्यांची शरीरे खुद्द पाणीच आहे असे जीव. हीच गोष्ट पृथ्वीकायिक इ. जीवांची आहे. या सर्वांना एकच इंद्रिय असते व ते म्हणजे स्पर्श. ज्यांना हिंदू दर्शने 'पंचमहाभूते' मानतात त्यांना जैन दर्शन एजेंयि जीव' संबोधतो.
त्रस म्हणजे जागा बदलू शकणाऱ्या जीवांचे दोन इंद्रियवाले, तीन इंद्रियवाले इ. भाग केले आहेत. गांडुळासारख्या प्राण्यांना स्पर्श व रसना ही दोनच इंद्रिये असतात. मुंगी, ढेकूण, कीटकांना स्पर्श, रसना व घ्राण ही तीन झंय असतात. डास, मधमाशी इ. जीवांना चक्षू इ. चार इंद्रिये असतात. गाय, घोडा इ. पृष्ठवंशीय प्राण्यांना श्रवण धरून पाच इंद्रिये असतात. मनुष्य, देव व अधोलोकातील जीवांना पाच इंद्रियांखेरीज मन व विचारशक्तीही असते. 'निगोद' हा सूक्ष्म जीवप्रकार असतो. सर्व जीवांच्या मिळून ८४ लक्ष योनी मानल्या आहेत. आत्मकल्याण करून घेण्याची सर्वात अधिक क्षमता अगर सामर्थ्य मनुष्य योनीत आहे. त्याचबरोबर हेही खरे आहे की संयम व विवेकाच्या अभावी जास्तीत जास्त क्रूर कर्मे करून अधोगतीला जाण्यासही मानवच उद्युक्त होतात. जैनांचा हा जीवविचार विज्ञानाच्या कसोटीवर कस उतरतो हा प्रश्न वेगळा पण चिंतनाला प्रेरक ठरणारा मात्र नक्कीच आहे !
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________ (आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, 2005) 3. अजीव-विचार जैन दर्शनातील 'जीव' विचारानंतर आपण 'अजीव' द्रव्याचा परामर्श घेणार आहोत. जैन तत्त्वज्ञानानुसार हे दृश्य विश्व सत्य अगर वास्तव असून तो सहा द्रव्यांचा समुदाय आहे. ही सहा द्रव्ये म्हणजे जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल आणि पुद्गल - होत. यातील 'जीव' वगळता उरलेली पाच द्रव्ये अजीव आहेत. पुद्गल हे पहिले अजीव द्रव्य आहे. ज्यांच्या लहानमोठ्या संघातांनी जगातील निरनिराळे अचेतन पदार्थ बनलेले आहेत त्या अणूंना ‘पुदगल' म्हणतात. त्यांच्या ठिकाणी सतत परिस्पंद व परिणाम या क्रिया सुरू असतात. परिस्पंद म्हणजे नुसती हालचाल तर परिणाम म्हणजे त्यांच्या गुणात व पर्यायात म्हणजे अवस्थांमध्ये झालेले बदल. प्रत्येक पुद्गलाच्या ठिकाणी स्पर्श,स, गंध व वर्ण (रूप) हे गुण असतातच. वैशेषिकांनी मांडलेल्या परमाणुवादापेक्षा जैनांचा परमाणुवाद ग्रीक तत्त्वज्ञानस अधिक जवळचा आहे. परमाणूंच्या संघातांना ‘स्कंध' म्हणतात. पुद्गलांचे स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर असे फरक आहेत कर्माचे सुद्धा अतिशय सूक्ष्म परमाणूच असतात. मृत्यूनंतर जीव हा स्वत:च्या सूक्ष्मतर कार्मण शरीरास घेऊनच दुसऱ्या शरीरात प्रवेशतो. 'धर्म' आणि 'अधर्म' नावाच्या स्वतंत्र तत्त्वांचा विचार जैन दर्शनाने केला आहे. याचा अर्थ सदाचार अगर दुराचार असा नाही. ह्या द्रव्यांनी सर्व लोकाकाश भरून टाकले आहे. यांचे वर्णन आधुनिक परिभाषेतmotion & intertia असे करता येईल. धर्मद्रव्य गतीस सहायक आहे. ते गतीस प्रेरणा देत नाही तर नुसती मदत करते. पाणी, काही माशांना ढकलत नाही, फक्त त्यांच्या गतीला वाव देते. अधर्मद्रव्य हे स्थितीचे उदासीन कारण आहे. स्थितिशील पदार्थांना एका ठिकाणी स्थिर रहाण्यास ते मदत करते. वृक्षाची सावली काही प्रवाशाला रोखून ठेवीत नाही पण सथला निवास सुखकर करण्यास मदत करते. म्हणजे ही स्थिति-गतींना आधारभूत तत्त्वे आहेत. ___चौथे अजीव तत्त्व 'आकाश' (space) हे आहे. सर्व द्रव्य-पदार्थांना अवकाश करून देणे, त्यांच्या अवगाहनास सहाय्य करणे हे आकाशाचे कार्य. आकाशाचे लोकाकाश आणि अलोकाकाश असे दोन भाग मानले. लोकाकाशसहा द्रव्यांनी भरून गेले आहे तर अलोकाकाश नुसतीच अखंड पोकळी आहे. तेथे पदार्थांची गती वा स्थिती शक्य नाही आत्तापर्यंत वर्णिलेली 'जीव' द्रव्य धरून पाच द्रव्ये 'अस्तिकाय' म्हणून संबोधली आहेत. 'पंचास्तिकाय' नावाच्या ग्रंथात त्याचे सविस्तर वर्णन आहे. 'काल' (time) हे सहावे द्रव्य आहे. त्याला लांबी, रुंदी, उंची अशी अनेक परिमाणे किंवा मिती नसतात. कालाचे अणू जणूकाही आडव्या दोऱ्यात मणी ओवावे तसे एकापुढे एक असतात. पदार्थांच्य मध्ये झालेले बदल अगर विकार आपल्याला जाणवून देण्यासाठी आधार-तत्त्व म्हणजे काल. पदार्थात बदल झाला तरी हाच तो पदार्थ' अशी ओळखही काळामुळेच पडते. दिवस, रात्र, महिना, वर्ष अशी गणती म्हणजे व्यवहारातील काळ होय. मुळात तो अखंड आहे. जैनांचा षड्द्रव्यविचार संक्षेपाने अशा प्रकारचा आहे.
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________ (आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, 2005) 4. उत्तराध्ययनातील विशेष विचार जैन साहित्यातील प्राचीन ग्रंथ 'अर्धमागधी' नावाच्या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. हिंदू धर्मात जे स्थान 'भगवद्गीते'ला आहे, बौद्ध धर्मात जे स्थान ‘धम्मपद' ग्रंथाला आहे किंवा ख्रिश्चन धर्मात जे स्थान बायबल'ला आहे तेच स्थान जैन धर्मात 'उत्तराध्ययन' नावाच्या ग्रंथास आहे. ही साक्षात् ‘महावीरवाणी' समजली जाते. याच्या महत्त्वाछे यास 'मूलसूत्र' असे म्हणतात. जैन समाजात या लोकप्रिय ग्रंथाचा आजही खूप अभ्यास केला जातो. यातील मोजके विचार आपल्या अधिक विचारार्थ आपल्या पुढे ठेवीत आहे. या संसारात प्राण्यांना चार गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत. मनुष्यजन्म प्राप्त होणे, सद्धर्माचे श्रवण करणे, धर्मावर अतूट श्रद्धा व संयमासाठी लागणारे सामर्थ्य या त्या चार गोष्टी आहेत. राग अर्थात् आसक्ती आणि द्वेष या दोन विकारांच्या द्वारे मनुष्य सतत कर्ममलाचा संचय करत असतो. हे त्याचे काम दोन्ही द्वारांनी माती खाणाऱ्या गुळासारखे असते. साधूने कशाचाही लेशमात्र संचय करू नये. पक्ष्याप्रमाणे सदैव विचरण करावे. तीन व्यापारी भांडवल घेऊन व्यापाराला निघाले. एकाने नफा कमावला. दुसरा भांडवलासह परत आला. तिसऱ्याने भांडवलही गमावले. मनुष्यत्व हे भांडवल आहे. देवगति ही लाभरूप आहे. मनुष्ययोनी गमावली तर नरक किंवा तिर्यंच गती प्राप्त होते. प्रवासाल निघालेला माणूस वाटेतच घर बांधून राहू लागला तर त्याला इच्छित स्थळाची प्राप्ती कशी होणार ? माणसानेही आत्मकल्याणाचे ध्येय सोडून उपभोगांच्या विषयात रममाण होऊ नये. भ. महावीर आपला प्रमुख शिष्य जो गौतम त्यास म्हणतात - “हे गौतमा, काळाच्या ओघात पिवळी पाने जशी झाडावरून आपोआप गळून पडतात, तसे मानवी जीवन आहे. तू क्षणभरही बेसावध राहू नकोस. सिंह जसा हरणाला पकडून फरफटत घेऊन जातो, त्याप्रमाणे मृत्यू मनुष्यावर झडप घालतो. अशा वेळी नातेवाईक, मित्र, शेजारी उपयोगी पडू शकत नाहीत. फक्त त्याचे कर्म तेवेढत्या कर्त्याच्या मागे जाते. पढलेले वेद आम्हाला तारणार नाहीत. ब्राह्मण भोजने घालणे हा काही मोठा धर्माचा मार्गनाही. श्राद्ध वगैरे करणारे पुत्रसुद्धा गेलेल्या जीवाचे काहीच बरेवाईट करू शकत नाहीत." 'अमुक अमुक मी मिळवले. अमुक अमुक मिळवायचे राहिले'-अशा विचारात तू गुंतून राहशील तर मृत्यू तुला कधी गाठेल याचा पत्ताही लागणार नाही. जसजसा माणसाला लाभ होतो, तसतसा त्याचा लोभ वाढतच जातो. दोन कवड्यांची आरंभी इच्छा करणारा माणूस, सोन्यारूपाचे पर्वत मिळूनही तृप्त होतच नाही. जरामरणाच्या प्रवाहात वेगाने वाहन जाणाऱ्या जीवास धर्म हेच द्वीप, तीच गती व तेच शरणस्थान आहे. भ. महावीरांनी जातिसंस्थेस प्राधान्य देणाऱ्या समाजातील मान्य विचारांवर घणाघाती प्रहार केले. ते म्हणतात, 'केवळ मुंडन केल्याने कोणी श्रमण होत नाही, समभाव ठेवल्याने श्रमण होतो. ओंकाराच्या जपाने नव्हे तर मलमज्ञानाने ब्राह्मण होतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हा जो तो आपल्या कर्मांनी होतो, केवळ जन्माने नव्हे.' **********
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________ 4. जैन दर्शनातील ‘पुनर्जन्म' संकल्पना ('जैन-जागृति' मासिक पत्रिका, मे 2011) परंपरेने 'आस्तिक' मानलेल्या भारतीय दर्शनांनी ज्याप्रमाणे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या संकल्पना मांडल्या आहेत, त्याचप्रमाणे नास्तिक' समजलेल्या जैन दर्शनानेही या संकल्पना सर्वस्वी मान्य केल्या आहेत. जगत् अथवा विश्व अनादि-अनंत मानल्यामुळे आणि सृष्टिनियामक ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यामुळे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्माला जैन दर्शनात अनन्यसाधारण महत्त्व लाभले. जीव (soul) आणि अजीव (matter) अशी दोन स्वतंत्र तत्त्वे मानली तरी कर्मांना पुद्गल किंवा परमाणुरूप मानून जैनांनी 'कषाय' आणि 'लेश्या' यांच्या मदतीने त्यांच्यातील अनादि संपर्क मान्य केला. सत्ताशास्त्रीय दृष्टीने जीव (individual soul) हे एक गुण-पर्यायात्मक द्रव्य आहे. पुद्गलमय कर्म हेही गुणपर्यायात्मक द्रव्य आहे. यांच्या संपर्कामुळे जीवाला मिळणाऱ्या विविध गतींमधील शरीरे हे जीवाचे जणू पर्यायच आहेत. जन्म-मरणाचे अव्याहत चालू असलेले चक्र हे 'पुनर्जन्मा'चेच चक्र आहे. जैन दर्शनात शरीरांचे पाच प्रकार सांगितले आहेत. शरीर हे जीवाचे क्रिया करण्याचे साधन आहे. औदारिक, वैक्रिय, आहारक, तैजस आणि कार्मण अशी पाच प्रकारची शरीरे एकूण असतात. त्यापैकी तैजस आणि कार्मण ही शरीरे जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाशी अविनाभावाने संबद्ध आहेत. त्यातही कार्मण' शरीर हे वारंवार जन्म घेण्यास कारण ठरणारे मूलभूत शरीर आहे. ते अत्यंत सूक्ष्म आहे. पूर्वकृत कर्मांचा भोग (विपाक) आणि नवीन कर्मबंधंचे अर्जन - ही घटना प्रत्येक जीवात सतत घडत असते. 'उत्तराध्ययन' या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे राग (आसक्ती) आणि द्वेष हे सर्व कर्मांचे बीज आहे. ___आपली गति, जाति, लिंग, गोत्र आणि सर्व शारीरिक-मानसिक वैशिष्ट्ये पूर्वकृत कर्मानुसारच ठरत असतात. अनादि काळापासून एकेंद्रिय ते पंचेंद्रिय सृष्टीत भ्रमण करणारा जीव कर्मांचा पूर्ण क्षय करेपर्यंत सतत नवनवे जन्मधारण करीतच रहातो. कर्मांचे चक्र हे पुनर्जन्मांचेच चक्र आहे. जगातील प्रत्येक जीव अशा प्रकारे इतर अनंत जीवांच्य संपर्कात अनेकदा येऊन गेलेला आहे. जैन दर्शनाच्या दृष्टीने अनंत पुनर्जन्म ‘कविकल्पना' नसून वस्तुस्थिती अहे. पुनर्जन्माच्या वस्तुस्थितीला पुरावा आहे का ? अर्थातच आहे. जैन दर्शनानुसार ज्ञान पाच प्रकारचे आहे. मतिश्रुत-अवधि-मन:पर्याय आणि केवल. त्यापैकी मतिज्ञान' हे इंद्रिये व मनाच्या सहाय्याने होणारे ज्ञान आहे. गर्भजन्मो जन्मणाऱ्या, पंचेंद्रिय संज्ञी (मनसहित) जीवाला विशिष्ट परिस्थितीत 'जातिस्मरण' नावाचे ज्ञान होऊ शकते. लेश्या, अध्यवसाय आणि परिणाम यांच्या विशुद्धीमुळे, मतिज्ञानाला आवृत करणाऱ्या कर्मांचा क्षयोपशम झाल्यास जातिस्मरण' अर्थात् पूर्वजन्माचे स्मरण होते. मानवांना तर ते होऊ शकतेच पण पशुपक्ष्यांनाही होऊ शकते. पूर्वजन्म-पुनमांचा हा व्यक्तिनिष्ठ पुरावा आहे. ____ बौद्ध धर्मातील 'जातककथा' या देखील अशाच प्रकारच्या पूर्वजन्मावर आधारित वृत्तांतआहे. जैन साहित्यातील शेकडो कथांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कथांमधे पूर्वजन्म-पुनर्जन्मांचे कथन असते. पातंजल योगसूत्रातील.३९ (अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथान्त: संबोध:) आणि 3.18 (संस्कारसाक्षात्करणात्पूर्वजातिज्ञानम्) या सूत्रांमधे जातिस्मरणचे उल्लेख आहेत. ____ जैन अध्यात्मात, आध्यात्मिक विकासाच्या 14 पायऱ्या (श्रेणी) आहेत. त्यांना ‘गुणस्थान' म्हणतात. त्यापैकी 4 थ्या पायरीवरील व त्यापुढे प्रगती केलेल्या जीवांना पूर्वजन्मांचे स्मरण' खात्रीने होत असते. 'अवधि' आणि 'केवल' ज्ञानाच्या धारक व्यक्ती आपली एकाग्रता केंद्रित करून इतर व्यक्तींचे पूर्वजन्म व पुनर्जन्म जाणू शकतात. अशा प्रकारे पुनर्जन्माची सिद्धी दुसऱ्याकडूनही होऊ शकते. प्रत्येक गतीत (देव-मनुष्य-नरक-तिर्यंच) आणि जातीत (एकेंद्रिय ते पंचेंद्रिय) जन्मलेल्या जीवाची कायस्थिती
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________ आणि भवस्थिती यांचे सविस्तर वर्णन तत्त्वार्थसूत्रात येते. ___ सारांश काय ? तर जैन दर्शनाचा पूर्वजन्म-पुनर्जन्मावर 100 टक्के विश्वास आहे. त्याला त्यांनी सत्ताशास्त्रीय आणि ज्ञानशास्त्रीय आधार दिला आहे. कर्मसिद्धांताच्या विस्तृत आणि सूक्ष्म मांडणीत ही संकल्पना कौशल्याने गुंफली आहे. अध्यात्माच्या दृष्टीनेही पुनर्जन्माची उपपत्ती लावली आहे. समग्र जैन कथावाङ्मय व चरित्रे पूर्वजन्मपुनर्जन्माने भरलेली आहेत. ___आधुनिक मानसशास्त्रीय संशोधकही पुनर्जन्माची सिद्धी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र विशिष्ट 'case-study' पुनर्जन्म सुचवीत असला तरी व्यापक सार्वत्रिक सिद्धांतात अजून तरी त्याचे रूपांतर झालेले दिसत नाही. **********
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________ 5. महावीरांच्या दृष्टीने 'वीर' कोण ? (महावीरजयंती विशेषांक, दैनिक 'प्रभात', एप्रिल 2009) जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर 'भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व 599 मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह') जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात ‘ज्ञातृ' कुळातील राजा 'सिद्धार्थ' व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयादशीच्या मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना 'महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान-प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय व चिंतनशील होते. वयाच्या 28 व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमती यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दु:खी-गरजू लोकांना विपुल दाने दिली. वयाच्या तिसाव्या वर्षी 'मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना केवलज्ञान' प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या 72 व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या' मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्र दीप प्रज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे 1000 वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गुजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा 'अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात. पहिला अंगग्रंथ आचारांग' नावाने सुप्रसिद्ध आहे. प्राकृत भाषातज्ञांनी या ग्रंथाचा पहिला विभाग अर्धमागधी भाषेचा सर्वात प्राचीन नमुना म्हणून स्वीकारार्ह मानला आहे. या ग्रंथाचा अभ्यास करीत असताना त्यातील 'वीर' आणि ‘महावीर' या शब्दांकडे माझे लक्ष वेधले गेले. भ. महावीर स्वत: 'वीर' शब्द कोणकोणत्या संदर्भात वापरतत याची उत्सुकता लागून राहिली. त्यांचे तद्विषयक विचार या लेखात मांडले आहेत. आचारांगाची भाषाशैली उपनिषदांशी अतिशय मिळतीजुळती आहे. महावीरांच्या उपदेशाचा काळ हा वैदिक परंपरेतील उपनिषत्काळाशी निकटता राखणारा असल्याने, ही गोष्ट नैसर्गिकच आहे. ___'वीर' हा शब्द वाच्यार्थाने रणांगणावर पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्याचा वाचक आहे. आचारांगात मात्र तो मेधावी, विवेकी मुनीसाठी उपयोजित करण्यात आला आहे. 'शस्त्रपरिज्ञा' आणि 'लोकविजय' या शीर्षकांच्या अध्ययनांमध्ये त्यांनी या शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग केला आहे. अर्थातच हा 'आध्यात्मिक विजय' आहे, रणांगणावरील विजय नव्हे. 'अत्युच्च आत्मकल्याण' हे ध्येय, उद्दिष्ट आहे. 'अहिंसेचे पालन' हा त्याचा मार्ग आहे. ते म्हणतात, पणया वीरा महावीहिं' - अर्थात् वीरपुरुष या महापथाला समर्पित आहेत (जसा योद्धा ध्येयपूर्तीसाठी समर्पित असतो तसे). असे वीर ‘पराक्रमी' आहेत. ते साधनेतील अडथळे, विघ्ने यावर मात करतात. बाह्य, दृष्य शत्रूवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूद करणारा हा पराक्रम नव्हे. हा तर संयमाचा पराक्रम' आहे. आजूबाजूच्या त्रस (हालचाल करू शकणाऱ्या) जीवांना तर हा वीर जपतोच पण पृथ्वी, जल, अग्नि, वायु व वनस्पती या एकेंद्रिय जीवसृष्टीविषयीही हा जागृत, अप्रमत्त असतो. पर्यावरणाच्या सर्व घटकांचे हा प्राणपणाने रक्षण करतो. भोजन करताना, वस्त्रे परिधान करताना, मार्गक्रमण करताना तसेच मल-मूत्र विसर्जन करताना हा आजूबाजूच्या कोणत्याही स्थूल-सूक्ष्म जीवाला इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेतो. हीच ‘शस्वपरिज्ञा' अर्थात् 'विवेक' आहे सामान्य वीर हे शबूंना बंदी बनवितात, त्यात भूषण मानतात. हे आध्यात्मिक 'वीर' आपल्या उपदेशाने
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________ अनेक प्राणिमात्रांना बंधनांपासून मुक्त करतात. भ. महावीर म्हणतात, ‘णारतिं सहते वीरे, वीरे णो सहते रतिं' अर्थात् हे वीरपुरुष संयम साधनेतील स्वत:ची ‘अरति' आणि असंयमातील 'रति' दोन्हीही सहन करत नाहीत. माध्यस्थवृत्ति धारण करतात. __ अत्यंत मोजका, नीरस आणि रुक्ष आहार ते स्वीकारतात. स्वत: अन्न शिजवीत नाहीत. इतरांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या आहारातील अगदी मोजकी भिक्षा जीवननिर्वाहापुरती ग्रहण करतात. वीराचे लक्षण सांगताना भ. महावीर म्हणतात, 'जागर-वेरोवरए वीरे' अर्थात् हा वीर सदैव अहिंसेविषयी जागृत आणि वैरभावापासून दूर असतो. मेधावी, निश्चयी व विवेकी साधक ‘आत्मगुप्त' असतो म्हणजेच कुशल सेनापतीप्रमाणे स्वतःला शाबूत ठेऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या मनात डोकावणाऱ्या क्रोध, अहंकार, कपट, लोभ या भावनवर मात करतो. हा वीर क्षेत्रज्ञ' असतो म्हणजेच रणांगणाचा जाणकार आणि रणनीतीत कुशल असतो. भगवद्गीतेतही क्षेत्रक्षेत्रज्ञ अध्यायात शरीराला क्षेत्र' आणि आत्म्याला 'क्षेत्रज्ञ' म्हटले आहे. आचारांगात 'वीर्य' आणि 'पराक्रम' हे शब्द वारंवार उपयोजिले आहेत. हा पराक्रम अर्थातच संयमात आणि आत्मविजयात दडलेला आहे. 'महावीरा विप्परक्कमंति' अशी शब्दयोजनाही आढळून येते. साधनेचा मार्ग कितीही खडतर असला तरी ते वीर मनाची प्रसन्नता घालवीत नाहीत. खिन्न, विमनस्क होत नाहीत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक साधकाची वाटचाल ‘एकट्याने करावयाची मार्गक्रमणा' आहे. યેથી૪ મનુભૂતી પ્રત્યેાવી સ્વતંત્ર સ્વતંત્ર માટે. હા સામુદ્રાયિક મા નાહી. મ. મહાવીર સ્ફળતાત દુરyવરો મયાધીરા अणियट्टगामीणं' - अर्थात् येथे कोणी सोबती नाही आणि खरा वीर मार्गावरून पुन्हा फिरत नाही. __आचारांग ग्रंथातील शेवटचे अध्ययन 'उपधानश्रुत' म्हणून प्रसिद्ध आहे. भ. महावीरांच्या उपदेशांचा संग्रह करणाऱ्या प्रभावी आचार्यांनी ते लिहिले असावे. त्यांनी सांगितलेली 'वीराची लक्षणे' त्यांच्या चरित्रातून कशी दिसम्त ते सांगून अखेरीस म्हटले आहे - 'सूरो संगामसीसे वा, संवुडे तत्थ से महावीरे / पडिसेवमाणे फरुसाई, अचले भगवं रीइत्था / / ' प्रतिक्षणी अहिंसेचे पालन करण्यात दक्ष असलेले हे तीर्थंकर गेली 2600 वर्षे ‘महावीर' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेली आध्यात्मिक पराक्रमाची लक्षणे त्यांनी स्वत: तंतोतंत पाळली म्हणून तर त्यांच्याच शब्त सांगायचे तर, ‘एस वीरे पसंसिए' अर्थात् या वीराची एवढी प्रशंसा झाली !!! **********
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________ 6. महावीरवाणीतून भेटलेले महावीर (स्वाध्याय शिबिर, महावीर प्रतिष्ठान, पुणे, विशेष व्याख्यान, मे 2011) जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व 599 मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह') जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात 'ज्ञातृ' कुळातील राजा 'सिद्धार्थ' व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयादशीच्या' मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान-प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय व चिंतनशील होते. वयाच्या 28 व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमतीन्यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दुःखी-गरजू लोकांना विपुल दाने दिली. वयाच्या तिसाव्या वर्षी 'मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या 72 व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्री दीप प्रज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे 1000 वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा ‘अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात. आचारांगसूत्र' हा अर्धमागधी भाषेतील सर्वात प्राचीन व पहिला अंगग्रंथ आहे. याची भाषा गद्यपद्यमय आहे. उपनिषदांच्या शैलीशी मिळतीजुळत्या अशा सूत्रमय, तत्त्वचिंतनात्मक विचारांनी हा ग्रंथ पुरेपूर भरला आहे. खेर तर 'आचारांग' म्हणण्यापेक्षा 'विचारांग' शीर्षकच त्याला शोभून दिसेल. गृहस्थावस्थेचा त्याग करून, आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय अहिंसेच्या आधारे प्रत्यक्षात उतरविणाऱ्या प्रबुद्ध, विवेकी साधकाचे चिंतनोन्मेष व उद्गार या ग्रंथात शब्दबद्ध केलेले आहेत. 'नत्थि कालस्स णागमो / ' 'सव्वेसिं जीवियं पियं' अथवा 'सुत्ता अमुणी, सया मुणिणो जागरंति' अशा सोप्या, छोट्या वाक्यांना महावीरांच्या वाणीचा ‘परतत्त्वस्पर्श' झाल्याने, ते आध्यात्मिकांसाठीदीपस्तंभ ठरले आहेत. संपूर्ण अहिंसा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक हालचाल, व्यवहार, अन्नग्रहण, वस्त्रग्रहण, मलमूत्रविसर्जन, तपस्या, तितिक्षा कशी करावी त्याचे हे 'पॅक्टिकल गाइडबुक' आहे. गूढगहन सिद्धांत, अवघड तत्त्वचर्चा, विश्वोत्तीची मीमांसा, ज्ञानाची मीमांसा यांना स्थान न देता जीवन जगण्याच्या ध्येयप्रधान शैलीवर भर दिलेला असतो. सूत्रकृतांग' या ग्रंथात महावीरांच्या जीवनाचा वेगळाच पैलू दिसतो.स्व-सिद्धान्त आणि पर-सिद्धान्त यात नोंदवले आहे. नियतिवाद, अज्ञानवाद, जगत्कर्तृत्ववाद, लोकवाद यांच्या सिद्धांतांचे मंडन व निरसन आहे. पंचानादी, षष्ठभूतवादी, अद्वैतवादी अशा विविध मतांची नोंद आहे. स्वत:च्या सिद्धान्तांचे नीट मंडनही केले आहे. खंडन करताना कलह, वितंडवाद, कठोरता, उपहास या शस्त्रांचा वापर केलेला नाही. अनेकान्तवादी दृष्टी ठेवून स्वत:चे सिद्धांत ठामपणे मांडले आहेत. 'आर्द्रकीय' आणि 'नालन्दीय' अध्ययनात आलेले संवाद त्या काळच्या दार्शनिक विचारप्रवाहांवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहेत. सूत्रकृतांगाची जमेची बाजू हीच आहे. 'स्थानाग' आणि 'समवायांग' ह्या ग्रंथातून महावीरांच्या प्रतिभेचा आणखी वेगळा पैल दिसतो. हे ग्रंथ कोशवजा आहेत. एकसंख्या असलेल्या गोष्टी स्थानांगाच्या पहिल्या अध्ययनात, दोन संख्यायुक्त दुसऱ्या अध्ययत याप्रमाणे दहा अध्ययनांची रचना आहे. त्या काळची दहा आश्चर्ये, दीक्षा घेण्याची दहा कारणे, दहा महानद्या, दहा
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________ प्रख्यात नगरींची नावे अशा सांस्कृतिक, ऐतिहासिक व भौगोलिक गोष्टींची नोंद यात आहे. दहाच्या पुढील विविध संख्यांचा विचार समवायांगात केला आहे. 24 तीर्थंकरांची नावे, 18 प्रकारच्या लिपींची नावे, 64 व 72 कलांची (विद्यांची) नावे आणि जैन धर्मासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती यातन मिळते. चाळीस प्रदीर्घ प्रकरणांनी बनलेला व्याख्याप्रज्ञप्ति' किंवा भगवती' हा ग्रंथ ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. हा ग्रंथ अनेक संवाद आणि प्रश्नोत्तरांनी नटलेला आहे. गौतम गणधर आणि भ. महावीर यांची सिद्धांतविषयक चर्चा खूपच उद्बोधक आहे. महावीरांच्या पूर्वीचा पार्श्वनाथप्रणीत निग्रंथ धर्म कशा स्वरूपाचा होमते यातूनच समजते. महावीरांच्या अनेक वर्षावासांची (चातुर्मासांची) हकीगत यात नोंदवली आहे. महावीर व त्यांचा विरोधक शिष्य गोशालक' यांची अनोखी भ्रमणगाथा यातूनच उलगडत जाते. अंग, वंग, मलय, लाढ, वत्स, काशी, कोशल इ. 16 जनपदांचा उल्लेख प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. महाभारत जसे अनेक संस्करणे होत होत वाढत गेले तसा हा ग्रंथ उत्तरवर्ती काळात भर पडत पडत बृहत्काय झाला असावा. महावीरांच्या समकालीन इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा हा ग्रंथ जैनविद्येच्या अभ्यासकांनी खूप प्रशंसिला आहे. ‘ज्ञातृधर्मकथा' ग्रंथाच्या पूर्वभागात महावीरांनी सांगितलेले प्रतीकात्मक दृष्टान्त आणि दीर्घकथा त्यांच्या विहारकाळातील लोकाभिमुखतेकडे आपले लक्ष वेधून घेतात. हा ग्रंथ नक्कीच जनसामान्यांसाठी आहे. आठ प्रकाच्या कर्मांचा सिद्धांत भोपळ्याला दिलेल्या आठ लेपांच्या दृष्टांतातून मांडला आहे. प्रत्येकी पाच अक्षता देऊन चासुनांची परीक्षा घेण्याची कथा, वाड्.मयीन दृष्ट्या सरस व रंजक तर आहेच परंतु अखेरीस 'पाच महाव्रतांचे साधूने कसेपालन करावे' असा बोधही दिला आहे. 'द्रौपदीने पाच पतींना का वरले ?' हे स्पष्ट करण्यासाठी तिच्या तीन पूर्वजमांचा सांगितलेला वृत्तांत एका वेगळ्या अद्भुत विश्वात घेऊन जातो. 'मल्ली' नावाच्या अध्ययनात तीर्थंकरपद प्राप्त केलेया सुंदर, बुद्धिमान व वैराग्यसंपन्न स्त्रीची अप्रतिम कथा रंगविली आहे. तेतलीपुत्र नावाचा मंत्री आणि सोनाराची कन्या 'पोट्टिला' यांच्या विवाहाची, वितुष्टाची आणि पोट्टिलेच्या आध्यात्मिक प्रगतीची कथा अशीच मनोरंजक आहे. तत्त्वचिंतक महावीरांचे हे गोष्टीवेल्हाळ रूप नक्कीच स्तिमित करणारे आहे. साधुधर्म कितीही आदर्श असला तरी सामान्य गृहस्थांना कठोर संयमपालन शक्य नसल्याने महावीरांनी त्यांच्यासाठी उपासकधर्म, श्रावकधर्म अथवा गृहस्थधर्मही समजावून सांगितला. 'आनंद' नावाच्या श्रावकाने श्रावकवेत घेऊन आपला परिग्रह व आसक्ती कशी क्रमाक्रमाने कमी केली त्याचा वृत्तांत पहिल्या अध्ययनात विस्ताराने येतो वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील स्त्रीपुरुषांच्या या हकिगती तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकतात. सर्वसामान्यांम झेपेल अशा धार्मिक आचरणाचा उपदेश देणारे वेगळेच महावीरांचे दर्शन ‘उपासकदशा' नावाच्या या ग्रंथातून होते 'अंतगडदशासूत्र' ह्या ग्रंथाचे पर्युषणकाळात वाचन करण्याचा परिपाठ आहे. यातील अर्जुनमाळी आणि बन्धुमती यांची कथा अतिशय रोचक आहे. महाभारतातील काही प्रमुख व्यक्तिरेखांची हकिगत या ग्रंथात येते. कृण, वासुदेव, देवकी, अरिष्टनेमी, द्वीपायन ऋषि, द्वारकेचा विनाश अशा अनेकविध कथा यात येतात. स्त्रियांनी केलेल्या कठोर तपश्चर्यांची वर्णने आश्चर्यकारक आहेत. “अनुत्तरोपपातिकदशा” या ग्रंथाचे स्वरूपही सामान्यत: असेचआहे. 'प्रश्नव्याकरण' ग्रंथात प्रश्न व त्यांची उत्तरे असावीत. आज उपलब्ध असलेल्या प्रश्नव्याकरणाचे स्वरूप मात्र पूर्ण सैद्धांतिक आहे. ___ 'विपाकश्रुत' ग्रंथात चांगल्या कर्मांचे सुपरिणाम आणि वाईट कर्मांचे दुष्परिणाम कथांच्या माध्यमातून सांगितेल आहेत. 'दृष्टिवाद' नावाच्या बाराव्या अंगग्रंथाचा लोप झाला असे जैन परंपरा सांगते. भ. महावीरांनी त्यांच्या निर्वाणापूर्वी सतत तीन दिवस ज्याचे कथन केले तो ग्रंथ ‘उत्तराध्ययनसूत्र' नावाने ओळखला जातो. गीता, धम्मपद, बायबल, कुराण अथवा गुरुग्रंथसाहेबाचे त्या त्या धर्मात जे आदरणीय स्थान आहे तेच स्थान श्वेतांबर जैन परंपरेत उत्तराध्ययनसूत्राचे आहे. यात तत्त्वज्ञान, जगत्-मीमांसा, कर्मविज्ञान, ज्ञानमीमांसा, कथा, संवाद, आचरणाचे नियम इ. अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्रमणपरंपरेची अनेक वैशिष्ट्ये या ग्रंथातून फ्रट होतात.
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________ वर वर्णन केलेल्या ग्रंथांचा सामग्याने, एकत्रित विचार केला तर महावीरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम त्यातून प्रकट होतात. आचारांगातून शुद्ध तत्त्वचिंतक महावीर प्रकटतात. सूत्रकृतांगात ते विविध दार्शनिक विचप्रवाहांच्या खंडनमंडनात मग्न दिसतात. स्थानांग-समवायांगात त्यांची कोशविषयक प्रतिभा प्रकट होते. व्याख्याप्रज्ञप्तीतून ते अनेक समकालीन ऐतिहासिक तथ्यांवर प्रकाश टाकतात. ज्ञातासूत्रातून त्यांच्या कथा व दृष्टान्तरचनेचे कौशल्य फ्रट होते. उपासकदशेत ते गृहस्थोपयोगी धार्मिक आचार सांगतात. विपाकश्रुत ग्रंथातून ते कर्मसिद्धान्ताचे व्यावहरिक परिणाम दर्शवितात तर 'उत्तराध्ययनसूत्र' त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा कळसाध्याय आहे. जैन परंपरा अवतारवादावर विश्वास ठेवत नाही. भ. महावीर काही पुन्हा अवतरणार नाहीत पण महावीरवाणीतून आपण आपापल्या कुवतीनुसार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पुन:पुन: वेध मात्र घेऊ शकतो. **********
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________ 7. जैन साहित्याची संक्षिप्त ओळख (महावीरजयंती विशेषांक दैनिक 'प्रभात', एप्रिल 2011) इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून, इसवी सनाच्या 15-16 व्या शतकापर्यंत जैन आचार्यांनी, जैन धर्माच्या अनुषंगाने, विविध भारतीय भाषांमध्ये आणि विविध वाङ्मयप्रकारांमध्ये प्रचंड साहित्याची निर्मिती केलेली दिसेत भ. महावीरांचे प्रारंभिक उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत निबद्ध आहेत. श्वेतांबर परंपरेने महावीर-निर्वाणानंतर सुमारे 200 वर्षे हे उपदेश मौखिक परंपरेने जपले. त्यानंतर ते लिखित स्वरूपात आणले. लिपिबद्ध केले, ग्रंथारूढ केले. यप्रदीर्घ कालावधीत त्या उपदेशात थोडी-थोडी भाषिक परिवर्तने येत गेली. नवनवीन ग्रंथकारांनी आपल्या रचना त्यात साविष्ट केल्या. इ.स.५०० नंतर हे भर पडण्याचे काम थांबले. अर्धमागधी भाषेतील 45 ग्रंथ ‘महावीरवाणी' नावाने संबोको जाऊ लागले. श्वेतांबर परंपरेतील स्थानकवासी' संप्रदाय यापैकी 32 ग्रंथांनाच 'महावीरवाणी' मानतो. __ दिगंबर परंपरेने आपले सर्व प्रारंभिक लेखन शौरसेनी' नावाच्या प्राकृत भाषेतून प्रथमपासूनच लिखित स्वरूपात आणले. शौरसेनी भाषेतील सुमारे 15 प्राचीन ग्रंथांना दिगंबर-परंपरा ‘आम्नाय' अगर ‘आगम' म्हणून संबोधते. त्यातील विषय मुख्यत: सैद्धांतिक, तत्त्वज्ञानात्मक, आध्यात्मिक आणि आचारप्रधान आहेत. 'शौरसेनी' भाषेच्या पाठोपाठ दिगंबरांचे साहित्य प्रामुख्याने संस्कृत भाषेत लिहिलेले दिसते. मूळ ग्रंथांवरील टीका, तत्त्वज्ञानन्याय, चरित (चरित्र), पुराण, चम्पूकाव्य, गणित - असे विविधांगी साहित्य जैनांनी अभिजात संस्कृतात रचले. आठव्या-नवव्या शतकापासून दिगंबरांनी 'अपभ्रंश' नावाच्या समकालीन प्राकृत भाषेत चरिते, पुराणे, दोहे यांची रचना केली. श्वेतांबर आचार्य इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून 'महाराष्ट्री' नावाच्या प्राकृत भाषेमध्ये ग्रंथरचना करू लागले. जैन पद्धतीने लिहिलेले पहिले रामायण ‘पउमचरिय' याच भाषेत आहे. चरिते-महाकाव्ये-खण्डकाव्ये याबरोब्लम श्वेतांबरांनी फार मोठ्या प्रमाणावर उपदेशप्रधान कथाग्रंथांची रचना केली. ही 'महाराष्ट्री' भाषा जैनेतरांनीलिहिलेल्या महाराष्ट्रीपेक्षा वेगळी आणि अर्धमागधी भाषेने प्रभावित अशी आहे. मधूनमधून शौरसेनी भाषेची झलकही त्यात दिसते. जैनांच्या महाराष्ट्री भाषेला, भाषाविद् 'जैन महाराष्ट्री' असे नामाभिधान देतात. कोणत्याही भारतीययक्तीला आकृष्ट करील असे अनुपमेय कथांचे भांडार आज जैन महाराष्ट्री' या प्राकृत भाषेत उपलब्ध आहे. स्व. दुर्गलाई भागवत यांनी ज्याप्रमाणे पालि भाषेतील 'जातककथा' मराठीत प्रथम आणल्या, त्याप्रमाणे अर्धमागधी आणि महाराष्ट्री भाषेतील जैन कथा मराठीत आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'जैन अध्यासन' आणि 'सन्मति-तीर्थ' संस्था यांच्या सहयोगाने सध्या चालू आहे. पाच खंड प्रकाशित झाले आहेत. __16-17 व्या शतकानंतर आजपावेतो जैनांनी, विशेषत: दिगंबर जैनांनी मराठीत लिहिलेल्या ग्रंथांची संख्याही विशेष लक्षणीय आहे. आधुनिक कन्नड भाषेतील साहित्याला जैन कवींनी आरंभीच्या काळात मोलाचे योगदान केले आधुनिक गुजराती भाषेतील प्रारंभीच्या ग्रंथरचनेतही श्वेतांबर जैन आचार्यांचा मोलाचा वाटा आहे, असे आढळूयेते. सारांश काय ? - तर संख्येने अल्प असलेल्या जैन साहित्यिकांनी संस्कृतबरोबरच विविध प्राकृत बोलीभाषातून ग्रंथरचना करून भारतीय साहित्याला आपले महत्त्वाचे योगदान दिले. 'आचारांग' नावाच्या ग्रंथाची शैली उपनिषदम्या भाषेशी जवळीक साधते - तीही बोलीभाषेतून ! 'ऋषिभाषित' या अर्धमागधी ग्रंथात ब्राह्मण, बौद्ध आणि जैन अशा एकूण 45 ऋषींचे विचारधन संकलित केलेले आहे. उत्तराध्ययन' हा जैन ग्रंथ आणि बौद्धांचे ‘धम्मपद' यात विलक्षा साम्य आहे. 'ज्ञाताधर्मकथा' ग्रंथातील कथा व दृष्टांत एकाहून एक सरस आहेत. 'तत्त्वार्थसूत्र' हा ग्रंथ संस्कृत्सूत्रांमध्ये निबद्ध असा अनुपमेय दार्शनिक ग्रंथ आहे. 'षट्खंडागम' हा आद्य दिगंबर ग्रंथ ‘कर्मसिद्धांत' आणि 'आध्यात्मिक विकासाच्या श्रेणी' या विषयांना वाहिलेला आहे. 'गोम्मटसार' या दिगंबर ग्रंथात जीवसृष्टीचा सूक्ष्म विचार ग्रथित केला आहे. महावीराचार्यांचा ‘गणितसार' ग्रंथ शास्त्रीय ग्रंथनिर्मितीतला मुकुटमणी आहे. हरिभद्रांचे प्राकृत भाषेतील 'धूर्ताख्यान'-व्यंग-उपहासाचा अजोड नमुना आहे. 'वसुदेवहिंडी' हे बोलीभाषेतले पहिले कथाप्रधान प्रवासवर्णन
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________ आहे. भ. महावीरांच्या 2610 व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली ही कृतज्ञतेची साहित्यिक भावांजली !! जय जिनेंद्र
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________ 8. प्राकृत म्हणजे काय ? जैनांनी प्राकृत का शिकावे ? (तीर्थंकर' मासिक पत्रिका, मुंबई, जुलै 2006) एका संपूर्ण जगात सुमारे 2000 भाषा बोलल्या जातात. विद्वानांनी त्या भाषांचे वेगवेगळे 12 गट केले आहेत. त्यापैकी एका गटाला भारोपीय (इंडो-युरोपियन) भाषागट असे म्हटले जाते. संस्कृत, प्राकृत आणि पालीया भाषा या परिवारात येतात. “प्राकृत' ही काही पालीसारखी एक, एकजिनसी भाषा नाही. इ.स.पू. 500 पासून इ.स. 1200 पर्यंतच्या प्रदीर्घ काळात भारतात ज्या विविध बोलीभाषा बोलल्या जात होत्या, त्या सर्व “प्राकृत' नावाच्या अंतर्ग येतात. “संस्कृत' ही भाषा वेदकाळापासून जवळजवळ 17 व्या शतकापर्यंत सर्व भारतीयांची ज्ञानभाषा होती. सर्व प्रकारच्या कला व विद्यांचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने संस्कृत भाषेच्या माध्यमातून होत होते. धार्मिक साहित्य, गीत, खगोल, ज्योतिष, नाट्यशास्त्र, वास्तू व शिल्पशास्त्र, वैद्यक अशा विविध ज्ञानशाखांचे सुप्रसिद्ध व उत्कृष्ट शास्त्रग्रंथ संस्कृत भाषेतच लिहिलेले दिसून येतात. एक गोष्ट अगदी खरी आहे की वर्णाश्रमव्यवस्थेचा पगडा भारतीय समाजावर असल्याने आणि हजारो वर्षांची पुरुषप्रधान संस्कृती येथे सर्रास रूळलेली असल्याने संस्कृतमधून शिक्षण घेणे व संस्कृतमधून लोकव्यवहार करणे हे अगदी आत्ताआत्तापर्यंत फक्त उच्चवर्णीयांची (ती सुद्धा पुरुषांची) मक्तेदारी होती. उच्चनीचतेवर आधारित जातिव्यवस्थ बांधलेला बहुजनसमाज व स्त्रिया, ही हजारो वर्षे काय करीत होत्या ? ते रोजच्या व्यवहारात, बाजारात, स्वयंपामरात, सामाजिक जीवनात कोणत्या भाषेचा वापर करीत होते ? या प्रश्नाचे उत्तर आहे - 'विविध प्राकृत भाषांमध्ये म्हणजे बोलीभाषांमध्ये, मातृभाषांमध्ये ते बोलत होते'. प्राकृत भाषांचे व्याकरणाचे नियम जाचक नव्हते. उच्चारणाच्या बाबतीत शिथिलता होती. वेगवेगळ्या प्रांतातील भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळी शब्दसंपत्ती (Vocabulary) होती. प्रत्येक व्यवसायानुसारही भाषांमध्ये फरक होता. कुंभार, लोहार, सुतार असे बारा बलुतेदार थोडी थोडी वेगळ्या धाटणीची बोली बोलत होत स्त्रियांचे स्वयंपाकघर, सण, वार, उत्सव इत्यादी प्रसंगी या भाषांचा वापर होत असे. विनोद करणे, एकमेकांवर मनापासूनप्रेम करणे आणि क्रोधाच्या भरात अपशब्द इ. उच्चारणे, भांडणे या मानवी मनातील अगदी मूलभूत प्रेरणा आहेत. त्याच्या प्रकटीकरणासाठी अतिशय सुसंस्कृत अशा संस्कृत भाषेचा वापर या देशातील लोकांनी फारच कमी प्रमाणात केला दिसतो. या भावनांना प्राकृतद्वारेच वाट मिळे. भारतातल्या सर्व बोलीभाषांना मिळून 'प्राकृत' असे नाव असले तरी ती प्रांतानुसार, व्यवसायानुसार विविध प्रकारची होती. या प्राकृत बोलीभाषाच खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांच्या मातृभाषा' आहेत. यांचे शिक्षण आईपासून मिळते. त्यांचा पगडा खोलवर असतो. सहसा त्या विसरत नाहीत. ____ आरंभीच्या काळात, प्राकृत बोलीभाषांमध्ये लिहिण्याचा प्रघात नव्हता. हळूहळू त्यातही पुस्तकांची रचना होऊ लागली. मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री व अपभ्रंश या प्राकृत भाषांमध्ये प्रामुख्याने ग्रंथरचना झालेली दिसते. ___भ. बुद्धांनी धर्मोपदेशासाठी ‘पाली' भाषा निवडली. तिचे साम्य ‘मागधी' भाषेशी होते. भ. महावीरांनी आपले सर्व धर्मोपदेश ‘अर्धमागधी' नावाच्या भाषेतून केले. आपला धर्म जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचावा ही त्यामागची भावना होती. धर्म हा आत्म्याशी निगडित असल्याने त्यांना संस्कृतची मक्तेदारी व पुरोहितवर्गाची मध्यस्थी मोडू काढायची होती. ___ श्वेतांबरीयांचे 45 किंवा 32 धर्मग्रंथ अर्धमागधी भाषेत आहेत. दिगंबर जैन पंथीयांचे सर्वात प्रचीन धर्मग्रंथ 'शौरसेनी' नावाच्या प्राकृतमध्ये लिहिलेले आहेत. हरिभद्र, हेमचंद्र, जिनेश्वर, मुनिचंद्र, देवेंद्र अशा अनेकानेकवेतांबर
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________ जैन आचार्यांनी आपले धार्मिक, लौकिक,कथाप्रधान व उपदेशप्रधान ग्रंथ 'जैन महाराष्ट्री' या भाषेतून अनेक शक्के लिहिले आहेत. 'गाथासप्तशती'सारखे शृंगारिक मुक्तकाव्य महाराष्ट्री प्राकृतमधील सौंदर्याचा अद्वितीय अलंकार आहे. दिगंबर आचार्यांनी इ.स.च्या 10 व्या शतकापासून 15 व्या शतकापर्यंत अनेक प्रकारचे चरित्रग्रंथ 'अपभ्रंश' नावाच्या भाषेतून लिहिले. ही अपभ्रंश भाषा पूर्वीच्या प्राकृत भाषातूनच हळूहळू विकसित झाली होती. आज आपण अनेक परदेशी भाषा अतिशय उत्साहाने शिकून त्यात प्राविण्य मिळवत आहोत. ही गोष्ट स्पृहणीय व अभिनंदनीय आहेच. परंतु त्याचबरोबर प्रत्येक जैन माणसाने (खरे तर अजैन माणसानेही) प्राकृत भाषांची तोंडळख करून घेतली पाहिजे. __गुजराथी, मारवाडी, राजस्थानी, पंजाबी, हिंदी, मराठी, बंगाली, आसामी इ. आजच्या सर्व बोलीभाषा याच प्राकृतातून निघाल्या आहेत.
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________ 9. जैन साहित्यातील कथाभांडार (भाषण, आकाशवाणी पुणे केंद्र, जून 2011) श्रोतेहो, आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून आत्तापर्यंत जे जे एतद्देशीय साहित्य अर्थात् वाङ्मय निर्माण झालं ते तीन भाषांमधे लिहिलेलं दिसतं. त्या भाषा म्हणजे संस्कृत, प्राकृत आणि पाली. वैदिक परंपरेचे अर्थात् हिंदधर्माचे ग्रंथ प्रामुख्यानं संस्कृतात आहेत. बौद्ध धर्माचं आरंभीचं साहित्य ‘पाली' भाषेत आहे. नंतरचं साहित्य संस्कृतात आहे. बौद्ध धर्म भारताबाहेर पसरल्यावर त्या त्या प्रांतांमधल्या प्रादेशिक भाषांत व लिपींमध्ये बौद्ध साहित्याचं लेखन झालं. प्राकृत' या ऋग्वेदकाळापासून आम समाजात प्रचलित असलेल्या बोली भाषा आहेत. त्या प्रांतानुसार, लोकांच्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या होत्या. आरंभी त्या केवळ दैनंदिन बोलचालीपुरत्याच मर्यादित होत्या. झवी सनापूर्वी 6 व्या शतकात भ. महावीर आणि भ. गौतम बुद्धांनी आपापले धर्मोपदेश अर्धमागधी आणि पाली या लोकभाषांमधे दिले. पहिल्यांदा काही शतकं ते तोंडी परंपरेनं पाठ करून जपले गेले. नंतर नंतर बोली भषांचं स्वरूप बदलत गेलं आणि स्मरणशक्तीही क्षीण होऊ लागली. परिणामी इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर प्राकृत साहित्य ग्रंथबद्ध होऊ लागलं. धार्मिक ग्रंथांखेरीज लौकिक ग्रंथांचीही निर्मिती होऊ लागली. ‘पाली' ही भाषा ‘मागधी' भाषेवर आधारित अशी प्राकृत भाषाच आहे. परंतु ‘पाली'चा स्वतंत्रपणं आणि विस्तारानं खूप अभ्यास झाला. शब्दकोषही बनले. इतर प्राकृत भाषांचा अभ्यास त्या मानानं नंतर झाला. त्यामुळं 'प्राकृत' या नावातून ‘पाली' भाषा वगळण्याचा प्रघात पडला. साहित्य अर्थात् वाङ्मयामध्ये अनेक प्रकार व अनेक विषय समाविष्ट असतात. त्यापैकी जैनांनी लिहिलेल्या प्राकृत साहित्यातील कथाभांडाराचा आज आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. ___अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, अपभ्रंश आणि संस्कृत या पाच भाषांमध्ये जैनांनी जवळजवळ 15 शतके अर्थात् दीड हजार वर्ष सातत्यानं लेखन केलं. त्यापैकी महाराष्ट्री भाषेत तर कथांची खाणच उपलब्ध आहे. तोंडी परंपरेनं चालत आलेल्या कथा तर त्यात नोंदवलेल्या आहेतच परंतु क्लिष्ट विषय सोपा करून समजावून सांगण्यासठी नवनवीन कथांची निर्मिती देखील केलेली दिसते. 'कथा' हा एकच वाङ्मयप्रकार किती विविध रूपांनी नटून अवतरतो त्याची गणतीच नाही. कधी चार ओळींची छोटीशी चातुर्यकथा दिसेल तर कधी 400 पानांची दीर्घकथा ! आत्ता आपण जिला कादंबरी म्हणतो क्लिा प्राकृतमधे कहा' अर्थात् 'कथा'च म्हटलं आहे. प्राकृत साहित्यात आख्यानं, उपाख्यानं, दृष्टांतकथा, रूपककथा, अद्भुतकथा, बोधकथा, प्रश्नोत्तररूपकथा, प्राणी-पक्षी-कथा यांची नुसती भरमार आहे. वेगवेगळ्या जैन आचार्यांनी कथांचं वर्गीकरण सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारांनी सादर केलं आहे ! दशवकालिक नावाच्या ग्रंथाच्या व्याख्येत आचार्य हरिभद्रांनी कथेचे परिणाम लक्षात घेऊन वर्गीकरण केलं आहे. तप, संयम, दान, शील अशा सद्गुणांचा परिपोष करणारी कथा ‘सत्कथा' असते. अज्ञान, अंधश्रद्धा, पाखंड वाढवणारी कथा ही 'अकथा' असते. राग, द्वेष, मत्सर, सूड, चोरी इत्यादी दुर्गुणांनी समाजात विकृती निर्माण करते ती 'विकथा' होय. तीन पुरुषार्थांवर आधारित असं कथांचं वर्गीकरण ‘कुवलयमाला' या दीर्घ काव्यकथेत आरंभी नोंदवलं आहे. धार्मिक गुणांचा विकास करते ती 'धर्मकथा'. विद्या, शिल्प, अर्थार्जनाचे उपाय, त्यासाठी केलेलं परदेशगमन इ. प्रयत्न, तसेच साम-दान (दाम)-दंड-भेद यांचा विचार जिच्यात असतो ती 'अर्थकथा' ! रूप-सौंदर्य, तारुण्य, प्रेम, स्त्रीदाक्षिण्य यांना प्रकट करते ती कामकथा'. या तिन्हींच्या मिश्रणानं तयार होते ती 'मिश्रित' अथवा 'संकीर्ण'
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________ कथा. धर्मकथेचे चार उपप्रकार सांगण्यात आले आहेत. मनाला अनुकूल ती आक्षेपणी' धर्मकथा, प्रतिकूल वाटणार 'विक्षेपणी', ज्ञान वाढवणारी 'संवेगजननी' आणि वैराग्य वाढवणारी 'निर्वेदजननी' धर्मकथा होय. स्त्री-पुरुष विलासांचे वर्णन 'रात्रिकथे'त येते. तसेच चौर्यकर्त्यांचे वर्णनही यात येते. भोजन-मेजवान्यांची रसभरित वर्णनं भोजनकथे'त येतात. स्त्रियांची रंगेलपणे केलेली वर्णने व व्यभिचार 'स्त्रीकथे'चा विषय असतो. युद्ध, हेरगिरी, कूट-कारस्थानं, बंडाळी यांची वर्णनं 'जनपदकथेत' किंवा 'राष्ट्रकथेत येतात. अशा कथा साधूसाध्वींनी रचू नयेत आणि ऐकूही नयेत - असा निर्बंध साधु-आचारात घालण्यात आला आहे. 'वसुदेवहिंडी' नावाच्या प्रवासवर्णनात्मक ग्रंथात - आख्यायिका-पुस्तक, कथाविज्ञान आणि व्याख्यान यांचं विशेष विवेचन केलं आहे. ___ जैन कथालेखकांनी, 'कथा मनोरंजक करण्यासाठी कोणते उपाय वापरावेत ?' - याचा विचार केलेला दिसतो. कथा अधिकाधिक आकर्षक बनण्यासाठी तिच्यात पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे. जसे :- संवाद, बुद्धिपरीक्षा, वाक्-कौशल्य, प्रश्नोत्तर, उत्तर-प्रत्युत्तर, प्रहेलिका, समस्यापूर्ती, सुभाषित-सूक्ती, म्हणी-वाक्प्रचार, गीत-गीतिका-गाथा अशा विविध भाषातील पद्यरचना - इत्यादी इत्यादी. समोर असलेला श्रोतृवृंद कसा आहे, कोणत्या आर्थिक-सामाजिक स्तरातला आहे, त्याची मानसिक अवस्था व बौद्धिक पातळी कोणती आहे - हे सर्व ध्यानात घेऊन वक्त्याने कथेचा विषय निवडावा आणि निरूपणाची पद्धतही त्यानुसार ठरवावी - असे म्हटले आहे. अधम-मध्यम-उत्तम' - अशी श्रोत्यांची वर्गवारी केलेली दिसते. ___ अर्धमागधी भाषेत लिहिलेले 11 अंगग्रंथ श्वेतांबर जैन साहित्यात ‘महावीरवाणी' या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यातील सहावा ग्रंथ आहे ज्ञाताधर्मकथा'. सामान्य लोकांचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन या ग्रंथात अनेक धार्मिक तत्त्वं आणि सिद्धांत - कथा आणि दृष्टांताच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली आहेत. यात एकूण 14 कथा आणि 5 दृष्टांत आहेत. प्रत्येक कथेत स्त्रियांचे चित्रण अग्रभागी असलेलं दिसतं. 'स्थापत्या' नावाची कर्तृत्ववान स्त्री, आपल्या मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतंत्रपणे आणि जबाबदारीनं घेताना दिसते. 'घरकामाची वाटणी चार सुनांमधे कशी करायची ?' हा दैनंदिन आयुष्यातला पेच सोडवण्यासाठी सासरेबुवा कोणती परीक्षा घेतात ? - याचा मनोरंजक वृत्तांत 'रोहिणी' नावाच्या कथेत येतो. चारही सुनांच्या शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेतल्या जातात. माहेरच्या मंडळींच्या समक्ष परीक्षा घेतल्याने पक्षपाताची आशंका रहात नाही. कथेच्या अखेरीस महावी पाच महाव्रते धारण केलेल्या साधूला लावून दाखवतात. ‘सतत शंकाकुल असणाऱ्या माणसाचे कधी भले होत नाही' - असा बोध मोराच्या दोन अंड्यांच्या दृष्टांतातून मिळतो. 'नंदीफल' नावाच्या वृक्षाची फळे कशी खायला गोड आणि परिणामी विषारी आहेत - यासाठीचा संदर दृष्टांत इथं योजला आहे. तलावातला बेडूक आणि समुद्रातला बेडूक यांचा अप्रतिम संवाद याच ग्रंथात चित्रित करण्यात आला आहे. महाभारतात कोठेही न आलेली द्रौपदीच्या तीन पूर्वजन्मांची साखळीबद्ध कथा यात वाचायला मिळते. द्रौपदीचे अपहरण, पांडवांचे निर्वासन, पांडुमथुरा अर्थात् मदुराईची निर्मिती - असे अनेक कथाभाग्नाचकांना स्तिमित करतात. 'उत्तराध्ययन-सूत्र' हा ग्रंथ सामान्यतः ‘धम्मपद' या बौद्ध ग्रंथासारखा आहे. वेगळेपण इतकेच की त्यातले काही संवाद व आख्यानं अतिशय आकर्षक आहेत. स्वत:ला सर्व प्रजेचा नाथ' समजणारा राजा वस्तुतः स्वत: किती 'अनाथ' आहे - हे एक मुनी राजाला समजावून सांगताना दिसतात. 'राजीमती' नावाच्या अत्यंत तेजस्वी चारित्र्यवान स्त्रीचा वृत्तांत यातूनच समजतो. ___अर्धमागधी ग्रंथांवर नंतरच्या काळात जे स्पष्टीकरणात्मक साहित्य लिहिले गेले त्याला 'टीका-साहित्य' म्हणतात. हे समग्र टीकासाहित्य कथा-कहाण्यांचं जणू अक्षय भांडारच आहे. योग्य आणि अयोग्य शिष्यांसाठी सूप, चाळणी, घडा इत्यादी अनेक मनोरंजक दृष्टांत दिले आहेत. मनुष्यत्वाचे दुर्लभत्व सांगण्यासाठी जैन साहित्यात वारंवार दहा दृष्टांत दिलेले दिसतात. मंत्रवलेले फासे घेऊन द्यूत खेळणारा जुगारी, ढीगभर धान्यात मोहरीचे दाणे
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________ शोधणारी म्हातारी, समुद्राच्या तळाशी गेलेले हरवलेले रत्न शोधणारा नावाडी - असे एकाहून एक सरस दृष्टान्त थे आढळतात. 'सुखबोधा' नावाच्या एका ग्रंथात तर अक्षरश: शेकडो कथा प्रसंगोपात्त सांगितल्या आहेत. आधीच्या ग्रंथात बीजरूपाने आलेल्या कथा नंतर-नंतरच्या ग्रंथात अधिकाधिक सुरस करून सांगितलेल्या दिसतात. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रकार चाणक्य ऊर्फ कौटिल्य याच्या जीवनाविषयीच्या काही कथा ‘आवश्यकचूर्णी' या 6-7 व्या शतकातील ग्रंथात प्रथम आढळल्या. वैदिक अथवा हिंदू आणि बौद्ध ग्रंथात या कथा सामान्यत: आढळत नाहीत. माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले. प्राकृत आणि संस्कृत साहित्यात चाणक्याचा कसून शोध घेतला. सुमो 30-35 ग्रंथात चाणक्याच्या अनेक कथा आढळल्या. त्याचा जन्म, जन्मगाव, आईवडील, शिक्षण, नंदाच्या भोजनशालेतील अपमान, प्रतिज्ञा, चंद्रगुप्ताचा शोध, त्याचं रक्षण आणि शिक्षण, पाटलीपुत्रावर अयशस्वी हल्ले, पर्वतकाचे सहाय्य, दोघात राज्यविभागणी, विषकन्येची योजना, राज्याचा खजिना वाढविण्याचे प्रयत्न, कडक राज्यशासन, काही निष्ठुर, निर्णय, चंद्रगुप्ताचा मृत्यू, बिंदुसाराचा राज्याभिषेक, ‘सुबन्धु' नावाच्या नंदाच्या पक्षपाती मंत्र्याने चाणक्याशी धरलेले शत्रुत्व, बिंदुसाराची नाराजी, चाणक्याची निवृत्ती, त्याने एका गोठ्यात समाधी घेणं, सुबंधूने गोठ्यास कपटानं आग लावणं, चाणक्याचे प्रायोपगमन व अखेरीस मृत्यू - या साऱ्या ठळक घटना प्रथम विखुरलेल्या कथाभागांच्या रूपानं जैन साहित्यात दिसतात. हेमचन्द्र नावाच्या आचार्यांनी त्यांचं संकलन करून सलग चरित्र 12 व्या शतकात संस्कृतात लिहिलं. दिगंबर आचार्य हरिषेण यांनी आपल्या बृहत्कथेत चाणक्याचे पूर्ण जैनीकरण करून वेगळीच कथा लिहिलेली दिसते. चाणक्याची अपूर्व बुद्धिमत्ता, कडक शासनव्यवस्था आणि निरासक्ती यामुळे जैन परंपरेनं त्याला गौरवलेलं दिसतं. डोळस संशोधकाला जैन कथा साहित्यातील असे अनेक विषय खुणावत रहातात. 11 वे-१२ वे शतक जैन कथासाहित्याचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. या काळात स्वतंत्र कथासंग्रहांची निर्मिती होऊ लागली. कथाकोषप्रकरण, आख्यानमणिकोश, कुमारपालप्रतिबोध, मनोरमाकथा ही काही सुप्रसिद्ध जैन कथाग्रंथांची नावं सांगता येतील. उपदेशप्रधान कथाग्रंथांची जणू लाट उसळलेली दिसते. उपदेशपद, उपदेशमाल धर्मोपदेशमालाविवरण, उपदेशतरंगिणी ही त्यातील काही नावं. 'कहकोसु' अर्थात् ‘कथाकोष' नावाच्या अपभ्रंश ग्रंथात तत्कालीन प्रचलित कथांचा अप्रतिम संग्रह करून ठेवला आहे. श्रोतेहो, जैन कथासाहित्यातील काही वेचक कथारत्नांचा आता रसग्रहणात्मक आस्वाद घेऊ. 'मेखल' नावाच्या एका साध्या, अशिक्षित परंतु बुद्धिमान गवळ्याने चार भावांच्या सांपत्तिक वाटण्यांचा तंटा कसा कुशलतेने सोडवला याची कथा 'मनोरमा' कथासंग्रहात येते. घरात शूरपणा दाखवणाऱ्या सोनाराचे भित्रे स्वरूप - त्याची पत्नी कोणत्या प्रसंगानं उघड करते, हे आपल्याला 'गृहशूर' कथेतून दिसतं. परकायाप्रवेशविद्येचं वर्णन करणारी विक्रमादित्याची कथा अशीच अद्भुतरम्य आहे. 'जसजसा जास्त पैसा येईल तसतशी बुद्धी फिरत जाते' - हे स्पष्ट करणाऱ्या दोन कथा खूपच रंजक आहेत. एकीचे नाव आहे 'अनर्थकारक अर्थ' आणि दुसरीचेनाव आहे ‘पापाचा बाप कोण ?'. साधूंची टिंगलटवाळी करण्यासाठी चंडचूडाने नियम घेतला की, 'समोरच्या कुंभाराचं झळझळतं टक्कल मध्यान्हीच्या उन्हात पाह्यल्याशिवाय मी भोजन घेणार नाही.' हा थट्टेनं घेतलेला नियम पाळताना कोणत्या अडचणी आल्या, त्याचं कोणते फळ मिळालं, याची ही गंमतीदार कथा लहान मुलांना खूपच आवडते. वसुदेवहिंडीतील कोंकणक ब्राह्मणाची कथा, लोकांना पशुबळीपासून दूर करण्याच्या उद्देशानं लिहिली असली तरी तिची मांडणी अतिशय आकर्षक आणि कुतूहल शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी आहे. भाग्यात नसेल तर कमनशिबी माणसाला देवाचे कितीही वर मिळाले तरी त्याच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. याउलट भाग्यात असेल तर गरीब अंध व्यक्तीसुद्धा उत्कर्षाला जाऊ शकते - असं तात्पर्य ‘प्राकृतविज्ञान-कथे'तल्या दुर्दैवी' या कथेत आढळते. श्रीपालकथेत सुरसुंदरी आणि मदनासुंदरी या दोन बहिणींची संलचक गोष्ट रंगवून रंगवून सांगितली आहे. राजाला फार गर्व होतो की माझ्या मुलींना मी जन्म दिला. त्या रूपवतीगुणवती-श्रीमंत आहेत. त्यांचा भाग्यविधाता मीच आहे. मीच त्यांना योग्य पती निवडून देईन. सुरसुंदरी सतत
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________ वडिलांची भलावण करते. त्यांची मर्जी संपादन करते. मदनासुंदरीचा कर्मसिद्धान्तावर दृढ विश्वास असतो. ती वडिलांना सांगते, 'माझ्या कर्मात असेल तोच नवरा मला मिळणार.' राजा रुष्ट होतो. मदनासुंदरीचं लग्न मुद्दामच एका कुष्ठरोग्याशी लावून देतो. ती पतीचे औषधोपचार करते. जोडीला सिद्धचक्राची उपासना करते. पती निरोगी होतो. स्वपराक्रमाने राज्यही मिळवतो. राजाही अखेर कर्मसिद्धान्ताचे श्रेष्ठत्व मान्य करतो. प्राविण्य मिळवण्याच्या 72 कला सुप्रसिद्ध आहेत. 'मतिशेखर' नावाच्या मंत्र्याने 'चौर्यकला' ही 72 वी कला असल्याचे चातुर्याने कसे दाखवून दिले ती कथा प्राकृत-विज्ञान-कथे'त नमूद केली आहे. शिक्षण आणि नम्रता यांच्या जोरावर एका अश्वाधिपतीकडे नोकर म्हणून रहाणारा युवक, कोणती युक्ती करून त्याचा घरजावई झाला - याची कथा 'उपदेशपद' या कथासंग्रहात येते. श्रोतेहो, पुण्यातील 'सन्मति-तीर्थ' नावाच्या संस्थेमार्फत जैन प्राकृत कथांच्या मराठी अनुवादाचे काम झपाटने चालू आहे. पाच खंड प्रकाशित झाले असून सहावा खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे. जिज्ञासूंनी याची जरूर नोंद घ्यावी. समाजातील उच्चभ्रू वर्गापासून तळागाळापर्यंतच्या स्त्री-पुरुषांच्या सर्व प्रवृत्तींवर प्रकाश टाकणाऱ्या या कथा प्रामुख्यानं मध्ययुगीन समाजजीवनाचा जणू आरसाच आहेत. या कथांच्या प्रामाणिक अनुवादाच्या आधारे अनेक अंगांनी त्यांची समीक्षा करता येईल. यातील व्यापार-व्यापारी मार्ग व अर्थशास्त्र अतिशय लक्षणीय आहे. स्त्रीवादी' समीक्षकांना तर अलीबाबाची गुहा सापडल्याइतका आनंद होईल. काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा शोध घेता येईल. यातील पुनरावृत्त 'मिथके' घेऊन जागतिक वाङ्मयात शोध घेता येईल. हिंदू-जैन-बौद्ध यांच्यातील पसरसंबंध वेगळीच सामाजिक तथ्ये उघड करतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व आबालवृद्धांचे त्या निखळ मनोरंजन करतील. श्रोतेहो, अखेरीस एक गोष्ट आवर्जून नमूद करते की क्लिष्ट, कंटाळवाण्या, उपदेशांनी भरलेल्या, दीक्षावैराग्याचा अतिरेक असलेल्या, पूर्वजन्म-पुनर्जन्मांच्या अतिरिक्त वर्णनांनी मुख्य कथावस्तू हरवलेल्या, अतिशयोक्त जैनीकरणाने असंभाव्य वाटणाऱ्या - अशाही अनेक कथा या जैन कथाभांडारा'त आहेत. राजहंसाच्या वृत्तीने आपण साररूपाने त्या ग्रहण करू या आणि त्यातील वेचक कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून आपले सांस्कृतिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करू या !! प्रेमाने म्हणू या - जय जिनेन्द्र !! **********
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________ 10. जैन प्राकृत साहित्य : काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे (जैन-मराठी-साहित्य-संमेलनानिमित्त लिहिलेला विशेष लेख, सोलापूर, मे 2011) जैन साहित्याचा इतिहास मुख्यत: हिंदीमध्ये आणि अनेक पद्धतींनी लिहिलेला दिसतो. पार्श्वनाथ विद्याश्रम संशोधन मंदिराने आठ खंडात्मक इतिहासात सर्व प्रकारच्या प्राकृत भाषा आणि संस्कृत यांमधील इतिहास विस्तारने लिहिला आहे. डॉ. जगदीशचंद्र जैनांचा प्राकृत साहित्याचा इतिहास सर्वविश्रुत आहे. जैनांच्या संस्कृत साहित्याच इतिहासही स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. डॉ. हरिवंश कोछड यांनी केवळ अपभ्रंश साहित्याचा इतिहास लिहिला आहे. इंग्रजी भाषेत असे इतिहास लेखन अत्यंत अल्प आहे. डॉ. हीरालाल जैन यांनी जैन संस्कृतीचे योगदान नोंदवितमा भाषा व विषयानुसार जैन साहित्याचा आढावा घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या जैन अध्यासनाने, जैन व प्राकृत साहित्याचा इतिहास विषयानुसारी, भाषानुसारी व शतकानुसारी लिहिण्याचा प्रयत्न नुकताच केला ओह महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेच्या स्मरणिकेसाठी लेख लिहित असताना या कोणत्याही प्रयत्नांची पुनरावृत्ती न करता केवळ काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यासाठी प्रस्तुत लेख लिहित आहे. समग्र प्रकाशित जैन साहित्याचे अनेक बै अवलोकन व चिंतन करून ही निरीक्षणे नोंदविलेली आहेत. वर नोंदविलेले ग्रंथ हेच याचे आधारभूत ग्रंथ आहेत. निरीक्षणे स्थूल मानाने असल्याने तळटीपा लिहिलेल्या नाहीत. जैन प्राकृत साहित्यावरील निरीक्षणे * श्वेताम्बर जैनांचे प्राकृत साहित्य क्रमाने अर्धमागधी, जैन महाराष्ट्री व अपभ्रंश भाषेत लिहिलेले आहे. अर्धममाधी साहित्यात प्रामुख्याने 45 आगमग्रंथांचा समावेश होतो. तिसऱ्या शतकापासन पंधराव्या शतकापर्यंत लिहिलेल्या जैन महाराष्ट्री साहित्यात महाकाव्य, कथा, चरित, उपदेशपर ग्रंथ, कर्मग्रंथ, आचारप्रधान ग्रंथ आणि मुक्तक काव्याच समावेश होतो. अपभ्रंशातील साहित्य त्यामानाने अत्यंत अल्प आहे. * दिगम्बरांनी शौरसेनी आणि अपभ्रंश या प्राकृत भाषांमध्ये विपुल ग्रंथरचना केली. त्यांचे प्राचीन सैद्धांतिक सहित्य शौरसेनी भाषेत असून अपभ्रंशात प्रामुख्याने पुराण आणि चरितसाहित्य लिहिले गेले. * इसवीसनाच्या चौथ्या शतकात लिहिलेला तत्त्वार्थसूत्र हा आचार्य उमास्वातिकृत ग्रंथ जैन साहित्यातील पहिला संस्कृत ग्रंथ होय. श्वेताम्बर व दिगम्बर दोन्हीही त्यांना आपल्या संप्रदायाचे मानतात. चौथ्या शतकानंतर जैनाहित्यक्षेत्रात संस्कृतमधून लेखनास आरंभ झाला. दिगम्बरीयांनी 4 थ्या शतकानंतर संस्कृतमध्ये लिहिणे विशेष पसंत केले. व्याख्यासाहित्य आणि न्यायविषयक साहित्य यासाठी दिगम्बरीयांना संस्कृत भाषा अत्यंत अनुकूल वाटली. श्वेताम्बीय आचार्यांनी लिहिलेल्या न्याय व सैद्धांतिक साहित्याखेरीज काव्ये व चरितेही संस्कृतमध्ये आढळतात. 'जैन संस्कृत साहित्य' हा विषय या लेखाच्या कक्षेत नसल्यामुळे त्याविषयी अधिक लिहिलेले नाही. * उपलब्ध सर्व प्राकृत साहित्यामध्ये अर्धमागधी भाषेतील आचारांग(१), सूत्रकृतांग(१), ऋषिभाषित आणि उत्तराध्ययन (काही अध्ययने) हे ग्रंथ अर्धमागधी भाषेचे प्राचीनतम नमुने असल्याचा निर्वाळा भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनी दिला आहे. * बोलीभाषा म्हणून शौरसेनी ही अर्धमागधीपेक्षा अधिक प्राचीन असण्याचा संभव असला तरी साहित्याच्या लिखित नमुन्यांमध्ये वरील विषिष्ट ग्रंथातील अर्धमागधी प्रथम अस्तित्वात आली असे दिसते. काही दिगम्बरीय अभ्यासक
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________ 'शौरसेनीतून अर्धमागधी निघाली' - असा दावा करतात. परंतु अद्याप तो सर्वमान्य झालेला नाही. भरताच्या नाट्यसनात अर्धमागधी व शौरसेनी, दोन्ही बोलीभाषांची नोंद घेतलेली दिसते. * 45 अर्धमागधी आगमग्रंथ इसवीसनपूर्व 500 ते इसवीसन 500 या एक हजार वर्षाच्या काळात तयार झाले. यापैकी काही निवडक ग्रंथांनाच खऱ्या अर्थाने 'महावीरवाणी' म्हणता येते. बहुतांशी रचना या उत्तरवर्ती आचार्यमी व स्थविरांनी लिहिलेल्या आहेत. याचमुळे अर्धमागधी भाषेचे वेगवेगळे तीन स्तर श्वेताम्बर आगमांमध्ये दिसतात. * दिगम्बर संप्रदाय असे मानतो की, कोणतेच अर्धमागधी ग्रंथ प्रमाणित महावीरवाणी' म्हणता येत नाहीत. काळाच्या ओघात अर्धमागधी भाषेत अनेक बदल झाले व भर पडली. म्हणून श्वेताम्बर आगमग्रंथ हे 'व्युच्छिन्न' झाले. याच कारणाने दिगम्बर आचार्यांनी दृष्टिवाद' या प्राचीनतम ग्रंथाच्या स्मरणाच्या आधारे शौरसेनी भाषेत नव्याने ग्रंथसना केली. त्यांना आम्नाय, आगम किंवा वेद म्हटले गेले असले तरी त्यांचे कर्तृत्व विशिष्ट विशिष्ट आचार्याकेज जाते. * अर्धमागधी आगमग्रंथांची विभागणी अंग, उपांग, मूलसूत्र, छेदसूत्र इत्यादी प्रकारे करतात. दिगंबरीय ग्रंथांची विभागणी प्रथमानुयोग (कथानुयोग), करणानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग या चार अनुयोगांमध्ये करतात अध्ययन-परंपरेत मात्र श्वेताम्बर हे मूलसूत्रांपासून आरंभ करतात तर दिगम्बर प्रथमानुयोगापासून करतात. * देवर्धिगणि क्षमाश्रमण यांच्या नेतृत्वाखाली, पाचव्या शतकामध्ये झालेल्या तिसऱ्या आगमवाचनेमध्ये, सर्व अर्धमागधी आगम प्रथम ग्रंथारूढ झाले म्हणजे लिखित स्वरूपात आले. त्यापूर्वी ते मौखिक परंपरेने जपलेले होते. 'षट्खंडगम' हा शौरसेनी भाषेतील पहिला दिगंबर ग्रंथ जेव्हा रचला गेला तेव्हाच म्हणजे पहिल्या शतकातच लिखित स्वरूपात अस्तित्वात आला. त्यानंतरही भगवती आराधना व कुन्दकुन्दांचे समग्र साहित्य ग्रंथारूढ स्वरूपातच प्रचलित झाले. त्यामुळे अर्थातच लिखित स्वरूपात जैन सिद्धांतविषयक साहित्य आणण्याचा पहिला मान दिगंबर परंपरेला दिला जातो. * दिगंबरीयांच्या शौरसेनी साहित्याचे स्वरूप मुख्यत: सैद्धांतिक अर्थात् तत्त्वप्रधान आहे. श्वेतांबरीय आगमसाहित्या मात्र विषयांची विविधता दिसते. उदाहरणार्थ - आचारांग(१) हा ग्रंथ औपनिषदिक शैलीत लिहिलेला अध्यात्मप्रधान ग्रंथ आहे. स्थानांग व समवायांग हे कोशवजा ग्रंथ आहेत. व्याख्याप्रज्ञप्तीतून महावीरांचा समकालीन इतिहास समजत 'नायाधम्मकहा' ग्रंथात अनेक सरस कथा व दृष्टांत आहेत. उपासकदशा, अंतगडदशा व विपाकसूत्र हे कथाप्रधान ग्रंथ आहेत. उत्तराध्ययनात तत्त्वज्ञान, आचरण, आख्यान, संवाद यांना प्राधान्य आहे. एक उत्कृष्ट श्रमणकाव्य' म्हणूनही त्याचा गौरव केला जातो. याखेरीज उपांगांमध्ये खगोल, भूगोल व प्राणिशास्त्र, जीवशास्त्रविषयक निरीक्षणे नोंदविली आहेत. हे चार विषय दिगंबर परंपरेतील तिलोयपण्णत्ति व गोम्मटसार या दोन ग्रंथात येतात. परंतु हे दोन्हीग्रंथ अर्धमागधी उपांगग्रंथांच्या रचनेच्या काळानंतरचे आहेत. * श्वेतांबर जैनाचार्य तिसऱ्या-चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत सातत्याने जैन महाराष्ट्री या प्राकृतभाषेत लिहित राहिले. वाड्.मयाचा प्रकार व विषय या दृष्टीने त्यात खूप विविधता राहिली. या ग्रंथांची संख्या शेकड्यंनी असली तरी वाड्.मयीन मूल्य असलेले व भारतीय संस्कृतीच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारे मोजके ग्रंथ यामध्ये उहेत. एकंदरीत भारतीय साहित्याला योगदान ठरणारे ग्रंथ व त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________ (1) पउमचरियं : * चौथ्या शतकातील पहिले जैन रामायण. * ‘आर्ष प्राकृत भाषा' म्हणून भाषाशास्त्रज्ञांकडून गौरव. * वाल्मीकि रामायण लिखित स्वरूपात आल्यावर सुमारे एक-दोन शतकातच लिहिलेला ग्रंथ. * रूढ रामायणातील अतार्किक व असंभवनीय गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न. * स्त्री व्यक्तिरेखांकडे बघण्याचा विशेष सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोण. * वाल्मीकींच्या तुलनेत रसवत्तेच्या दृष्टीने दुय्यम. * उत्तरवर्ती काळात अनेक दिगंबर-श्वेतांबर रामायणांना आधारभूत. * स्वयंभूदेवांचे अपभ्रंश ‘पउमचरिउ' त्या तुलनेने अधिक रसवत्तापूर्ण. (2) वसुदेवहिंडी : * प्राचीन जैन महाराष्ट्री अर्थात् आर्ष प्राकृत भाषेचा 6 व्या शतकातील उत्कृष्ट नमुना. * भारतीय प्राचीन वाड्.मयातले पहिलेवहिले प्रवासवर्णन. * धर्मकथांबरोबरच कामकथांचा अंतर्भाव. * सकस कथाबीजे, वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या दीर्घकथा. * श्रीकृष्ण वासुदेवाचे उत्तरायुष्य व द्वारकाविनाशाची सविस्तर हकीगत. * व्यक्तिरेखांचे एकांगी चित्रण न करता समतोल लेखन. * दोन आचार्यांनी संयुक्तपणे लिहिलेला ग्रंथ. * समाजाच्या उत्तम-मध्यम-निम्न स्तरांचे सर्वांगीण दर्शन. * सहाव्या शतकातल्या भारताचे सांस्कृतिक प्रतिबिंब. (3) हरिभद्रांचे जैन महाराष्ट्री साहित्य : (8 वे शतक-पूर्वार्ध) * धूर्ताख्यान' : समग्र भारतीय साहित्यात उठून दिसणारे, व्यंग-उपहासप्रधान शैलीतले खंडकाव्य. * रामायण-महाभारत-पुराणातील तर्कविरूद्ध व असंभाव्य गोष्टींचा यथेच्छ समाचार. * पुढे अनेक शतके प्राकृत, संस्कृत व अपभ्रंशात धूर्ताख्यानाची अनुकरणे. * 'समराइच्चकहा' : कर्मसिद्धांतावर आधारित धाराप्रवाही महाकादंबरी. * यातील समासप्रचुर भागांवर संस्कृतची छाप. * बोलीभाषेतील चपखल संवाद, देशी शब्दांचा वापर. * आवश्यकटीकेत जरूर तेथे प्राकृत कथांची योजना. * 'उपदेशपद' : प्रचलित प्राकृत कथांचा जणू कोशच. (4) कुवलयमाला : (8 वे शतक-उत्तरार्ध) * उद्योतनसूरिकृत अपूर्व लोकप्रिय ग्रंथ, उत्कंठावर्धक कथानके. * लिखित स्वरूपातील पहिले 'मराठी' शब्द. 18 देशीभाषांचे नमुने. * समकालीन भारतीय संस्कृतीचा जणू कोशच ! (5) परमप्पयासु-योगीन्दुदेव (काळ अंदाजे 7 वे ते 9 वे शतक) * अपभ्रंश भाषेतील शुद्ध आध्यात्मिक लघुग्रंथ.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________ * ध्यान व योगावरही योगसार' लघुग्रंथ. (6) सुखबोधा टीकेतील प्राकृत कथा : (11 वे शतक) * देवेंद्रगणींची उत्तराध्ययनसूत्रावरील टीका. त्यात अनेक कथा * दीर्घकथा, मध्यमकथा व लघुकथांचे भांडार. * प्राकृत अभ्यासकांचा लोकप्रिय ग्रंथ. (7) पाइयलच्छीनाममाला आणि देशीनाममाला : * यापैकी पहिला धनपालकृत ग्रंथ (10 वे शतक) प्राकृत भाषेचा अमरकोश. * दुसरा हेमचन्द्रकृत ग्रंथ (12 वे शतक) वैशिष्ट्यपूर्ण 3978 देशी शब्दांचा अर्थसहित संग्रह. * संस्कृतपासून न बनलेल्या शब्दांचा एकमेवाद्वितीय शब्दकोश. * प्राकृत साहित्याचा विषयानुसारी आढावा * * ‘चण्ड' या जैन आचार्यांचे पहिले प्राकृत व्याकरण, 'नमो अरिहंताणं' ने आरंभ (3 रे-४ थे शतक), पुढे हेम्बंद्रांनी विस्तारले. * संस्कृत-प्राकृत वैयाकरणांनी हैमशब्दानुशासन गौरविले, अभ्यासले. (12 वे शतक) * नय व अनेकान्तवादावरील एकमेव प्राकृत ग्रंथ-सिद्धसेन दिवारकृत सन्मति-तर्क. * ‘सन्मति-तर्क' - श्वेतांबर, दिगंबर दोहोंना आदरणीय (7 वे शतक). हा एकमेव ग्रंथ सोडून इतर सर्व न्यायप्रमाण-स्याद्वाद-अनेकान्तवादावरील साहित्य संस्कृतात. * षट्रखंडागमावरील वीरसेनकृत धवला टीका (7 वे-९ वे शतक) शौरसेनी गद्याचा खंडनमंडनशैलीत वापर. अभूपूर्व तार्किक शैलीतला विशालकाय ग्रंथ. * प्राकृतमधील (अपभ्रंशातील) पहिले ‘पुराण' - पुष्पदन्तकृत महापुराण' (9 वे शतक). सहाव्या सातव्या शतकापासू संस्कृत पुराणांची दिगंबरीय परंपरा. * अपभ्रंशात दिगंबरीयांचे विपुल चरित (चरिउ) लेखन. करकंडचरिउ' आणि 'जसहरचरिउ' लोकप्रिय. स्वयंभूदेवोच 'पउमचरिउ' विशेष प्रसिद्ध. बरीचशी चरित्रे अनुकरणात्मक आणि अनाकर्षक. * संस्कृतच्या तुलनेत प्राकृत शास्त्रीय (लाक्षणिक) साहित्य अत्यंत अल्प व नगण्य. अंगविज्जा' निमित्तशास्त्रावर आधारित परंतु अत्यंत दुर्बोध. ठक्कुर फेरू (14 वे शतक)चा एकमेव अपवाद वगळता नोंद घेण्याजोगे शास्त्रीय खन प्राकृतात नाही. * प्राकृत छंदांचे सोदहरण विवेचन करणारे ग्रंथ पुढील तीन जैन कवींचे - स्वयंभूछंदस् (8 वे-९ वे शतक)नंदिताढ्य (10 वे शतक), हेमचंद्र (12 वे शतक) प्राकृत छंदांचा इतका सविस्तर विचार संपूर्ण भारतीय साहित्यात दुसरा नही. * शिलालेखांमध्ये खारवेल सम्राटाचे हाथीगुंफा (ओरिसा) येथील प्राकृत शिलालेख अशोक शिलालेखांखालोखाल महत्त्वाचे. दक्षिण भारतातील दिगंबरीय शिलालेखांचे संग्रह प्रकाशित. श्वेतांबरीय मुनि जिनविजय, जयन्तविजय आणि विजयधर्मसूरिकृत लेखसंग्रह उल्लेखनीय. * ऐतिहासिक प्रबंधसाहित्यात संस्कृत-प्राकृत मिश्रित विविधतीर्थकल्प' (जिनप्रभसूरि-१४ वे शतक) विशेष महत्त्वाचा. इतर प्रबंध पूर्णत: संस्कृतात. * सुभाषित संग्रहात जयवल्लभकृत वज्जालग्ग' (13 वे शतक) हा प्राकृत सुभाषितांचा खजिना. केवळ संकलनात्मक ग्रंथ. महाराष्ट्री मुक्तककाव्य गाथासप्तशती' (गाहासत्तसई) च्या तुलनेत कितीतरी उत्तरकालीन व काव्यदृष्ट्याटुय्यम. * संस्कृत नाटकात प्राकृतभाषांचा विपुल वापर. प्राय: सर्वच्या सर्व नाटके जैनेतरांची. संपूर्ण प्राकृत नाटेक(सट्टके)
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________ देखील जैनेतरांची आहेत. ___* आधुनिक भारतीय बोलीभाषा आणि जैन साहित्य * * कन्नड भाषेच्या प्राथमिक साहित्यात पंप, पोन्न आणि रन्न या जैन आचार्यांचे मोलाचे योगदान आहे. * मराठीतील पहिले शब्द, पहिले वाक्य आणि 15-16 व्या शतकातील चरित-पुराण रचना हे जैनांचे मराठीतील योगदान आहे. * प्राचीन गुजराथी आणि प्राचीन हिंदीमध्ये असलेल्या जैनांच्या रचना या अपभ्रंशाच्या अंतिम अवस्था आहेत. * बाकीच्या भारतीय बोलीभाषांतील जैन साहित्याचा अभ्यास नसल्यामुळे त्याविषयी विधान करू शकत नाही. * खऱ्या अर्थाने अस्सल जैन प्राकृत साहित्याचा लेखाजोखा * (1) प्राकृत म्हणजे बोलीभाषेत धर्मोपदेश असावा' हा भ. महावीरांनी घातलेला दंडक जैन परंपरेने पाळला. इ.स.— 500 पासूनइ.स. 1500 पर्यंत सतत त्या त्या काळच्या प्राकृत भाषेत साहित्यरचना केल्या. आधुनिक भारतीय बोलीभाषांमध्येही ग्रंथरचना करीत राहिले. 'अर्धमागधी-शौरसेनीपासून आधुनिक बोलीभाषांपर्यंतचा भाषाशास्त्रीय प्रवास कसा झाला ?' याचे प्रभावी साधन केवळ जैन वाड्.मयामुळेच उपलब्ध होऊ शकले. (2) अतिशय समृद्ध कथासाहित्य हे प्राकृत भाषांचे बलस्थान आहे. त्या प्रामुख्याने जैन महाराष्ट्रीत श्वेतांबर आचामी लिहिलेल्या आहेत. त्यातील सुमारे 100 कथा अतिशय चित्तवेधक व संस्कृतपेक्षा वेगळ्या आहेत. बाकीच्या भारंभार कथा रटाळ, केवळ उपदेशप्रधान, दीक्षा आणि वैराग्याच्या वर्णनांनी भरलेल्या आहेत. जैन सोडून इतरांना त्यातून काहीही रसनिष्पत्ती होत नाही. अनेक कथांतून वर्णिलेले चमत्कार, मंत्र-तंत्र आणि अद्भुतता जैन तत्त्वज्ञानाच्या गाभ्याशी विसंगत आहे, असेही दिसते. लेखात वर्णन केलेले चार-सहा कथाग्रंथच वाड्.मयीन व सांस्कृतिक दृष्टने अस्सल आहेत. जी गोष्ट कथाग्रंथांची, तीच चरितग्रंथांची आहे. चार-सहा निवडक चरितांचा अपवाद वगळता अजैनांनाच काय जैनांनाही त्यात रस वाटणे शक्य नाही. (3) दिगंबर शौरसेनी ग्रंथ जवळजवळ सर्वच सिद्धांत, तत्त्व व आचारप्रधान आहेत. कुन्दकुन्दांचे काही ग्रंथ व योगीन्दुदेवांचा परमात्मप्रकाश हे शुद्ध आध्यात्मिक ग्रंथ समग्र भारतीय आध्यात्मिक साहित्याला योगदानस्वरूप ओह. (4) दर्शनक्षेत्रातील अग्रगण्य जैन ग्रंथ तत्त्वार्थसूत्र' आणि 'षड्दर्शनसमुच्चय' हे आहेत. परंतु ते संस्कृतमधे आहेत. भारतीय दार्शनिक परंपरेत केवळ याच दोन ग्रंथांची दखल घेतली गेली. (5) प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या शिक्षणपरंपरेत समाविष्ट झालेला आणि नाव घेण्यासारखा एकही शास्त्रीय अथवा लाक्षणिक ग्रंथ प्राकृत साहित्यात आढळत नाही. निमित्तशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोल, योग, ज्योतिष, अर्थशास्त्र या सर्व विषयातील अग्रगण्य ग्रंथ संस्कृतमधे आहेत आणि प्रामुख्याने जैनेतरांचेच आहेत. दोन-चार अपदा असतीलही परंतु प्राकृत बोलीभाषा लाक्षणिक-शास्त्रीय साहित्य लिहायला अनुकूल नव्हत्या असेच म्हणावे लागेल. (6) आधुनिक भारतीय बोलीभाषांचा विचार करताना आपण मराठीतील समकालीन जैन साहित्याचा विचार करू. मराठी साहित्य गेल्या काही दशकात सर्वार्थाने समृद्ध होत चालले आहे. श्री. निर्मलकुमार फडकुले, विलास सावे, जोहरापुरकर, मा.प.मंगुडकर, शांतिलाल भंडारी, अशोक जैन, सुरेश भटेवरा, सुरेखा शहा हे काही निवऊ आणि मला माहीत नसलेले इतरही अनेक जैन लेखक-लेखिका मराठीत लेखन करीत आहेत. ते आपापल्या अभ्यासविषयात
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________ सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्धी पावत आहेत. परंतु त्यांच्या लेखनाला ‘जैन साहित्य' म्हणण्यापेक्षा 'धर्माने जैन असलेल्या मराठी व्यक्तींनी लिहिलेले साहित्य' असेच म्हणावे लागते. समकालीन मराठी जैन कथांबाबतचा पेच असा आहे की कथेत कर्मकांड, पारिभाषिकता, आचार आणि जैन पुराणकथा घुसल्या की दर्जेदार मराठी साहित्याच्या दृष्टीने रसवत्ता घसरते आणि कथावस्तू आणि मांडणी उत्तम अली की तिला 'जैन' का म्हणावे असा संभ्रम पडतो. जैनांनी, जैनांचे, जैनांसाठी मराठी साहित्य संमेलन जरूर भवावे परंतु, 'मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात समकालीन जैन साहित्याचे योगदान किती आहे ?' याची पक्षपातरहित समीक्षा इतरांकडून अवश्य करून घ्यावी. **********
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________ 11. जैनांनी जपलेली ऋषिवचने (महावीर जयंतीनिमित्त 'लोकसत्ता' दैनिकात प्रकाशित, एप्रिल 2011) आपले स्वत:चे तत्त्वज्ञान, सिद्धांत, आचार-नियम, त्यावर आधारित तात्त्विक ग्रंथ, उपदेशकथा - या सर्वांचे जतन प्रत्येक धर्म आणि संप्रदाय अतिशय साक्षेपाने करीत असतो. 'आपल्या आजूबाजूच्या वैचारिक क्षेत्रात काय चालू आहे ?' त्याचा आढावा मुख्यतः, ते विचार खोडून काढण्यासाठी घेतला जातो. असे अनेक खंडन-मंडनत्मक दार्शनिक ग्रंथ भारतीय साहित्यात लिहिले गेले आहेत. आज 2610 व्या महावीरजयंतीच्या निमित्ताने अर्धमागधी भाषेत असलेल्या एका अत्यंत उदारमतवादी ग्रंथाचा परिचय करून देणार आहे. त्याचे नाव आहे - इसिभासियाई - अर्थात् 'ऋषिंची भाषिते' म्हणजेच 'वचने'. ___ आपला भारत देश प्राचीन काळापासून ‘तपोभूमि' म्हणून ख्यातकीर्त आहे. ऋषि, मुनि, तपस्वी, साधु, भिक्षु, निग्रंथ, अनगार, परिव्राजक, तापस, योगी, संन्यासी, श्रमण - असे अनेक वैविध्यपूर्ण शब्द भारतातल्या विरागी वृत्तीच्या साधकांचे द्योतक आहेत. 'ऋषिभाषित' या जैन ग्रंथात सर्वांचा ऋषि' या शब्दानेच निर्देश केलेला दिसतो. यात एकूण 45 ऋषींच्या विचारांचे संकलन प्रस्तुत केले आहे. भारताच्या प्राचीन इतिहासावर नजर टाकली की हे समजून येते की या ग्रंथात महाभारताच्या काळापासून होऊन गेलेल्या विचारवंतांची चिंतने नोंदवलेली अहेत. जैन परंपरेनुसार या 45 ऋषींपैकी 20 जण अरिष्टनेमींच्या काळात झाले. 15 ऋषी पार्श्वनाथांच्या काळात झाले. उरलेले 10 भ. महावीरांच्या काळात झाले. 45 अध्ययनांमध्ये (अध्यायांमध्ये) 45 पूजनीय व्यक्तींचे विचार दिले असून प्रत्येकात असे म्हटले आहे की, हे विचार अमुक अमुक अर्हत् ऋषींनी सांगितलेले आहेत'. आश्चर्याची आणि गौरवाची गोष्ट म्हणजे वर्धमान (29) आणि पार्श्व (31) हे दोनच ऋषी स्पष्टत: जैन परंपरेतील आहेत. वज्जीयपुत्त, महाकश्यप आणि सारिपुत्र हे तीन बौद्ध विचारधारेतील ऋषि आहेत. देव नारद, असित देवल, अंगिरस भारद्वाज, याज्ञवल्क्य, बाहक, विदर, वारिषेण कृष्ण, द्वैपायन, आरुणी, उद्दालक, तारायण - ही सर्व नावे वैदिक परंपरेत प्रसिद्ध आहेत. आजही यांचे उपदेश उपनिषदे, महाभारत आणि पुराणांमध्ये सुरक्षित आहेत. यापैकी काही ऋषींची नावे बौद्ध त्रिपिटक साहित्यातही आढळतात. ____ मंखलिपुत्र, रामपुत्र, अंबष्ठ, संजय बेलट्ठिपुत्र - ही अशी काही नावे आहेत की जी जैन-बौद्धांव्यतिरिक्त असलेल्या 'आजीवक' इ. श्रमणपरंपरेतील आहेत. आर्द्रक, वल्कलचीरी, कूर्मापुत्र, तेतलिपुत्र, भयाली - या विचारवंतांच्या कथा प्रामुख्याने जैन परंपरेतच आढळतात. ऋषींच्या संपूर्ण यादीचे अवलोकन केले की सोम, यम, वरुण, वायु आणि वैश्रमण - ही पाच नावे वैदिक परंपरेत मंत्रांच्या उपदेष्ट्यांच्या स्वरूपात दिसतात. ही पाच नावे वगळली तर उरलेले सर्व ऋषी खरोखरच प्रागैतिहासिक काळात प्रत्यक्ष होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत. काल्पनिक चरित्रे नाहीत. ___ जैन धर्मातील प्रमुख तत्त्वे, चातुर्याम धर्म, कर्मसिद्धांत आणि आचरणाचे नियम मुख्यत: ‘पार्श्व' अध्ययनात येतात. विश्वाला 'शाश्वत' म्हटले असून त्याची सराराची परिवर्तनशीलता नमूद केली आहे. जीव (आत्मा) आणि पुद्गल (परमाणु) यांना 'गतिशील' म्हटले आहे. द्रव्य-क्षेत्र-काल-भाव या चतुष्टयीची चर्चा येते. चार गती, अष्ट आहे. 'शरीर हा आत्म्याचा पाहुणा असून त्याला लागणारे सव्वाचारशेर अन्नपाणी रोजच्या रोज द्या', अशा त-हेचे उद्गार ग्रंथसाहिबात आढळतात. उपासतापासाला जास्त प्राधान्य नाही. 'भिक्षाचर्य' पूर्ण वर्ण्य आहे. शीख धर्मातील पहिल्या पाच गुरूंनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सत्संगाबरोबरच शेती व्यवसायही केला. हाताने काम व मुखाने हरिनाम' याच सूत्राने शीखधर्मीय वागत होते व आहेत. याबाबत गीतेतील निष्काम कर्मयोग हा त्यांना आदर्शरूप वाटतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार सोडण्याची गरज भासत नाही. ग्रंथसाहिबात म्हटले आहे की,
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________ कर्मग्रंथी यांचा उल्लेख असून स्पष्ट केले आहे की प्रत्येक जीव स्व-कृत पाप-पुण्याचाच भागीदार असतो. पार्श्वयांच्या तुलनेने वर्धमानांचे विचार त्रोटक आहेत. 'आचारांग' आणि 'उत्तराध्ययन' नावांच्या ग्रंथातील अनेक विषयवस्तूंचे शाब्दिक रूपांतरण यात दिसते. म्हणूनच प्रो. शूबिंग म्हणतात की या ग्रंथाच्या रचनेचा आरंभ पार्श्वनाथांच्या कार्यकाळात (महावीरांपूर्वी 250 वर्षे) झाला असावा. आता इतर ऋषींचे विचार पाहू. इंद्रनाग' ऋषी तपोबलाचे प्रदर्शन करण्यास विरोध दर्शवितात. द्वैपायन ऋषी इच्छेला (वासनेला) अनिच्छेत परावर्तित करण्यास सांगतात. सुख-दुःखांची मीमांसा ‘सारिपुत्त' ऋषी करतात. 'श्रीगिरि' म्हणतात, 'विश्वाला माया म्हणू नका. ते सत्य आहे. अनादि-अनंत आहे'. 'तारायण' ऋषी क्रोधाचे दुष्परिणाम काव्यमयतेने रंगवितात. 'सदैव जागृत रहा, जागृत रहा, सुप्तावस्थेत जाऊ नका'-असा प्रेरक संदेश उद्दालक ऋषी देतात. क्षमा, तितिक्षा आणि मधुरवचनांचे महत्त्व 'ऋषिगिरि' स्पष्ट करतात. दुर्वचन-दुष्कर्म, सुवचन-सुकर्म आणि सत्संगती-कुसंगतीचा विचार 'अरुण' ऋषी परिणामकारकतेने मांडतात. आध्यात्मिक कृषीचे (शेतीचे) रूपक ‘पिंग' ऋषी रंगवतात.आत्मा हे क्षेत्र, तप हे बीज, संयम हा नांगर आणि अहिंसा-समिति ही बैलजोडी आहे. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र - कोणीही ही उत्कृष्ट शेती करू शकतो. 'मातंग' ऋषी देखील अशाच आध्यात्मिक शेतीचा उपदेश करतात. 'नारद ऋषी श्रवणाचे आणि आंतरिक शुद्धीचे महत्त्व सांगतात. ___जैनांनी उदार दृष्टिकोणातून जपलेल्या या ग्रंथातील विचारधन हा सर्व भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. संप्रदायभेद दूर करून आपण तो ग्रंथ वाचू या.
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________ जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख) भाग -3 * लेखन व संपादन * डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ ऑगस्ट 2011
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________ 12. जैन ऐतिहासिक साहित्य (शिवाजी विद्यापीठ आयोजित द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील विशेष व्याख्यान आयोजक : भ. महावीर जैन अध्यासन, मार्च 2008) 'जैनविद्या' हे अभ्यासाचे एक विस्तृत क्षेत्र आहे. जैन इतिहास आणि परंपरा, जैन साहित्य, जैन तत्त्वज्ञान आणि जैन कला हे जैनविद्येचे चार प्रमुख स्तंभ आहेत. त्याखेरीज सर्व इतर विद्याशाखांशी केलेला तौलनिक अभ्यास हे त्याचे एक नवे अंग झपाट्याने पुढे येत आहे. त्यातील ऐतिहासिकता या आयामाविषयी आपण साहित्यिक दृष्टने विचार करणार आहोत. तसे पाहिले तर साहित्य हे ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने सर्वात कमी महत्त्वाचे अंग आहे. पुरातत्त्वविषयक प्रमाणे ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जातात. शिलालेख, स्तंभलेख, मंदिरे, स्तूप, चैत्य, चित्रकला, मूर्तिकला, ताम्रपट, दानपत्रे इत्यादींच्या माध्यमातून कोणत्याही परंपरेचे दृष्टिगोचर होणारे रूप निखळ सत्य म्हणून स्वीकाले जाते. जैन परंपरेतील वरील पुरावे भारतभर पसरले आहेत. ऐतिहासिकतेच्या दृष्टीने जैन साहित्यातील सर्वात महमाच्या आहेत त्या पटवली ! अर्धमागधी भाषेतील पर्युषणाकल्प अथवा कल्पसूत्रातील स्थविरावली हा भाग त्या दृष्टीने सर्वात प्राचीन आहे. 12 व्या शतकात होऊन गेलेल्या हेमचंद्रांनी संस्कृतमध्ये परिशिष्टपर्व' लिहून त्याची बऱ्याच प्रमाणात पूर्ती केली. गण व गच्छ परंपरा सुरू झाल्यावर विविध गुर्वावलि, पट्टावलि लिहिल्या जाऊ लागल्या. आंचलगच्छ, खरतरगच्छ, तपागच्छ इ. च्या पट्टावली जैन इतिहासावर चांगला प्रकाश टाकतात. या पट्टावलींचे संग्रह जामनगर, भावनगर आदि संस्थांनी प्रकाशित केले आहेत. अद्यापही काही पट्टावली प्रकाशनाची वाट पहात आहेत. पट्टवलींव्यतिरिक्त जैन ग्रंथांच्या प्रशस्तींमधूनही विविध प्रकारची ऐतिहासिक माहिती मिळते. त्यानंतर महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे प्रबंध होत. आज आपल्याला प्रथम जैन साहित्यातील 'प्रबंध या विषयाची अधिक माहिती करून घ्यावयाची आहे. सिंघी जैन ग्रंथमालेने ते अत्यंत चिकित्सापूर्वक प्रकाशित केले आहेत. ते बहुतांशी संस्कृतमध्ये आहेत. पुढ्याची हिंदी भाषांतरे फोटो इत्यादींसह प्रकाशित करण्याचा त्यांचा मनोदय होता. आत्तापर्यंत तरी माझ्या पहाण्यात अशी भाषंतरे आलेली नाहीत. ब्राह्मण किंवा बौद्ध परंपरेत अशा प्रबंधरचना अगदी तुरळक दिसतात. जैन आचार्यांनी याबाबत आघाडी मारलेली दिसते. कालानुक्रमे पहिला प्रबंधग्रंथ आहे धनेश्वरसूरिविरचिर्तशत्रुञ्जयमाहात्म्य'. नावावरूनच स्पष्ट होते की शत्रुञ्जय तीर्थाची, त्याच्या निर्मितीची आणि दंतकथांची समग्र माहिती धनेश्वरसूरींनी संकलित केली आहे. 13 व्या शतकक्लि प्रभाचन्द्रकृत 'प्रभावकचरित' हा ग्रंथ या मालिकेतील दुसरी महत्त्वपूर्ण प्रबंधरचना आहे. वज्रस्वामींपासून आरंभ करून आर्यरक्षित, आर्यनन्दिल, कालकसूरि अशा क्रमाने हेमचन्द्रसूरींपर्यंतची चरित्रे यात नोंदवली आहेत. या सर्वांची गणना त्या त्या काळातील प्रभावसंपन्न व्यक्ती अशी केली आहे. चरितांच्या ओघात प्राकृत व अपभ्रंश काव्ये, प्राकृत म्हणी व देशी शब्दांचा वापर केलेला दिसतो.. 14 व्या शतकात होऊन गेलेल्या श्री मेरुतुङ्ग यांनी रचलेला प्रबन्धचिन्तामणि' हा ग्रंथही संस्कृतमध्येच असून त्याची रचना अधिक सुघट आहे. विक्रमादित्य, सातवाहन, वनराज, मूलराज, मुञ्जराज, भोजराज, सिद्धराज, कुमारफा, वस्तुपाल, तेजपाल यांच्याविषयीची कथानके एकेका प्रकाशात' समाविष्ट केलेली असून अनेक महत्त्वाचे आचार्य, श्रावक व अन्यधर्मीय प्रभावी व्यक्तींचा वृत्तांत शेवटच्या प्रकरणात दिला आहे. शैलीची वैशिष्ट्ये प्रभावकचरिताप्रमोप्य आहेत. 14 व्या शतकातील श्री राजशेखरकृत 'प्रबन्धकोश या मालिकेतील पुढचा ग्रंथ आहे. यातील बहुतांशी विषय प्रभावकचरिताप्रमाणेच आहेत. भद्रबाहु-वराह-प्रबन्धाने आरंभ होतो. वस्तुपाल-तेजपाल प्रबंध शेवटचा आहे.
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________ एकूण प्रबंधसंख्या 24 आहे. हरिहरकवि, अमरचन्द्र, मदनकीर्ति, रत्नश्रावक व आभडश्रावक यांवरील प्रबंध पूर्वीच्या प्रबंधांहून वेगळे आहेत. आपल्या या चर्चासत्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे विविधतीर्थकल्प' हा होय. 14 व्या शतकातच जिनप्रभसूरींनी हा ग्रंथ लिहिला. ग्रंथातील प्रत्येक निबंधाला 'कल्प' म्हटले आहे. एकूण 62 कल्प आहेत. यातील पहिला शत्रुञ्जयतीर्थकल्प संस्कृतात आहे. बाकीचे प्रायः 50 कल्प जैन महाराष्ट्री प्राकृतात आहेत. प्राकृत भाषा अतिशय रसाळ आहे. प्रस्तावनेतच मुनि जिनविजय म्हणतात की हे जणू काही भारतातील तीर्थक्षेत्रांचे गाइडबुक'च आहे. भारतात 11-12 व्या शतकापासून ते 16-17 व्या शतकापर्यंत मुस्लीम राजवट कमी-अधिक प्रमाणात पसरलेली होती. 5 पातशाह्यांचा अंमल चालू होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या काळात जैन आचार्यांनी मात्र संस्कृत, जैन महाराष्ट्री आणि अपभ्रंश या भाषांमध्ये विपुल ग्रंथसंपत्ती निर्माण केली. काही मुगल बादशहांच्यदरबारात त्यांचा प्रभाव लक्षणीय दिसतो. ___इतिहासात 'वेडा महम्मूद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महम्मद तुघलकाच्या दरबारात जिनप्रभसूरींना अतिशय मान होता. (गिरीश कर्नाड यांनी 'तुघलक' नाटकात या बादशहाच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.) आपल्या विरक्त, निःस्पृह आणि ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वाने जिनप्रभसूरींनी या सम्राटाला प्रभावित केले होते. त्यांचे इतिहासाचे आणि तीर्थभ्रमणाचे प्रेम विविधतीर्थकल्पातून उत्तम रीतीने व्यक्त होते. गुजरातव काठेवाडमधील 8 तीर्थक्षेत्रे, युक्तप्रान्त आणि पंजाबमधील 6, राजपुताना व माळव्यातील 7, अवध व बिहारमधील 11, दक्षिण व बराड (व-हाड) मधील 3 आणि कर्णाटक व तेलंगणातील 3 तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करून यांनी त्यावर आधारित 'कल्प' लिहून मोलाची कामगिरी केली. (या ठिकाणी काश्मिरी कवी कल्हण याच्या राजतरङ्गिणी' ग्रंथाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. काश्मिरचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचे ते एकमेव साहित्यिक साधन आहे.) 16 व्या शतकात झालेल्या सम्राट अकबराच्या दरबारात ज्या प्रतिभावंतांना मानाचे स्थान होते त्यात जैन आचार्य हीरविजयसूरि यांचा गौरवाने उल्लेख करता येईल. येथे आयोजित केलेल्या चर्चासत्राशी सुसंगत अशा तीन कल्पांचा आपण या चारही ग्रंथांच्या आधारे आढावा घेऊ. 'नासिक्यपुरकल्प हा 28 वा कल्प संपूर्णतः प्राकृतात आहे. तो आठवे तीर्थंकर चन्द्रप्रभ यांच्या संदर्भात आहे. 'नासिअकलिमलनिवह' (नाशित-कलि-मल-निवह) असा नाशिक नावावर श्लेष केलेला आहे. ब्राह्मणादि तीर्थिक याविषयी काय माहिती सांगतात ते आरंभी दिले आहे. कृतयुगात ब्रह्मदेवाचे कमळ अरुणा-वरुणा-गंगा यांनी भूषित अशा महाराष्ट्रात पडले. तेथे ब्रह्मदेवाने पद्मपुर वसविले. यज्ञात देव आले. दानव येईनात. ते म्हणाले, जर चंद्रप्रभस्वामी आले तरच आम्ही येऊ. ब्रह्मदेवाने विहार करणाऱ्या चंद्रप्रभस्वामींचा शोध घेऊन येण्याची विनंती केली. चंद्रप्रभ म्हणाले, 'माझ्या प्रतिरूपाने म्हणजेच मूर्तीनेही काम होईल'. चंद्रकांत रत्नांपासून बनविलेली प्रतिमा ब्रह्मदेवाने सौधर्म इंद्राकडून घेतली. नाशिकक्षेत्र हे कृतयुगातले पद्मपुर' होय. त्रेतायुगात राम, लक्ष्मण, सीता पितृआज्ञेने वनवास पत्करून गौतमीगंगा'तीरावरील पंचवटीत राहिले. गौतमी म्हणजे प्राकृतात गोदमी - त्यावरून 'गोदावरी' नाव पडले असावे. शूर्पणखेचे 'नाक' रामाने छेदले म्हणून नासिक्क' नाव पडले. रामायण घडले. अयोध्येस परत जाताना, येथे थांबून रामाने चंद्रप्रभमंदिराचा उद्धार केला. कालांतराने पुण्यभूमी म्हणून जनकराजा येथे आला. त्याने यज्ञ केला. 'जनकस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. आजही नाशिकजवळचा आदिवासी भाग 'जनस्थान' म्हणून प्रसिद्ध आहे. कवी कुसुमाग्रजांनी तेथे बरेच कार्य केले हे आपल्याला माहीत आहेच. शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिचे दंडकराजाने अपहरण केले. शक्राचार्यांनी शाप दिला. दंडक राजा चंद्रप्रभस्वामींना शरण गेला. शापमुक्त झाला. या घटनेनंतर कवी लिहितो, 'परतीर्थिकही ज्याचा महिमा गातात त्या
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________ क्षेत्राचा महिमा आरहंतलोक कसा गाणार नाहीत ?' द्वापारयुगात कुंतीपुत्र युधिष्ठिराने चंद्रप्रभस्वामींच्या प्रासादाचा उद्धार केला. जवळ बिल्ववृक्ष लावला. ते स्थान 'कुंतीविहार' म्हणून प्रसिद्ध झाले. जैन परंपरेप्रमाणे द्वीपायन ऋषींच्या भविष्यवाणीनुसार द्वारकेचा विनाश झाला. त्या प्रसंगी वज्रकुमार यादव याची पत्नी या ठिकाणी आली. चंद्रप्रभस्वामींना शरण गेली. प्रसूत झाली. तो पुत्र मोठय पराक्रमी नगरप्रमुख झाला. यादव वंश येथे रुजला. त्यानेही चंद्रप्रभतीर्थाचा उद्धार केला. कलियुगात शान्ताचार्यांनी (उत्तराध्ययनाचे टीकाकार) हे तीर्थ उद्धरले. त्यानंतर कल्याणकटक नगरातील ‘परमड्डी' राजाने ती प्रतिमा ताब्यात घेण्याचा असफल प्रयत्न केला. मग भवनोद्धार करून 24 गावे दिली. पुढे पल्लीवाल वंशातील माणिक्यपुत्र आणि नाऊ यांचा पुत्र साहु कुमारसिंह या परमश्रावकाने हा प्रासाद नवा केला. आजही तेथे चारही दिशांनी संघ येऊन उत्सव करतात. शेवटी असे म्हटले आहे की हा कल्प त्यांनी नासिक्यपुरातच लिहिला. 'प्रतिष्ठानपत्तनकल्प' हा देखील जैन इतिहासाशी कित्येक शतकांपासून जोडलेला दिसतो. त्या कल्पाचा आरंभ महाराष्ट्राच्या वर्णनाने होतो. महाराष्ट्रात 68 लौकिक तीर्थे असून 52 जैन तीर्थे आहेत असा उल्लेख अहे. आंध्रभृत्य वंशातील सातवाहन राजांच्या इतिहासाशी प्रतिष्ठान अथवा पैठणचे नाव निगडित आहे. या सर्वच प्रबंधकांनी शातवाहन-सातकर्णी-सालवाहन-सालाहण या राजांना 'जैनधर्मी' असे संबोधले आहे. प्राचीन भारताचे इतिहासकार हे मान्य करीत नाहीत. सातवाहनांच्या राजवटीत जैन धर्माचा प्रचार, प्रसार मात्र येथे भरपूर झालेला दिसतो. मुनिस्म्रत तीर्थंकरांच्या जीवत्स्वामी प्रतिमेचा, लेप्यमयी प्रतिमेचा वारंवार उल्लेख येतो. या क्षेत्राची देवता अम्बादेवी असून 'कपर्दी' (कवड्डिय) हा यक्ष' आहे. 'कालकाचार्यकथानक या विषयावर प्राकृतामध्ये अनेक खंडकाव्ये दिसून येतात. उज्जैनीचा राजा गर्दभिल्ल, त्याने केलेले कालकसूरींच्या 'सरस्वती' नावाच्या बहिणीचेअपहरण, त्यांनी घेतलेले शक (शाखि) राजांचे सहाय्य इ. घटना जैनांमध्ये प्रचलित आहेत. हे कालकसूरी विहार करीत प्रतिष्ठानपुरास आले. सातवाहनाने मोठ्या थाटामटाने प्रवेश करविला. त्यावेळी इंद्रमहोत्सव सुरू होता. पर्युषणपर्वात नेहमी येणारी अडचण जाणून सातवाहन व कालकसी यांनी एकत्रितपणे पर्युषणपर्वसांगता'चतुर्थी'ला करावी असा निर्णय घेतला. प्रतिष्ठान नगर या घटनेचे साक्षीदार आहे. उपलब्ध पुराव्यानुसार सुमारे 4 थ्या शतकात होऊन गेलेल्या पादलिप्त-पालित्तय-या आचार्यांचाही प्रतिष्ठानच्या इतिहासाशी संबंध वर्णिला आहे. पादलिप्ताचार्य दक्षिणाशामुखभूषण' अशा प्रतिष्ठान नगरात आले. सातवाहनाच्या दरबारातील लोकांनी तुपाने भरलेले भांडे पाठवणे - पादलिप्तांनी त्यात सुई टाकून कुशाग्रता सिद्ध करणेइ. घटना वर्णिल्या आहेत. त्यांच्या 'निर्वाणकलिका' आणि 'प्रश्नप्रकाश' या ग्रंथांचा उल्लेख आहे. आज अजूनपर्यंत त्यांची हस्तलिखिते सापडलेली नाहीत. सातवाहनाच्या राज्यातच त्यांनी 'तरंगलोला' नावाचे अप्रतिम काव्य रचले. आज तेही उपलब्ध नाही. त्यावर आधारित काव्ये मात्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये पादलिप्तांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. सातवाहन म्हणतो, 'सर्वजण आपली स्तुती करतात. अमुक अमुक गणिका स्तुती करीत नाही. तिला स्तुती करायला लावा'. पादलिप्त योगसाधनेने श्वासनिरोध करतात. प्रेतयात्रा गणिकेच्या घरासमोरून जात असते. तिने तरंगलोला काव्य वाचून आस्वाद घेतलेला असतो. ती उद्गारते - "सीसं कहवि न फुट्ट जमस्स पालित्तयं हरंतस्स जस्स मुहनिज्झराउतो तरंगलोला नई वूढा / / " उज्जैनी (अवंती) चे विक्रमादित्य आणि सातवाहन राजे यांचा परस्परसंबंध सांगणारी कथाही या प्रतिष्ठानकल्पात येते. उज्जैनीत भविष्यवेत्ते घोषित करतात की, 'प्रतिष्ठानला सातवाहन राजा होणार आहे. दरम्यान सातवाहनाचे बुद्धिकौशल्य व पराक्रम उज्जैनीत समजतो. विक्रमादित्य आक्रमण करतो. सातवाहन अद्भुत शक्ती व पराक्रमाने त्यांना पळवितो. सातवाहनाचा राज्याभिषेक होतो. तो तापी नदीपर्यंत राज्यविस्तार करतो. 50 जिमंदिरे बांधतो.
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________ सातवाहन हा शृंगारप्रेमी राजा असून त्याने कोट्यवधि सुवर्णनाणी खर्च करून गाथासंग्रह केल्याचा उल्लेखही या प्रबंधामध्ये येतो. 'शूद्रक' नावाचा एक 'वीर' आणि दोघांविषयीच्या दंतकथा रंगवून दिल्या आहेत. आज उपलब्ध असलेल्या गाथासप्तशतीत पालित्तय' आणि 'शूद्रक यांच्या नावावर प्राकृत गाथा दिसतात. सातवाहनाच्या दानशूरतेची आणि तीर्थस्थापनेची वर्णने सर्वच आचार्य करतात. सातवाहनाने सत्तूंचे दान पूर्वभवात मुनींना केले इत्यादी दंतकथाही जोडल्या आहेत. प्रतिष्ठानकल्प मुख्यत्वाने सुव्रतजिनांशी संलग्न असून वारंवार त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कथा येतात. विविधतीर्थकल्पात 'दक्षिण व बराड' संबंधी जे कल्प आहेत त्यातील एक म्हणजे 'श्रीपुर' येथील 'अन्तरिक्षपार्श्वनाथकल्प' होय. कथेचा आरंभ थेट रामायणापासून होतो. रावण आपल्या माली व सुमाली या योद्ध्यांना कामासाठी दुसरीकडे पाठवितो. त्यांचा बटुक पुजारीही बरोबर असतो. विमानप्रवास सुरू होतो. पुजारी गडबडीत जिनप्रतिमा घेण्यास विसरलेला असतो. विद्याबलाने तो भाविजिन पार्श्वनाथांची वालुकामय प्रतिमा करतो. मालीसुमालींनी पूजन केल्यावर ती विसर्जित करतो. खाली सरोवर असते. दीर्घकाळ प्रतिमा सरोवरात तशीच रहाते. कित्येक वर्षांनी चिंगउल्ल किंवा विंगउल्ल प्रदेशाचा श्रीपाल राजा तेथे येतो. तो कुष्ठरोगी असतो. सरोवरातील स्नानाने कुष्ठरोग बरा होतो. राणी आश्चर्यचकित होते. तिला स्वप्नात पार्श्वनाथ प्रतिमेचा दृष्टांत होतो. राजा रथातून प्रतिमा नेऊ लागतो. मध्येच वळून पहातो. प्रतिमा अंतरिक्षात शिर होते. राजा श्रीपुर' नावाचे नगर वसवितो. चैत्य बांधतो. अंबादेवी क्षेत्रपाल व धरणेंद्र-पद्मावतींच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करतो. आजही 'श्रीपुर' येथे यात्रा महोत्सव असतो. 'श्रीपुर' या ठिकाणाची विविधतीर्थकल्पात आलेली नोंद अशा प्रकारची आहे. कोंकण प्रदेशाच्या उत्पत्तीची कथा प्रबन्धचिन्तामणीत आली आहे. समुद्र हटवून काही द्वीपे तयार करून महानन्द राजाने, आपल्या प्रसंगवशात् नावडत्या झालेल्या राणीच्या पुत्राला ती दिली असा उल्लेख आहे. ब्राह्मण परंपरेतील परशुरामाशीही त्याचा संबंध या प्रबंधांमध्ये दिसत नाही. प्रभावकचरितात वज्रस्वामी विहार करीत दक्षिण्याला येतात, असा उल्लेख आहे. 'स शनैः प्रायात् कुंकणान् वित्तवञ्चणानं असा कोंकण प्रांताच्या दारिद्र्याचा उल्लेख दिसतो. तेथून ते 'सोपारपत्तना'स जातात असे म्हटले आहे. अशोकाचे शिलालेख जेथे सापडले ते शूर्पारक (ठाण्याजवळ - नाला सोपारा) हेच असण्याची शक्यता आहे. कोंकणातील जैन तीर्थ अगर प्रतिमांचा उल्लेख नाही. चतुर्दशपूर्वधारी भद्रबाहू यांचा वृत्तांत प्रबन्धकोशात प्रतिष्ठान (पैठण) येथे घडला असे नोंदविले आहे. भद्र aa व ब्राह्मण परंपरेतील सुप्रसिद्ध खगोल-ज्योतिषी वराहमिहिर यांना सहोदर' (भाऊ) म्हटले आहे. त्यांचा बृहत्संहिता ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. कथानकात भद्रबाहू वराहमिहिरांचे त्यांचे भविष्य कसे अचूक नाही हे दाखवून देतात. वराहमिहिर अनेक विघ्ने उत्पन्न करतात. त्या विघ्नांच्या उपशमासाठी भद्रबाहू उपसर्गहर' स्तोत्राची रचना करतात असे म्हटले आहे. प्रबंधचिंतामणीत मात्र हाच सर्व वृत्तांत पाटलीपुत्र येथे घडला असे म्हटले आहे. 'न्यायावतारसूत्र' या सुप्रसिद्ध जैन न्यायविषयक ग्रंथाचे कर्ते, स्तुतिविद्या' आणि 'कल्याणमंदिर स्तोत्रांचे कर्ते सिद्धसेन दिवाकर आपल्या अखेरच्या दिवसात प्रतिष्ठानपुरास आले. त्यांनी तेथेच प्रायोपवेशनाने देहत्याग केला असे प्रभावकचरितात म्हटले आहे. प्रबन्धचिन्तामणी ग्रंथात गुर्जराधिपती सिद्धराज आणि कोल्लापुर येथील राजा यांच्या संबंधातील एक हकीगत सांगितली आहे. तेथील महालक्ष्मी मंदिरातील दीपोत्सवाचा उल्लेख लक्षणीय आहे. उपसंहार : आरंभीच म्हटल्याप्रमाणे साहित्यात आख्यायिका, दंतकथा आणि इतिहास यांचे सतत मिश्रण झालेले असते. त्यातून प्रमाणित इतिहास शोधणे फार कठीण असते. हे सर्व गृहीत धरले तरी जैन आचार्यांनी लिहिलेल्या पाच प्रबन्धविषयक ग्रंथांमधून जैन क्षेत्रे व जैन धर्मप्रभावक व्यक्तींचा इतिहास नोंदविण्याची असलेली त्यांची दृष्टी मोलीचा
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________ मानली पाहिजे. सध्या जैन साहित्याचा शतकानुसारी आढावा घेण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. इसवीसनपूर्व काळापासून 17 व्या शतकापर्यंत श्वेतांबर-दिगंबर आचार्यांनी सातत्याने आरंभी अर्धमागधी व जैन शौरसेनी भाषांतून आणि नंत जैन महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश भाषांतून जी साहित्यनिर्मिती केली आहे, त्याला भारतीय वाङ्मयाच्या झहिासात तोड नाही, हे नक्की. संदर्भ-ग्रंथ-सूची 1) प्रभावकचरित : प्रभाचन्द्र, सिंघी जैन ज्ञानपीठ, सं. जिनविजयमुनि, अहमदाबाद, 1940 2) प्रबन्धचिन्तामणि : मेरुतुङ्ग , सिंघी जैन ज्ञानपीठ, सं. जिनविजय, शान्तिनिकेतन, 1933 3) प्रबन्धकोष : राजशेखर, सिंघी जैन ज्ञानपीठ, सं. जिनविजय, शान्तिनिकेतन, 1935 4) विविधतीर्थकल्प : जिनप्रभ, सिंघी जैन ज्ञानपीठ, शान्तिनिकेतन, 1934 5) प्राकृत साहित्य का इतिहास : जगदीशचन्द्र जैन, वाराणसी, 1985 6) भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान : डॉ. हीरालाल जैन, भोपाळ, 1962 7) प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास : डॉ. नेमिचन्द्र शास्त्री, वाराणसी, 1966 *****
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________ 13. जैन पुराणातील राजे (इतिहास-संकलन-परिषद, पुणे येथे वाचलेला शोधनिबंध, 2010) लेखक : श्री. सुमतिलाल भंडारी ___मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी 'सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च / वंशानुचरितं चैव पुराणं पञ्चलक्षणम् / / ' अर्थात् पुराण पाच प्रकारचा विचार करते. उत्पत्ति, प्रलय, वंश, मन्वन्तर मनु व वंशाचा इतिहास. 'पुराण' शब्दाची हिंदू साहित्यातील ही परिभाषा जैन पुराणांनाही लागू पडते. रामायण, महाभारत, हरिवंशपुराण आदि हिंदूंचे ग्रंथ 'पुराण' या स्वरूपात मोडतात. पुराण याचा अर्थ प्राचीन. ही हिंदूंची पुराणे जेव्हा लोकप्रिय होऊ लागली तेव्हा जैन विद्वानांनाही पुराण लिहावेसे वाटू लागले. मग त्यांनी पुराणांतर्गत जैन महापुरुषांची चरित्रे लिहिली. तीर्थंकरांची तसेच राम, श्रीकृष्ण आदि प्रभावी पुरुषांची चरित्रे लिहली. (राम आणि श्रीकृष्ण हे जैनांमध्ये आदरणीय मोक्षगामी पुरुष आहेत. 'त्रिषष्टिशलाकापुरुष' या चरित्रग्रंथात राम व श्रीकृष्ण यांना अनुक्रमे बलदेव व वासुदेव असे संबोधले आहे.) ____ श्रुतकेवली भद्रबाहू स्वामी यांनी अर्धमागधी भाषेत रचलेल्या कल्पसूत्र' या ग्रंथात ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ व महावीर या तीर्थंकरांची चरित्रे दिली आहेत. 'हरिवंशपुराण' हे महाकाव्य 22 वे तीर्थंकर नेमिनाथ अथवा अरिष्टनेमी यांचे चरित्र वर्णन करणारे आहे. त्यामुळे या महाकाव्याचे दुसरे नाव 'अरिष्टनेमिपुराणसंग्रह' असेही आहे. याचे कर्ता पन्नाटसंघीय जिनसेन असन निर्मितीकाल अंदाजे 8 वे शतक आहे. वसुदेवहिंडी या आचार्य संघदासगणि व धर्मसेनगणि यांनी इ.स.च्या 6 व्या शतकामध्ये लिहिलेल्या ग्रंथात, ऋषभदेवांचे तसेच श्रीकृष्णपिता वसुदेव यांचे चरित्र दिले आहे. विमलसूरि या आचार्यांनी ‘पउमचरिय' हे रामचरित्र, महाकाव्य या रूपाने इ.स.च्या तिसऱ्या शतकात म्हणजे वाल्मीकि रामायणानंतर जवळ जवळ 200 वर्षांनी लिहिले आहे. हे जैन रामायण आहे. अशाकरिता की यातील घटना व क्रम वाल्मीकि रामायणाप्रमाणेच आहे. पण त्यांना वाटणाऱ्या विपरीत, असंभवनीय गोष्टींना तर्काचा, तत्त्वांचा व कर्मसिद्धांतांचा आधार देऊन त्यांनी काही फेरबदल केले आहेत. विमलसूरि, या महाकाव्याला 'पुराण' असे संबोधतात. ज्ञातृधर्मकथा, अंतकृद्दशा, उत्तराध्ययनसूत्रावील सुखबोधाटीका या ग्रंथात अनेक राजांच्या कथा आल्या आहेत. जैन पौराणिक महाकाव्यांची कथावस्तू जैन धर्मातील 63 शलाकापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारलेली आहे. शलाकापुरुष म्हणजे स्तुत्य पुरुष, सर्वोत्कृष्ट महापुरुष अथवा सृष्टीत उत्पन्न झालेले वा उत्पन्न होणारे सर्वश्रठ महापुरुष. हे शलाकापुरुष म्हणजे 24 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती, 9 वासुदेव, 9 प्रतिवासुदेव व 9 बलदेव हे होत. या 63 पुरुषांमध्ये भरत, ब्रह्मदत्त, श्रीकृष्ण, राम, बलराम, जरासंध, रावण आदींचा समावेश आहे. या महापुरुषांनी भरत क्षेत्राच्या इतिहासात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. 63 शलाकापुरुष हे एक धार्मिक काव्य आहे व कथेद्वारा धर्मोपदेश देणे हाच याचा उद्देश आहे. 63 शलाकापुरुष ही रचना पुराण याकरिता आहे की यामध्ये प्राचीनांचे इतिवृत्त आहे. हे वर्णन प्राचीन कवींनी केले आहे. हे महान याकरिता आहे की यात महापुरुषांचे वर्णन आहे. हे महान याकरिताही आहे की हे महान शिकवण देते.६३ महान पुरुषांचे वर्णन करणारे काव्य म्हणन हे 'महापराण' आहे. त्यामळे जैनांमध्ये या महत्त्व तेवढेच आहे जितके रामायण, महाभारताचे आहे. ___'त्रिषष्टिमहापुरुषगुणालंकार' हा महाकाय काव्यग्रंथ 'पुष्पदंत' या कवीने अपभ्रंश भाषेत लिहिला. याचा निर्मितीकाळ इसवी सनाचे 10 वे शतक असा आहे. आचार्य जिनसेन यांनी 'आदिपुराण' हा ग्रंथ 9 व्या शतकात लिहिला. तिसरा ग्रंथ 'त्रिषष्टिशलाकापुरुषचरित' हा आचार्य हेमचंद्रांनी (श्वेतांबर जैन मुनी) संस्कृतमध्ये इ.स.च्या 12 व्या शतकात लिहिला. अशा पुष्कळ लेखकांनी 63 शलाकापुरुषांवर ग्रंथ लिहिले आहेत.
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________ हे शलाकापुरुष असे आहेत. 24 तीर्थंकर : वृषभ, अजित, संभव, अभिनंदन, सुमति, पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभ, सुविधि, शीतल, श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्मनाथ, शांतीनाथ, कुन्थु, अरह, मल्ली, मुनिसुव्रत, नमि, अरिष्टनेमि, पार्श्वनाथ, महावीर. 12 चक्रवर्ती : भरत, सगर, मघवा, सनत्कुमार, शांतिनाथ, कुन्थुनाथ, अरह, सुभौम, पद्म, हरिषेण, जयसेन, ब्रह्मदत्त. 9 वासुदेव : त्रिपृष्ठ, द्वयपृष्ठ, स्वयंभू, पुरुषोत्तम, पुरुषसिंह, पुरुषपुंडरीक, दत्त, नारायण, श्रीकृष्ण. 9 प्रतिवासुदेव : अश्वग्रीव, तारक, मेरक, मधुकैटभ, निसुम्भ, बलि, प्रहरण, रावण, जरासंध. 9 बलदेव : वितय, अचल, धर्म, सुप्रभ, सुदर्शन, नंदी, नंदिमित्र, राम, बलभद्र. जैन पौराणिक ग्रंथात अनेक राजांचा उल्लेख आढळतो. प्राय: हे राजे चार प्रकारात आढळतात. एक म्हणजे आपल्या राज्याचा, संपत्तीचा त्याग करून, दीक्षा घेऊन लोकांना धर्मोपदेश देणारे. यात तीर्थंकरादि व्यक्ती येतात. उदा. ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ, महावीर इ. दुसरे म्हणजे गृहस्थाश्रमात राहून काही एका विशिष्ट प्रसंगाने प्रतिबोधित होऊन स्वत:च दीक्षा घेणारे व मोक्षाला जाणारे मोक्षगामी पुरुष. यात प्रत्येकबुद्ध येतात. उदा. करकंडु, नमीराजा, नग्गतिराजा, द्विमुखराजा, शालिभद्र इ. तिसरा प्रकार म्हणजे राजपदावर राहून पण जैन धर्म स्वीकारून धर्माचा प्रसार करणारे व धर्माचा आधारस्तंभ झालेले राजे. हे राजे चांगले आचरण करीत प्रजेला सन्मार्ग दाखवितात या प्रकारात चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, राजा श्रेणिक (बिंबिसार), कुणिक (अजातशत्रू), जितशत्रू, कुमारपाल आदि राजे येतात. चौथ्या प्रकारात राजे दीक्षा घेतात पण धर्मोपदेश न करता एकांत स्थळी जाऊन तपश्चर्या करतात व आत्मोन्नती साधतात. प्रत्येक प्रकारातील एक एक उदाहरण पाया. जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव : अयोध्या नगरीचे 14 वे अंतिम कुलकर नाभिराजा व राणी मरुदेवी यांच्या पोटी ऋषभदेवांचा जन्म झाला. नाभिराजा मरण पावल्यावर ते राजे बनले. पण सर्वांना ते परिचित आहेत ते त्यांच्या कार्यामुळे. सर्व मानवजातीला सुसंस्कृत करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या काळी मानवजात प्रगत नव्हती. लोक झाडाखाली झोपत. कंदमुळे खात. लोकांचे जीवन कर्तव्यशून्य व निष्क्रिय होते. लोकसंख्येची वाढ झाली होती. त्यामुळे भांडणे, वैर, घृणा, संघर्ष अशा अपप्रवृत्ती आढळून येऊ लागल्या होत्या. ऋषभदेवांनी या लोकांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांना शेती करण्याची, वस्त्रे विणण्याची कला शिकविली. स्वत: विनीता नगरी (आताची अयोध्या) निर्माण करून नगर, गाव कसे निर्माण करावे हे शिकविले. स्वत: दोन राण्यांशी - सुनंदा व सुमंगला यांच्याशी विवाह करून विवाहसंस्था अस्तित्वात आणली. आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा पाया घातला. स्त्रियांना मानाचे स्थान दिले. जातीनुसार नाही तर प्रत्येकाच्या कामानुसार क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी वर्णव्यवस्था अस्तित्वात आणली. थोडक्यात त्यांनी लोकांना पुरुषार्थाचा धडा घालून दिला व निष्क्रियता नष्ट केली. मानवजात सर्वार्थाने प्रगत झाल्यावर आपला पुत्र भरत यास राज्यावर बसवून त्यांनी दीक्षा घेतली. श्रमण धर्माची स्थापना केली. साधु-साध्वी, श्रावक-श्राविका अशा चतुर्विध संघाची स्थापना केली. __ ऋषभदेवाचे नाव ऋषभ अथवा वृषभ अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. या त्यांच्या कार्यामुळेच जैनांबरोबर त्यांना वैदिक व बौद्ध धर्मात आदराचे स्थान मिळाले. (1) ऋग्वेदात त्यांचा उल्लेख जागोजागी आढळतो (ऋ. 10/166/1).
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________ ऋषभं मासमानानां सपत्नानां विषासहिम् / हत्तारं शत्रूणा कृधि, विराजं गोपतिं गवाम् / / (ऋ. 10/166/1) तसेच त्यांचा उल्लेख अथर्ववेदात (ऋचा 19/42/4) व तैत्तियारण्यकात (ऋ. 2/7/1) मध्येही आढळतो. भागवत पुराणात ऋषभदेवांना 24 अवतारांपैकी एक अवतार मानले आहे. त्यातल्या रजसा उपप्लुतो अयं अवतार: / ' या उद्गारात ऋषभदेवांचा धुळीने माखले असण्याचा उल्लेख आहे. भगवान ऋषभदेवांची स्तुती मनुस्मृतीमध्येही खालीलप्रमाणे आढळते. अष्टषष्टिवु तीर्थेषु यात्रायां यत्फलं भवेत् / श्री आदिनाथस्य देवस्य स्मरणेनापि तद्भवेत / / त्याचप्रमाणे शिवपुराण, आग्नेयपुराण, ब्रह्माण्डपुराण, विष्णुपुराण, नारदपुराण आदि पुराणातही ऋषभदेवांचा उल्लेख तर आहेच. त्याचबरोबर त्यांच्या जीवनातल्या घटनाही दिल्या आहेत. (2) मोहनजोदारो (इ.स.पू. 6000) याच्या उत्खननात ऋषभदेवांची मूर्ती सापडली होती. ती मूर्ती ऋषभदेवांची होती हे अशाकरिता की मूर्तीच्या खाली वृषभाची आकृती होती जी त्यांची खूण आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ऋषभदेवांचा काळ हा मानवाच्या सुसंस्कृतपणाच्या सुरवातीचा काळ होता हे मान्य करावे लागते. त्यावरून त्यांचे प्राचीनत्व सिद्ध होते. इतर निरीक्षणे : 24 तीर्थंकरांपैकी केवळ ऋषभदेवच असे तीर्थंकर होऊन गेले की ज्यांनी अष्टापद अर्थात् कैलास पर्वतावर अंतिम तपस्या करून तेथून निर्वाणपद प्राप्त केले. त्यांचे जटाधारी स्वरूप, कैलास पर्वतावरील ध्यानस्थ अवस्था, नंदीशी असणारे वृषभाचे चिह्न तसेच वृषभदेवांना जसा पिता, पत्नी, पुत्र असा परिवार होता तसाच पौराणिक शंकरालाही होता. त्याचप्रमाणे शंकराचा स्मशाननिवास आणि भस्मलेपन हे अंशही ऋषभदेवांच्या वर्णनातून घेतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जैन अभ्यासकांचे असे मत आहे की ऋषभदेवांच्या व्यक्तिमत्वाचे काही अंश उत्तरकालीन, पौराणिक शिव देवतेच्या वर्णनात समाविष्ट केले असावेत. प्रत्येकबुद्ध अथवा स्वयंसंबुद्ध राजे : __ गृहस्थाश्रमात राहून गुरूंच्या उपदेशाशिवाय, एखाद्या प्रसंगाचे किंवा वस्तूचे निमित्त होऊन काही राजे विरक्त झाले व त्यांना बोधि प्राप्त झाली. नंतर त्यांनी स्वत:च दीक्षा घेतली व लोकांना उपदेश न देता शरीराचा अंत करून ते मोक्षाला गेले. अशा राजांना प्रत्येकबुद्ध अथवा स्वयंसंबुद्ध असे संबोधले जाते. हे प्रत्येकबुद्ध एकाकी विहार करणारे असतात व ते गच्छावासात रहात नाहीत. उत्तराध्ययन या मूलसूत्राच्या 18 व्या अध्यायात चार प्रत्येकबुद्धांचा उल्लेख आढळतो. तो असा - करकंडु कलिंगेसु, पंचालेसु य दुम्मुहो / नमी राया विदेहेसु, गंधारेसु य नग्गई / / (उत्त.१८.४६) एए नरिंदवसभा, णिक्खंता जिणसासणे / पुत्ते रज्जे ठवित्ता णं, सामण्णे पज्जुवट्ठिया / / (उत्त. 18.47) अर्थात् कलिंग देशाचा करकंडु, पांचाल देशाचा द्विमुख, विदेह देशाचा नमीराजा तर गांधार देशाचा नग्गति राजा, हे चार श्रेष्ठ राजे आपल्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून जिनशासनात प्रव्रज्या घेते झाले व श्रमणधर्मात सम्यक प्रकाराने स्थिर झाले. श्वेतांबर संप्रदायात या चार प्रत्येकबुद्धांवर कथा दिलेल्या आढळतात. उत्तराध्ययन सूत्रावरील सुखबोधाटीका
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________ या 11 व्या शतकात आ. देवेद्रगणि यांनी लिहिलेल्या ग्रंथात या कथा आलेल्या आहेत. बौद्धांच्या कुम्मकारजातक या पालिसाहित्यात या चार राजांना प्रत्येकबुद्ध मानून यांच्यावर कथा दिलेल्या आहेत (जातककथा क्र.४०८). बौद्ध लोक या चारही राजांना महात्मा बुद्धांच्या अगोदर होऊन गेल्याचे मानतात. यातील करकंडु राजा पार्श्वनाथ संपरेतला जैन असण्याची दाट शक्यता आहे. तसेच हे चारही राजे समकालीन होते. या प्रत्येकबुद्धांचा काळ भ. पार्श्वनाथ व भ. महावीर यांच्या मधला काळ मानला जातो जो 250 वर्षांचा आहे. या प्रत्येकबुद्धांवर प्राकृतमध्ये प्रत्येकबुद्धचरित' हा इ.स. 13 व्या शतकात लिहिलेला श्री तिलकसूरिरचित ग्रंथ आढळतो. संस्कृतमध्ये प्रत्येकबुद्ध महाराजर्षि चतुष्कचरित्र' हा जिनलक्ष्मीकृत ग्रंथ आढळतो. कनकामर मुमी यांनी अपभ्रंश भाषेत करकंडुचरिउ' हा ग्रंथ इ.स.च्या 11 व्या शतकात लिहिला आहे. ___या चौघांच्या पैकी, दिगंबर साहित्यात मात्र फक्त करकंडूचेच चरित्र आढळते. परंतु दिगंबरांनी करकंडूला प्रत्येकबुद्ध असे संबोधलेले आढळत नाही. ___ या चार राजांव्यतिरिक्त इतरही अनेक बुद्ध होऊन गेल्याचे आढळते. ऋषिभाषित या ग्रंथात या प्रत्येकबुद्धांची एकूण संख्या 45 दिली आहे. त्यातले 200 नेमिनाथांच्या, 15 पार्श्वनाथांच्या तर 10 प्रत्येकबुद्ध महावीरांच्या तीर्थकाळात झालेले दाखविले आहेत. वरील चार राजांव्यतिरिक्त अंबड, कूर्मापुत्र, धन्ना, शालिभद्र आदींची नावे यात आढळतात. राजपदावर राहून जैन धर्माचा प्रसार करणारे प्राचीन राजे : कलिंग देशाचा राजा सम्राट खारवेल हा इ.स.पू. पहिल्या शतकात होऊन गेला. तो चेदि महामेघवाहन वंशाचा होता. तो अतिशय शूर व पराक्रमी होता. त्याने कलिंग देशाला एक सुदृढ व शक्तिशाली राज्य बनविले. हे राज्य गंगापासून ते गोदावरीपर्यंत विस्तृत होते. खारवेल राजाचा जन्म जैन परिवारातच झाला होता. त्यामुळे तो जन्मत:च जैन होता. परंतु जैनधर्मी असूनही त्याचा इतर धर्मांप्रती उदार दृष्टिकोन होता. बौद्ध धर्मावरही त्याचे प्रेम होते. किंबहुना समसामायिक कलिंगावरबौद्ध धर्माचा प्रभाव वाढण्याचे तेही एक कारण मानता येईल. कलिंग देशाला जैन धर्माची परंपरा इ.स.पू. 5 व्या शतकात होऊन गेलेल्या करकंडु राजाकडून मिळाली होती. करकंडच्या काळी पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म प्रचलित होता. भुवनेश्वर जवळील उदयगिरी पर्वतात हाथी गुफा आहे. त्या गुफेत छतावर राजा खारवेल याने ब्राह्मी लिपीमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावरून खारवेल राजाची माहिती मिळते. या शिलालेखात खारवेल राजाच्या 13 वर्षांच्या राज्यकारकीर्दीचा आढावा घेतलेला दिसतो. शिलालेखावरून राजा खारवेलने जैन धर्माच्या संस्थापनेचे व प्रसाराचे प्रमुख कार्य केल्याचे दिसते. राज्यपदावर आल्यावर त्याने जैन तीर्थ मथुरेला यवनाच्या तावडीतून मुक्त कले असे लिहिलेले आहे. शिलालेखावरून त्याकाळच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनावर प्रकाश पडतो. राज्यामध्ये संगीत, नृत्य, उत्सव आदींचे आयोजन केले जात होते. खारवेल स्वत: क्रीडा व संगीतप्रेमी असल्याचे त्यात म्हटले आहे. स्त्री, पुरुष दोघेही अलंकारप्रिय होते. धनिक लोक आपल्या पगड्यांनाही अलंकार घालीत. स्त्रियांना राज्यात मान होता. त्या पतीबरोबर उत्सवात सहभागी होत. एकट्या स्त्रिया राजपथावर अश्वारूढ व गजारूढ होत. त्या नृत्य, संगीत, वादन आदींमध्येही प्रवीण होत्या. कलिंग देशात शस्त्रास्त्रे निर्माण केली जात होती. शेतीबरोबरच पशुपालन हाही एक प्रगत व्यवसाय होता. त्याकाळच्या चित्रांवरून रोम देशाबरोबर कलिंग देशाचा व्यापार चालू होता व रोममधील भांडी कलिंगामध्ये आयात केलेली होती असे दिसते. दुसरा राजा कुमारपाल हा गुजराथेतील अणहिल्ल नगराचा राजा होता. तो चालुक्यवंशीय होता. व इ.स. 12
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________ व्या शतकात राज्य करीत होता. तोही अतिशय शूर व पराक्रमी होता. तसेच तो अतिशय हुशार व उदारमतवादी होता. न्यायाने राज्य करीत होता. सुखी जीवनाकरिता खरा धर्म जाणून घेण्याची त्याला उत्कंठा होती व प्रबळ इच्छा होती. गुजराथेत आलेल्या जैन आचार्य हेमचंद्रसूरि यांच्या प्रभावाने त्याने जैनधर्म स्वीकारला व त्याचा सर्वांगाने प्रसार केला. आचार्य हेमचंद्रांनी कुमारपाल राजाला कथांद्वारे उपदेश दिला. प्राण्यांची हिंसा, छूत, मांसाहार, मद्यपान, वेश्यागमन इ. सप्त व्यसनांचे भयानक परिणाम त्यांनी दाखवून दिले. एवढेच नाही तर राजाला या व्यसनांना राज्यात बंदी घालण्याकरिता सांगून तसा राजादेशही काढविला. खरे देव, खरे गुरू व खरा धर्म याविषयी सांगून इतर धर्मतले मिथ्यात्व व अंधश्रद्धा दाखवून दिली. याकारणाने कुमारपालराजा श्रद्धायुक्त होऊन जैनधर्माकडे ओढला गेला. ___कुमारपाल राजाने नंतर राज्यात जैन मंदिरे उभारली. त्यांना स्वतः भेटी देऊ लागला. अष्टाह्निकांसारखे जैनाचे उत्सव साजरे करू लागला त्याने अनेक समाजोपयोगी कामे केली. दुर्बल घटकांकरिता अन्न व वस्त्रे देण्याची व्यवस्था केली. धार्मिक कृत्यांकरिता पौषधशाळा निर्माण केल्या. गिरनार पर्वतावरील जैन मंदिराकडे जाण्याकरिता पायऱ्या बांधल्या. ___ कुमारपाल राजाने आचार्य हेमचंद्रांकडून 12 श्रावक व्रते ग्रहण केली. मरेपर्यंत त्याने त्यांचे निष्ठापूर्वक आचरण केले. कुमारपाल राजाच्या मृत्यूनंतर सुमारे 11 वर्षांनी आचार्य हेमचंद्रांचे शिष्य सोमप्रभसूरि यांनी 'कुमारपालप्रतिबोध' या ग्रंथाची रचना केली. यात आ. हेमचंद्रांनी कुमारपाल राजाला उपदेश देताना सांगितलेल्या कथा ग्रथित केल्या आहेत. या ग्रंथाची भाषा जैन महाराष्ट्री असून यातील काही प्रस्ताव संस्कृत व अपभ्रंश भाषेत आहेत. यावरून सोमप्रभसूरींची प्रकांड पंडितता व विविध भाषांवरचे प्रभुत्व दिसते. या ग्रंथात सप्तव्यसनांसहित एकूण 54 कथा आहेत. या कथा अतिशय रंजक व बोधप्रद आहेत. ___ जैन पुराणातील राजांचा विचार करताना वर उल्लेखिलेल्या चार राजांचा प्रामुख्याने विचार केला. त्या पाठीमागील कारणमीमांसा अशी आहे. ___ भद्रबाहूरचित कल्पसूत्रात वृषभ, अरिष्टनेमि, पार्श्वनाथ, महावीर अशा चार तीर्थंकरांची चरित्रे दिली आहेत. उरलेल्या 20 तीर्थंकरांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या चार तीर्थंकरांपैकी क्षत्रिय राजे म्हणून ऋषभदेवाचे नाव घेतले जाते. तसेच ते घेतले जाते ते त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही. दुसरे कारण असे की ऋषभदेवांना वैदिक, जैन, बौद्ध अशा तिन्ही साहित्यात पुष्टी मिळालेली दिसते. राजा म्हणून व धर्माचा प्रसार करणारे म्हणून ऋषभदेवांबद्दल वर माहिती दिली आहे. करकंडु, नमि, द्विमुख व नग्गति अशा चार प्रत्येकबुद्धांचा उल्लेख उत्तराध्ययनसूत्रात केलेला आढळतो. या चौघांना जैन व बौद्ध धर्मात मान्यताही आहे. तरीही करकंडु राजा पार्श्वनाथांच्या काळातला जैन राजा असण्याची दाट शक्यता आहे. तसेच अपभ्रंश भाषेत करकंडुचरिउ हा ग्रंथही उपलब्ध असल्याने त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळते. खारवेल हा सर्वात जुना जैन परंपरा असलेला व शिलालेखी पुरावा असलेला एकमेव राजा होय. जैन कथांमध्ये चंद्रगुप्त व चाणक्य यांचे वर्णन जैन म्हणून केलेले दिसते. या दोघांनीही दीक्षा घेतली. चंद्रगुप्त आ.भद्रबाहूंबरोबर कर्नाटकात श्रवणबेळगोळ येथे आला. तेथे चंद्रगुंफेमध्ये त्याने संथारा व्रत धारण केले. आदि वृत्तांत जैन याग्रंथांमध्ये आढळतात. परंतु चंद्रगुप्त हा प्रत्यक्ष जैन धर्मावलंबी असल्याचे इतिहासकार मानीत नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्व इतिहासकारांनी सम्राट खारवेल यांचे जैन धर्मावलंबन मान्य केले आहे व त्याचेच शिलालेखही असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याची माहिती वर दिली आहे. प्राचीन इतिहासाच्या तुलनेत त्यामानाने अर्वाचीन काळात म्हणजे इसवी सनाच्या 12 व्या शतकात होऊन गेलेला चालुक्यवंशीय राजा कुमारपाल याची ऐतिहासिकता सर्व इतिहासकारांनी मान्य केली आहे. वाङ्मयाच्या आधारे ऐतिहासिकतेचा शोध घेणे हे काम अतिशय अवघड आहे. अशा परिस्थितीत जैन
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________ वाङ्मयाच्या आधारे ज्यांची ऐतिहासिकता निष्पक्षतेने मान्य करता येते अशा राजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा संदर्भ-ग्रंथ-सूची 1) प्राकृत साहित्य का इतिहास - डॉ. जगदीशचंद्र जैन 2) जैन साहित्य का बृहद् इतिहास - डॉ. गुलाबचंद्र चौधरी, पार्श्वनाथ विद्याश्रम शोधसंस्थान, वाराणसी 3) महापुराण भाग 1 व 2 - डॉ. देवेंद्रकुमार जैन 4) त्रिषष्टिशलाकापुरुषचरित - अनुवादक श्री गणेश ललवाणी एवं श्रीमती राजकुमारी बेगानी 5) उत्तराध्ययनसूत्र 6) ऋषभदेव : एक परिशीलन - देवेंद्रमुनी शास्त्री 7) करकंडुचरिउ - डॉ. हिरालाल जैन 8) प्राकृत साहित्याचा संक्षिप्त इतिहास - सन्मति-तीर्थ प्रकाशन 9) कुमारपालप्रतिबोध - सं. आर.टी.व्यास (गायकवाड ओरिएन्टल सेरीज - 14), सोमप्रभाचार्य 10) खारवेल - श्री. सदानंद अग्रवाल (श्री दिगंबर जैन समाज, कटक) 11) आओ, जैन धर्म को जाने - प्रवीणचंद जैन ** ********
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________ 14. जैन तत्त्वज्ञान आणि जैन समाजातील परिवर्तने (महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, मुंबई येथे विशेष व्याख्यान, नोव्हेंबर 2010) (1) प्रस्तावना : समाजाची परिवर्तनशीलता ; परिवर्तनशीलतेला जैन तत्त्वज्ञानात स्थान आपल्या आजूबाजूचे जग, वस्तू, व्यक्ती, घटना सर्वांमध्ये सतत बदल चालू आहेत. काही बदल मंद तर काही शीघ्र आहेत. बदलांच्या अखंड मालिकेने डोळ्यात भरणारी पृथगात्मकता ज्याने जाणवते त्याला आपण 'परिवर्तन' म्हणू या. सामान्यत: अशी अपेक्षा केली जाते की धर्माचरणामध्ये अशी परिवर्तनशीलता असावी. परंतु ती इतकीही नसावी की जिने धर्माला आधारभूत चौकट देणाऱ्या सिद्धांतांना, तत्त्वांना धक्का बसेल. जैन परंपरेचे असे वैशिष्ट्य आहे की बदल, परिवर्तनशीलता आणि 'ध्रौव्य' या दोहोंना तिने आपल्या मूलभूत ढाचातच कौशल्याने विणून ठेवले आहे. 'सत्' म्हणजे reality'चे स्वरूपच जैन दर्शनाने 'कूटस्थ नित्य' न मानता 'उत्पाद-व्यय-ध्रौव्ययुक्त सत्' असे मानले आहे. अशी 'सत्' द्रव्ये एकूण सहा मानली आहेत. जगातील खऱ्याखुऱ्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींची विभागणी षड्-द्रव्यांमध्ये केली आहे. द्रव्याची व्याख्या-'गुणपर्यायवद् द्रव्यम्' अशी आहे. यातील ‘पर्याय' संकल्पनेत अवस्थांतरे, बदल, परिवर्तने याला भक्कम सैद्धांतिक पार्श्वभूमी आहे. ____ वस्तूकडे (व्यक्तीकडे, घटनांकडे) पाहण्याचे चार 'निक्षेप'ही परिवर्तनशीलतेला वाव देणारे आहेत. ते म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भाव. अनेकान्तवादाचा सिद्धांत तर theory of non-absolutism' अगर theory of relativity म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याचा अधिक विस्तार न करता म्हणेन की 'जैनत्व अबाधित राखणारे घटक' आणि 'जैन समाजातील कालानुसार परिवर्तने' या दोन मुद्यांचा विचार आणि त्यातील सुसंगती दाखवणे हे आजच्या माझ्या भाषणाचे प्रयोजन आहे. (2) जैनविद्येकडे पाहण्याचे अभ्यासकांचे जुने प्रारूप (model). ते बदलण्याची आवश्यकता ___ “मुळातला जैनधर्म हा अत्यंत सैद्धांतिक, मूलगामी व कडक असून, साहित्यात, समाजात आणि कलानिर्मितीत, केल्या गेलेल्या तडजोडी ही सर्व ‘भ्रष्टरूपे' आहेत”-असे एक प्रारूप जैनविद्येचे देशी-विदेशी अभ्यासक, कयासमोर ठेवून मूल्यांकन करीत असत. गेल्या दशकात म्हणजे 21 व्या शतकाच्या आरंभापासून हे वैचारिक प्रारूप बदलण्याच आवश्यकता, अभ्यासकांना वाटू लागली. डॉ. जॉन ई. कोर्ट, डॉ. पॉल डून्डास इ. पाश्चात्य विचारवंतांनी नवीन विचारसरणी प्रथम दृष्टिपथात आणली. वैदिक धर्मापासून पुराणातील हिंदुधर्मापर्यंत, त्या परंपरेत जे बदल, परिवर्तने व अवस्थांतरे झाली, त्याची अनेक अभ्यासकांनी 'लवचिक', 'समन्वयवादी' अशा शब्दात भलावण केली. हिंदूच्या विकसनशील दैवतशास्त्राचा चिकित्सक अभ्यास केला. नवीन बदलांना स्वीकृती दिली. __ हिंदू समाजाच्या अत्यंत निकट राहणाऱ्या, जैन समाजाने मात्र ज्या चालीरीती, श्रद्धा व देवदेवता स्वीकारल्या, त्याबद्दल जैनांमधल्या सनातन्यांनी पाखंड म्हणून हिणवले. विचारवंतांनीही 'जैनीकरण' 'जैनीकरण' अशी दूषणे लावली. जैनधर्म आणि हिंदुधर्म यांना असे दोन वेगळे निकष लावायचे का ? 'हे सर्व बदल बाह्य आचारबदल आहेत की सिद्धांताशीही तडजोड केली आहे, याचा पुनर्विचार होणे अत्यंत जरूरीचे आहे. (3) जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार टिकविण्याचे मुख्य आधार - 1) कुटुंब 2) स्वाध्याय मंडळे 3) साधुसाध्वी वर्ग औपचारिक शिक्षण पद्धतीतून जैन तत्त्वज्ञान, धर्म व आचार यांचे मिळणारे मार्गदर्शन जवळ-जवळ नगण्य आहे. समाजही अल्पसंख्य आहे. तरीही हे तिन्ही अव्याहतपणे 2600-2700 वर्षे टिकून राहण्याचे मुख्य आधार, वर वर्णन केलेले तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत. हे आव्हान खरोखरच अवघड आहे. धर्माचरणाची व सिद्धांतांची
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________ मूलभूत आवड असल्याशिवाय, हे टिकून राहणे दुष्कर आहे. त्यामुळेच द्रव्य-क्षेत्र-काल-भावानुसार काही तडजोड करतच, या धर्माचे अस्तित्व टिकून राहिले. (4) कोणत्या गोष्टींमुळे जैन समाज हिंदू बांधवांच्या अगदी जवळ आला असा आभास निर्माण होतो ? १)मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा : ___'सैद्धांतिक दृष्टीने निरीश्वरवादी असलेल्या जैनधर्मीयांनी मंदिरे, मूर्ती, प्रतिष्ठा, पूजा इ. ना आपल्या धर्मात का बरे स्थान दिले ?'-असा कळीचा प्रश्न वारंवार विचारला जातो. हिंदुधर्माचा यांवरील प्रभाव पूर्ण नाकारता येणर नाही. तथापि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीतरागी जिनांची स्थापना करून, त्यांच्या आदर्शरूप मानवी गुणांची पूज करणे, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. भक्ती, श्रद्धा, पूजा यांना स्थान असले तरी ते पुण्यबंधकारक मानले आहे. सिद्धांतानुसार भक्ती, पूजा, गुणानुवाद, दान इ. सर्व कृत्ये पुण्य बांधतात परंतु कर्मांची निर्जरा करू शकत नाहीत. त्यासाठी ज्ञानपूर्वक केलेल्या तपस्येची, शुद्ध आचरणाची आणि संयमित वृत्तींची आवश्यकता आहे, हे प्रत्येक जैन व्यक्ती प्रायः समजूनच असते. यक्ष-यक्षिणी, विद्यादेवता, शासनदेवता इ. मुळे कदाचित ऐहिक लाभ होऊ शकतील (अर्थात् तेही कर्मफलानुसार). परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी देवदेवता पूजन प्रत्यक्ष सहाय्यभूत होऊ शकत नाही. 2) सण-वार-उत्सवात सहभाग : ___हिंदू बांधवांच्या सण-वार-उत्सवात जैन बांधवांचा सहभाग हा निव्वळ सामाजिक कारणाने असतो, धार्मिक नव्हे. अर्थातच काही अपवाद असू शकतात. अक्षयतृतीया, दिवाळी इ. प्रसंगी आवर्जून, जैन इतिहासातील व्यक्तींचे व घटनांचे स्मरण केले जाते. 3) चातुर्मास व इतर व्रते : ___ हिंदूंच्या व जैनांच्या चातुर्मासाच्या पद्धतीत साम्प्रत काळातही बराच फरक दिसतो. जैनांच्या चातुर्मासात तप आणि उपवासाला विशेष महत्त्व असते. हिंदू व्रते प्राय: पूजाविधी व भोजनविधीच्या संबंधित असतात. मुळातच 'व्रत' हा शब्द जैन परंपरेत महाव्रते व श्रावकव्रते (अणुव्रते) यांच्याशीच जोडलेला आहे. इच्छित गोष्टीच्या प्रतीसाठी केलेली तात्कालिक व्रते जैनांमध्ये त्यामानाने अत्यल्प आहेत. त्यापेक्षा दैनंदिन, चातुर्मासिक अथवा वार्षिक मयम ग्रहण करून तो पाळण्याकडे अधिक कल दिसतो. 4) अनेक संप्रदाय-उपसंप्रदाय : अनेकांतवादी जैनधर्मातील श्वेतांबर-दिगंबर मतभेद आणि फाटाफूट होऊन निघालेले इतर संप्रदाय, याबद्दल अभ्यासक अनेकदा आक्षेप घेतात. फाटाफुटीचे समर्थन करण्याचा येथे उद्देश नाही. परंतु शैव, वैष्णव, माहेश्वरी, लिंगायत, नाथपंथी, वारकरी, रामानुजी आणि इतरही असंख्य उपसंप्रदाय असूनही, जेव्हा ते सर्वजण हिंदू म्हणून संबोधले जातात, तेव्हा समान सैद्धांतिक आधार असणारे संप्रदाय अनेक असले तरी, जैनधर्माच्या एकत्वाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. शिवाय आधुनिक काळात याच कारणासाठी धर्म आणि जात या दोन्ही शीर्षकाखाली फक्त जैन' असे लिहावे, असे आव्हान करण्यात येते. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे कारण जैन युवापिढीला संप्रदाय-उपसंप्रदायातील ही तेढ अजिबात मान्य नाही. येत्या दशकभरातच त्याचे परिणाम दिसण्याची सुचिह्ने जाणवू लागली आहेत.
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________ (5) व्यापार व शेतीव्यवसायामुळे निर्माण झालेली अंगभूत वैशिष्ट्ये अ) साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण : भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार जैन समाजात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण जवळ-जवळ शत-प्रतिशत आहे. व्यापार आणि हिशेब ठेवणे ही तर कारणे आहेतच परंतु आदिनाथ ऋषभदेवांनी आपल्या कन्या ब्राह्मी व सुंदरी यांना लिपी विज्ञान आणि गणित यांचे शिक्षण दिले होते, ही ऐतिहासिक धारणाही यामागची पार्श्वभूमी असावी. ब) जेथे जातील तेथील समाजाशी एकरूप : भ. महावीरांच्या कार्यप्रवृत्ती प्रामुख्याने मगधात होत्या म्हणजे अंग-वंग आणि कलिंग या प्राचीन भारतीय प्रदेशात तो सर्वप्रथम पसरला. जैन इतिहासानुसार त्यानंतर तो पश्चिमेकडे व दक्षिणेकडेही प्रसृत झाला. विशेष गोष्ट अशी की व्यापारामुळे व धाडसी स्वभावामुळे जैन समाज भारतभर व भारताबाहेरही पसरत राहिला. विशिष्ट प्रदेशाशी निगडित नसल्यामुळे, त्या त्या प्रदेशाची भाषा, चालीरीती, पोषाख इ. ही स्वीकारीत गेला. एवढे सामाजिक अभिसरण होऊनही जैनधर्मीयांनी आपली पृथगात्मकता नेटाने जपली. क) भाषिक वैशिष्ट्ये : धर्म आणि आचार हा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठीच, जैन तीर्थंकरांनी आपले उपदेश ‘प्राकृत' भाषेमध्ये दिले होते. भ. महावीरांचे प्राचीन उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत आहेत. प्राकृत या बोलीभाषा असल्यामुळे त्या संपूर्ण भारतात आरंभापासूनच विविध होत्या. भाषेची स्थळानुसार आणि काळानुसार होणारी सगळी परिवर्तने, जैनधर्माने सकारात्मकतेने स्वीकारली. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश या पाचही भाषेतून ग्रंथनिर्मिती केली. 10 व्या शतकानंतर गुजराती, हिंदी, मराठी कन्नड या चार भाषांमधील मूळ साहित्याला भरीव योगदान दिले. महत्त्वाची गोष्ट अशी की, आपले सर्व मूलगामी तत्त्वज्ञान वेळोवेळी त्यांनी या भाषांच्या माध्यमातून समाजापर्यंत झिरपवले. जैन समाजाचे हे वैशिष्ट्यच आहे की तो तीन-चार भाषा तरी सहजपणे बोलू शकतो. अर्थातच बहुभाषित्वाचे हे वरदान जैन साधु-साध्वी-वर्गामध्ये तर अधिकच विशेषत्वाने दिसते. ड) राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण : जैनांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहास वाचताना हे जाणवते की, या तिन्ही काळात त्यांनी राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवले. इ.स.पूर्व 200 मध्ये होऊन गेलेला सम्राट खारवेल' जन्माने जैन होता असे कलिंग अर्थात आधुनिक ओरिसातील हाथीगुंफा' शिलालेखावरून स्पष्ट होते. गुजरातेतील शैवारजा, वनराज चावडा जैनानुकूल होता. चालुक्य राजा कुमारपाल पूर्णतः जैन श्रावक होता. दक्षिणेतील कदंब, गंग, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ हे राजेही जैन साधुवर्ग व श्रावकवर्गाला अनुकूल होते. ह्या सर्व राजवटीत राजकीय प्रणालींशी सामोपचाराचे धोरण ठेवणे त्यामानाने सोपे होते. मुघल राजांच्या आक्रमणानंतर तपागच्छ आणि 'खरतरगच्छा'च्या साधुवर्गाने त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. जिनप्रभसूरींच्या अंगी असलेल्या शक्ती व सिद्धींचा प्रभाव, ‘महम्मद तघलका'वर होता असे दिसून येते. त्यामुळेच जिनप्रभसूरींनी मुघल राजवट चालू असतानाही, अनेक जैन मंदिरांच्या उभारणीत पुढाकार घेऊन जैनसंघाची व धर्माची खूप प्रभावना केली. त्याच्या आश्रयाने 'विविधतीर्थकल्प'सारख्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मितीही केली. 16 व्या शतकात सम्राट अकबरा'चा दरबारात आ. 'हीरविजयसूरींना सन्मानाचे स्थान होते. सम्राट अकबराने आपल्या संपूर्ण साम्राज्यात पर्युषणपर्वक्ळात कत्तलखाने बंद ठेवण्याची आज्ञा दिली होती. शिकारीलाही बंदी घातली होती. बादशाह जहांगिर'नेही अकबरानंतर हेच धोरण ठेवले होते. 20 व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांवरही
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________ तपागच्छाच्या 'बुद्धिसागरसूरीं'च्या अहिंसाविचाराचा पगडा होता. ___पुढील काळात जैन आणि युरोपियन यांचे सामाजिक, आर्थिक संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले. ब्रिटीश राजवटीतही जैन समाजाने Bankers, Traders and Merchants यांच्या रूपाने आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटन, आफ्रिका आणि अमेरिका या खंडात व्यापारानिमित्त पोहोचलेले लोक बहुतांशी जैनच होते. या खंडात पोहोचल्यानंतर त्यांनी आपोआपच संघटना बांधून, मंदिरनिर्मिती वअभ्यासकेंद्रे स्थापली. यशस्वी व्यापाराबरोबरच शाकाहार, अहिंसा आणि शांतता यांच्या प्रसाराचे काम, आपापल्या शक्तीनुसार चालू ठेवले. ___ या संक्षिप्त इतिहासावरून असे दिसून येते की सामोपचाराचे धोरण ठेवण्यासाठी, स्वत:त वेळोवेळी बदल घडवून आणण्याची जी शक्ती लागते, ती जैनांनी परंपरागत धर्मातून चालत आलेल्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मिळविली. (6) परिवर्तने चालू असतानाच जैनांनी जपलेले 'जैनत्व' : ___ वर वर पाहता समाजाशी एकरूप झाल्यासारखे दिसणारे जैन लोक, कोणकोणत्या बाबतीत आपल्या जैनत्वाची चिह्न जपून आहेत, या विषयाचे काही मुद्दे, माझ्या 25 वर्षांच्या निरीक्षणाच्या आधारे नमूद करीत आहे. 1) अहिंसेचे आहारात प्रत्यक्षीकरण : अहिंसातत्त्वाचा दैनंदिन व्यवहारात सूक्ष्म वापर करत असताना, जैनांनी प्रथम स्वत:च्या आहारात पूर्ण अहिंसा आणली. शाकाहाराच्या अंतर्गतही प्रत्येक वनस्पतिजीवाचा सूक्ष्म विचार करून, अनेक प्रकारच्या संयम व मर्यादा सांगितल्या. आधुनिक काळातही देश-विदेशी मिशनरी वृत्तीने शाकाहार चळवळ चालू ठेवली. त्या चळवळीला सकारात्मक पाठिंबाही मिळत आहे. 2) 'आपला समाज'-अशी संघभावना : सामाजिकता जपत असतानाच स्वत: अल्पसंख्य असल्यामुळे धर्माच्या समानतेच्या आधारे, छोट्या-मोठ्या संघटना उभ्या करून, त्या द्वारे आपल्या आणि इतर समाजाच्या हिताची कामे करण्याची एक सर्वसाधारण प्रवृत्ती, जैन माणसामध्ये मूलत:च रुजलेली असते. धर्म आणि आचार टिकून राहण्यासाठी, अशा छोट्या-मोठ्या संघटना आपोआपच कार्यरत असतात. 3) साधु-साध्वी वर्गाचे तुलनेने काटेकोर आचरण : पायी विहार, वस्त्र-पात्र मर्यादा, सचित्त सेवनाचा त्याग, रात्रिभोजनत्याग इ. अनेक प्रकारचे कडक अथवा कठोर आचरण इतर धर्मीयांच्या तुलनेत, जैन साधु-साध्वीवर्ग काटेकोरपणे करीत असलेला दिसतो. वेळोवेळी यामध्ये शिथिलता आणण्याची चर्चाही होत राहते. परंतु जैनत्व जपण्यासाठी अंतिमत: हे कडक आचरण उपयुक्तच ठरते. 4) दान-मदत-सेवा यांचे सैद्धांतिक स्थान : ‘जीवो जीवस्य जीवनम्' या वचनामध्ये 'एकाने दुसऱ्याच्या जिवावर जगणे', असा भाव विशेषत्वाने दिसतो. जैन तत्त्वज्ञानात जीवाचे कार्यानुसारी लक्षण देताना ‘परस्परोपग्रहो जीवानाम्' असे दिले जाते. या लक्षणात सर्व प्रकारच्या जीवजातीप्रजातींनी एकमेकांना जगायला परस्पर सहकार्य करण्याचा भाव असल्यामुळे अर्थातच दान, मदत, सेवा इ.ना भक्कम सैद्धांतिक आधार लाभतो. परिणामी सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील जैन व्यक्तींना मनापासून दान देण्याची उर्मी विशेष करून दिसून येते.
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________ 5) 'पंधरा कर्मादान' अर्थात् निषिद्ध व्यवसाय : जैन श्रावकाचारात, 'कोणते व्यवसाय करावेत व कोणते करू नयेत', याबाबत मार्गदर्शन आढळते. श्रावकाचारातील पंधराही निषिद्ध व्यवसाय आधुनिक परिस्थितीत निषिद्ध ठरवता येत नाहीत. तरीही मद्य, मांस, कातडे, शिंग, केस, रेशीम, हस्तिदंत, मासेमारी इ. प्रत्यक्ष हिंसाधार व्यवसायांमध्ये जैन व्यक्ती सहजी प्रवेश करीत नाही. निषिद्ध व्यवसायांविषयीचे हे संकेत बऱ्याच अंशी पाळल्यामुळे, जैनेतरांना हे प्रांत खुले राहिले. परिणामी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने ते हितकारकच ठरले. 6) तप, उपवास व नियम ग्रहण यांना विशेष स्थान : ____ महाव्रतांचे पूर्ण पालन करणे, श्रावकाला शक्य नसल्याने यथाशक्ती धर्म पालन करणारा प्रत्येक श्रावक, प्राय: विशिष्ट धार्मिक कालावधीत तरी नक्कीच तप, उपवास अथवा विशिष्ट गोष्टींच्या त्यागाचा नियम ग्रहण करतो. असे यथाशक्ती नियम पालन 'जैनत्वा'ची ओळख म्हणूनच गणली पाहिजे. 7) क्षमापना : पर्युषणपर्वानंतर जैन समाजाकडून पाळला जाणारा क्षमापनेचा दिवस हा संवराचे साधन असलेल्या दशविधधर्मापेकी एक सद्गुण जो ‘क्षमा'-त्याच्या आचारात्मक प्रतिबिंबावर आधारलेला आहे. 8) श्राद्ध, पितर, पिंड व इतर तत्सम चालीरीतींचा अभाव : वेदकाळापासून आधुनिक काळापर्यंत श्राद्ध, पितर, पिंड, व इतर चालीरीती हा हिंदू समाजाचा एक आविभाज्य घटक बनलेला आहे. शहरीकरणामुळे हिंदूसमाजातील या चाली काहीशा कमी दिसत असल्या तरी, मध्यम छोटी गावे, खेडी इ. मध्ये यांचे प्राय: पालन केले जाते. अगदी तुरळक अपवाद वगळता जैन समाजाने हे विधी उचललेले नाहीत. त्याचे कारण त्यांच्या पुनर्जन्मविषयक सिद्धांतात आहे. जीवाने देहत्याग केल्यानंतर काही क्षणातच तो दुसरे शरीर धारण करतो. त्यामुळे पितर, पिंड, श्राद्ध इ.ना मुळीसुद्धा वाव रहात नाही. ह्या स्पष्ट सैद्धांतिक मान्यतेत बदल करण्याची आवश्यकता जैन समाजाला कोणत्याही काळात वाटली नाही. 9) जैन तत्त्वज्ञानाचा विज्ञानानुकूलतेच्या दिशेने अभ्यास : जैन तत्त्वज्ञानाची पर्यावरणरक्षणाला असलेली अनुकूलता, परमाणु-सिद्धांताचा नवा अन्वयार्थ, गोत्र-कर्माचा आनुवंशशास्त्राशी असलेला संबंध, सम्मूर्छिमजीव आणि क्लोनिंग, जैन तत्त्वज्ञानातून मिळणारे उत्क्रांतिवादाला अनुकूल असे संकेत-ह्या आणि अशा अनेक वैज्ञानिक दिशांनी जैनविद्येच्या संशोधनाचे प्रयत्न चालू आहेत. जैनविद्येच्या अभ्यासाला आधुनिक काळात मिळत चाललेले हे अभिनव वळण, अत्यंत आशादायी आणि तत्त्वज्ञानाची महत्ता अधोरेखित करणारे आहे. 7) काळाच्या ओघात निर्माण झालेले दोष : आत्तापर्यंतच्या वर्णनावरून असे वाटेल की जैनत्व जपण्यासाठी केलेले सर्व बदल सकारात्मकच आहेत की काय ? अर्थातच हे खरे नाही. बदल-परिवर्तन करून घेत असताना स्वाभाविकपणे दोष हे उद्भवणारच. ___ 'गहमयुर' वृत्ती, संप्रदाय-संप्रदायात कापणा-वैमनस्य-तेढ, आर्थिक घोटाळ्यांशी संबंध, दानात दडलेली दिमाख दाखविण्याची वृत्ती, समारंभी बडेजाव-डामडौल, 'अहो रूपं अहो ध्वनिः' -अशा प्रकारे पुरस्कारांची लचेल, सामाजिक प्रतिष्ठेचे दडपण, हाव अथवा अट्टाहास, जैन सोडून जे इतर ते पाखंड'-अशी वृत्ती, आर्थिक भरभरीसाठी साधु-बुवा-ज्योतिषांकडे घेतलेली धाव-हे आणि इतरही अनेक दोष जैन समाजाबाबत दृष्टोत्पत्तीस आणून दिले
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________ जातात आणि येतील. ____ परंतु यातील कित्येक दोष असे आहेत की जे काळाच्या ओघात एकंदर समाजातच खतपाणी घालून जोपासलेले आहेत, केवळ जैन' असल्यामुळे आलेले नाहीत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार' अशा सार्वत्रिक नैतिक अध:पतनाच्या काळात हे जैन-हे जैनेतर' अशी तफावत करून ठोकत रहाणे उचित नव्हे. ___ अत्यंत वरचा मलईदार स्तर (creamy layer) आणि निम्न स्तर हे वगळता सामान्यत: जैन समाज धर्मप्रेमी, कौटुंबिक व अंतर्गत भावनिक संबंध जपणारा, संकटकाळी तत्परतेने मदतीसाठी पुढे होणारा, तडजोडवादी आणि इतरांशी एकरूप होता होता स्वत:चे 'जैनत्व' जपण्याची तारेवरची कसरत करणारा असा आहे. ते बदल आणि परिवर्तने तो सहज स्वीकारतो जे मूलभूत तत्त्वज्ञानाच्या चौकटीशी सुसंगत ठरतात. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सामान्यतः समजतात तसे 'जैन' म्हणजे केवळ 'जैन दर्शन' नव्हे. ही एक स्वायत्त, प्राचीन परंपरा आहे. त्या परंपरेला तिचा म्हणून खास इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, आचारप्रणाली आणि कलानिर्मितीची प्रेरणा आहे. या सर्व प्रांतात जैनांनी भारतीय संस्कृतीला दिलेले योगदान, 'संख्याबल' पाहता, खरोखरच लक्षणीय आहे !!! **********
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________ 15. जैन चातुर्मास : काही निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा (स्वानंद महिला संस्था, पुणे, चर्चासत्र, जानेवारी 2008) (जैन साधु आचारात, वर्षभराचा विहार थांबवून, पावसाळ्याचे चार महिने एका ठिकाणी राहण्याचे विधान आहे. भ. महावीरांच्या चरित्रात त्यांच्या साधु जीवनातील 30 चातुर्मासांचे वर्णन अर्धमागधी व जैन महाराष्ट्री यात येते. प्रस्तुत लेख हा पुणे परिसरातील श्वेतांबर स्थानक वासींच्या चातुर्मासावर प्रामुख्याने आधारित आहे. यातील निरीक्षणे, प्रश्न व अपेक्षा सुमारे 100 जैन गृहिणींच्या चर्चेतून पुढे आल्या आहेत. वाचकांना काही मते न पटल्याप्त त्यावरून वादंग निर्माण करू नये ; ही अपेक्षा.) आज प्रचलित असलेला वैदिक हिंदू (पौराणिक, देवताप्रधान व भक्तिप्रधान) धर्म आणि जैन धर्म यांच्यात एरवी फारसे उठून न दिसणारे भेद चातुर्मासाच्या वेळी अगदी स्पष्ट दिसून येऊ लागतात. हिंदू स्त्रियांमध्ये व्रन पूजांची लाट उसळते. श्रावण-भाद्रपदात तर प्रत्येक दिवशी हिंदू स्त्री सणवारांसाठी धावपळ करताना दिसते. मोठ्या शहरात धावपळीच्या आयुष्यातही सामान्यत: स्त्रिया, नवविवाहित मुली शिवामूठ, मंगळागौर, सत्यनारायण, हरितालिका, गणेशस्थापना-विसर्जन, अनंतव्रत इत्यादि व्रते करताना दिसतात. छोट्या शहरात आणि गावात तर ही व्रते व पूजा अधिक उत्साहाने व मनापासून साजऱ्या होतात. ठराविक दिवशी खिचडी, भगर, रताळी इ. खाऊन उपवास, सणावाराल स्नान वगैरे करून भरपूर स्वयंपाक, नैवेद्य, फळे-फुले-पत्री गोळा करून देवाला वहाणे इत्यादि गोष्टी सुरूहोतात. दूरदर्शनच्या मालिकांमध्ये बघून-बघून, तरुण-तरुणीही सणावाराला गणपती, साईबाबा अशा ठिकाणी लांबलचक रांगा लावून दर्शन घेताना दिसतात. जैन गृहिणी मात्र घरातले व्याप, स्वयंपाक कमी करून स्थानक-मंदिरातील कार्यक्रमांना, प्रवचनांना हजेरी लावू लागतात. पर्युषणात तर शक्यतो कंदमुळे, पालेभाज्या, मोडाची कडधान्ये वर्ण्य मानतात. एरवी शांत असणाया स्थानक व मंदिरात उत्साहाचा महापूर येतो. निमंत्रित साधु-साध्वी ठरलेल्या ठिकाणी विराजमान होतात. कमिट्या स्थापन केल्या जातात. सुप्त पुरुषवर्गामध्येही चैतन्य सळसळू लागते. वर्गण्या काढल्या जातात. त्या अनेकदा लाखातीह असू शकतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्पॉन्सरर्सचा शोध घेतला जातो. विधिपूर्वक उपवास अथवा नियम घेतले जातात. मोठमोठे मंडप पडतात. शेकडो बॅनर्स लागतात. धार्मिक साहित्याचे स्टॉल्स सजतात. अनेकांच्यानावानिशी पाट्या झळकू लागतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कामांना, करमणूकीच्या कार्यक्रमांना व शिबिांनाही उधाण येते. अशा प्रकारचे चातुर्मास वर्षानुवर्ष चालू आहेत.आपण प्रथम याचे काही फायदे पाहू - 1) जैन समूहाला एकत्रित येण्याचे एक ठिकाण मिळते. एकीभावना टिकून रहाते. 2) पावसाळ्यामुळे इतरत्र फारसे हिंडता फिरता येत नाही. त्यामुळे स्थानक-मंदिरात नटून-थटून जाण्याचा उत्साह वाढतो. 3) युवक-युवती, लहान मुले इ. ना धार्मिक प्रथांची माहिती होते. त्यांच्यावर जैन धर्माचे व सामाजिकतेचे संस्का होतात. संयमाचे शिक्षण मिळते. 4) वेगवेगळ्या स्पर्धांमुळे सर्वांच्या कलागुणांना वाव मिळतो. पारितोषिके भरपूर असल्याने प्रोत्साहन मिळते. 5) सामाजिक प्रतिष्ठा वाढते. 6) दान देण्याची भावना निर्माण होते. 7) नेतृत्वगुणाला वाव मिळतो. एकंदरीत, जरा धावपळ झाली तरी चातुर्मास हवाहवासा वाटतो. चर्चेतून पुढे आलेली काही स्पष्ट मते व निरीक्षणे : 1) 'कोणाचा चातुर्मास अधिक यशस्वी झाला ?' - अशा चर्चा सुरू होतात. मोठमोठे मांडव, मोठे बजेट, थाटमाट,
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________ गर्दी, जेवणावळी इ. निकष त्यासाठी वापरले जातात. 2) गेल्या काही वर्षात याच कारणाने साधु-साध्वींची ओढ शहरी भागाकडे वाढली आहे. छोट्या गावांना, खेड्यांना साधु-साध्वींच्या सत्संगाचा लाभ होत नाही. (अर्थात् त्यामुळे स्वाध्यायी श्रावक-श्राविकांना भरपूर वाव मिळता) 3) ठराविक ठिकाणी ठराविक लोकांचे वर्चस्व वर्षानुवर्षे रहाते. वाव न मिळालेले लोक असंतुष्ट रहातात, ___ आपोआपच दूर जातात. 4) साधु-साध्वींच्या पुढे पुढे करण्याची अहमहमिका सुरू होते. 5) प्रभावना म्हणून खाद्यवस्तू, पुस्तके व भोजनांचे आयोजन केले जाते. नव्या पिढीला या गोष्टी निरर्थक वाटतत. 6) बालक, गृहिणी, युवक-युवती, सुना, जोडपी अशा वेगवेगळ्या गटांसाठी शिबिरे आयोजित केली जातात. __ अनेकदा वेगवेगळ्या मंडळांची स्थापना होते. चातुर्मासानंतर त्यात कोणतेच सातत्य रहात नाही. 7) स्टेजवर राजकीय पुढाऱ्यांना व स्पॉन्सरर्सच्या () बसवून त्यांची स्तुति-स्तोत्रे गायली जातात. शाली, माळा व मोमेंटो देऊन सत्कारांचे कार्यक्रम इतके रटाळ केले जातात की अतिशय कंटाळवाणे वाटू लागते.स्टेजवर भरमसाठ सत्कार आणि श्रोत्यांमध्ये आपसात गप्पा व चर्चा सुरू रहातात. 8) स्थानिक लोकांमध्ये आधीच काही स्वाध्याय मंडळे, धार्मिक-शैक्षणिक कार्य चालू असते. त्यांची मुळीच दखल घेतली नाही अथवा त्यांच्याविषयी तुच्छतावाद व्यक्त केला तर आधीचे चांगले उपक्रम बंद पडतात. नवीन तर टिकू शकतच नाहीत. अनेक वर्षे चालू असलेले सन्मति-तीर्थ चे प्राकृत व जेनॉलॉजीचे क्लासेस 4-5 गावालरी अशा प्रकारे बंद झाले आहेत. 9) काही ठिकाणी जैन समाज जास्त असतो. काही ठिकाणी मोजकी घरे असतात. गृहिणी अधिक व्यस्त झाल्या आहेत. गोचरीचे नियमही अनेकांना माहीत नसतात. त्यातूनच मग साधु-साध्वींना गोचरीचे टइम-टेबल देणे, टिफिन पोहोचता करणे - अशा प्रथा सुरू होतात. त्या अनेकदा सोयीस्कर ठरतात. अनेक महिलांचे असेही मत पडले की साधु-साध्वींना योग्य असा साधा, प्रासक आहार एके ठिकाणी बनवून द्यावा. 'भिक्षाचर्या' च्या नियमात बसत नसल्याने असे करता येत नाही - या मताचा पुरस्कार इतरांनी केला. साधुंना भिक्षा देण्याचा विधी नवीन पिढीला माहीत होण्यासाठी गोचरीची आवश्यकता आहे - असेही मत काहींनी सांगितले 10) आपापली पीठे अथवा संस्था स्थापन करणे, त्यासाठी आवाहन करून पैसा उभा करणे, त्यातून सामाजिक, धार्मिक कामे करणे - अशी लाटही काही वर्षांमध्ये साधु-साध्वींमध्ये पसरत आहे. काही श्रोत्यांनी या स्वांना, 'संन्यासधर्माला अयोग्य असा परिग्रह असे नाव दिले. काहींनी त्या निधीतून शाळा-कॉलेज, हॉस्पिटलस, अनाथालये, अंध-पंगु-आश्रम, ग्रंथालये इ. उभे रहात असल्यास, ती नव्या काळाची गरज मानून पाठिंबा दिला. त्यातूनच साधुधर्माचे ध्येय 'आत्मकल्याण' की 'समाजसेवा' असा प्रश्न उपस्थित झाला. 'साधूंनी धार्मिक व आध्यात्मिक प्रांतात कार्य करावे, समाजोन्नतीचा विषय समाजसेवकांवर सोपवावा - असाही एक विचार पुढे आला. 'एक घरसंसार सोडून या मोठ्या प्रपंचाची उलाढाल कशासाठी करायची ? हा प्रश्नही विचारला गेला. 'दीन-दु:खी व गरजूंची सेवा हा काय जैन-धर्म-पालनाचा एक मार्ग नाही का ? असा प्रतिवाद केला गेला. त्यानंतर चर्चा पुढच्या मुद्याकडे वळली. 11) काही महिलांनी त्यांच्या मनातील शल्ये मोकळेपणाने बोलून दाखविली. * आपले नेतृत्वगुण जरा उाखविले की साधु-साध्वी आग्रह करून अशा काही अवघड जबाबदाऱ्या अंगावर टाकतात की ते 'अवघड जागेचं दुखणं' बनते. मग त्यांना टाळण्याकडे कल होऊ लागतो. * अनेकांची अपेक्षा असते कीआपण त्यांचा जेथे जेथे चातुर्मास असेल तेथे तेथे जाऊन त्यांच्या संपर्कात रहावेहे तर अशक्यच असते. * प्राकृत भाषा किंवा काही तत्वज्ञानविषयक शंका घेऊन आपण गेलो तर त्याविषयी चर्चा करायला पुरेसा वेळ तेदेऊ शकत नाहीत. त्यावेळी जनसंपर्क खूपच असतो.
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________ * तरुण मुलामुलींना अगदी गळ घालून, खेचून नेले तर त्यांची वेषभूषा, केशभूषा, धार्मिक पाठांतराचा अभाव याब टीका टिप्पणी केल्याने मुलांची मने दुखावतात. खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडण्याच्या शपथा घेणेही मुलांन रुचत नाही. प्रवचनांना यायला तर युवक-युवती नाराजच असतात. त्यांच्या कथा-कहाण्या बोअर होतात, नवीन ठोस मुद्दे कोणतेच नसतात' असा मुद्दाही मुले उपस्थित करतात. * पति-पत्नी दोघेही खूप उत्साहाने रोज सामील झाले तर घरातील वडीलधारे व मुलेबाळे यांची खूप आबाळ होते 'गृहिणीधर्म' सोडून मी असे वागू का ? - असा प्रश्न सतावतो. * साधु-साध्वींनी B.A.; M.A. किंवा Ph.D. होण्यास आमची काय हरकत असणार ? परंतु परीक्षेचा फॉर्म भरणे, नोट्स् मिळवून देणे, परीक्षेची तयारी करून घेणे इ. साठी ते एकाच गोष्टीसाठी 3-4 जणांना गळ घालतात. त्यांनासतत अनेक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी खूप तारांबळ उडते. * 'गणपती उत्सवाचे कार्यक्रम' आणि 'पर्युषणाचे कार्यक्रम यात जवळजवळ काहीच फरक उरलेला नाही. मग 'आमच्या घराशेजारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही का अटेंड करू नये ? - हा प्रश्नही विचारला गेला. धार्मिक उद्दिष्टांशी संबंधित असलेले निव्वळ मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवू नयेत - असे एकमताने श्रोत्यांनी सांग्मिले. * इतक्या प्रकारची प्रवचनांची पुस्तके, सी.डी., डी.व्ही.डी., स्वत:चे फोटो छापलेल्या वह्या-पेन्स यासंबंधीभनेकांनी नाराजी व्यक्त केली. धार्मिक पुस्तकांच्या लाखोंनी प्रती काढून, जाणत्या-नेणत्यांना सरसकट वाटण्याने श्सत्रग्रंथांची 'आशातना' च होते असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले. __ 'आणखी वीस वर्षांनी चातुर्मासाचे स्वरूप कसे असेल ? या प्रश्नावर, 'आत्ता ज्या प्रकारे चालला आहे तसा नक्कीच नसेल' असे सर्वसंमत उत्तर मिहाले. त्याच्या खोलात शिरल्यावर पुढील विचार नोंदविले गेले. * श्रावक जसे बदललेले, नवीन विचारांचे असतील तसेच साधूही नवीन विचारांचे असतील. * प्रवचन अगदी 1 तासाचे - ज्ञानवर्धक व माहिती देणारे असेल. त्यानंतर सर्वजण आपापल्या उद्योगाला जातील. * चार महिन्यांच्या जागी एकत्रित पर्वविधी फक्त आठ दिवसांचा असेल. * खाण्यापिण्याचे कडक नियम नवी पिढी बहधा आठ दिवस पाळेल. * हार-तुरे, सत्कार-गौरव व रटाळ भाषणे यांना फाटा मिळेल. * श्वेतांबर-दिगंबर-स्थानकवासी५तेरा पंथी हे भेद बरेच कमी झालेले असतील. जैन' एकतेची भावना वाढेल. * नवी पिढी अधिक सत्यप्रिय, निर्णयक्षम व अवडंबर-रहित आहे. शाकाहार, सचोटी, धर्मप्रेम व कुटुंबप्रेम हे क्यम राखून ती पिढी चातुर्मासाला नवेच रूप प्राप्त करून देईल - या असीम आशावादी विचारांनी चर्चासत्राचा शेवट झाला.
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________ 16. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे स्थान (दशलक्षणपर्वानिमित्त विशेष व्याख्यान, कोपरगाव, सप्टेंबर 2008) गेली 50 वर्षे संपूर्ण जगात आणि गेली 10 वर्षे भारतात, स्त्रीमुक्तीच्या चळवळीने फारच जोर धरलेला दिसतो. गेल्या काही दशकात विचारवंतांनी या विषयावर इतके काही लिखाण केले आहे की, स्त्रीमुक्तीसंबंधीच्या साहियाचे एक स्वतंत्र ग्रंथालय होऊ शकते. पुण्यासारख्या शहरात अशी स्वतंत्र ग्रंथालये आहेत. अलिकडे समाजातील प्रत्येक घटक कधी नव्हे एवढा जागृत झाला आहे, अशा परिस्थितीत महिला सुद्धा आपापल्या संघटना मजबूत करू लागल्या आहेत. मुंबईत-महागाई प्रतिकार समिती, भारतीय महिला फेडरेशन, पुण्यात-समाजवादी महिला सभा, महिला संपर्क समिती, नारी समता मंच, दिल्लीत-महिला सभा, महिला दक्षता समिती, जनवादी महिला सभा, इंडियन कौन्सिल फॉर फॅमिली वेल्फेअर, तसेच विविध छोट्या मोठ्या राज्यात ग्रामीण पातळीवरही महिला संस्था कार्यरत आहेत. आपल्या परीने या संस्था हुंडा-बेकारी-बलात्कार इत्यादि अनेक अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत आहेत. समाजातील पुरुषप्रधानता हे काही केवळ भारतीयांचे वैशिष्ट्य नाही. इतिहासात डोकावले तर एखादा अपवाद वगळता, संपूर्ण जगभरातच अशी पुरुषप्रधानता दिसते. स्त्रीमुक्तीचा लढा पुरुषांच्या विरुद्ध उभारलेले बंड आहे का ? पुरुषांपासून मुक्ती मिळविण्याच्या नादात भरकटलेले, एकाकी जीवन आपण जगू इच्छितो का ? सर्व देशांच्या बहासात असे दिसते की, स्त्री-जागृतीच्या कार्याला आरंभ पुरुषांच्या पुढाकाराने झाला आहे. गुलामगिरीविरुद्धचा लढा गुलाम नसलेल्यांनीच आरंभिला. कामगार लढ्याबाबतही हेच झाले. स्त्रीमुक्ती ही पुरुषांपासून पळ काढण्यासाठी नसून त्यांच्या सहकार्याने व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याची एक संथगतीची क्रिया आहे. असे सतत जाणवते. स्त्रीमुक्तीच्या चळवळीला योग्य ते अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी भारताच्या गत इतिहासात स्त्रीचे कोणते स्थान होते ते प्रथम पाहू. वैदिक व बौद्ध परंपरेतील स्थान संक्षेपाने पाहू व त्यानंतर जैन धर्मग्रंथांत विशेषत: 11 आग्रंथांत प्रतिबिंबित झालेले स्थान पाहू. वैदिक धर्मात स्त्री : वेदकाळात आरंभी, धर्माचे स्वरूप कर्मकांडात्मक व गुंतागुंतीचे नव्हते. वैदिक सूक्ते रचणे, उपनयन, यज्ञ अश प्रसंगी स्त्रियांचा बरोबरीचा सहभाग असावा असे दिसते. काही मोजक्या उल्लेखांवरून स्त्रियांच्या उच्चस्थानाविषयी निर्विवाद विधाने करणे शक्य नाही. वेद व ब्राह्मणकाळात संन्यासाची व मोक्षाची चर्चा आढळत नाही. उपनिषदात आत्मविद्येची चर्चा येते. परंतु स्त्रियांच्या संदर्भात मोक्षाची चर्चा आढळत नाही. स्त्रियांच्या धार्मिक व सामाजिक स्थानात यानंतर झपाट्याने व्हास सुरू झालेला दिसतो. बहुपत्नीत्वाची चाल, स्त्रियांचे विवाहाचे वय घटणे, उपनयन इ. संस्कारांचा व मंत्रोच्चारणाचा हळूहळू नष्ट झालेला हक्क या सर्वांचा परिणाम म्हणून, इ.स.पू.५०० च्या सुमारस धर्माची द्वारे स्त्रियांसाठी बंद झाल्याचे आपणास दिसते. विविध स्मृतींमध्ये याचे पडसाद उमटलेले दिसतात. जैन व बौद्ध धर्माचा झपाट्याने प्रसार होऊ लागल्यावर व इतरही काही सामाजिक कारणांनी विविध पौराणिक पंथ व भक्मिार्गाचा उदय होऊ लागला. या व्रत-उपासना-भक्तीवर आधारित धर्मात आता हिंदू स्त्रीला पुन्हा स्थान प्राप्त होऊ लागले. स्त्रियांचा संन्यास व स्त्रियांना मोक्षप्राप्ती या संकल्पना हिंदू धर्माने संपूर्णपणे दुर्लक्षिलेल्या दिसतात. आताची धर्मिक हिंदू स्त्री रामायण-महाभारत व पुराणे वाचते, विशिष्ट व्रतवैकल्ये करते, पूजा, नैवेद्य इ. करून विविध सण-वासाजरे करते. गीता, अथर्वशीर्ष, रामरक्षा इ. म्हणते व राम, कृष्ण, शंकर, गणपती अशा अनेकविध देवतांची उपासना करते आजही तिच्या मनात निवृत्ती, संन्यासधर्माचा स्वीकार अथवा मोक्षप्राप्ती हे विचारही येत नाहीत.
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________ बौद्ध धर्मात स्त्री : महावीरांच्या जवळ जवळ समकालीन असलेले गौतमबुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. आत्यंतिक कर्मकांड अथवा आत्यंतिक वैराग्य याच्या मधला मार्ग म्हणून ते स्वत:च्या धर्माला 'मध्यम-मार्ग' म्हणतात. 14 निदाने व 5 शील यावर आधारलेला हा ‘अष्टांगमार्ग' आहे. बौद्ध भिक्षुणींचा एकंदर आचार-विचार, नियम, भिडूंच्या तुलनेत स्थान, त्यांच्यातील वाद-विवाद, कलह या सर्वांचे दर्शन आपल्याला 'विनयपिटक' व 'जातककथा'तून होते. जैन संघाप्रमाणेच बौद्ध संघही भिक्षु-भिक्षुणी, उपासक-उपासिका असा चतुर्विध असतो. स्त्रियांना संघात प्रवेश देण्यास गौतमबुद्ध आरंभी फारसे उत्सुक नव्हते. भिक्षू आनंदा'ची कळकळीची विनंती व महाप्रजापति गौतमी'ची (गौतमुद्धांची सावत्र माता) एक प्रकारची धार्मिक चळवळ, यामुळे बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिलेला दिसतो. भिक्षुणींसाठी विनयपिटकात दिलेल्या 'अट्ठ-गुरु-धम्म' या नियमातून गौतमबुद्धांचा स्त्रियांकडे बघण्याचा सहानुभूतिशून्य व उपेक्षा करणारा दृष्टिकोण दिसतो, असे निरीक्षण बौद्ध धर्माच्या अभ्यासक श्रीमती दुर्गा भागवत यांनी नोंदविले आहे. बद्ध दीक्षाविधी जैन दीक्षाविधींपेक्षा साधेपणाने झालेले दिसतात. बुद्धांच्या मते स्त्रिया अरहंतपद प्राप्त करू शकतात परंतु 'बुद्ध' होऊ शकत नाहीत. बौद्ध धर्मग्रंथात उपासिकांना एक खास स्थान दिसते. बुद्धघोषाच्या मते बुद्ध, धम्म व संघाला जो शरण गेला, तो उपासक होय. गौतमबुद्ध स्वतः उपासिकांशी चर्चा करून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यास मदत करीत. सुजाता, विसाखा, खुज्जुत्तरा, सुप्पवाता, कातियानी या स्त्रियांचा स्वत: गौतमबुद्ध ‘आदर्श उपासिका' મસા ગૌરવ છતાત. વૌદ્ધ મારામાતુન રુપાસિઋવિષયી વરીવ માહિતી મિઝતે. અર્ધમાગધી ગ્રંથાંત ત્યા માનાને જૈન श्राविकांविषयी माहिती फारशी मिळत नाही. गौतमबुद्धांच्या आचारविषयक उदारमतवादी धोरणामुळे जैन धर्मापेक्षा बौद्धधर्माचा प्रसार सर्व जगभर आज झालेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धधर्म स्वीकारानंतर भारतात तरी त्या धर्माची धुरा दलित वर्गाकडे आहे, असे चित्र दिसते. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे कौटुंबिक स्थान : जैन धर्मग्रंथाच्या अभ्यासाने पुढील निरीक्षणे दिसून येतात. कन्या ही कुटुंबात मोठे स्नेहभाजन आहे. औपचरिक शिक्षण हा केंद्रबिंदू नसून थोड्याबहुत ललितकला व मुख्य म्हणजे विवाह हीच तिच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना आहे. मातापित्यांकडून तिला संस्कार, भरणपोषण व पित्याच्या इच्छेने विवाहातील प्रीतिदानाचे हक्क आहेत. स्थिाच्या संपत्तीत वारसा हक्क नाहीत. अविवाहित कन्या व अनेकदा विधवाही, पित्याकडेच राहतात. विवाहानंतर ती पतीच्या एकत्र कुटुंबाचा घटक बनते. सहपत्नी नसलेल्या कुटुंबात ती अधिक सुखी व स्वतंत्र आहे. खर्च ती पतीच्या अनुमतीनेच करते. समाजातील कष्टकरी वर्गातील स्त्रिया पतीबरोबर व्यवसायात सहभागी होतात. राजघराण्यातील व धनिक वर्गातील पत्नींना सपत्नींशी व्यवहार करावे लागतात. मोठमोठी अंत:पुरे ही मसर, द्वेष, कारस्थाने व राजकीय संबंधांनी युक्त दिसतात. संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य नसले तरी पूर्ण पारतंत्र्यही नाही,मर्यादित स्वातंत्र्य आहे. माहेरून आणलेल्या संपत्तीवर स्त्रीचा पूर्ण हक्क आहे. सासरच्या संपत्तीत वाटा नाही. पतीच्या मृथूनंतर जीवन संपूर्ण परावलंबी आहे. घरात विनयशील रहावे लागले तरी घंघट, पडदा हा घरात अगर समाजात घ्यावा लागत नाही. सण, उत्सव, जना, मेजवान्या, धर्मप्रवचन, दीक्षोत्सव, उद्यानयात्रा, प्रेक्षणक (नाटक) ही करमणुकीची साधने आहेत. एकपत्नी पद्धतीतील स्त्रियांचे कामजीवन बहुतांशी सुखासमाधानाचे आहे. अनैतिक संबंधाची कारणे बरीचशी बहुपत्नीत्वामुळे येणाऱ्या अतृप्त कामजीवनात आहेत. सर्व प्रकारच्या कुटुंबियांशी संबंध प्राय: चांगलेच आहेत. दीक्षेसाठी पती त्याच्या मातापित्यांची अनुमती घेतो, पत्नीची घेताना दिसत नाही. बहुतांशी कुटुंबात कष्टप्रक्कामासाठी नोकर, दास-दासी आहेत. पति-पत्नीत गैरसमज, कलह बरेचदा किरकोळ आहेत. संबंधविच्छेद, पुनर्विवाह, विधवाविवाह, सती या प्रथा अगदी नगण्य स्वरूपात आहेत. धार्मिक स्वातंत्र्य आहे. माता बनणे, बालकांचे संगोपन हे मोठे आनंदाचे विषय आहेत. पत्र अगर कन्या यापैकी कोणीही जन्मले तरी
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________ अपत्याचे स्वागत करतात. अपत्यप्राप्तीसाठी नवस करतात. दत्तकाची पद्धत तुरळक आढळते. डोहाळे कोणत्याही प्रकारचे असले तरी, पती व कुटुंबीय ते पुरविण्यात तत्पर आहेत. मातेचे संबंध पुत्राशी, तर पित्याचे कन्येशी,अधिक जवळकीचे आहेत. अपत्यांविषयीच्या जबाबदाऱ्या पति-पत्नी दोघे मिळून पार पाडतात. दास-दासी ठेवण्याची पद्धत आहे. धात्रींचा दर्जा बराच चांगला आहे. दास्यत्वातून क्वचितच सुटका होते. दासींची आर्थिक, सामाजिक, धार्मिक व कामजीवनविषयक स्थिती अत्यंत अनुकंपनीय आहे. भारताच्या प्राचीन इतिहासातील ते अंधकारमय पर्व आहे. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे सामाजिक स्थान : व्यक्ती कुटुंबात जन्मलेली असली तरी वावरत असते ती समाजात ! व्यक्तीच्या जडणघडणीत समाजाचा मोठाच वाटा असतो. कर्मपरिणाम व पुरुषार्थवादाला प्राधान्य देणाऱ्या जैन धर्मात, रूढीनुसार केलेल्या जन्मापसून मृत्युसंस्कारापर्यंतच्या संस्कारांना, खरे तर खास स्थान नाही. संस्कृत मंत्र व विविध विधानांनी भरलेले कर्मकहप्रधान संस्कार आगमांत दिसत नसले तरी, समाजाच्या रेट्याने या संस्कारांना पूर्णविराम मिळू शकलेला दिसत नाही. मग्न नियम-अपवादांनी भरलेले क्लिष्ट संस्कार काहीसे सुलभ झालेले दिसतात. आगमकालीन स्त्री खऱ्याखुऱ्या अर्थाने समृद्ध व कलात्मक आयुष्य जगते ती विविध सामाजिक उत्सवात भाग घेऊनच ! स्त्री-पुरुष, कुमार-कुमारी, बालक-बालिका या उत्सवप्रसंगी समाजात मोकळेपणाने वावरताना दिसतात. त्यातील काही उत्सव धार्मिक स्वरूपाचे तर काही निव्वळ आमोद-प्रमोदासाठी दिसून येतात. खाद्य-पेय, नृत्य-गीतनाटक, माल्य-पुष्पे यांची रेलचेल असलेल्या या उत्सवांमध्ये, समाजाच्या सर्व स्तरातील स्त्रिया सहभागी होताना दिसतात. 'संखडी' या आधुनिक काळातील 'फूड फेस्टिव्हल'सारख्या आहेत. फक्त तेथे अन्नाचा क्रयविक्रय होत नाही. रूढी, अंधविश्वास, अपसमज, शकुन-अपशकुन यांच्या जोखडातून, कोणताही समाज कोणत्याही काळी सुटू शकत नाही. आगमकालीन जैन समाज देखील वैदिक देवता व स्थानिक देवतांच्या पगड्याखालून सुटलेला दिसत नाही. डोहाळे, नवस, अपत्यप्राप्ती या संदर्भात स्त्रिया यक्ष, भूत, पिशाच, तंत्र-मंत्र, जादूटोणा यांना आश्रय देतान दिसतात. काम, वासना, विषय-भोग, स्त्रीपुरुष-आकर्षण यांचा विचार आगमांत वारंवार केलेला दिसतो. अर्थात् तो वर्जनाच्या, निषेधाच्या स्वरूपात व निंदेच्या सुरातच केलेला दिसतो. विविध गुन्ह्यांचा व विशेषत: अनैतिक संबंधया उगम, अनेक ठिकाणी स्त्रियांच्या अतृप्त कामजीवनात दिसतो. बहुपत्नीत्वपद्धतीमुळे अंतर्गत हेवेदावे, मत्सर व वधापर्यंतही मजल गेलेली दिसते. वेश्या व गणिका या प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या संस्था, आगमकाळी चांगल्याच स्थिरावलेल्या व प्रतिष्ठाप्राप्त दिसतात. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व समृद्ध, अद्वितीय सौंदर्याच्या सम्राज्ञी, विविध विद्या व कलांत प्रवीण व शृंगाररसाचे आगर असलेल्या कामध्वजा व आम्रपालीसारख्या गणिकांचे, जैन व बौद्ध आगमात वर्णिलेले स्थान, हे आगमकालीन सुदृढ कामजीवनाचे प्रतीक आहे. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे धार्मिक स्थान : जैन धर्मग्रंथांत, साध्वीधर्म स्वतंत्रपणे प्रतिपादन केलेला दिसत नाही. साधुधर्माच्या आधारेच तो समजून घ्यावा लागतो. साध्वींच्या दीक्षेची कारणे, दीक्षेस अनुमती, दीक्षामहोत्सव यांचा विचार विस्ताराने केलेला दिसतो. सांछ्या दीक्षाविधीइतक्याच गौरवपूर्ण रितीने साध्वींचे दीक्षाविधी झालेले दिसतात. आचारात साधू व साध्वी यांच्याबाबत जो फरक केलेला दिसतो, जे अपवाद केलेले दिसतात, ते साध्वींना गौण लेखण्यासाठी केलेले नसून, त्यांची सुचतिता व शीलरक्षण केले असावेत, असा तर्कसंगत निष्कर्ष काढावा लागतो. संघाचे सर्वोच्च पद देताना मात्र, पुन्हा एकदा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दिसून येतो. उपाध्यायिनी अगर स्त्री गणधर आपणास आगमकालीन जैन संघात आढळत नाहीत. साधुवंदनेबाबतही स्त्रियांचे स्थान गौण दिसते. साध्वींच्या संकटमय जीवनाचे चित्र आगमात दृष्टोत्पत्तीस यो.
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________ खडतर अशा सामाजिक, भौगोलिक, राजकीय परिस्थितीत साध्वींनी ज्या दृढश्रद्धेने आध्यात्मिक प्रगती साधली, त्यामुळे तर आगमकालीन स्त्रियांच्या उत्कृष्ट मनोबलाचे ऊर्जस्वल दर्शन घडून आले. ___ चतुर्विध संघाला दृढप्रतिष्ठ करण्यात ज्यांचा फार मोठा सहभाग आहे, अशा जैन श्राविकांचा अथवा उपासिकांचा विचार आपण यानंतर केला. श्वेतांबर जैन आगमांत श्रावकाचार' स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. आगमात उल्लेखित अशा श्राविकांचा विचार केल्यावर, गृहस्थाश्रमातील धार्मिक जीवनाचे एक प्रगल्भ चित्र आपल्यासमोर उभे राहते. पतीच्या सांगण्यानुसार श्राविका बनलेल्या, स्वतंत्रपणे धर्मोपदेश ऐकून श्रद्धावान बनलेल्या, स्वत:बरोबर कुटुंबियांनाही निष्ठ बनवणाऱ्या, पतीला श्रावकव्रतात स्थिर करणाऱ्या, स्वधर्मीय व इतर धर्मीयांशी मोकळी, तर्कसंगत चर्चा करणाऱ्या, साधर्मिकांचे स्वागत करणाऱ्या, साधुप्रायोग्य आहार-वसतिदान करणाऱ्या, तत्त्वांपासून विचलित न होणाऱ्या, अंतिम्स: संलेखनेने देहत्याग करणाऱ्या, मोक्षमार्गी झालेल्या, अशा स्त्रियांच्या धार्मिक जीवनाचा प्रत्यय आपणास आगमातून येतो. अपवादादाखल पतीला धार्मिकतेपासून परावृत्त करणाऱ्या, मद्यपी, क्रूर अशा रेवतीसारखे एखादे उदाहरणही क्वचित आढळते. साध्वी व उपासिका या दोन्ही रूपात आगमकालीन जैनधर्मी स्त्रीचे आदरणीय स्थान आपल्याला दिसून येते. जैन धर्मग्रंथांतील स्त्रियांचे सांस्कृतिक जीवन : भरभराटीस आलेली समृद्ध नगरे, त्यातील आखीव मार्गरचना, मालाने ओथंबून वाहणाऱ्या बाजारपेठा, अनेक मजली भव्य राजप्रासाद, धनिकांच्या हवेच्या रूपसंपन्न गणिकांचे वैभव, नंदा-पुष्करिणीसारखी आरामोद्याने, राण्यांची शयनगृहे, ग्रामांमधील हिरवीगार शेते, पशुशाळा, धान्य, वस्त्रे, उपभोगाच्या सामग्रीची रेलचेल, विविध क्रीडा, त्यनाट्य इत्यादि मनोरंजनाची साधने, ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात साजरे केलेले मनमोकळे सामाजिक उत्सव, अश त-हेच्या अनेक उच्च अभिरूचींनी नटलेल्या सांस्कृतिक जीवनाचा ठसा, आगमांच्या अभ्यासकाच्या अंत:करणावर, प्रथमदर्शनी उमटतो. सुखसाधनांची कोणतीही उणीव नसलेल्या राजपुत्र व राजकन्यांच्या दीक्षा, अनेक कारणांनी समाजातील विविध स्त्रियांनी अंगीकारलेला श्रावकधर्म व साध्वीधर्म, विविध धर्मोपदेशसभा, अंतकृद्दशेत स्त्रियांनी आचरलेली कठोर तपे, प्रौषधशाळा, जैन व जैनेतर पारिवाजिकांचे संवाद-वादविवाद, श्रद्धाळू श्राविकांनी साधुसाध्वींना दिलेले आहारदान, असे एक धर्मप्रवण जीवनाचे चित्रही त्याचवेळी डोळ्यासमोर उभारते. विविध रोग, दुष्काळ, रोगाच्या साथी, युद्धे, राजकीय कारस्थाने, अंत:पुरातील कलह, छोटे-छोटे व्यवसाय करणारी गीरब दांपत्ये, बलात्कार, अपहरण, अनैतिक संबंध असे अनेक गुन्हे व सामाजिक अपप्रवृत्ती, भूत-प्रेत-विभूती, मंत्र-तंत्र, नवससायास, यक्षावेश याच्या मागे लागलेल्या अंधश्रद्धाळू व्यक्ती व विशेषत: स्त्रिया, राजगृहात, धनिकांकडे व सामान्यजनांच्या घरात अन्न-वस्त्रापायी आयुष्याच्या आयुष्य खाली मान घालून काम करीत राहणाऱ्या दासी, धात्री, दासचेटी, कर्मकरी, दासीपुत्र व त्यांचे कलह, थट्टामस्करी असे निम्न स्तरातील व्यक्तींचे संपूर्ण वेगळेच विश्व आमात दिसून येते. या तीन प्रकारच्या धाग्यांना बेमालूम सरमिसळ करून करून एकत्र विणून तयार होते ते आगमकालीन संस्कृतीचे वस्त्र ! जैन धर्मग्रंथांतील स्त्रियांचा संदेश : आर्या चंदना, तीर्थंकर मल्ली, साध्वी राजमती, श्राविका जयंती, आदर्श गृहिणी रोहिणी या स्त्रिया, सर्व स्त्रीजातीला व आधुनिक स्त्रीमुक्ती चळवळीच्या धुरीणींना असा उर्जस्वल संदेश देत आहेत की - ‘उच्च दर्जा व स्थान मिळविण्यासीठ आपण स्वत: झगडले पाहिजे. आपली सर्व सामर्थ्य पणाला लावून व ज्ञानाची कास धरून कर्तृत्व केले पाहिजे. द्वेष, असूया करून अगर हक्कांची भीक मागून कोणतेच स्थान मिळत नाही. कर्तृत्वसंपन्न स्त्रीकडे श्रेष्ठ स्थान आपोआप चालत येते. भारतीय संस्कृतीत हे स्थान मिळवायचे असेल तर कर्तृत्वसंपन्नतेला शुद्ध आचरण व आत्मोन्नतीच्या तळमळीची जोड असणेही आवश्यक आहे. अन्यथा हजारो वर्षे लोटल्यावरही आगमकालातील तेजस्विनींचे हे स्थान
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________ अक्षुण्ण राहिलेच नसते !!!' **********
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________ जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख) भाग - 4 * लेखन व संपादन * डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ ऑगस्ट 2011
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________ 17. जैन धर्मातील वैज्ञानिकता (दशलक्षणपर्वानिमित्त विशेष व्याख्यान, बारामती, ऑगस्ट 2009) प्रस्तावना : जैन धर्मातील वैज्ञानिकता या विषयावर बोलण्याचा अधिकार वस्तुत: एखाद्या वैज्ञानिकाचा अथवा शास्त्रज्ञाचाच आहे. भाषा, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास असलेल्या माझ्यासारख्या सामान्य अभ्यासकाला हा अधिक पोहोचत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तथापि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक संशोधक हे जैन धर्मतत्त्वांची माहिती असणारे मिळणे हे दुरापास्त आहे. याउलट धर्माच्या अभ्यासकाला वैज्ञानिक संशोधन पद्धती आणि वैज्ञानिक सूत्रे अचूक सांगता येणे फार अवघड आहे. तरीही संयोजकांनी दाखविलेल्या विश्वासाला मान देऊन जैन धर्मातील वैज्ञानिकता शोधण्याचा व त्याचे मूल्यमापन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. वैज्ञानिक असल्याचा दावा : केवळ जैन परंपराच नव्हे तर वैदिक अथवा हिंदू परंपरा सुद्धा वेद, उपनिषदे, दर्शने, रामायण, महाभारत यांमध्ये अतिप्रगत वैज्ञानिकता आढळते असा दावा करते. त्यांच्या मते प्रगत अस्त्रे, शस्त्रे, विमानतळ, पुष्पक विमानासारखी विमाने, सागरी सेतू बांधण्याचे प्रगत तंत्रज्ञान, भूगोल, ज्योतिष, वास्तू यासंबंधीचे सर्व प्रगत ज्ञान आमच्या प्राचीन ऋषिमुनींना होतेच. संस्कृतमध्ये असलेल्या विविध शास्त्रविषयक ग्रंथसंपत्तीवर नजर टाकली असता असे दिसते की एकेकाळी आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीत अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिष, खगोल, गणित, नाट्यशास्त्र, आयुर्वेद, योग या विषयांवर आधारित प्रमाणित ग्रंथांचा समावेश झालेला होता. या सर्व बाबतीत आपण एकेकाळी प्रगत होतो. परंतु मध्ययुगानंतर सामाजिक विषमता, परकीय आक्रमणे, युद्धे, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांनी ही शिक्षणपद्धती लोप पावत गेली. आज आता विविध शास्त्रे व कला यांची जी शिक्षणपद्धती आहे, ती सर्वस्वी पाश्चात्य शिक्षण-पद्धतीवरच बेतलेली आहे. आपण ज्या ज्या सुखसुविधा व उपकरणे वापरतो ती जवळजवळ सर्वच प्रथमत: विदेशी शास्त्रज्ञांनी बनविलेली आहेत. अशा परिस्थितीत आपला वैज्ञानिकतेचा दावा पुन्हा एकदा तपासून पाहाण्याची वेळ आली आहे. जी गोष्ट हिंदूंबाबत तीच गोष्ट जैनांच्य बाबतही खरी आहे. निर्विवादपणे वैज्ञानिक असलेली जैन जीवनशैली : काही मुद्दे मानवी आरोग्य उत्तम राखण्यासाठी जैन जीवनशैलीतील काही मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत. आज जगातील 90% लोक मांसाहारी असले तरी शाकाहाराचे महत्त्व सर्वांनाच हळूहळू पटू लागले आहे. बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू आणि इतरही अनेक संसर्गजन्य रोग मांसाहारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातूनच मानवांपर्यंत पोहनेत आहेत. प्राण्यांची कृत्रिम पैदास करण्यामुळे तयार झालेल्या नव्या प्रजाती, निसर्गातील प्राण्यांसारख्या रोगप्रतिकारक्षमा नसतात. त्यामुळेच गायी-गुरे-मेंढ्या-कोंबड्या-डुक्करे इ. मध्ये नवनवीन रोग पसरतात. त्यानंतर संसर्गाने ते मानवापर्यंत पोहोचतात. संपूर्ण शाकाहारी भोजनशैली स्वीकारल्यास हे सर्व टळू शकते. ___अर्थात् शाकाहारासंबंधी सुद्धा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. धान्याच्या विविध प्रकारांच्या संकरित जाती आणि भरपूर धान्य उत्पादनासाठी वापरण्यात येणारी हानिकारक रासायनिक खते यामुळे शाकाहार सुद्धा अनेक प्रकारे प्रदूषित झाला आहे. म्हणून आरोग्याची जाणीव असलेले शाकाहारी, नैसर्गिक खतांवर पोसलेले धान्य व भाजीपाल्याची निवड करू लागलेले आहेत. रात्रिभोजनत्याग अर्थात् सूर्यास्तापूर्वी भोजन घेणे, आरोग्यविज्ञानाशी संपूर्णतः सुसंगत आहे. तरीही आपल्या व्यस्त शहरी जीवनशैलीत हे तत्त्व प्रत्यक्ष व्यवहारात पाळणे शक्य होत नाही. जी व्यक्ती रात्रीचे भोजन आणि
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________ झोप यांमध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर ठेवते ती व्यक्ती रात्रिभोजनत्याग व्रताचे अंशत: तरी पालन करते असे म्हणावे लागेल. गरम करून गार केलेले व गाळलेले पाणी पिणे व पावसाळ्याच्या चार महिन्यात कटाक्षाने ऊनोदरी, उपवास इ. करणे हे आरोग्याला फायदेशीर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वैज्ञानिक पद्धती : विज्ञानात सर्वात महत्त्वाचे असते ते निरीक्षण. अनेक निरीक्षणे नोंदवून त्या प्रयोगांच्या आधारे सर्व परिस्थितीत लागू पडेल असा सर्वसामान्य सिद्धान्त शोधून काढला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितींना अॅप्लाय केला जाता तो सिद्धान्त जीवनोपयोगी असेल तर त्याच्या आधारे विविध उपकरणेही तयार केली जातात. विजेचा मूलगामी शोध लागल्यावर अशीच विविध उपकरणे तयार झाली. भौतिकशास्त्रात जसे संशोधन होते तसेच संशोधन समाजविज्ञान व मानसशास्त्रातही होत असते. जैन शास्त्राने आरंभापासूनच उद्घोषिलेला अहिंसातत्त्वाचा सिद्धान्त महात्मा गांधींनी अशाच प्रकारे समाजविज्ञान व मानसशास्त्रात अॅप्लाय केला. महात्मा गांधींचा जैन धर्माशी असलेला निकटचा संबंध आणि अभ्यास सुपरिचित आहेच. त्यांचे ‘सत्याचे प्रयोग' सुद्धा असेच प्रसिद्ध आहेत. अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग धरून त्यांनी संपूर्ण भारतीय मनांवर त्यांचा पगडा बसविला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या तत्त्वांचा समयोचित वापर केला. कवी म्हणतो - दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल / / अनेकान्तवाद आणि सापेक्षतावाद : जर्मन संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन हा सापेक्षतावादाचा जनक आहे, हे सर्वविश्रुत आहे. जैन शास्त्रात सांगितलेल्या अनेकान्तवाद' या शब्दाचे इंग्रजी भाषांतर सुद्धा Theory of Relativity of Truth असे केले जाते. जैन परंपरेविषयी आईनस्टाईनने काढलेले गौरवोद्गारही सुप्रसिद्ध आहेत. परंतु “जैनांचा अनेकान्तवाद त्यालसापेक्षतावाद शोधून काढण्याच्या आधी माहीत होता की नंतर", याविषयी खुलासा आतापर्यंत झालेला नाही. ह्या सिद्धान्ताचे रूपांतर त्याने E=mc या सूत्रात केले. (यातील E= Energy, m-mass आणि c=velocity) हे सूत्र शोधून काढल्यावर त्याच्या आधारे पुढील वैज्ञानिक संशोधनास चालना मिळाली. दुर्दैवाने हे नमूद करावेसे वाटते की अनेकान्तवदाचा जैन सिद्धान्त मात्र विचारापुरताच मर्यादित राहिला. म्हणजे वैज्ञानिक उपकरणे बनविण्यासाठी तो वापरणे तर दूरच पण सांप्रदायिक भेद मिटविण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला गेला नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम : ___विश्वात असलेली विशिष्ट नियमितता कोणत्या नियमानुसार आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न न्यूटन या शास्त्रज्ञाने केला. त्याने गती, क्रिया, प्रतिक्रिया, गुरुत्वाकर्षण इ. अनेक विषयांसंबंधीची महत्त्वाची सूत्रे शोधली. भूगोल व खगोलविषयक अनेक रहस्ये त्याने उलगडली. न्यूटनपूर्वी सुमारे 2500 वर्षापासून प्रचलित असलेल्या जैन परंपरेत आपल्या दृश्य विश्वाची उपपत्ती लावून सहा द्रव्यांमध्ये त्याची विभागणी केलेली दिसते. जगातील कोणत्याही धर्माने न सांगितलेली दोन तत्त्वे या सहा द्रव्यात समाविष्ट आहेत. ती तत्त्वे म्हणजे गतिशील पदार्थांना गतिशील ठेवणारे 'धर्म' तत्त्व आणि स्थितिशील पदार्थांना स्थितिशील ठेवणारे 'अधर्म तत्त्व'. अवकाशस्थ सर्व ग्रहगोलांना गतिशील ठेवूनही विशिष्ट नियंत्रणात राखणारी ही दोन द्रव्ये आहेत. दुर्दैव असे की ती धार्मिक ग्रंथांतच मयादित राहिली. स्मरणशक्ती व पाठांतराने ती पुढील पिढ्यांना पोहोचवली. बहुधा 'धर्म' व 'अधर्म' या शब्दांनी संभ्रमवस्था निर्माण केली असावी. ती तत्त्वे वैज्ञानिक नसून बहुधा नैतिक मानली गेली असावी. त्यातील पारिभाषिकता विसरली.
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________ कोणाही भारतीयाने ती वैज्ञानिक अंगाने विकसित केली नाहीत, परिणामी गुरुत्वाकर्षणाच्या शोधाशी न्यूटनचेचनाव निगडित राहिले. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जेव्हा सामान्य माणसांसाठी लिखाण करतात तेव्हा ते पाजञ्जलयोग आणि गीता वारंवार उद्धृत करतात. नोबेलप्राईझ विनर अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन जेव्हा नवा अर्थविषयक सिद्धान्त शोधतात तेव्हा चार्वाकांच्या मताचा विशेषत्वाने विचार करतात. 'पाणी' या विषयावर सध्या जगभरात सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेस् चालू आहेत. अपेक्षा अशी आहे की अपकायाविषयीचा मूलगामी आणि सूक्ष्म विचार करणाऱ्या जैन ग्रंथांचा पार्श्वभूमी म्हणून तरी निदान संदर्भ दिला जावा. याचाच अर्थ असा की जैन धर्मातील मूलगामी आणि सूक्ष्म विचार, जैन धर्माच्या अभ्यासकांनी विविध विज्ञानशाखांमध्ये संशोधन करणाऱ्या प्रगत संशोधकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत अन्वयार्थ उलगडून सांगण्यासाठी तरी त्यांच्यापुढे जायला हवेत. आपण जर आपल्या मुलांना जैन धर्मातील धारणा समजावून सांगितल्या तर आजची जैन युवा पिढी त्यांच्या संपर्कात असलेल्या संशोधक युवा पिढीपर्यंत त्या धारणा पोहोचवत राहील. सौरऊर्जा : सोलर हीटर व सोलर कुकर ही दोन साधने पूर्णत: सौरऊर्जेवर चालतात. वर्षातील जवळजवळ दहा ते अकरा महिने ती आपण वापरू शकतो. सूर्याची वाया जाणारी उष्णता त्यात वापरली जाते. ही साधने वापरणे हे पूर्णतः अहिंसेचेच पालन आहे. शिवाय विजेची बचत होतेच. जे जे अनुदिष्ट आहे त्याचा वापर करण्याच्या जैन तत्त्वाचेही पालन होते. प्रत्येक जैन घरात निरपवादपणे दिसलीच पाहिजे अशी ही उपकरणे आहेत. विशेष नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की, कुमारपालप्रतिबोध नावाच्या जैन ग्रंथात 'सूर्यपाकरसवती' अर्थात् सूर्याच्या उष्णतेवर बनविलेल्या चवदार स्वयंपाककलेचा उल्लेख येतो. उत्सर्ग समिति आणि कचरा : जैन शास्त्रानुसार समिति पाच आहेत. ईर्या, भाषा, एषणा, आदाननिक्षेप आणि उत्सर्ग अशी त्यांची नावे आहेत. प्रासुक स्थंडिल भूमीवर मलमूत्र विसर्जन करणे, हे शहरी जीवनशैलीशी सुसंगत नाही. परंतु कचरा बाहेर फेकणे हाही उत्सर्गच होय. घरातील रोजचा ओला कचरा वापरून उत्तम फुलबाग फुलते. बागकामात कराव्या लागणाऱ्या हिंसेचा विचार येथे न केलेला बरा. कारण ओला कचरा उघड्यावाघड्यावर सडून कुजून लाखो बॅटरया निर्माण करतो. त्यापेक्षा ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्याचे तंत्र शिकून घेणे केव्हाही फायदेशीर आहे. यामुळे ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणरक्षण आणि उत्सर्गसमितीचे पालन होऊन घरच्याघरी शुद्ध भाजीपालाही मिळेल. एकेंद्रियविषयक मान्यता : ___ जैन शास्त्रानुसार पृथ्वी, अप, तेज, वायु व वनस्पति हे एकेंद्रिय आहेत. जैन शास्त्रानुसार या सर्वांना एकच स्पर्शनेंद्रिय आहे. जैन शास्त्रात ही मान्यता कशी आली असेल ? सर्व सजीव जगण्याकरता एकेंद्रियांचा वापर करतात. सजीव हे सजीवांवरच जगू शकतात. निर्जीव वस्तू खाऊन जगू शकत नाहीत. द्वींद्रिय इ. जीव आणि हे चार एकेंद्रिय जीव पृथ्वी, अप् इ. एकेंद्रियांचा आहार करतात. त्याअर्थी हेही जिवंत असले पाहिजे. द्विन्द्रियांपेक्षा ते अप्रगत आहेत. म्हणून त्यांना एकेन्द्रिय मानले आहे. माती, पाणी, वायु इ. वैज्ञानिकांना सजीव वाटते की नाही, हा खरा प्रश्न आहे. माती व पाण्याच्या सूक्ष्म कणाच्या अथवा थेंबाच्या आधारे लाखो सूक्ष्म बॅक्टेरिया जगत असतात असे वैज्ञानिक म्हणतात. परंतु खुद्द माती अथवा पाणी सजीव असल्याचा निर्वाळा आतापर्यंत दिला जात नव्हता. दि. 1.9.2009 च्या दैनिक सकाळमध्ये डॉ. कर्वे यांच्या आलेल्या लेखानुसार, 'सूक्ष्म जीव हे दगड, माती
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________ खातात'. याचा अर्थ असा की, 'सजीव सजीवांचाच आहार करतात' या निष्कर्षाशी हा जुळतो. मातीबाबतचे हे तथ्य कदाचित इतरही एकेंद्रियांना लागू पडेल. डॉ. कर्वे यांना वरील संशोधनापूर्वी एकेंद्रियविषयक जैन मान्यता माहीत असणे बहुधा संभवत नाही. जैन शास्त्रातील जीवविषयक सिद्धान्त जीवशास्त्राच्या अभ्यासकापर्यंत पोहोचले तर कदाचित जीववैज्ञानिकांना नवीन दिशा प्राप्त होईल. वनस्पतिविषयक विचार : डॉ. जगदीशचन्द्र बसू यांनी केलेले वनस्पतिविषयक संशोधन सुप्रसिद्ध आहे. त्यांनी वनस्पतींचे सजीवत्व आणि त्यांना असणाऱ्या भावभावना पद्धतशीर प्रयोगांनी सिद्ध करून दाखविल्या. अर्धमागधी ग्रंथ आचारांग (श्रुतस्कंध 1) यामध्ये वनस्पती आणि माणूस यांची तुलना भ. महावीरांनी प्रस्तुत केली आहे. त्यातील वनस्पतिविषयक निरीक्षणे डॉ. बसूंच्या निरीक्षणाशी प्राय: जुळतात. ___‘महावीरवाणी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक अर्धमागधी ग्रंथांत तसेच दिगंबरीय ग्रंथांत, सृष्टीविषयक विविध निरीक्षणे बारकाईने नोंदविलेली दिसतात. त्यांनी काढलेले निष्कर्ष हे प्रत्यक्ष निरीक्षण व त्याविषयीचे चिंतन यावर आधारलेले होते असे न मानता, जैन परंपरेने अशा महापुरुषांच्या निरीक्षणाला व चिंतनाला त्यांच्या सर्वज्ञत्क्मे आविष्कार' मानले आहे. નૈન ગ્રંથાંત સર્વ વનસ્પતીના નપુંસઋત્રિી માનન્ને બહેત. બાન અને દ્વિતે જી સપુષ્પ વનસ્પતીંમધ્યે નર વ માવી अशा वेगवेगळ्या वनस्पती असतात. शिवाय प्राय: सर्व फुलांमध्ये स्त्रीकेसर व पुंकेसरही असतात. सर्व वनस्पतींच्या नपुंसकलिंगत्वाचा नव्याने शोध घेण्याची जरुरी आहे. जैन अभ्यासकांनी नपुंसकलिंगत्वा'चा अर्थ नव्याने समजावून घेण्याची जरूरी आहे. पपईसारख्या झाडांमध्ये नर आणि मादी असा भेद असतो हे सामान्य माणूसही जाणतो. मग हे तथ्य आगमांमधील निरीक्षकांच्या कक्षेतून सुटले असेल असे मानणे योग्य ठरत नाही. म्हणून नपुंसकलिंग' या शब्दाची चिकित्सा व्हायला हवी. जैन मान्यतेनुसार वनस्पतीचा मूल जीव एक आहे आणि त्याच्या विभिन्न अवयवांमध्ये अलग अलग विभिन्न असंख्यात जीव असतात. वनस्पतिशास्त्रानुसार, वनस्पती केवळ विभिन्न अवयवांच्या पेशींचा एकदुसऱ्याशी जोडलेला संघात आहे'. विज्ञानाने, पूर्ण वनस्पतीत व्याप्त एका जीवाला मान्यता दिलेली नाही. वृक्षाच्या कोणत्याही अवयवाच्या पेशीचा डी.एन्.ए. पाहून आपण त्या वृक्षाची जात ओळखू शकतो. पेशींचे अलग अलग अस्तित्व असूनही त्यात जे साम्य आहे, ते लक्षात घेऊन, जैन ग्रंथांमध्ये एक मूल जीव' आणि 'बाकी असंख्यात जीवांची' कल्पना सांगितली असावी. वैज्ञानिक मान्यतेनुसार वनस्पतींना विविध इंद्रिये नाहीत. प्राय: सर्व इंद्रियांची कार्ये त्या त्वचेमार्फत करतात. म्हणूनच जैन शास्त्राने वनस्पतींना त्वचा अथवा स्पर्शनेंद्रिय हे एकच इंद्रिय मानले असावे. वैदिक परंपरेत उत्तरकाळात आयुर्वेदशास्त्र खूप प्रगत झाले. जैन परंपरेतही अगदी प्रारंभकाळात आयुर्वेदविषयक ग्रंथ असावेत असे उल्लेख काही ग्रंथांत दिसतात. परंतु हिरव्यागार वनस्पतिसृष्टीचा मानवाच्या रोगनिवारणासाठी वापर करून घेणे हे बहुधा अहिंसातत्वाच्या विरुद्ध वाटले असावे. म्हणून सजीव वनस्पतींची मुळे, साली, पाने, फळे इ. यापासून काढे, लेप, चूर्ण इ. तयार केले गेले नाहीत. औषधयोजना करताना प्रासुकतेकडे लक्ष दिले गेले. जीवांची इंद्रियांनुसार विभागणी : जैन मान्यतेनुसार पृथ्वी ते वनस्पती या जीवांना एकच इंद्रिय आहे (स्पर्शन). कृमि, जळू आणि अळ्या यांना दोन इंद्रिये आहेत (स्पर्शन + रसन). मुंगी, ढेकूण इ. हे त्रींद्रिय आहेत (स्पर्शन + रसन + घ्राण). भुंगा, माशी, विंचू आणि डास इ. ना चार इंद्रिये आहेत (स्पर्शन + रसन + घ्राण + नेत्र). मनुष्य, पशु, पक्षी इ. ना पाच इंद्रिये आहेत. जैन मान्यतेनुसार सर्प हा पंचेंद्रिय आहे. आजचे सर्पतज्ज्ञ स्पष्ट सांगतात की सापाला श्रोनेंद्रिय' नाही.
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________ याविषयी एका जैन डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार वरील इंद्रियविषयक मान्यता आजच्या प्राणिशास्त्राशी सुसंगत नाहीत. द्रव्येद्रिये व भावेंद्रिये ही जैन विभागणी सांगून सर्व प्रश्नांमधून सुटका करून घेता येणार नाही. मूलद्रव्यांची संख्या : जैन सिद्धान्तानुसार प्रत्येक पुद्गलावर एक वर्ण, एक रस, एक गंध व दोन स्पर्श राहतात. एकंदरित सर्व वर्ण, रस, गंध, स्पर्शाचा गुणाकार करून मूलद्रव्यांची संख्या 220 येते. स्पर्धांचा विचार करताना 'बंध' (Bonds) हा शब्दही महत्त्वाचा आहे. आत्ता उपलब्ध अणुविज्ञानानुसार मूलद्रव्यांची (Elements) संख्या 114 आहे. महत्त्वाची बाब अशी की 'नवीन मूलद्रव्य शोधून काढताना वर्ण-गंध-रस-स्पर्श या चार गुणांचा विचार केला जातो का ?' याची चिकित्सा रसायनशास्त्रज्ञाच्या मदतीने करणे आवश्यक आहे. तिर्यंचसृष्टीचा विचार : जैन शास्त्रानुसार तिर्यंचसृष्टीत एकेंद्रिय ते पंचेंद्रिय सर्व जीव येतात. येथे मात्र मर्यादित अशा पशुपक्षीसृष्टीचा विचार करणार आहोत. गेल्या 20 वर्षात जीवसृष्टीच्या निरीक्षणाचे विज्ञान विशेषच प्रगत होत चालले आहे. स्थलचर, नभचर, जलचर असे विविध पशुपक्षी, कीटक, प्राणी यांच्यावर आधारित अभ्यास आणि फिल्म्स् या नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी इ. चॅनेलवर चोवीस तास प्रदर्शित होत असतात. प्राय: यांचे अभ्यासक विदेशीच असतात. भारतातील डॉ. सलीम अली, नीलिमकुमार खैरे, डॉ. किरण पुरंदरे इ. काही मोजकेच निसर्गनिरीक्षक प्रसिद्ध आहेत. भारतातही हा अभ्यास हळूहळू प्रगत होत आहे. जैन शास्त्रातून मिळणारे तिर्यंचविषयक वर्णन अतिशय सूक्ष्म, विस्तृत आणि स्तिमित करणारे आहे. इंद्रिये, गती, आहार, ज्ञान, संयम, लेश्या, कषाय, गुणस्थान व संलेखना इ. अनेक अंगांनी तिर्यंचांची जैन शास्त्रात निरीक्षणे दिली आहेत. एका फिल्ममध्ये जेव्हा Pride, Anger, Cruelty, Soberness अशी शीर्षके देऊन विविध प्राण्यांचे व्यवहार नोंदविण्यात आले तेव्हा साहजिकच जैन शास्त्राप्रमाणे हे कषायांचे आविष्कार आहेत असे वाटले. हिंस्र पश कडकडून भूक लागल्याखेरीज शिकार करीत नाही. अन्नाचा परिग्रह करीत नाही. सिंह, वाघ हे पकडलेल्या पशूचे शरीर पूर्ण निष्प्राण झाल्याखेरीज आहार करीत नाहीत. अनेक पशुपक्ष्यांना मृत्यूची चाहूल लागल्यावर ते दूर एकांतत निघून जातात. जवळजवळ सर्वच प्राण्यांमधील वात्सल्यभावनाअतिशय प्रबळ असते. स्थलांतर करणारे पक्षी विशिष्ट दिशेनेच जातातव परत येतात. पशुपक्ष्यांचे व्यवहार प्राय: अंत:प्रेरणेने चालत असले तरी प्रत्येकाची वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्येही दिसतात. तिर्यंचांना असलेले जातिस्मरण, त्यांनी धारण केलेली संलेखना, त्यांची गुणश्रेणींमध्ये चौथ्या गुणस्थानांपर्यंत प्रगती, असे उल्लेख विविध जैन ग्रंथांत विखुरलेले दिसतात. तिर्यंचांचे जैन शास्त्रनिर्दिष्ट वर्तन प्राण्यांच्या मनोवैज्ञानिक भाषेत नक्कीच मांडता येईल. सम्मूर्छिम जीव : जैन शास्त्रानुसार मुंग्या, किडे, अळ्या, ढेकूण, डास, माशी, भुंगा इ. अनेक कीटक सम्मूर्छिम आहेत म्हाजे मातापित्यांच्या संयोगाशिवाय ते उत्पन्न होतात. आधुनिक विज्ञानानुसार या सर्व कीटकांची सूक्ष्म अंडी असतात. मात्र माणसांच्या मलमूत्र इ. 14 अशुचिस्थानातून निर्माण होणारे 'सम्मूर्छिम मनुष्य' ही संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्याही विशेष लक्षणीय आहे. Genetic Science च्या आधुनिक संशोधनानुसार माणसाच्या मलमूत्र, गर्भजल इ. पासून त्या मनुष्याचा DNA मिळविता येतो. असा DNA विकसित करून कदाचित कत्रिम मनुष्य तयार करण्यापर्यंत विज्ञान प्रगती करू शकेल. जनकीय शास्त्राचा शोधनिबंध लिहिताना जैन शास्त्रातील एतदविषयक विचार मांडले गेले पाहिजेत असे प्रामाणिक जैन अभ्यासकाला मनापासून वाटते.
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________ भूगोलविषयक मान्यता : ___जैन मान्यतेनुसार मध्यलोकात जम्बूद्वीपाच्या मधोमध मेरुपर्वत आहे. जम्बूद्वीपाच्या भोवती जम्बूद्वीपाच्या दुप्पट लवणसमुद्र आहे. त्याच्याभोवती त्याच्या दुप्पट धातकीखण्ड आहे. याप्रमाणे सात द्वीप आणि सात समुद्रांची रचना आहे. याचा अर्थ ही भूगोलरचना अतिशय आखीवरेखीव व प्रमाणबद्ध आहे. मुळातच हा भूगोल फक्त पृथ्वीचा आहे, की विश्वाच्या काही भागांचा आहे की, संपूर्ण विश्वाचा आहे, याबाबत शंका येते. __ भूमितिशास्त्रानुसार बिंदू, रेखा, चौकोन व वर्तुळे या सर्व गणिती संकल्पना आहेत. पूर्ण चौकोन, पूर्ण वर्तुळ अशी एकही आकृती निसर्गात निसर्गत: दिसून येत नाही. शिवाय जैन शास्त्रानुसार विश्व कोणी निर्माण केलेले नही. विश्वाचा नियामक ईश्वर मानला असता तर कदाचित या आखीवरेखीव क्रमाची पुष्टी करता आली असती. ईश्वरासारख्या सर्वज्ञ प्राण्याखेरीज आपोआप निर्माण झालेली सृष्टी वर वर्णन केल्याप्रमाणे अतिशय सुनियोजित व प्रमाणबद्ध कशी असू शकेल ? जैन शास्त्रातील द्वीप व समुद्रांचे, समकालीन द्वीप व समुद्राशी नाते जोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला दिसतो. जैनांनी तो श्रद्धेने मान्य केला तरी भूगोलतज्ज्ञ तो मान्य करणार नाहीत. आहारचिकित्सा : शाकाहार ही जैनांची ओळख आहे. केवळ शाकाहारच नव्हे तर त्याच्याही अंतर्गत प्रत्येक धान्याचा, भाजीचा, फळाचा, फुलाचा केलेला सूक्ष्म विचार हे जैन ग्रंथांचे वैशिष्ट्य आहे. भावनिक, मानसिक आणि धार्मिक दृष्टीने शाकाहार हा सात्त्विक मानला जातो. साधूंना प्रायोग्य अशा आहाराचे वर्णन करणारे अनेक ग्रंथ जैन शास्त्रात 'पिण्डैषणा' शीर्षकाने प्रसिद्ध आहेत. रोजच्या आहारात नियमोपनियमांची बंधने घालून घेणे हे जैन धार्मिकतेचे मुख्य अंग बनले आहे. यात आश्चर्यकारक बाब अशी की अनासक्ती अर्थात् निरासक्तीचे तत्त्व डोळ्यासमोर ठेवले तर जैन व्यक्तीला हे कल्पते की - जो, जसा, जेव्हा, जितका शाकाहार मिळेल त्यातील थोडा व योग्य आहार घ्यावा. आपले आहाराचे नियम इतरांना त्रासदायक ठरतील असे शक्यतो घेऊ नयेत. घेतल्यास आपल्या बलबुत्यावर निभावून न्यावेत. आपल्या खाण्यापिण्याचे 'टॅबू' निर्माण करणे जैन आचारपद्धतीत बसत नाही. खाण्यापिण्याबाबत सहजता व साधेपणा ही मूल तत्त्वे आहेत. __ डाएटिशियन जो आदर्श आहार सुचवितात त्यात गाजर-दुधी भोपळा इ. चे रस, कडुनिंबाची चटणी. उकडलेल्या भाज्या, मोड आणून वाफवलेली कडधान्ये, एक ग्लास दूध, सूप, ताक, सर्व फळे इ. गोष्टींचा समावेश असतो. काही विशिष्ट व्यक्ती वगळल्यास सर्वसामान्य माणसाला असा आहार सतत घेणे अशक्य आहे. आहाराच्या चर्वितचर्वणापेक्षा अनेक उत्कृष्ट गोष्टी जैन धर्माने आम्हाला वारश्याने दिल्या आहेत. त्यांचा योग्य दिशेने अभ्यास करून त्या समाजापुढे आणणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे पूर्णत: धार्मिक आहार, पूर्णत: आरोग्यसंपन्न आहार आणि पूर्णत: तामस आहार हे तीनही अतिरेक टाळून सामान्य गृहिणीला योग्य पोषणरत्ये असलेला व चवदार आहार बनवावा लागतो. उपसंहार : ___सदाचरण आणि शांततामय सहजीवन हे धर्माचे व्यावहारिक उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी जी धार्मिक मूल्ये अत्यंत उपयोगी ठरतात ती श्रद्धेनेही मान्य करण्यास काही हरकत नाही. धार्मिक ग्रंथात लिहून ठेवलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध केलीच पाहिजे असा अट्टाहासही करण्याचे काही कारण नाही. शांततामय सहजीवनासाठी जैन धर्माने समग्र जीवसृष्टिविषयक निरीक्षणे त्या-त्या काळात नोंदवून ठेवलेली आहेत. जैन धमील सणे इतर समकालीन धर्मांच्या तुलनेत त्यातल्या त्यात अधिक सक्ष्म व वैज्ञानिक आहेत ही मोठीच जमेची बाजू आहे. **********
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________ 18. भ. महावीरांचे तत्त्वज्ञान : आधुनिक संदर्भात (जैन-मराठी-साहित्य-संमेलनातील विशेष व्याख्यान, मिरज, मे 2003) 25 एप्रिल 2002 ला संपणारे वर्ष भ. महावीर जन्मकल्याणक वर्ष म्हणून सर्व भारतभर व संपूर्ण जगभर मोठ्या थाटामाटाने साजरे झाले. भव्य मेळावे, दिमाखदार उत्सव, भाषणे, प्रदीर्घ चर्चासत्रे, पुस्तकांचे प्रकाशन समारंभ, मिरवणुका, पूजा, अभिषेक, स्पर्धा, पुरस्कार अशा अनेकविध अंगांनी हे वर्ष साजरे झाले. जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या श्रेष्ठतेचा उद्घोष करणाऱ्या आवेशमय भाषणांचा एकंदर सूर पुढीलप्रमाणे होता - ‘दहशतवाद व युद्धसदृश परिस्थिीत जगाला अहिंसाच तारणार आहे. अहिंसा जैन विचारांची विश्वाला अमोल देणगी आहे. म. गांधींनी तिचा यथायोग्य वापर केला.नयवाद व अनेकान्तवाद जैन धर्माचे हृदय आहे, पंचमहाव्रते हे पंचप्राण आहेत. हा धर्म वैश्विक धर्म होण्याच्या योग्यतेचा आहे. शाकाहार व व्यसनमुक्तीच्या चळवळींच्या रूपाने हा परदेशातही घरोघरी रूजत चालला आहे. हा धर्म पूर्णांशाने वैज्ञानिक आहे. यात नाही असे जगात काहीच नाही.' इ.इ. महती गाणे, विशेषणे लावणे अथवा वर्णनेंकरणे अतिशय सोपे असते. थोडे भाषाकौशल्य व वक्तृत्व असले की घणाघाती विधानांनी तास-दोन तास व्यासपीठ गाजवणं काही फारसे अवघड नाही. जैन धर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त (विशेषतः अजैन) व्यक्तींना तो पटवून देणे आवश्यक आहे. 'गृहमयूर' बनून स्वत:च्याच पिसाऱ्यावर मोहित होण्यापेक्षा, या धर्माच्या श्रेष्ठतेची कारणमीमांसा देता येणे फार महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अगर वैश्विक पातळीवर पोहोचण्यापूर्वी आपण वेचक 12 मुद्यांच्या सहाय्याने, याच्या विशष्ट्यांची नोंद आधुनिक व विशेषतः वैयक्तिक संदर्भात घेऊ. व्यक्तिश: या तत्त्वाचे पालन करणे व ज्ञान मिळविणे अतिशय जरूरीचे आहे, भाषणबाजी नव्हे. 1) केवलिप्रज्ञप्त परिपूर्ण धर्म : जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या इतिहासात डोकावता, असे दिसते की, बौद्ध धर्माप्रमाणे हा व्यक्तीप्रवर्तित नाही व वैदिक धर्माप्रमाणे विकसनशीलही नाही. महावीरच नव्हे तर ऋषभदेवांच्या काळापासून हा केवलिप्रज्ञप्त' आहे. तत्त्वज्ञान व मूल आचरणाच्या गाभ्यात आजतागायत नवी भर पडलेली नाही. उलट, क्षुल्लक गोष्टींचे निमित्त करून संप्रदाय निर्माण करण्याची गर्हणीय गोष्ट आम्ही अनेक शतके करीत आलो आहोत. श्वेतांबर, दिगंबर, त्यातही स्थानकवासी, मूर्तिपूजक, तेरापंथी, वीसपंथी, सोळापंथी अशा संप्रदायानिशी फुटीर स्वरूपात जैन धर्म विश्वाला सामोरा गेला, तर आपल्या एकसंध केवलिप्रज्ञप्त परिपूर्ण अनादि धर्मावर कोणी विश्वास तरी ठेवेल का ? 'स्वत:च्यर सुधारा व मगच आम्हाला सुधारा' असे जग आपल्याला नाही का म्हणणार ? 2) धर्माची भाषा कोणती असावी ? : संस्कृत भाषेचा आधार न घेता, लोकभाषा असलेल्या 'अर्धमागधी' नावाच्या प्राकृतात उपदेश देऊन महावीरांनी धर्मभाषेविषयीचा एक कायमचा दंडक घालून दिला, महावीरांचे भाषाविषयक कार्य पुढील 6 ओळीत परिणामकाकपणे सांगता येईल - धर्म आणि जीवनाची फारकत ही जाहली / घेउनी ध्यानी जिनांनी गोष्ट ही हो साधली / / संस्कृताची बंद दारे धाडसाने उघडली / आणि त्यातुनि लोकभाषा सहज केली वाहती / /
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________ तुंबलेला धर्म सारा खळखळुनि झेपावला / वगळलेल्या जनमनांचा शिंपता केला मळा / / महावीरांच्या या क्रांतीपासून स्फूर्ती घेऊन आपणही महावीरवाणी व तिचे चिंतन भारतातील व इतर देशातीलही बोलीभाषांमध्ये प्रभावीपणे आणू या. आपल्या मुलांना मातृभाषेत धर्म शिकवू. इंग्रजीत भाषांतर करून नको. 3) ज्ञानमीमांसा : जैन दर्शनाने ज्ञानाचे पाच भेद सांगितले. मति, श्रुत, अवधि, मन:पर्याय व केवलज्ञान. जैन दृष्टीनेnformation Technology च्या युगात कोणत्याही वैज्ञानिक साधनाने मिळविलेले ज्ञान फक्त माहितीचा धबधबा, महापूर आहे. मति-श्रुत नंतर त्याची मर्यादा संपते. पुढची ज्ञाने बौद्धिक कुवतीशी निगडित नाहीतच. प्रथम सम्यक्त्वाची जोड मिळाली तरच मति-श्रुतही सम्यक् बनते. शुद्ध चारित्राने आध्यात्मिक प्रगती केली, तरच पुढील ज्ञाने आविर्भूत होता. सॉक्रेटिसही knowledge is virtue', म्हणतो तो याच अर्थाने ! 'तो फार ज्ञानी, पंडित आहे. वक्तृत्व उत्तम आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात तो काही का करेना !' हा दृष्टिकोण जैन दर्शनास संमत नाही. शुद्ध आचरण नसलेल्याचे ज्ञान, जैन दर्शनाच्या दृष्टीने पोकळ व आत्मघातक आहे. स्वत: भरपूर परिग्रह करणाऱ्या माणसाचे अपरिग्रहावरील व्याख्यान ऐकून इतर लोक कसे अपरिग्रही होणार ? प्रश्नच आहे. 4) समन्वयवाद : कार्यकारणसिद्धांत असो, सप्तभंगीनय असो अगर आत्मकल्याणाचा मार्ग असो, महावीरांनी इतरांचे सिद्धांत सर्वस्वी फुली मारून कधीच धिक्कारले नाहीत. इतरांच्या प्रतिपादनातील सत्य अंश सतत ग्रहण केले. बौद्ध वाङ्मया जो सतत इतरांवरील टीकेचा सूर दिसतो तसा जैन साहित्यात (विशेषतः आगमात) जवळजवळ नगण्य दिसतो. भगवद्गीतेने ज्ञानमार्ग, संन्यासमार्ग, भक्तिमार्ग, ध्यानमार्ग, कर्ममार्ग असे विविध अध्यायात कथन केलेले दिसतात. जैन धर्माने एकाच आचाराचे दर्शन, ज्ञान, चारित्र, तप व वीर्य असे पाच भेद कल्पिले. भगवती आराधनेने चतुष्कंध आराधना सांगितल्या. उत्तराध्ययनाने 28 व्या मोक्षमार्गगति अध्ययनात स्पष्टपणे नोंदविले - नाणेण जाणई भावे, दंसणेण य सद्दहे / चारित्तेण निगिण्हाई, तवेण परिसुज्झई / / उत्त.२८.३५ उमास्वातींनी पहिल्याच सूत्रात दर्शन, ज्ञान, चारित्राचा समन्वय केला. कुटुंबात, परिवारात, गावात, व्यापारात, सर्व व्यवहारातच समन्वयवादी दृष्टिकोण व्यवहारनयाच्या दृष्टीनेही फायदेशीरच नाही काय ? केवळ नफ्याकडे बघून तत्त्वे गुंडाळून कसेही वागण्याचा समन्वयवाद' नको बरे का ! 5) विवेक व अप्रमाद : आत्मकल्याणाची कास धरलेल्या आराधकासाठी महावीरांनी सतत अप्रमाद (बेसावधपणाचा व बेफिकीरीचा अभाव) सांगितला आहे. गौतम गणधरांसारख्या पारगामी व्यक्तीलाही त्यांनी तो वारंवार सांगितला, तेथे तुमच्याआमच्यासारख्या सामान्यजनांचा काय पाड ? धर्माचरण करताना देहली-दीपन्याया'ने हा विवेकरूपी दिवा तेवत ठेवला तर आपोआपच तोंडून शब्द उमटतात -
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________ माझ्या जीवा - एकासन ब्यासन, बेला, तेला जमेल तेवढेच कर तप / डोळ्यात तेल घालून दिवा, अंत:करणामध्ये जप / / (ज्ञानदीप) सैरावैरा कुठे धावतोस, ठेच लागली पुढं बघ / बंद दार आहे पुढं, परत जरा मागे वळ / / (प्रतिक्रमण) तुझे ज्ञान नुसती माहिती, पक्के ध्यानी धरून चल / ज्ञान तुझ्यात होईल प्रकट, शुद्ध केलंस तरच मन / / (त्रिरत्न) ती भलत्यावर ठेवू नको, श्रद्धा मोठंच आहे बळ / / (सम्यक्त्व) नीट पारखून ठेव स्वत:वर, सारे दूर करून सल / / (शल्योद्धार) दर क्षणी, दर पावली, थोडा पुढं पुढं सर / प्रवास हळू झाला तरी, नक्की भेटेल शाश्वत घर / / (गुणस्थाने अगर श्रेणी) वेळेवारी सारा पसारा, आता आवरून सावरून नीघ / मागे वळून पाहू नको, श्रद्धांजलीचीही रीघ / / (अनासक्ती) दुसरे कंटाळण्याच्या आधी, बऱ्या बोलानं मुक्काम हलव / / (पंडितमरण) इतकं सोपं समजू नको, कर्मोदयाचंच हवं पाठबळ / / (संलेखना) 6) कषायांवर नियंत्रण : आपल्याला सर्वांना पाठ आहेत ही नावं ! घडाघडा म्हणून दाखवतो. क्रोध, मान, माया, लोभ, त्यांच्यावर राज्य मोहाचं, त्याच्या मुळाशी राग-द्वेष, त्यांना जिंकणारे जिन, आत्म्याला कसणारे कषाय. कषाय म्हणजे काढा अगर चहा. वैदिक दर्शनात षड्रिपु - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, जैन दर्शनात अनंतानुबंधी ते संज्वलन से एकूण 16 प्रकार सांगितले आहेत. आपण आहोत सामान्य संसारी श्रावक. संपूर्ण वीतरागी, निर्विकार, मध्यस्थ अशी पत्नी, माता कोणाला तरी रूचेल काय ? आपल्यात कषाय रहाणारच. परंतु संज्वलनाच्या दिशेनं प्रवासाचा यत्न व्हावा' हीच सदिच्छा ! 7) स्वावलंबन : महावीरांनी सांगितलेले स्वावलंबन मुख्यत: आध्यात्मिक स्वावलंबन आहे. जगन्नियंता, तारणहार, अवतारधारी ईश्वर जैन दर्शनात संमत नाही. 'अप्पा कत्ता विकत्ता य' असे हे स्वावलंबन आहे. घरात आपण साधा पाण्याचा ग्लासही दुसऱ्याकडे सतत मागत असू, कुठलीच कामे स्वत:ची स्वत: करीत नसू, आजी-आजोबांची निंदा करीत असू, कोणतेही मत स्वतंत्रपणे मांडू शकत नसू तर हे काय स्वावलंबन झालं ? एकंदरीत शारीरिक व बौद्धिक पापणा जवळ असेल तर आत्म्याच्या स्वावलंबनाच्या गोष्टी आपण करू शकतो काय ? 8) अपरिग्रह : 'परि + ग्रह' म्हणजे चोहोबाजूने ग्रहण करणे. तत्त्वार्थसूत्रानुसार वस्तू म्हणजे परिग्रह नसून आसक्ती हा परिग्रह आहे. 'मूर्छा परिग्रहः' अपरिग्रहाचा आज आपल्याला उपयुक्त अर्थ लावू या. सामान्य माणसानं अपरिग्रही व्हायचं तरी कसं ? धान्याचा साठा करणं हा जरी परिग्रह, तरी कीड मुळीच लागू न देता, कण न् कण मुखी घालणं हाच अपरिग्रह ! / / 1 / /
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________ भरपूर स्वयंपाक करणं हा जरी परिग्रह, तरी अपुरं अन्न न करणं, अन् शिळं न उरण्याची खबरदारी घेणं हाच अपरिग्रह ! / / 2 / / नवनवीन फॅशनचे कपडे घेत रहाणं, हा जरी परिग्रह, तरी जुन्याचा लोभ लचका न ठेवता, वेळेवारी देऊन टाकत रहाणं, हाच अपरिग्रह ! / / 3 / / आरडाओरडा करून, धपाटे घालून मुलांना अभ्यासाला बसविणं, हा जरी परिग्रह, तरी मुलांच्या बुद्धीच्या मर्यादा ओळखून, त्यांना रेसच्या घोड्यासारखं न पळविणं, व इतर हुषार मुलांचा द्वेष न करणं, हाच अपरिग्रह / / 4 / / जीव टाकून, जीव लावून, मुलं मुलं करून, लाड करणं व वळण लावणं हा जरी परिग्रह, तरी म्हातारपणची काठी म्हणून, डोळे लावून न बसणं, हाच खरा अपरिग्रह / / 5 / / स्वत:च्या भोगोपभोगांची तजवीज हा जरी परिग्रह, तरी कोणाचे हिसकावून न घेण्याची जाण, व गरजूंना एक टक्का तरी देण्याची वृत्ती, हा अपरिग्रह / / 6 / / जीवन सुखकर करायला, खूपशी साधनं जमविणं, हा जरी परिग्रह, तरी त्यातलं एखाद-दुसरं नसलं, किंवा मोडलं, तरी निभावून नेता येणं हाच अपरिग्रह / / 7 / / घाण्याच्या बैलासारखं, उपजीविकेच्या साधनांमागं, चक्राकार फिरत रहाणं हा जरी परिग्रह, तरी दिवसाकाठी तासभर तरी स्वतंत्रपणे चिंतन, वाचन हाच अपरिग्रह / / 8 / / 9) पर्यावरण रक्षण व ऊर्जाबचत : आधुनिक युगाचे परवलीचे शब्द आहेत हे ! त्यासाठी आपण सौर ऊर्जा, ठिबक सिंचन, पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्षारोपण, वनसंवर्धन असे हजारो कार्यक्रम राबवीत असतो. जैन दर्शनानं या सर्व चळवळींना संपूर्णत: तत्त्वज्ञानाचाच पाया प्राप्त करून दिला आहे. जैन दृष्टीनं पंचमहाभूते ही जड व परमाणूंपासून बनलेली नसून, एकेंद्रय जीव आहेत. पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजस्कायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक जीवांशी आपण कसे वर्तन करतो, काय बिनधास्त खेळ करतो ते जरा काव्यमय पद्धतीनं मांडते. वेष कवितेचा असला तरी गाभा तत्त्वांचा अहे, हे सूज्ञास सांगणे नल गे! 'आंदण' - सर्व जगच जणू आंदण घेतल्यासारखे वागतो आपण / त्रस-स्थावर जीवांपैकी, स्थावरांचंच एवढं कथन / / आता हे पृथ्वीकायिक जीव - पृथ्वीकायिक जीव आपल्या पायाखालचा मामला / कसंही करून कुचला, खणा, काढा, उचला / /
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________ कोळसाही आपला अन् सोनंही आपलं / बोअरिंगनं छेद घेऊ, ते पाणीही आपलं / / डोंगर उडवून सारं काही भुईसपाट करू / शेत-मळे उखणून तिथं नव्या वस्त्या सजव / / नवनवीन वाणांना, भरमसाठ खतं घालू / / जमीन-कस जाऊ दे खड्ड्यात, कृषि-मित्र' सत्कार घेऊ / / 1 / / आता हे अप्कायिक जीव - अप्कायिक सुद्धा आहे, आपल्याच बापाचा माल / हपापाचा माल म्हणून किती किती प्याल ? वहातं पाणी साठवू, साठलेलं पाणी वाहवू / समुद्र मागे हटवू, दिमाखात कॉलनी उठवू / / मासे म्हणजे पाण-भाजी, जाता येता खुडून घेऊ / होड्या, जहाजे चाल-चालवून नद्या, समुद्र पार करू / / जलसंपत्ती निसर्गाची वारेमाप कशीही लुटू / मिनरलच्या नावाखाली दहा रुपये लिटर विकू / / 2 / / आता हे वायुकायिक जीव - फुफ्फुसाच्या पंपांनी, हवा आत घेऊ आणि सोडू / आपली शुद्ध हवा आपण अनेक कारणांनी बिघडवू / / तिच्या दाबावर आपण, लहानमोठी यंत्रे बनवू / चाकात भरून हीच हवा, जमिनीवर फिरत राहू / / तेजस्कायिक उपकरणांनी, हवेलाही वेठीस धरू / आपल्या मर्जीनुसार तिला गरम-गार करीत राहू / / 3 / / आता हे अग्निकायिक जीव - पृथ्वीकाय कोळसापासून तेजस्काय वीज बनवू / वायुकायिक पवनचक्कीनं नवनवीन काम राबवू / / अप्कायापासून वीज मोठ चा कौशल्यानं निर्मू / अग्निबाण अन् अणुस्फोटांनी स्वशक्तीची स्तोत्रं गर्जू / / जमीन-आकाश-पाताळात लक्षावधी वहानं चालवू / आपला निसर्ग-विजय म्हणून आपली आपलीच शेखी गिरवू / / 4 / / आता हे वनस्पतिकायिक जीव - वनस्पतींचा आपल्याबाबत आहे नाजूक मामला / प्रश्न पोटाचा आहे, जरा हळू हळू बोंबला / / जे जे दिसलं झाडावर, गुपचूप पोटात रिचवलं / टनावरी धान्य, फळं, भाजी, दुधही खूप चापलं / / तृणभक्षी रूचकर जीव, जिभल्या चाटत पचविले / वस्त्रं विणली, घरं बांधली, बगीचेही उभारले / / प्रयोगशाळेत भावभावना वनस्पतींच्या सिद्ध केल्या / आमच्या बोथट मनापर्यंत कशा बरे त्या पोहोचाव्या ?
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________ जिनेंद्रांनी दिली दृष्टी, ही तर एकेंद्रियांची सृष्टी / हिंसा-चौर्य-परिग्रहावरच, उभारलीय मानवी संस्कृती / / संस्कृती सोडू शकत नाही, बदलू शकतो आपली नजर / गौतमांची अप्रमत्तता ठेवू, मनाच्या तळाशी सदैव हजर !! सारांश काय ? एकेंद्रिय जीवांना अभय म्हणजे पर्यावरण रक्षण नव्हे काय ? 10) प्रतिकूल परिस्थितीशी सामना : __या मुद्याला तत्त्वज्ञानात स्थान लाभलं आहे ते परीषह व उपसर्गाच्या रूपानं ! 22 परीषह व त्रिविध उपसर्गांना महावीरांनी कर्मनिर्जरेचे साधन मानले ! जरा मनाविरुद्ध, प्रतिकूल झालं की व्यवहारात आपला तोल जातो. चिडच्छि होते. शीत-उष्ण-दंश-मशक यांचा भयंकर त्रास होतो. मानसिक परीषह तर आम्हाला मनोरुग्णतेच्या पातळीपर्यंत नेऊन पोहोचवितात. दुहेरी उपयोगी आहे हा कर्मनिरचा सिद्धांत ! शारीरिक, मानसिक आरोग्य ठेवतो वआत्म्याचीही उन्नती करतो. दहशतवादी कारवाया अगर शत्रूच्या आक्रमणाला मात्र परीषह मानून कर्मनिर्जरेचे साधन मानणे भयंकर घातक ठरेल. राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांसाठी व्यवहारनयाने राष्ट्रीय अस्मिताच योग्य ठरेल ! 11) निःशल्यीकरण : कोणतेही व्रत ग्रहण करण्यापूर्वी मानसिक शल्ये दूर करणं अत्यावश्यक आहे असे जैन दर्शनाचे प्रतिपादन आहे. ही एक प्रकारची शल्यक्रिया म्हणजे सर्जरीच आहे. कपट, ढोंग, अंधविश्वास, एकमेकांविषयीचे गैरसमज, किंतुत्याचे द्वेषात झालेले रूपांतर, या सर्वांमुळे आपली मनं नेहमी टाचणीघरासारख्या bin-holder) अवस्थेत असतात. ख्रिश्चन धर्मात confessionritual यासाठीच आहे. महाभारतात, भीष्मांचा “शरपंजर" मला कायम या शल्योद्धाराची आठवण करून देत आला आहे. 12) स्त्रियांना असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान : जैन आगमात, 2600 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अनेक स्त्रियांचे यथार्थ दर्शन घडते. पुरुष आचार्यांनी हजारो वर्षे तोंडी परंपरेने जपलेल्या या आगमांमधून इतक्या प्रभावी स्त्रियांचे कार्य आपल्यापर्यंत पोहोचले आहे. तीर्थंकरमल्ली, साध्वी राजीमती, आर्या चंदना, राणी कमलावती, कनकध्वज राजाची पत्नी पद्मावती, थापत्या गृहपत्नी, शंख श्रावकाची पत्नी उत्पन्न, जिज्ञासू श्राविका जयंती, स्पष्टवक्ती अग्निमित्रा, भातशेतीत प्रवीण व अर्थसल्लागार स्नुषा रोहिणी, 18 देशी भाषात विशारद अशा देवदत्ता, अनंगसेना, कामध्वजेसारख्या गणिका ... असंख्य कर्तृत्ववान् स्त्रिया आहेत या आगम व आगमटीकाग्रंथांमध्ये ! हे स्थान त्यांनी मिळविले आहे आपल्या चारित्र्याच्या व कौशल्याच्या बळावर ! जै धर्मात असलेले हे स्त्रियांचे स्थान आधुनिक स्त्री चळवळींनाही स्फूर्तिप्रद ठरेल ! उपसंहार : वरील 12 मुद्दे केवळ दिग्दर्शनाखातर आहेत. या दर्शनातील जवळजवळ सगळ्याच गोष्टी सदासर्वकाळ स्वीकारणीयच आहेत. सर्वात महत्त्वाचा आहे प्रत्येकानं स्वयंप्रेरणेनं केलेला अभ्यास व त्यातून होणारी स्वसामर्थ्यनी जाणीव' ! जय जिनेंद्र ! जय भारत !! **********
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________ 19. जैन आणि हिंदू धर्म : साम्य-भेदात्मक निरीक्षणे (ब्रह्ममहतिसागर जैन साहित्य संशोधन केंद्र : दहिगांव आणि जैन अध्यासन पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने __ आयोजित चर्चासत्रात वाचलेला शोधनिबंध, मार्च 2010) लेखक : डॉ. अनीता बोथरा मार्गदर्शक : डजें. नलिनी जोशी प्रस्तावना: 'जैन व वैदिक परंपरा : साम्य-भेदात्मक निरीक्षणे', हा विषय एका मोठ्या प्रबंधाचाच विषय आहे. तथापि सुमारे गेल्या 15 वर्षातील वाचन व चिंतनातून, जैन व वैदिक परंपरा यांच्या साम्य-भेदांवर आधारित, जी निरीक्षणे डोळ्यासमोर आली, ती संक्षेपाने एकत्रित नोंदविण्यासाठी, हा शोधलेख लिहण्याचा प्रयास केला आहे. __ गेली किमान पाच वर्षे तरी, भारतभरातल्या अनेक सेमिनार आणि कॉन्फरन्सेसला जाऊन, जैन आणि वैदिक परंपरांमधील मुद्यांवर आधारित असे, तौलनिक शोधलेख प्रस्तुत केले. त्यावेळी असा अनुभव आला की, वैदिक, हिंदु व ब्राह्मण या तीनही शब्दांवर, अनेकदा आक्षेप घेतले गेले. जैन, बौद्ध आणि आजीवक या तीन विचारधारा, निश्चितपणे श्रमण परंपरेच्या मानल्या जातात. त्या सोडून वेदांपासून चालू होऊन ब्राह्मण, आरण्यक, उपनिषदे, रामायण, महाभारत, सहा दर्शने आणि शैव, वैष्णव इ. संप्रदाय, या सर्वांना एका विचारधारेत गुंफून, त्याला आम्ही वैदिक, हिंदू व ब्राह्मण संप्रदाय असे संबोधतो. साम्य-भेदात्मक निरीक्षणे * प्रवृत्तिपरकता आणि निवृत्तिपरकता * अतिशय साकल्याने अर्थात् संग्रहनयाने विचार केल्यास, जैन परंपरा व एकंदरीतच श्रमण परंपरा या, निवृत्तिगामी आणि वैराग्य व तपाला प्राधान्य देणाऱ्या आहेत. वैदिक परंपरा प्राधान्याने, प्रवृत्तिगामी आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य देणारी आहे. जैन परंपरेने नेहमीच साधुधर्म हा प्रधान मानून, अग्रस्थानी ठेवला आहे. अमृतचंद्राचार्यांनी यावर 'पुरुषार्थसिद्धयुपायात' चांगलाच प्रकाश टाला आहे. याउलट वैदिकांचे स्मृति इ. आचारविषयक ग्रंथ प्रामुख्याने गृहस्थधर्मालाच केंद्रस्थानी ठेवतात. जैन परंपरेत श्रावकाचार अर्थात् गृहस्थाचार देखील विस्ताराने सांगितला आहे. तरीही श्रावकाच्या प्रत्येक व्रतांमध्ये परिणाम अर्थात् मर्यादेला महत्त्व दिले आहे.४ वैदिक परंपरेतही तत्त्वचिंतनाला प्राधान्य देणारी उपनिषदे आणि संन्यासधर्माचे विवेचन करणारे ग्रंथ अर्थातच आहेत. तरी बहुसंख्येने असलेल्या गृहस्थांसाठी यज्ञ, पूजा-अर्चा, सण-वार, व्रत-वैकल्य यांच्या रूपाने एकंदर आचारातून प्रवृत्तिप्रधानतेचाच ठसा उमटतो. * कालानुरूप बदल * वैदिक परंपरेतील दैवतशास्त्राकडे नजर टाकली तर असे दिसते की, ऋग्वेदापासून ते उत्तरकालीन पुराणांपर्यंत त्यांचे दैवतशास्त्र विकसित होत राहिले. इंद्र, वरुण, रुद्र, विष्णु, उषा अशा वैदिक देवतांपैकी काही लोप पावत्या तर काहींचे व्यक्तिमत्व वेगवेगळे अंश मिसळून बदलत गेले. म्हणूनच वेदातील शिपिविष्ट 'विष्णु' हा, पुराणातील अवतारधारी विष्णुपेक्षा पूर्णत: बदलून गेलेला दिसतो. त्याचप्रमाणे ऋग्वेदामध्ये वादळी वाऱ्यांची देवता असलेले
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________ 'रुद्र' हे, कालांतराने कैलासनिवासी शंकराचे पर्यायवाची नाव झाले.५ दैवत शास्त्राचे जसे बदलते स्वरूप दिसते, तसे यज्ञ संकल्पनेचेही बदलते स्वरूप आपल्याला वैदिक परंपरेत दिसते. आज ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो, तो स्पष्टतः देवीदेवतांच्या उपासनांवर आधारित असा भक्तिप्रधान धर्म आहे व तो अनेक संप्रदायांनी युक्त आहे. कालानुरूप बदल व परिवर्तने करून, जास्तीत जास्त लोकांना एकत्रितपणे टिकवून धरण्याचे काम, वैदिक परंपरेने केलेले दिसते. जैन परंपरेतही कालानुरूप परिवर्तने तर दिसतात पण षद्रव्ये, नवतत्त्वे, कर्मसिद्धांत, अनेकांतवाद आणि साधु व श्रावकाचार या मूळ गाभ्याला प्रदीर्घ कालावधीतही धक्का लागला नाही. परिवर्तने होत गेली तरी ती जैन परिभाषेत मांडायची झाली तर, पर्यायात्मक परिवर्तने आहेत द्रव्यात्मक नाहीत. पार्श्वनाथप्रणित चातुर्यामधर्म महावींनी पंचयाम केला. संघात सचेलक व अचेलक दोहोंनाही स्थान दिले. आजघडीला मंदिरमार्गी जैनांवर स्पष्टत: हिंदुधर्माच्या पूजाविधीचा प्रभाव दिसतो. तरीही षद्रव्ये, नवतत्त्वे इ. वरील सर्व मुद्दे अबाधित राहिले आहेत. पूजास्थानी आदर्शत् म्हणून वीतरागी जिनांचीच स्थापना केली जाते. बदलत्या काळानुसार सर्वस्वी वेगवेगळी नवीन आराध्य दैवते निर्माण झाली नाहीत. * मोक्ष व मोक्षमार्ग * ___ वैदिक परंपरा असो अथवा जैन परंपरा असो, दोन्ही भारतीय संस्कृतीचीच अपत्ये असल्याने, त्यांमध्ये नातिपालनाइतकेच (ethics) आध्यात्मिकतेलाही (spiritualism) महत्त्व राहिले. त्यामुळे दोहोंनीही मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय मोक्षच मानले. परंतु यातही फरक असा आहे की, जैन परंपरेने प्रारंभीपासूनच मोक्ष पुरुषार्थाला अधेखित केले आहे तर अभ्यासक असे म्हणतात की, धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांनाच वैदिक परंपरेत आरंभी प्राधान्य होते. श्रमण परंपरेच्या प्रभावानेच मोक्ष हा पुरुषार्थ, महाभारत काळापासून प्रामुख्याने नजरेसमोर आला. सांख्यमार्ग अथवा ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, निष्कमकर्मयोगमार्ग अथवा ध्यानमार्ग अशी मोक्षाकडे नेणाऱ्या मार्गांची विविधता आणि त्यांची स्वतंत्रता, हे वैदिक परंपरेचे वैशिष्ट्य आहे. भगवद्गीतेतील अध्यायांच्या नावांवरूनसुद्धा हे स्पष्ट होते. जैन परंपरेने मात्र आरंभापासूनच 'सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः / ' हे सूत्र स्वीकारले. परंतु हे तीन वेगवेगळे मार्ग नसून, तिन्हींची समन्वित आराधनाच मोक्षमार्गात अपेक्षित आहे, असे प्रतिपादन केले आहे. * ईश्वर संकल्पना* वैदिक परंपरेतील विविध ग्रंथात, ईश्वर संकल्पनेविषयी संभ्रमावस्था दिसते. वेदात देवदेवता असल्या तरी त्यांना नक्की देव अथवा ईश्वर असे संबोधित केलेले नाही. ब्राह्मणग्रंथात अनेकदा 'यज्ञो वै देवः' असे वर्णन दसते. 'कस्मै देवाय हविषा विधेम ?' असाही प्रश्न उपस्थित केलेला दिसतो. रामायण व महाभारताच्या अखेरच्या भागात, त्यांना देवत्व आलेले दिसते. पुढे पुराणकाळात तर त्यांची अवतारातच गणना झाली. सांख्य दर्शनात पुरुषांचे असंख्यत्व सांगितले असले तरी, ईश्वराला स्वतंत्र स्थान नाही. योगदर्शनात मात्र क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः / 11 अशी ईश्वराची व्याख्या दिली आहे. पण ते एक की अनेक याबाबत योगदर्शन मौन पाळते. __ वैदिक परंपरेतील पुराण ग्रंथात उत्पत्ती, स्थिती व प्रलयाचे प्रवर्तक असे तीन देव मानलेले दिसतात. आज प्रचलित हिंदुधर्मात ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ___ जैन परंपरेने आरंभापासूनच सृष्टीच्या कर्ता-धर्ता-विनाशका ईश्वराची संकल्पनाच मानलेली नाही. सृष्टीला अनादि-अनंत मानून, जीवांचे नियंत्रण करणारे तत्त्व म्हणून, कर्मसिद्धांताला अग्रस्थानी ठेवले आहे. जैन परंपरा अंतिम शुद्ध अवस्था प्राप्त केलेल्या सर्व जीवांना, परमात्मा अथवा ईश्वर या नावाने संबोधते. पण हे ईश्वर सृष्टीची उत्पत्ती, पालन इ. कशामध्येही सहभाग घेत नाहीत. त्यांचे चैतन्यमय अस्तित्व मात्र सतत असते.
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________ एकंदरीत वैदिक परंपरेत ईश्वर संकल्पनेविषयीची जी संभ्रमावस्था दिसते ती जैन परंपरेत दिसत नाही. कारण जैन परंपरेने देवलोकातील देव व मोक्षगामी परमात्मा या दोन्हीही सर्वथा वेगळ्या मानल्या आहेत. * कर्मसिद्धांत * दोन्ही परंपरांनी कर्मसिद्धांताला महत्त्व दिले आहे. परंतु जैन परंपरेत त्याचे विश्लेषण व उपयोजन अतिशय सुसंबद्धपणे, तार्किकतेने व विस्ताराने केले आहे. ___ वैदिक परंपरेत संचित, प्रारब्ध व क्रियमाण हे तीन शब्द मुख्यत: येतात.१२ भगवद्गीतेत कर्म, विकर्म आणि अकर्म या शब्दांचा वारंवार उपयोग केला आहे.१३ पण त्यातून कर्मसिद्धांताचे एकत्रित चित्र व स्वरूप मुळीसुद्धा स्पष्ट होत नाही. याउलट षट्खंडागमासारख्या प्राचीनतम ग्रंथातून, कर्मसिद्धांताच्या विवेचनाला सुरवात होऊन,पुढे पुढे दिगंबर व श्वेतांबर दोघांनीही यावर आधारित असे स्वतंत्र कर्मग्रंथच निर्माण केले. किंबहुना जैन साहित्यात कर्मसाहित्याची एक शाखाच निर्माण झाली. जैन दर्शनात असलेली सात तत्त्वांची साखळी, कर्मांच्या आधारेच जोडलेली आहे. जीव व अजीव यांच्या आपापल्या प्रत्येक कर्माचा कर्ता व भोक्ता असल्यामुळे, त्यात मध्यस्थी करणाऱ्या ईश्वराला कोणतेही स्थान नाही. 14 त्यामुळे साहजिकच कर्मसिद्धांत अधिकाधिक पल्लवित झाला. * पूर्वजन्म व पुनर्जन्मविषयक धारणा * दोन्ही परंपरेत या धारण समान असल्या तरी, जैन परंपरेवर यांचा पगडा इतका दृढ आहे की, प्रत्येक जैन चरितग्रंथात आणि कथाग्रंथात अनिवार्यपणे पूर्वभवांचे व पश्चात्भवांचे वर्णन येतेच. कर्मसिद्धांत अग्रभागी असल्युळे पूर्वभव व पश्चातभवांचे वर्णन हा कथांचा अविभाज्य भाग ठरला. याउलट पूर्वजन्म व पुनर्जन्म मानले असले तरी वैदिक परंपरेतील कथाप्रधान ग्रंथांमध्ये पूर्वभव व पश्चात्भव यांच्या चित्रणावर भर दिलेला दिसत नाही. * दान संकल्पना* अनुसरून वेगवेगळे झाले आहेत. दोन्ही परंपरेत दान हे धर्माचे आणि पुण्यप्राप्तीचे साधन आहे. दानाने मिळणारे जास्तीत जास्त फळ हे स्वर्गप्राप्ती आहे. नित्यदानाचे महत्त्व दोन्ही परंपरांमध्ये दिसते. परंतु नैमित्तिक आणि फ्यदानांचा विचार ब्राह्मण परंपरेत दिसतो. ब्राह्मण परंपरेत 'ज्ञानदानाला' एक विशिष्ट पवित्र दर्जा दिलेला दिसतो. जैन परंपरेत 'अहिंसा' व सर्वजीवरक्षणाच्या भावनेतून 'अभयदानाचा' महिमा वर्णिलेला दिसतो. 'ग्रहण, पर्वकाळ, श्राद्ध, तीर्थक्षेत्र इ. प्रसंगी विशेष दान करावे', असे निर्देश ब्राह्मण परंपरेत आढळतात. तीथींचे व क्षेत्रांचे पावित्र्य, पितृलोक आणि तर्पण इ. संकल्पना जैन शास्त्रात बसत नसल्यामुळे, सागारधर्मामृतकाराने अशा प्रकारच्या दानांचा स्पष्टपणे विरोध केला आहे. जैन परंपरेने दान संकल्पनेला केवळ पुण्य संकल्पनेपर्यंत मर्यादित ठेवलेले नाही. दानाला सैद्धांतिक आधारही दिले. सम्यक्त्वाच्या आठ अंगामध्ये वात्सल्य व प्रभावनेच्या रूपाने१५, श्रावकाचारात अतिथीसंविभागवताच्या रूपाने१६, साधुआचारात उपदेशरूपाने", दान-शील-तप-भाव या चतुष्टयीतून धर्माच्या व्यावहारिक रूपाने१८, प्रत्याख्यानाच्या क्रियेमध्ये अभयदानाच्या रूपाने, आठकर्मातील वेदनीय, अंतराय व तीर्थंकरनामकर्माच्या रूपाने जैनसिद्धांत व आचारात दानाचे असलेले अनन्य साधारण स्थान स्पष्ट दिसते. परिणामी अहिंसा व तपाइतकेच, दान हेही जैन परंपरेचे वैशिष्ट्य बनले.
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________ * व्रतविचार * वैदिक परंपरेत ऋग्वेद काळात, 'धार्मिक अथवा पवित्र प्रतिज्ञा किंवा आचारणसंबंधी निबंध', या अर्थाने 'व्रत' शब्दाचा प्रयोग होत होता. ब्राह्मणग्रंथात 'व्यक्तीचा विशिष्ट वर्तनक्रम अथवा उपवास', या दोन्ही अर्थांनी 'व्रत' शब्द येऊ लागला.२२ स्मृतिग्रंथात प्रायश्चित्ताचे विधान' व्रतरूपाने आले.२३ पुराणग्रंथात तिसऱ्या-चौथ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत, व्रतांचे स्वरूप व उद्देश बदलत गेले व संख्या वृद्धिंगत होत गेली.४ व्रतांच्या मूळ अर्थांमध्ये संकल्पित कृत्य, संकल्प, प्रतिज्ञा व इच्छा हे अर्थ जोडले गेले. त्यामुळे व्रतांना ऐहिकता, काम्यता प्राप्त झाली. व्रते करण्यास स्त्रियांना व निम्न वर्णियांनाही स्थान मिळाले. ही व्रते अत्यंत आकर्षक स्वरूपाची होती. जैनधर्मात आगमकाळापासून ‘व्रत' शब्दातील ‘वृत्' क्रियापदाचा अर्थ मर्यादा घालणे, नियंत्रण करणे, रोकणे, संयम करणे असा होता. म्हणूनच जैन परंपरेत व्रतासाठी विरति, विरमण असे शब्द येतात. याच अर्थाने जैनांनी पूर्ण विरतीला ‘महाव्रत' व आंशिक विरतीला ‘अणुव्रत' म्हटले आहे.२६ ही व्रते प्रासंगिक नसून आजन्म परिपालन करण्याची आहेत. हिंदुधर्मामध्ये पौराणिक काळात जसजसे व्रतांचे स्वरूप बदलत गेले, तसतसा जैन समाज व विशेषत: महिलावर्ग, त्याकडे आकृष्ट होऊ लागला असावा. त्यामुळे अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत, जैनसमाजातही आचार्यांनी विधि-विधानात्मक व्रतांचा प्रचार केला. जैनांच्या दोन्ही संप्रदायात प्रतिमा, पूजा, विधिविधाने, प्रतिछा, यंत्र-मंत्र इ. चा समावेश झाला. परिणामी लोकाशाहसारख्या श्रावकास, मूर्तिपूजेविरूद्ध स्थानकवासी संप्रदाय स्थापन करण्याची प्रेरणा झाली. हिंदू आणि जैन समाज सतत संपर्कात असल्यामुळे, त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींचे आदान-प्रदान कसे होते गेले असावे, यावर वर वर्णन केलेला व्रतांचा इतिहास, हे एक बोलके उदाहरण आहे. * समाधिमरण * प्रायोपवेशन किंवा संजीवन समाधी इ. नावांनी धार्मिक मरणाचा स्वीकार करणे, हे हिंदुपरंपरेला काही नवीन नाही. तथापि हिंदू वातावरणात असे मरण स्वीकारल्याची उदाहरणे अगदी मोजकी आढळतात. शिवाय ह्या मरणासाठी स्वीकारलेल्या प्रक्रियेचा, विशेष बोध करणारे साहित्य निर्माण झालेले दिसत नाही. __ जैन परंपरेत आगमकाळापासून मृत्युविचाराला विशेष स्थान दिसते. भगवती आराधनेसारख्या दिगंबरग्रंथात आणि श्वेतांबरांच्या अनेक प्रकीर्णकात संलेखना, संथारा, समाधिमरण, पंडितमरण, अंतिम आराधना अशा विविध आजही या प्रथेचे असलेले प्रचलन, हे हिंदूंपेक्षा असलेले वेगळेपणच मानावे लागेल. * कर्मक्षयाचा विचार * भवकोटी संचित कर्मांचा या मानवी आयुष्यात, आपण आपल्या प्रयत्नाने क्षय करावयाचा आहे, ही संकल्पना दोन्ही परंपरेत दिसते. संचित कर्मे पुष्कळ असल्यामुळे व वेगवेगळ्या वेळी कर्मबंध झाल्यामुळे त्यांच्या क्षयाचा एक विशिष्ट क्रम सांगणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू परंपरेतील ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करीत नाहीत. 'ज्ञानाग्निः सकर्माणि भस्मसात्कुरुते तथा / 28 हे विवेचन कर्मक्षयाबाबत पुरेसे ठरत नाही. जैन परंपरेने या कर्मक्षयाला 'निर्जरा' या नावाने तात्विक दर्जा दिला आहे.२९ म्हणून निजरेची व्याख्या, निर्जरेचे प्रकार,३१ निजरेचे अधिकारी,३२ संवरयुक्त तपाने होणारी निर्जरा,३३ गुणस्थान व निर्जरा,४ समुद्घात व निर्जरा,५ निर्जरेचा क्षपणविधि अशा प्रकारे केलेला विविधांगी विचार हे जैन परंपरेचे वैशिष्ट्य ठरले.
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________ * समन्वयवादी दृष्टिकोण * नयवाद, स्याद्वाद, अनेकान्तवाद आणि समन्वयवाद हे जैन अभ्यासकांच्या मते, जैन परंपरेचे वैशिष्ट्य आहे. सर्व दार्शनिक प्रवाहांना जैनांनी एकेक नय स्पष्ट करणारा वाद म्हणून सामावून घेतले. 'ऋषिभाषिता'सारख्या ग्रंथात हिंदू आणि बौद्ध विचारवंतांचाही गौरव केला. सामान्य जीवन आणि अध्यात्म यांचा समन्वय व्यवहारनय आणि निश्चयनय सांगून केला. कार्य-कारण भावाचे स्पष्टीकरण देत असताना, कोणतेही कार्य स्वभाववाद, कालमद, पौरुषवाद, कर्मवाद व नियतिवाद या पाचांच्या समन्वयाने होते, असे सांगितले. जैनांचा उदारमतवाद दर्शविणारी अनेक उदाहरणे अशाप्रकारे देता येतील. परंतु याच बरोबर असेही लक्षात ठेवले पाहिजे की वैदिक म्हणा, ब्राह्मण म्हणा अथवा हिंदू म्हणा या परंपरेनेही तडजोड, बदल, परिवर्तने काळाच्या ओघात स्वीकारलेली दिसतात. ऋषभदेवांना आणि गौतमबुद्धांना पुराणांनी अवतारपद दिले. पशुबलीप्रधान यज्ञ कालांतराने हिंसारहित बनले. स्वाध्याय, ज्ञान, तप इ. ना यज्ञाचा दर्जा दिला.३८ शंकराचार्यांसारख्या अद्वैत वेदांताने प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा तीन सत्तांचा सिद्धांत मांला. कोणतेही कार्य पाचांच्या समवायाने होते, हे विधान तर भगवद्गीतेत जसेच्या तसे आहे.३९ वेदांपासून आरंभ झालेली ही परंपरा, प्रथम ब्राह्मण परंपरा म्हणून परिवर्तित झाली व नंतर तीच पुराणकाली भक्तिप्रधान झाली. म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भावाचा सिद्धांत फक्त जैनांनीच मांडला, असा अभिनिवेश सोडून देणे आवश्यक आहे. आता एकगोष्ट मात्र खरी की, कोणतेही विधान फक्त विशिष्ट अपेक्षेनेच सत्य असते, असे म्हणून आणि सद्वस्तूला अनंत धर्मात्मक मानून जैनांनी सापेक्षतावाद आणि अनेकांतवाद, सैद्धांतिक रूपाने यथार्थतेने मांडला. त्यासाठी ‘आइनस्टाइन' सारख्या वैज्ञानिकानेही जैनांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.४० यातील खरी मेख अशी आहे की, या सापेक्षतावादात दडलेली वैज्ञानिक समीकरणे व सूत्रे जैनही तयार करू शकले नाहीत व हिंदूही तयार करू शकले नाहीत. * स्त्रीविषयक दृष्टिकोण * मध्ययुगापर्यंतच्या काळात हिंदुधर्मात व समाजात, स्त्रियांचे स्थान अतिशय दुय्यम होते, असे अभ्यासक म्हणतात. जैन धर्माने प्रथमपासूनच साधुंबरोबर साध्वींना व श्रावकांबरोबर श्राविकांनाही संघात स्थान दिले. शिवाय बोलीभाषेत उपदेश देऊन, स्त्रियांनाही समजू शकेल अशा भाषेत धार्मिक कार्य केले. महावीरांचे चरित्र लिहताना अनेकांनी 'नारि जाती के उद्धारक' असा त्यांचा गौरव केलेला दिसतो. पण याबाबत असे म्हणावेसे वाटते की, महावीरांचे हे कार्य धार्मिक आणि आध्यात्मिक बाबतीत होते. आणि त्यातही कुंदकुंदांसारख्या दिगंबर आचार्यांनी स्त्री जन्मातून स्त्रीला मोक्ष नाही असेही नोंदविले आहे. जैन स्त्रीची कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती मात्र भारतल्या हिंदू स्त्रीसारखीच होती. साध्वींना जरी धर्मात स्थान होते तरी साधूंच्या तुलनेने साध्वींना नेहमीच दुय्यम स्थानावर ठेवले गेले. आजतागायत साध्वींना दुय्यम लेखण्याची ही स्थिती कायम आहे. उत्तराध्ययनासारख्या अर्धमागधी ग्रंथात स्त्रीलिंगसिद्धा, पुरुषलिंगसिद्धा, नपुंसकलिंगसिद्धा असे उल्लेख येणे, ज्ञाताधर्मकथासारख्या ग्रंथात ‘मल्ली' ही स्त्री तीर्थंकर असणे,४२ जयंतीसारख्या बुद्धिमती श्राविकेचा सन्मानपूर्वक उल्लेख असणे, इ. उल्लेखांवरून असे म्हणावेसे वाटते की, आगमांमध्ये जैन स्त्रीचे स्थान दुय्यम असले तरी समकालीन हिंदू अगर बौद्ध स्त्रीपेक्षा त्यामानाने बरेच श्रेष्ठ होते. * यज्ञ संकल्पना * जैन ग्रंथात येणाऱ्या यज्ञविरोधी धोरणात, काळानुसार स्थित्यंतरे येत गेली, असे दिसून येते. आगमकाळात यज्ञाला स्पष्टत: विरोध न करता, हिंसा-अहिंसेच्या विवेचनातून तो व्यक्त होतो. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________ शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत, सर्व प्रकारच्या यज्ञांना होणाऱ्या विरोधाची धार, हळुहळू अधिकाधिक तीव्र होत गेली. धर्मोपदेशमालाविवरण ग्रंथात, यज्ञाला स्पष्टत: नरकगतीचे कारण मानले आहे.४४ __ हिंसक यज्ञाच्या विरुद्ध दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियांमुळे, ब्राह्मण परंपरेला यज्ञाचा पुनर्विचार करावा लागला. हिंसक यज्ञाचे प्रचलन कमी कमी होऊ लागले. यज्ञचक्रप्रवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या भगवद्गीतेलाही, द्रव्ययज्ञाबरोब्य ज्ञान, स्वाध्याय, तप इ. ची गणना यज्ञात करावी लागली. दहाव्या शतकानंतर ब्राह्मणधर्माच्या प्रभावाने, यज्ञपद्धती पूजारूपात व क्रियाकाण्डात्मक रीतीने जैनधर्मात येऊ लागली. आजही जैनांमध्ये मोठ्या प्रमाणात यज्ञाचे आयोजन होत नसले तरी छोटे होम, गृहस्थांच्याद्वारे केले जातात. शिवाय हिंदू धर्माच्या सानिध्याने विवाह प्रसंगी अमिहोम हा केला जातोच. अशा प्रकारे जैन व हिंदू समाजात अनेक बाबतीत आचाराचे आदान-प्रदान चालू असलेले दिसते. * अवतारवाद * अवतारवाद प्रामुख्याने हिंदू पुराणग्रंथात स्पष्टपणे मांडला गेला. भगवान विष्णूने साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी अवतार घेणे आणि अवतार कार्य संपताच निजधामी परत जाणे',४५ ही संकल्पना पुराणांनी हिंदू मनात खोलवर रूजवली. जैन परंपरेत मात्र सर्व तीर्थंकर, जिन, केवली हे मनुष्ययोनीत जन्मतात व स्वत:च्या आत्मिक विकासाने निर्वाणपदास जातात. सिद्धगतीत गेल्यावर हे जीव पुन्हा जगाच्या अनुकंपेने परत भूतलावर अवतरत नाहीत. ___ बौद्धधर्म हा स्वतंत्रधर्म असूनही, गौतमबुद्धांना पुराणांनी दहा अवतारात स्थान दिले. त्याची कारणे काहीही असोत. महावीरांचा मात्र हिंदुग्रंथात विशेषतः पुराणात, कोठेही नामनिर्देश सुद्धा नाही. भागवतपुराणात ऋषभदेवंचा 24 अवतारात समावेश केला गेला, कारण त्यांची प्रवृत्तिपरकता आणि एकंदर जीवनक्रम पुराणकारांना हिंदुधर्मासारखा वाटला असावा. भगवान महावीरांना मात्र पौराणिकांनी आपलेसे केले नाही. याचाच अर्थ असा की, महावीरवाणीसू प्रकट होणारी विचारधारा, पौराणिकांना मानवली नसावी. शिवाय महावीरांचा दृष्टिकोण टीका व उपहासात्मक नसल्यामुळे, त्यांना ते दखलपात्र वाटले नसावेत. शिवाय ज्या काळात गौतमबुद्धाला अवतार म्हटले गेले, त्याकाळात बौद्धधर्माचा प्रसार अधिक झाला असावा. ऋषभदेवांचा अवतारात समावेश असणे व महावीरांचा अवतारात समावेश नसणे, यातील कोणती गोष्ट श्रमणधर्माच्या स्वतंत्रतेला पोषक आहे व कोणती पोषक नाही, हा विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. * पितर संकल्पना * पितर, पिंड, श्राद्ध इ. संकल्पना वैदिक परंपरेत, ऋग्वेदापासून सर्व वेद, तैत्तिरीय ब्राह्मण व आरण्यक, छांदोग्यासारखी उपनिषदे, मनु, याज्ञवल्क्य इ. स्मृतिग्रंथ, कौटिलीय अर्थशास्त्र, रामायण, महाभारत, जवळजवळ सर्व पुराणे आणि पूर्वमीमांसा दर्शन या सर्वांमध्ये दिसून येते. श्राद्धविधिविषयक स्वतंत्र ग्रंथनिर्मितीही झालेली झिते. भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व जातिजमातींमध्ये पितर संकल्पना आणि त्याच्याशी जुळलेले श्राद्ध इ. विधी केले जातात. जैन परंपरेने हिंदू संस्कार, व्रतवैकल्य, पूजाअर्चा हे सर्व विधी थोड्याफार फरकाने आत्मसात केले असले तरी, पितर संकल्पना ही जैन सिद्धांताच्या पूर्ण विपरीत असल्याने स्वीकारली नाही. जैन दार्शनिक मान्यतेनुसार मनुष्यगतीतील जीव पुढील जन्मात देव, मनुष्य, नारकी किंवा तिर्यंच कोणत्याही रूपाने आपल्या कर्मानुसार जन्मते. शिवाय वर्तमान जन्म व पुढचा जन्म यामध्ये फक्त काही समयाचेच (क्षणाचे) अंतर असते.त्यामुळे मधील काळात पितृलोक नावाच्या ठिकाणी वसती करणे इ. संकल्पना, जैन दर्शनात बसत नाही. द्रव्य-क्षेत्र-काल-भाव-भव अशा पंचविध संसारात, प्रत्येक जीव इतर जीवांच्या अनेक वेळा संपर्कात येऊन, क्रमाक्रमाने माता-पिता-पुत्रकन्या इ. झालेला आहे. हिंदू दृष्टीने ज्या तीन पिढ्यातील पितरांना तर्पण इ. केले जाते, ते जीव जैन दृष्टीने केव्हाच
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________ वेगवेगळ्या गतीत जन्मलेले असतात. अशा परिस्थितीत कोणाला आपले पितर मानून श्राद्ध, तर्पण अथवा पिंड प्रदान करणार ? असा कळीचा मुद्दा आहे. * पंचमहाभूते व पाच एकेंद्रिय जीव * वैदिक मान्यतेनुसार पृथ्वी, अप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. ती जड अर्थात् निर्जीव आहेत.४८ तैत्तिरीय उपनिषदात त्यांचा एक विशिष्ट क्रम सांगितला आहे. तो असा - आत्मन: आकाश: संभूतः / आकाशाद्वायुः / वायोरग्निः / अग्नेरापः / अद्भ्यः पृथिवी / पृथिव्या ओषधयः / ओषधीभ्योऽन्नम् / अन्नात्पुरुषः / 49 सांख्यदर्शनात प्रकृति, महत्, अहंकार, पंचतन्मात्रे व क्रमाक्रमाने पंचमहाभूते असा क्रम वर्णिला आहे.५० जैन परंपरेला हा दृष्टिकोण सर्वथा अमान्य आहे. त्यांनी पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजस्कायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक यांना एकेंद्रिय जीव मानले आहे. पहिला फरक असा की हे जड नाहीत. दुसरा फरक असा की आकाश हे जड म्हणजे अजीव आहे. परंतु त्याची गणना षद्रव्यांमध्ये केली आहे.५१ वनस्पतिकायिकाला पृथ्वी इ. चारांच्या जोडीने एकेंद्रिय मानले आहे. शिवाय चैतन्यमय आत्म्यापासून, चेतनाहीन पंचमहाभूते निर्माण होण्याचा वैदिकांवर असलेला अतयं प्रसंग, जैनांनी टाळला आहे. पृथ्वी इ. ना एकेंद्रिय मानल्यामुळे, अहिंसा तत्त्वाला भक्कम आधार मिळाला आहे. त्यामुळे जैनधर्म पर्यावरण रक्षणालाही अनुकूल बनला आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी परमेश्वराचे अस्तित्व मानण्यापेक्षा, जैनांनी खरोखरीचे चैतन्यरूपच त्यांच्याठिकाणी कल्पिले आहे. * पाण्याचा वापर * स्नान, संध्या, पूजा, स्वच्छता, पाण्यात उभे राहून केलेली पुरश्चरणे हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. याउलट पाणी हे एकेंद्रिय जीव असल्याने, त्याचा अगदी गरजेपुरता, कमीत कमी वापर, हे जैन आचाराचे वैशिष्ट्य दिसते. त्यामुळे अर्थातच पाण्यात निर्माल्य अथवा अस्थींचे विसर्जन जैन आचाराच्या चौकटीत बसत नाही. 'पाण्याने शुद्धी मिळत असती तर सर्व जलचर जीव केव्हाच स्वर्गात पोहोचले असते', असे उपहासात्मक उद्गार, ‘सूत्रकृतांगा'सारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथातही आढळतात.५२ * विज्ञानानुकूलता * प्राचीन जैन प्राकृत ग्रंथात, त्या काळाच्या मानाने कितीतरी प्रगत वैज्ञानिक धारणा आढळून येतात. उदा. षद्रव्यांमधील धर्म, अधर्म या द्रव्यांमध्ये अपेक्षित असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती ; एका परमाणूवर राहणारे चार गुण, त्यांचे उपप्रकार व त्यातून निष्पन्न होणारी मूलद्रव्यांची संख्या ; तिर्यंचगतीच्या विवेचनात अंतर्भूत असलेला वनस्पतिविचार, प्राणिविचार व पक्षीविचार ; ध्वनी अर्थात् शब्दाला आकाशाचा गुण न मानता पौद्गलिक मानणे - हे सर्व विचार वस्तुतः आजच्या विज्ञानालाही त्यामानाने कितीतरी अनुकूल आहेत. अभ्यासक हेही मान्य करतात की जैनांचा पुद्गल व स्कंध विचार कणादांच्या परमाणूवादापेक्षा अर्थात् वैशेषिकांच्या परमाणूवादापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे. हीच गोष्ट इतरही उदाहरणांबाबत सांगता येईल. प्रयोगशील विकासाची जोड या विचारांना न मिळायामुळे, प्रगत शास्त्रनिर्मितीची संभावना असूनही, जैन परंपरेत त्या त्या प्रकारची विज्ञाने निर्माण होऊ शकली नाहीत. याउलट आयुर्वेद, खगोल, भूगोल, ज्योतिष, गणित, परमाणुवाद, अर्थशास्त्र अशी शास्त्रे वैदिक परंपरेत तयार झाली व तत्कालीन शिक्षण पद्धतीत अंतर्भूतही झाली. * पुरुषार्थविचार * ___प्राच्यविद्यांचे अभ्यासक साक्षेपाने नोंदवतात की, प्रवृत्तिपर वैदिक परंपरेत आरंभी धर्म, अर्थ व काम हे तीनच
Page #99
--------------------------------------------------------------------------
________________ पुरुषार्थ होते. निवृत्तिवादी श्रमण परंपरांच्या प्रभावाने 'मोक्ष' हा चौथा पुरुषार्थ त्यात दाखल झाला.५३ वैदिकांनी या चारही पुरुषार्थासंबंधी विपुल लेखन केले. धर्मशास्त्रे व मोक्षशास्त्रे तर निर्माण केलीच पण कामशास्त्रे व अर्थशास्ती निर्माण केली. याउलट जैन परंपरेत 'मोक्ष' या पुरुषार्थाचेच सदैव प्राधान्य राहिले. अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थांसंबंधी फारसा गंभीर विचार झालाच नाही. * योग शब्दाचा विशेष अर्थ * पातजंलयोगदर्शनाचा 'योग' म्हणजे 'चित्तवृत्तिनिरोध'.५४ 'यमनियमादि आठ अंगांनाही तेथे 'योग' म्हटले आहे.५५ भगवद्गीतेत योग शब्द वेगवेगळ्या अर्थांनी येतो. 'समत्वं योग उच्यते'५६, 'योगः कर्मसु कौशलम्'५७ ही वचने तर सुप्रसिद्ध आहेत. त्याखेरीज भगवद्गीतेत अध्यायाच्या प्रत्येक नावालाही 'योग' शब्द लावला आहे.५८ जैन परंपरेनेही आ. हरिभद्रकृत योगबिंदु, योगशतक इ. ग्रंथांच्या शीर्षकामध्ये वैदिक परंपरेतील हाच अर्थ दिसून येतो. पण याखेरीज मन-वचन-कायेच्या सर्व हालचाली म्हणजे कर्मे म्हणजे 'योग' होय.५९ ह्या व्याख्येतून 'युज्' धातूशी जुळणाऱ्या, योग शब्दाच्या वेगळ्याच अर्थावर प्रकाश टाकला आहे. मन-वचन-कायेच्या हालचाली या अर्थाने योग शब्द वापरून, तीन योगांनी व तीन करणांनी अर्थात् ‘तिविहं तिविहेणं' ही पदावली जैन तत्त्वज्ञानात व आचारातही अतिशय रूळली आहे. वैदिक परंपरेत रूढ असलेल्या अनेक शब्दांना जैन परंपरा वेगळेच पारिभाषिक अर्थ प्राप्त करून देते. त्यापैकी योग ही एक विशेष संकल्पना आहे. * 'सती' शब्दाचा विशेष अर्थ * __ हिंदू पौराणिक परंपरेत ‘पतिव्रता' ह्या अर्थाने वापरण्यात येणारा सती हा शब्द, मध्ययुगीन काळात पतीच्या चितेवर आरूढ होणाऱ्या, पतिव्रता स्त्रीसाठी वापरण्यात येऊ लागला. गेल्या दोन-तीन शतकात तरी, हिंदू परंपरेत तो याच अर्थाने रूढ झालेला दिसतो. राजा राममोहन रॉय' आदि सुधारकांनी, या अनिष्ट रूढीबद्दल खूप आवाज उठवला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात, या अनिष्ट रूढीला उत्तेजन देणाऱ्यांविरूद्ध, कडक कायदा केलेला दिसतो. जैन परंपरेत काळाच्या कोणत्याच टप्प्यावर, अशा प्रकारच्या सती प्रथेला स्थान नाही. आदरणीय साध्वींना जैन परंपरा, सती अगर महासती संबोधते. अशा प्रख्यात सोळा महासतींचा गौरव, जैन परंपरेने आदरपूर्वक केला आहे. * संस्कृत आणि लोकभाषा * वेदांपासून आरंभ करून पुराणांपर्यंत वैदिक, ब्राह्मण अथवा हिंदू परंपरेत नेहमीच संस्कृतला अग्रस्थान मिळत राहिले. मराठी साहित्याबाबत बोलायचे झाले तर सुमारे दहाव्या-अकराव्या शतकापासून मुकुंदराज महानुभाव पंथ आणि नंतर बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी समकालीन धार्मिक रचनांना आरंभ केला. जैन परंपरेत मात्र लोकभाषेत धर्मोपदेश करण्याचा प्रघात आरंभापासूनच होता. केवळ महावीरांनीच नव्हे तर आधीच्या सर्व तीर्थंकरांनी सुद्धा, लोकभाषेतून उपदेश केला असावा. म्हणूनच जैनांचे इसवी सनापूर्वीचे आगम किंवा आम्नायग्रंथही, अर्धमागधी व शौरसेनी या लोकभाषातून लिहलेले दिसतात. म्हणजेच धार्मिक वाड्.मय लोकभाषेत असावे, ही संकल्पना जैन परंपरेत, हिंदू परंपरेपेक्षा 1000 वर्षांनी जुनी दिसते. अर्थात् आम समाजाच्या मनोरंजनाचे साधन असलेली संस्कृत नाटके व काव्य यांच्यासाठी, हिंदू परंपरेनेही प्राकृत अर्थात् लोकभाषांचा वापर केलेला दिसतो.
Page #100
--------------------------------------------------------------------------
________________ * तिर्यंचगतीचा विशेष विचार * ___जैन परंपरेत सैद्धांतिक दृष्ट्या तिर्यंचगतीची व्याप्ती पुष्कळच आहे. प्रस्तुत ठिकाणी आपण केवळ पशु-पक्षी सृष्टीचा विचार करीत आहोत. आधुनिक काळात जगभरातील प्रणिशास्त्राचे अभ्यासक, वैविध्याने नटलेल्या पशुपक्षी सृष्टीचा, अनेकविध अंगांनी अभ्यास करून, त्यांचे चित्रीकरण करून, त्यांवर आधारित अशा उत्कृष्ट वैज्ञानिक ग्रंथांची निर्मिती करत आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, प्रज्ञापना, जीवाभिगम यांसारख्या अर्धमागधी ग्रंथात आणि त्रिलोकप्रज्ञप्ति, गोम्मटसार (जीवकांड) सारख्या शौरसेनी ग्रंथात, प्राणिसृष्टीविषयीचे मौलिक विचार नोंदविलेले दिसतात. तिच्यांच्या देखील गति, जाति, इंद्रिये, शरीर, लिंग, पर्याप्ति, प्राण, कषाय, लेश्या, ज्ञान, आयुष्य इ. विविध अंगांनी विचार केला आहे. मुख्य म्हणजे कर्मसिद्धांतही त्यांच्याबाबत उपयोजित करून दाखविलेला आहे. केवळ सिद्धांतग्रंथातच नव्हे तर कथाग्रंथातही त्याची उदाहरणे सापडतात.६० जैन ग्रंथातील हे मार्गदर्शन, प्राणिशास्त्राच्या आधुनिक अभ्यासाला पूरक ठरू शकेल असे वाटते. हिंदू ग्रंथांतून अशा प्रकारचे मार्गदर्शन अतिशय अल्प आढळते. * मुक्त जीवांचे अस्तित्व * ____चार्वाक सोडून प्राय: सर्व भारतीय दार्शनिकांनी अथवा विचारवंतांनी मोक्ष संकल्पना मांडली आहे. मोक्षानंतर मुक्त जीवांचे अस्तित्व, स्वतंत्र स्वतंत्र स्वरूपात कायम राहते, हा सिद्धांत मात्र केवळ जैनांचाच आहे. अशा प्रकारे सिद्ध किंवा मुक्त जीवांची व्यवस्था, ब्राह्मण परंपरेत कुठेही लावलेली दिसत नाही. एकदा प्रत्येक जीवाची स्वतंत्र सत्ता अर्थात् अस्तित्व मानल्यानंतर, ती सत्ता नाहीशी करणे किंवा दुसऱ्यात विलीन करणे, जैन सिद्धांताला धरून नसल्याने मुक्त जीवांचे अशा प्रकारचे अस्तित्व मानले आहे. * व्यक्तिमत्वांचे जैनीकरण * जैनांच्या समन्वयवादाचे एक बोलके उदाहरण म्हणजे त्यांनी राम, लक्ष्मण, रावण, हनुमान, कृष्ण, नारद, पांडव, जरासंध, सीता, अंजना, मंदोदरी, कैकेयी, द्रौपदी, रुक्मिणी या आणि अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या जैनीक्याचे प्रयत्न आपल्याला पुराणकाव्य व चरितग्रंथातून केलेले दिसते. 24 तीर्थंकर वगळता, शलाकापुरुष, कामदेव इ. ची जैन परंपरेने तयार केलेली चौकट, बहधा या सर्व अजैन व्यक्तिरेखांचे जैनीकरण करण्यासाठीच, योजलेली युक्ती असावी असे वाटते. जैनांनी या सर्व व्यक्तींना कितीही आपलेसे केले तरी जैनेतरच काय, जैनांच्या मनातही त्यंच्यावर असलेला हिंदुधर्माचा प्रभाव कायम आहे. म्हणून वाल्मीकि रामायण हे मुख्य प्रवाहातील रामायण ठरले आणि जैन रामायणे त्याच्या प्रतिकृती ठरल्या. * वर्गीकरणाची सूक्ष्मता * ___कोणताही एखादा मुद्दा विचारार्थ घेतल्यानंतर जैन परंपरेत त्याचे विवेचन अनेक प्रकार, उपप्रकार सांगून, तार्किकतेच्या शेवटच्या टोकापर्यंत, अतिशय सूक्ष्मतेने केले जाते. विचारांचा कोणताही धागा अपूरा ठेवणे, ही जैनधर्माची प्रकृति नाही. कर्मसिद्धांत सांगायला लागल्यानंतर, कर्माचे आठ प्रकार म्हणजे मूल प्रकृति, त्या प्रत्काच्या उत्तर प्रकृति, घाति-अघाति कर्म, कर्म आणि गुणस्थान या आणि अशा अनेक प्रकारे कर्मसिद्धांत सांगितला आहे.१ इतकेच नव्हे तर याविषयीची एक स्वतंत्र कर्मसाहित्यविषयक शाखाच तयार झाली आहे. दुसरे उदाहरण जीवतत्त्वाच्या विचारासंबंधीचे घेता येईल. जीवांचे संसाराच्या दृष्टीने, हालचालीच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, इंद्रियांच्या दृष्टीने, गतीच्या दृष्टीने, शरीरांच्या प्रकारांच्या दृष्टीने, वेद अर्थात् लिंगांच्या दृष्टीने, योनि अर्थात् जन्मस्थानाच्या दृष्टीने वर्गीकरण आणि विवेचन केलेले दिसते.६२ याउलट वैदिक परंपरेत वर वर्णन केलेली कर्मसिद्धांताची व जीवविचाराची संकल्पना, एवढ्या सूक्ष्मतेने स्पष्ट
Page #101
--------------------------------------------------------------------------
________________ केलेली दिसत नाही. वैकुंठ, कैलास, पितृलोक यांचे स्वर्गातील नेमके स्थान स्पष्ट होत नाही. जाति-वर्णव्यवस्था स्वीकारल्यामुळे, चारही वर्णांचा व चारही आश्रमांचा व्यवस्थित आचार, हिंदू परंपरेने व्यवस्थित सांगणे अपेक्षित होते. तथापि हिंदू धर्मशास्त्रात बराचसा आचार, ब्राह्मण केंद्री दिसतो व ब्राह्मणांच्या बाजूने पक्षपातीही दिसतो. याउलट जैनांचा साधुआचार व गृहस्थाचार अनेक ग्रंथात विस्तृतपणे सांगितला आहे. सारांश काय, तर सूक्ष्मता व चिकित्सा ही जैन परंपरेची वैशिष्ट्ये मानावी लागतात. * उपसंहार व निष्कर्ष * शोधलेखात दिलेल्या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करता, असे म्हणावेसे वाटते की, जैनधर्म आणि हिंदुधर्म यांच्यात कमीत कमी गेली 2600 वर्षे तरी, बाह्यआचारामध्ये क्रियाप्रतिक्रियात्मक आंदोलणे चालू आहेत. वरकरण पाहता जैनधर्मीय हे, अनेक बाबतीत हिंदू धर्मीयांच्या कितीही जवळ गेल्यासारखे वाटले तरी, त्यांच्या सैद्धांतिक भूमिका व जीवनविषयक दृष्टिकोण, यात मूलगामी भेद असल्यामुळे, जैनधर्मी हे अल्पसंख्य असूनही, हिंदू धर्मामध्ये विलीन होऊन गेले नाहीत. अल्पसंख्य असूनही जैनत्व अबाधित ठेवण्यासाठी, त्यांना कुटुंबातून मिळणारे संस्कार, साधुवर्ग, तीर्थक्षेत्रे व मंदिरे, श्रावक संघ आणि जैन समाजाची घट्ट असलेली वीण, हे घटक प्रामुख्याने उपयोगी पस आले आहेत. आजूबाजूच्या समाजाशी समरस होऊनही, आपली पृथगात्मकता ते अशाच प्रकारे टिकवून ठेवतील, असा विश्वास वाटतो. ** ********
Page #102
--------------------------------------------------------------------------
________________ 20. उत्तराध्ययन आणि धम्मपद ('सन्मति-तीर्थ वार्षिक पत्रिका', जून 2008) जैन आणि बौद्ध या श्रमण परंपरेच्या दोन धारा आहेत. बौद्धांच्या मानाने जैन परंपरा कितीतरी अधिक प्राचीन आहे. जैनांचे आज उपलब्ध असलेले साहित्य मात्र ‘महावीरवाणी' या नावानेच प्रसिद्ध आहे. श्वेतांबर संप्रदाय अर्धमागधी भाषेतील 45 अगर 32 आगमग्रंथांना प्रमाण मानतो. त्यांचे अंग, उपांग असे 6 उपविभाग केले आहेत. त्यापैकी 'मूलसूत्र' या उपविभागात उत्तराध्ययन, आवश्यक व दशवैकालिकाचा समावेश होतो. उत्तराध्ययनसूत्राचा अभ्यास श्वेतांबर परंपरेत विशेषच केला जातो. त्यातील विषयांची विविधता, मांडणी, पद्यमयता, काव्यगुण यामुळे त्याची लोकप्रियताही खूप आहे. उत्तराध्ययनाचा अभ्यास केवळ त्या ग्रंथापुरताच न राहता, त्याला काही तौलनिक अभ्यासाचे परिमाण लाभावे अशी नव्या युगाच्या ज्ञानसंकेतांची मागणी आहे. वैचारिक कक्षा रुंदावत आहेत. परस्पंख्या संकल्पना समजावून घेणे ही सामाजिक गरजही निर्माण झाली आहे. श्रमणपरंपरेतील दुसरा प्रवाह ‘बौद्ध दर्शन' हे अनेक दृष्टींनी जैन मान्यतांशी मिळतेजुळते आहे. वेदांची मान्यता व सर्वश्रेष्ठत्व नाकारणे, हिंसक यज्ञांना विरोध करणे, जात्याधार चातुर्वर्ण्याचा निषेध, स्वतंत्र श्रामणिक साहित्याची निर्मिती, अशी काही प्रमुख साम्ये दिसतात. भ. महावीर व भ. गौतम बुद्ध हे प्राय: समकालीन. त्यांच्या कार्यप्रवृत्तही प्राय: समान प्रांतात राहिल्या. दोघांच्या धर्मभाषाही ‘मागधी' भाषेशी संबंधितच होत्या. उत्तराध्ययनाशी ज्या बौद्ध ग्रंथाचे बहिरंग व अंतरंग साम्य आढळते, असा ग्रंथ म्हणजे पाली भाषानिबद्ध धम्मपद' होय. दोन्ही ग्रंथ इसवी सनापूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकात अंतिम संस्करणाच्या स्वरूपात आले. धम्मपद हा काही कोणा एका व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ नसून तो केवळ एक गाथा-संग्रह आहे. वेगवेगळ्या बौद्ध आचार्यांनी त्या निरनिराळ्या प्रसंगी लिहिल्या आहेत. गौतम बुद्धाच्या विचारसरणीच्या त्या निदर्शक असल्यामुळे, त्या बुद्धाच्या नावावर घातल्या गेल्या. सुप्रसिद्ध त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक' भागात, 'खुद्दकनिकाय' हा उपविभाग आहे. त्यात एकूण 15 ग्रंथ आहेत. त्यापैकी एक ग्रंथ ‘धम्मपद' आहे. सुप्रसिद्ध जातककथाही ह्याच खुद्दकनिकायात आहेत जैन परंपरा उत्तराध्ययनास अंतिम महावीरवाणी मानते. तथापि त्याच्या 36 अध्ययनांपैकी काहीच अध्ययने महावीरकथित असून, काही परवर्ती जैन आचार्यांनी रचून त्यात घातली आहेत, हे तथ्य आता विद्वज्जगतात मान्य झालेले आहे. उत्तराध्ययनात 36 अध्ययने आहेत तर धम्मपदात 26 वर्ग (वग्ग) आहेत. उत्तराध्ययनामधील 'नमिप्रव्रज्या' या नवव्या अध्ययनातील दोन गाथा धम्मपदातील 'बालवग्ग' (7.11) आणि 'सहस्सवग्ग' (8.4) यातील दोन गाथांशी तंतोतंत जुळतात. 'युद्धात हजार पटींनी हजार माणसांना जिंकण्यापेक्षा, जा स्वत:स एकट्यास संयमपूर्वक जिंकतो, तो सर्वश्रेष्ठ होय'-हा विचार दोन्ही परंपरांनी शिरोधार्य मानला आहे धम्मपदातील पहिल्या ‘यमकवर्गातील परस्परविरोधी गाथांच्या जोड्या उत्तराध्ययनातील पहिल्या 'विनय' अध्ययनाची आठवण करून देतात. प्रमाद आणि अप्रमाद यांचे वर्णनही दोहोत समान आहे. धम्मपदात 'अप्पमादवग्ग' आहे तर उत्तराध्ययनामधील 10 व्या द्रुमपत्रक अध्ययनात ‘समयं गोयम मा पमायए' अशी सूचना गौतमस्वामींना वारंवार दिलेली दिसते. अज्ञानी व्यक्तीला 'बाल' आणि ज्ञानी व्यक्तीला दोन्ही ग्रंथात 'पंडित' अशी संज्ञा दिसते. 'तण्हावग्गा'त ज्या तृष्णेची निंदा केलेली दिसते, तोच आशय जहा लाहो तहा लोहो, लाहा लोहो पवड्डई' अशभाषेत उत्तराध्ययनामध्ये आढळतो. 'भिक्खुवग्ग' आणि 'सभिक्ख' अध्ययन यातील साम्य थक्क करणारे दिसते. दोहोतही काया-वाचा-मनाच्या संवराला (संयमाला) महत्त्व दिले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जन्मजात जातींचा विरोध करून दोन्ही ग्रंथात तं वयं बूम माहणं' अशा शब्दात खऱ्या ब्राह्मणाची लक्षणे दिली आहेत. भ. महावीर व बुद्ध यांची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समान असल्यामुळे दोन्ही ग्रंथात अनेक उपमा, दृष्टांतही समान दिसतात. वायने न हालणारा पर्वत (उत्त.२१.१९ ; धम्म.६.७); लोकांच्या गायी मोजणारा गुराखी
Page #103
--------------------------------------------------------------------------
________________ (उत्त.२२.४५, धम्म.१.२०) ; राखेत लपलेला अग्नी (उत्त.२५.१८, धम्म.५.१२) ; बेटासारखे स्थिर असणे (आचारांग 1.6.5.5, धम्म. 2.5) अशी शेकडो उदाहरणे देता येतील. भिडूंच्या आहाराविहाराविषयीची वाक्ये, शब्दयोजना वगैरेत पुष्कळच साम्य केवळ धम्मपदातच नव्हे तर इतर पाली व जैन प्राकृत ग्रंथातही आढळून येते. वरील साम्यस्थळे पहाणाऱ्यास कदाचित् असे वाटेल की दोन्ही ग्रंथ अगदी एका साच्यातून काढलेले दिसतात. काव्यमयता, सामान्य सदाचार, नीतिनियम, सुभाषितांची पखरण, जाता जाता सामाजिक परिस्थितीवर केलेले भाष्य इत्यादि बाबतीत दोन्ही ग्रंथात समानता असली तरी त्यांचे अंतरंग मात्र वेगळे आहे. धम्मपदापेक्षा उत्तराध्ययनाचे मल जाणवलेले वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न येथे करते. उत्तराध्ययनात प्रत्येक अध्ययनाचा उद्देश, प्रतिपाद्य व पार्श्वभूमी निरनिराळी आहे. विषयांची अथवा कल्पनांची कोठेही पुनरावृत्ती नाही. काही अध्ययने केवळ उपदेशपर, काही तत्त्व व सिद्धांतप्रधान, काही कथात्मक, काही संवादात्मक तर काही सर्वस्वी आचारप्रधान आहेत. जैन विचारांचा कणा असलेले प्रायः सर्व सिद्धांत विविध अध्ययनात गोवले आहेत. विनय, परीषह, चतुरंग, अकाम-सकाम मरण, अष्ट प्रवचनमाता, सामाचारी, मोक्षमार्गगति, तपोमार्ग, कर्मप्रकृति, लेश्या आणि जीवाजीवविभक्ति ही काही नावे देखील उत्तराध्ययनाच्या मौलिक सिद्धांतदृष्टीवर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. वस्तुत: धम्मपदातून देखील त्रिरत्न, पंचशील, चार आर्यसत्ये, द्वादशनिदान, प्रतीत्यसमुत्पाद इ. प्रमुख बौद्ध सिद्धांतांचे मार्गदर्शन आपण अपेक्षितो. परंतु 1-2 गोष्टींचा अपवाद वगळता धम्मपद बौद्ध तत्त्वज्ञानाच्य गाभ्याला स्पर्श करू शकलेले नाही असेच म्हणावेसे वाटते. कदाचित् साध्या-सोप्या भाषेत सदाचरणाचा उपदेश हेच धम्मपदामागचे प्रयोजन असू शकेल. क्लिष्ट, पारिभाषिक शब्दयोजनेचा अभाव, साधे, सोपे नैतिक विचार आणि सुंदर भाषा यामुळे धम्मपदाला विलक्षण लोकप्रियता मात्र लाभली. धम्मपदाची संस्कृत, तिबेटी व चिनी संस्करणेही झाली. सिलोन, ब्रह्मदेश, थायलंड कंबोडिया ह्या देशातील तरुण भिडूंचा व गृहस्थाश्रमी उपासकांचाही हा नित्य पाठांतरातील ग्रंथ आहे. उत्तराध्ययनाच्या जैन अभ्यासकांनी पाली भाषेतील 'धम्मपदा'चा जरूर विशेष अभ्यास करावा यासाठी हा लेखन प्रपंच !! **********
Page #104
--------------------------------------------------------------------------
________________ जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख) भाग - 5 * लेखन व संपादन * डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ ऑगस्ट 2011
Page #105
--------------------------------------------------------------------------
________________ 21. जैनधर्म व शीखधर्म : काही तुलनात्मक निरीक्षणे (सन्मति-तीर्थ वार्षिक पत्रिका, जून 2009) (ज्ञान व माहितीचा प्रसार हे एकविसाव्या शतकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व जग झपाट्याने जवळ येत आहे. सर्व धर्म व संप्रदायांच्या माणसांना फक्त आपला धर्म आणि संप्रदायापुरताच संकुचित विचार करून चालणार नाही. जगात शांतता आणि सलोखा नांदायचा असेल तर एकमेकांच्या धर्माचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जैन धर्मात तर इतरांच्या मतांचा आदर करणे हे तत्त्वत: अनेकान्तवाद आणि स्याद्वादाच्या रूपाने मान्यच केले आहे. याच उद्दिष्टाने प्रेरित होऊन सन्मति-तीर्थ संस्थेत प्रगत अभ्यासक्रमाच्या रूपाने जगातल्या सर्व प्रमुख धर्मांची तोंडओळख विद्यार्थ्यांनी करून घेतली. 2008-2009 या वर्षात शीखधर्माविषयी जे चिंतन केले त्यातून पुढील तौलनिक निरीक्षणे मांडली आहेत.) विश्वकोशातील माहितीप्रमाणे शीखधर्म हा जगातील पाचवा मोठा धर्म आहे. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, हिंदू आणि शीख हा त्यांचा क्रम आहे. साहजिकच भारतात सर्वात उशिरा जन्माला आलेला हा धर्म आज संख्येच्या दृष्टीने जैनांपेक्षाही जास्त आहे. इ.स. च्या 15 व्या व 16 व्या शतकात शीखधर्माचा प्रारंभ व क्रमाक्रमाने विकास होऊ लागला. अभ्यासकांचा असा अंदाज आहे की जगभरात 2 कोटी 30 लाख लोक शीखधर्मी आहेत. जैनधर्म परंपरेने अनादि मानला आहे. लेखी पुराव्यानुसार तो ऋग्वेदाहनही नक्की प्राचीन आहे. जैनधर्माचा इतिहास पाहू लागल्यास असे दिसते की स्थानकवासी संप्रदाय ज्या काळात निर्माण झाला साधारणत: त्याच काळात शीखधर्माचाही उदय झाला. उशिरा स्थापन होऊनही शीखधर्मीय संख्येने जास्त असण्याची कारणे नक्कीच त्या धर्माच्या वैशिष्ट्यांमध्ये सामावलेली आहेत. क्लिष्ट तत्त्वज्ञान, अवघड परिभाषा, आचाराचा कडकपणा, खाण्यापिण्यावरील निर्बंध आणि साधुवर्गाला पायीच विहार करून प्रसार करण्याचा असलेला नियम यामुळे जैनधर्माच्या प्रसाराला साहजिकच मर्यादा पडल्या. वरील सर्व बाबतीत शीखधर्म सहजसुलभ व उदारमतवादी दिसतो. शीख' हा जरी 'धर्म' म्हणून ओळखला जात असला तरी तो वस्तुत: हिंदूधर्माचा एक संप्रदायच आहे. गुरू नानकदेवांनी हिंदूधर्मातील अनिष्ट प्रथा व चालीरीतींमध्ये सुधारणा घडवून हा संप्रदाय स्थापला. शीख तत्त्वज्ञानावर सांख्य आणि वेदान्त तत्त्वज्ञानाची असलेली छाप तसेच ब्रह्म, परमात्मा, जगत्, ईश्वर, प्रकृति, पुरुष, माया इ. परिभाषाही शिखांनी हिंदू धर्मातूनच घेतलेली दिसते. जैनधर्म हा वैदिक, ब्राह्मण अथवा हिंदू धर्माची शाखा अगर संप्रदाय नसून तो एक स्वतंत्र श्रमणधर्म आहे. त्याची मूळ तत्त्वे, सिद्धान्त, ईश्वराविषयीची मान्यता, अहिंसा-संयम-तप-वैराग्य यांना असलेले प्राधान्य, हे सर्व त्या धर्माची स्वतंत्रता सिद्ध करण्यास पुरेसे आहे. काळानुसार बाह्य परिवर्तने येऊनही जैन धर्माचा गाभा तोच राहिला. ___ दोन्ही धर्मांच्या धार्मिक ग्रंथांच्या स्वरूपातही मूलगामी भेद आढळतात. दोन्ही धर्मांचे ग्रंथ त्या-त्या काळात बोलीभाषेत असणे', हे साम्य मात्र त्यात दिसते. गुरुग्रंथसाहिब या एकाच ग्रंथाला शीखधर्माने मूळ आगमग्रंथाचा दर्जा दिला आहे. जैनांमध्ये श्वेतांबर संप्रदायाने 45 अथवा 32 अर्धमागधी आगमग्रंथ मानले आहेत. दिगंबरीय लोक शौरसेनी भाषेतील प्राचीन ग्रंथांना आगमग्रंथ मानतात. याचा अर्थ असा की जैन आगमग्रंथ विस्ताराने व संख्येने कितीतरी अधिक आहेत. ग्रंथसाहिबातील पद्यांच्या विभागणीचा मुख्य आधार ‘रागानुसारी रचना' हा आहे. शीखधर्मात एकंदरीतच गायन आणि वादनाला महत्त्व असल्यामुळे ग्रंथसाहिबातील पद्ये रागांवर आधारित, गेय, रसाळ व भक्तिरसपूर्ण आहेत. याउलट गायनवादन इ. सर्व कलाविष्कार जैन साधूंसाठी पापश्रुत व वर्जनीय मानले आहेत. त्यामुळे काही जैन आगम छंदोबद्ध असले तरी गायनवादनाला त्यात स्थान नाही. शिवाय 'गुरु मानियो ग्रंथ' असे म्हणून शिखांच्या
Page #106
--------------------------------------------------------------------------
________________ दहाव्या गुरूंनंतर ते या ग्रंथालाच गुरुस्थानी ठेवतात. जैन लोक ज्ञानपंचमी अथवा श्रुतपंचमीला ग्रंथांची पूजा कीत असले तरी ते गुरुस्थानी मानीत नाही. उलट आगमग्रंथांचे ज्ञान प्रभावी उपाध्याय किंवा गुरूंकडूनच घेण्याचा प्रधात आहे. ग्रंथसाहिबात शीख धर्मातील गुरूंच्या पद्यरचनांबरोबरच जयदेव कवी, कबीर, नामदेव यांच्याही रचना सम्मीलि आहेत. यात दिसून येणारा उदारमतवाद आपल्याला ऋषिभाषितासारख्या एखाद्याच प्राचीन जैन ग्रंथात दिसतो. जैन धर्मात जसजसा कट्टरपणा वाढत गेला तसतशी इतरांची संभावना ते 'मिथ्यात्वी' अगर ‘पाखंडी' म्हणून करू लागले. अनेकान्तवादाशी विसंगत अशी ही गोष्ट हळूहळू या धर्मात शिरली. ___‘एक परिपूर्ण दर्शन' या दृष्टीने विचार करता जैन धर्मातील सर्वात अधिक प्रमाणित संस्कृत सूत्रबद्ध ग्रंथ 'तत्त्वार्थसूत्र' याचा निर्देश करता येतो. तत्त्वज्ञान, वस्तुमीमांसा, आचरण, ज्ञानमीमांसा व अध्यात्म या सर्वांची सुरेख गुंफण या ग्रंथात दिसते. शीख धर्मात मात्र तत्त्वज्ञान व आचारविषयक मार्गदर्शन ग्रंथसाहिबातून विखुरलेल्या स्वरूपात आढळते व तेही शोधून काढावे लागते. तत्त्वज्ञानाची सुघट, तार्किक मांडणी हे जैन दर्शनाचे खास वैशिष्ट्य दिसते.तत्त्वज्ञान व आचार समजून सांगण्यासाठी जैनांनी विविध प्राकृत व संस्कृत भाषेत जी विपुल साहित्याची निर्मिती केली, तेही जैन धर्माचे वैशिष्ट्य आहे. ___ या दोन्ही धर्मातील तत्त्वज्ञानाचा ढाचाच वेगळा असल्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा करणे येथे उचित ठरणार नाही. मात्र दोन-तीन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. 'जग निर्मिण सामर्थ्यशाली सत-स्वरूप ईश्वरला संपूर्ण शरण जाणे' - हे शीख धर्माचे वैशिष्ट्य आहे. याउलट जगत्का ईश्वराची सत्ता अमान्य करून जैनधर्म, कर्म आणि पुरुषार्थ याची सांगड घालतो. स्वत:ची आत्मिक शुद्धी सर्वोच्च मानून ईश्वर शरणागतीला स्थान देत नाही. तीर्थंकरांना सुद्धा जैनधर्म कवळ पूजनीयतेच्या स्थानावर ठेवतो. कोणाच्या कृपेने उद्धरून जाण्याची गोष्ट जैनधर्म मान्य करीत नाही. गुरुग्रंथसाहिबात कर्मगतीचा उल्लेख असला तरी कर्मसिद्धान्त त्यांनी विशेष स्पष्ट केलेला नाही. ___ शीखधर्म सृष्टीची उत्पत्ति ईश्वरकृत मानतो तर जैनधर्म सृष्टीला अनादिअनंत मानतो. शीख धर्मापेक्षा जैन धर्मातील स्वर्ग-नरक कल्पना तर्कदृष्ट्या अधिक सुसंगत व चतुर्गतींवर आधारित आहेत. दोन्ही धर्मांनी जातिवर्णभेदांचा निषेध केला आहे. शीख धर्माने सर्व जातिवर्णांच्या लोकांसाठी ‘लंगर प्रथा' चालू केली. आजही लंगर प्रथेत जातिवर्णभेद, उच्चनीच, रंकराव असे भेद केले जात नाहीत. सर्वजण एकत्र मिळूनच तेथे असलेली सर्व कामे करतात व एकत्र जेवतात. जैन धर्मात सिद्धान्तरूपाने जरी जातिवर्णभेद मान्य केला नसला तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मागील दाराने जातिवर्णव्यवस्था घुसलेली दिसते. ____ शीख धर्मातील दहा गुरूंनी तीर्थयात्रा करण्याचा निषेध केला असला तरी त्या-त्या गुरूंच्या नावाने तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आहेत. बदलत्या परिस्थितीत त्यात काही अनुचितही वाटत नाही. जैन धर्मात मात्र सात सुप्रधिद्ध तीर्थक्षेत्रांच्या यात्रा प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रचलित आहेत. ___मांसाहाराचा संपूर्णत: निषेध हे जैन धर्माचे एक विशेष लक्षण मानले जाते. त्या तुलनेत शीख गृहस्थ सामिष व निरामिष दोन्ही प्रकारचे आहार आपापल्या वैयक्तिक आवडीनुसार घेताना दिसतात. त्याबाबत त्यांना शीख धर्माचे कडक बंधन दिसत नाही. शीख समाजात नामकरण, विवाह, दीक्षा, मृत्यू इ. संस्कार अतिशय साधेपणाने साजरे केले जातात. त्यावेळी ग्रंथसाहिबातील पद्ये म्हटली जातात. जैन समाजात हे सर्व संस्कार व विशेषत: दीक्षा अतिशय थाटामाटात व डामडौलात होते. नामकरण, विवाह इ. प्रसंगी आगमातील पाठ वाचण्याचा प्रघात नाही. शिखांच्या धार्मिक चिह्नात कृपाण, कट्यार अथवा तलवारीचा समावेश असतो. याउलट जैन धर्मात ही सर्व हिंसेची उपकरणे मानून त्यांची देवघेव कटाक्षाने टाळली जाते. ___ अन्नपानाचे कडक नियम, कंदमुळांचे वर्जन, रात्रिभोजनाचा त्याग, उपवासाला दिलेले महत्त्व, परीषह सहन करण्याविषयीचे मार्गदर्शन ही सर्व जैन धर्माची वैशिष्ट्ये आहेत. याबाबतीत मात्र शीख धर्माची दृष्टी सर्वस्वी वेगळी
Page #107
--------------------------------------------------------------------------
________________ आहे. 'शरीर हा आत्म्याचा पाहुणा असून त्याला लागणारे सव्वाचारशेर अन्नपाणी रोजच्या रोज द्या', अशा त-हेचे उद्गार ग्रंथसाहिबात आढळतात. उपासतापासाला जास्त प्राधान्य नाही. 'भिक्षाचर्य' पूर्ण वर्ण्य आहे. शीख धर्मातील पहिल्या पाच गुरूंनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सत्संगाबरोबरच शेती व्यवसायही केला. हाताने काम व स्त्राने हरिनाम' याच सूत्राने शीखधर्मीय वागत होते व आहेत. याबाबत गीतेतील निष्काम कर्मयोग हा त्यांना आदर्शरूप वाटतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार सोडण्याची गरज भासत नाही. ग्रंथसाहिबात म्हटले आहे की, 'हसंदिआ खेलंदिआ पैनंदिआ खावंदिआ विचे होवै मुकति / ' जीवन उत्साहाने जगण्याची शिखांची प्रवृत्तिपरकता या उद्गशातून स्पष्ट दिसते. ___ शिखांचा इतिहास आणि जैनांचा इतिहास यात मूलगामी फरक आहे. जैनांच्या इतिहासात शांतता, अहिंसा आणि संयम यांचे साम्राज्य दिसते. सशस्त्र प्रतिकाराचा त्यांनी कधीही विचार केला नाही. याउलट शिखांच्या शेवटशेवटच्या गुरूंचा इतिहास हा लढाया, रक्तपात, साम्राज्य, बलिदान यांनी भरलेला दिसतो. भारताच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या या पंजाब प्रांताने इ.स.च्या 7-8 व्या शतकापासून ते थेट ब्रिटीश राजवटीपर्यंत अनेक परकीय आक्रमणे सोसली. अत्याचार सहन केले. धार्मिक जुलूमही अनुभवले. लढाऊ बाण्याच्या या समाजाने या सर्व अन्यायाचा प्रतिकार समर्थपणे केला. परकीय धर्म व राज्यकर्त्यांपुढे कधीही मान तुकविली नाही. अखेर अखेर तर सशस्त्र सैन्यदळेही उभी केली. સ્વતંત્ર વાસા રાખ્યાખ્યા માપણીસાહી માનહી ગુરૂદાવ્યા બાશ્રયાને શસ્ત્ર-સાડા વમળ્યાવા પ્રસંગે શિવાંચ્યા इतिहासात येऊन गेला. कै. इंदिरा गांधींच्या राजवटीत 'ऑपरेशन ब्लू स्टार' करून हा प्रयत्न मोडून काढावा लागला. 'सच्चा डेरा सौदा' चळवळीमध्ये नुकताच रक्तपात झाल्याचे प्रसंगही घडले आहेत. त्यांच्या इतिहासाची समीक्षा करताना ही सर्व धार्मिक, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी बघणे अत्यंत गरजेचे आहे. एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी स्वत:च्या धर्माचा प्रसार मात्र कधीही तलवारीच्या बळावर केला नाही. गायन-भजन-सत्संग व उपदेश अशा सोप्या मार्गांनी त्यांनी शीखधर्माचा प्रसार केला. वाणीसंयम, मन:संयम, सत्संग, सेवा, ऐक्य, दया-क्षमा-संतोष, काम-क्रोध इ.चा त्याग, दानादि पुण्याचरण, स्वत:ची सुधारणा, सार्थक-निरर्थक विवेक आणि कृत्रिमतेचा निषेध हे सारे मुद्दे मात्र जैन व शीख या दोन्ही धर्मात समान दिसतात. ___ या तौलनिक निरीक्षणांचा उद्देश कोणाचीही श्रेष्ठता-कनिष्ठता ठरविणे हा नाही. जैनधर्म व शीखधर्म यांची पार्श्वभूमी, इतिहास, जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन या दृष्टीने त्यांच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
Page #108
--------------------------------------------------------------------------
________________ 22. जैनांच्या आगमग्रंथांतील बहात्तर कला (विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, 1986) प्राचीन भारतात अध्ययनाचे विषय म्हणून अनेक विद्या, कला, इत्यादींचा उल्लेख वाङ्मयात सापडतो. हिंदूंच्या ग्रंथात चौसष्ट कलांचा निर्देश येतो. या कलांचे परिगणन व अर्थ यांबाबत मतभेद दिसतो. तसेच कधी 64 पेक्षा अधिक कलाही सांगितल्या गेल्या आहेत. बौद्धांच्या ललितविस्तर नामक ग्रंथात बोधिसत्त्व म्हणजे बद्ध हा 90 पेक्षा अधिक कलांमध्ये पारंगत होता', असे म्हटले आहे. जैन धर्मीयांच्या ग्रंथात 72 कला असा उल्लेख येतो. या 72 कलांच्या सूची जैनांच्या आगमग्रंथात आढळतात. जैनांच्या आगमेतर ग्रंथात प्राय: अशा सूची नाहीत. तथापि उद्योतनसूरिकृत कुवलयमाला या प्राकृत भाषेतील ग्रंथात 72 कलांचे परिगणन आहे. पण त्या कला आगमग्रंथांतील कलांपेक्षा वेगळ्या आहेत. प्रस्तुत लेखात जैनांच्या आगम ग्रंथातील 72 कलांचा विचार केला आहे. कला म्हणजे काय ? कला या शब्दाचे अनेक व्युत्पत्त्यर्थ तसेच प्रचलित अर्थ दिले जातात. त्यांमध्ये एखाद्या कामातील अपेक्षित अथवा आवश्यक चातुर्य, प्रावीण्य' असा एक अर्थ आहे. जैनांच्या आगमग्रंथावरील टीकाकार' अभयदेव हा 'कला' म्हणजे 'विज्ञानानि' असा अर्थ देतो. त्याच्या मते, एखाद्या ज्ञेय विषयाचे विशेष ज्ञान म्हणजे कला होय आणि म्हणून 'कलनीयभेदाद् द्विसप्ततिः कला:' असे तो सांगतो. जैन आगमग्रंथातील 72 कला जैनांच्या आगमग्रंथांपैकी समवायांगसूत्र, ज्ञातृधर्मकथा (नायाधम्मकहाओ), औपपातिकसूत्र आणि राजप्रश्नीयसूत्र (रायपसेणइयसुत्त किंवा पएसिकहाणय) या चार ग्रंथात 72 कला दिलेल्या आहेत. या कलांमध्ये काही कला समान आहेत तर काही कला वेगळ्या आहेत. तसेच लक्षणीय गोष्ट अशी की काही ग्रंथात या कला 72 पेक्षा जास्तच आहेत. एके ठिकाणी तर 72 ही संख्या साधण्यास, अनेक कला एकाच क्रमांकाखाली दिलेल्या आहेत. हा सर्व तपशील पुढीलप्रमाणे सांगता येईल. (अ) नायाधम्मकहाओ या ग्रंथात कला बरोबर 72 आहेत. (आ) समवायांगसूत्र-येथे क्रमांक देऊन 72 कला दिलेल्या आहेत. परंतु कला क्रमांक 67 खाली एकूण 3 कला, क्रमांक 68 खाली एकूण 7 कला, क्रमांक 69 खाली एकूण 5 कला, क्रमांक 70 खाली एकंदर 2 कला, आणि क्रमांक 71 खाली एकूण 2 कला आहेत. आता, त्या त्या क्रमांकाखाली जर एकच कला ठेवली, तर एकूण चौदा कला - (3+7+5+2+2 = 19 ; 19-5 = 14) जास्त होतात. म्हणजे समवायांगसूत्रात एकूण कला 86 (72+14) होतात. समवायांगसूत्रातील कलांच्या संदर्भात पुढील गोष्ट सांगणे आवश्यक आहे. भ.महावीर 2500 महानिर्वाण महोत्सव याप्रसंगी, पंडिता सुमतिबाई शहा यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेल्या 'पूर्णार्घ्य' या ज्ञानकोशात्मक ग्रंथात, 'समवायांगसूत्रामध्ये 72 कलांची नामावली आहे.' (पृ.७८५) असे म्हणून पुढे यादी देताना मात्र प्रत्यक्षात 85 कला दिलेल्या आहेत. आणि कलांची 85 संख्या होण्याचे कारण असे की ‘पोक्खच्च' ही कला या यादीतून गळली आहे ; ती धरली की समवायांगसूत्रातील कला 86 होतात. म्हणजे 72 म्हणून आपण 85-86 कला देत आहोत, हे या कलांबद्दल लिहिणाऱ्या लेखकाच्या लक्षात आलेले दिसत नाही. (तसेच, पूर्णार्घ्य मधील या यादीत
Page #109
--------------------------------------------------------------------------
________________ चमत्कारिक मुद्रणदोष झालेले आहेत. त्यांचा निर्देश पुढे केला आहे.) (इ) औपपातिकसूत्र-या सूत्राच्या मुद्रित पोथीत कलांची संख्या 75 होते. प्रा. सुरू यांनी संपादित केलेल्या औपपातिक सूत्रात सहा कला कंसात ठेवलेल्या आहेत. त्या धरून एकूण 80 कला होतात, त्या सोडल्यास कला 74 होतात. प्रा. सुरूच्या पुस्तकात कंसात असणाऱ्या 'वत्थविहि' आणि 'विलेवणविहि' या कला पाथीमध्ये कंसरहित दिल्या आहेत. खेरीज, सुरू-संपादित पुस्तकातील संभव, मुठ्ठिन्जुद्ध, मणिपाग, आणि धाउपाग' या कला पोथीत नाहीत. __ येथेही पुढील गोष्ट लक्षात घ्यावी :- वर उल्लेखिलेल्या पूर्णाऱ्या ग्रंथात म्हटले आहे. 'औपपातिकसूत्रामध्ये बहात्तर कलांची एक यादी दिलेली आहे. ती या यादीप्रमाणेच (म्हणजे समवायांगसूत्रातील यादीप्रमाणेच) असून केवळ काही नावांमध्ये फरक आहे.' (पृ.७८७) पण हे विधान संपूर्णपणे बरोबर नाही. कारण औपपातिकसूत्रातील पुढील 8 कला समवायांगसूत्रात नाहीतच. (1) पासक, (2) हिरण्णजुत्ति, (3) सुवण्णजुत्ति, (4) चुण्णजुत्ति, (5) चक्कवूह, (6) गरुलवूह, (7) सगडवूह आणि (8) लयाजुद्ध, म्हणजे येथेही कलांबद्दल लिहिणाऱ्या लेखकाचा घोटाळा झालेला आहे. (ई) मलयगिरि या टीकाकाराच्या वृत्तीसह असणाऱ्या राजप्रश्नीय सूत्राच्या मुद्रित पोथीत कलांची संख्या 73 आहे. पण श्री. दोशी यांनी संपादित केलेल्या रायपसेणइयसुत्तच्या मुद्रित पोथीत 72 कला आहेत, कारण तेथे राज.च्या मुद्रित पोथीतील पडिवूह' ही कला गळलेली अथवा गाळलेली आहे. डॉ.प.ल.वैद्य आणि श्री.ए.टी.उपाध्ये यांनी संपादित केलेल्या 'पएसिकहाणय' ग्रंथात कलांची संख्या बरोबर 72 आहे. तथापि वर उल्लेखिलेल्या पोथीतल काही कला येथे सापडत नाहीत. बहात्तर कलांची निश्चिती ____ वर पाहिल्याप्रमाणे कलांची संख्याभिन्नता अभयदेवसूरीसारख्या टीकाकाराच्या लक्षात आली नसती तरच नवल. या स्थितीत 72 ही कलांची संख्या साधण्यास अभयदेव असे सुचवितो :- काही कलांचा अंतर्भाव अन्य कलांमध्ये होतो असे समजावे. (इहच द्विसप्ततिः इति कलासंख्या उक्ता, बहुतराणि च सूत्रे तन्नामानि उपलभ्यन्ते, तत्र कासांचित् कासुचिद् अंतर्भाव: अवगन्तव्यः / ) हे म्हणणे समाधानकारक वाटत नाही. तसेच, कलांचे वर्ग करून, एका वर्गात अनेक कला घातल्या तरी 72 हा कलासंख्येचा प्रश्न सुटत नाही. या बाबतीत असे सुचविता येईल :- ज्याप्रमाणे एखाद्या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखितावरून पाठ निश्चित करताना जास्तीत जास्त हस्तलिखितात आलेला पाठ प्राय: स्वीकारला जातो. त्याप्रमाणे 72 कलांच्या बाबतीत करावे. म्हणजे असे :- 72 कला असणाऱ्या सर्व ग्रंथात ज्या कला समानपणे येतात, त्या सर्व घ्यावयाच्या याप्रमाणे क्रमाने करीत गेल्यास 72 कला ठरविता येतील, ही दृष्टी पत्करून कलांचे परिगणन पुढीलप्रमाणे होईल. कलांचे परिगणन कलांच्या सूची एकूण चार ग्रंथांत आहेत. तेव्हा प्रथम चार ग्रंथांत, मग तीन ग्रंथांत, नंतर दोन ग्रंथांत समान असणाऱ्या कला, व शेवटी एकेका ग्रंथांत असणाऱ्या कलांचे निर्देश करता येतील. या संदर्भात पुढील बाबी लक्षात असाव्यात :- (1) ज्ञाताधर्मकथा आणि नायाधम्मकहाओ ही एकाच ग्रंथाची दोन नावे आहेत. (2) राजप्रश्नीय, रायपसेणइय आणि पएसिकहाणय ही एकाच ग्रंथाची नावे आहेत. (3) कलांची नावे प्राकृत भाषेत आहेत. तेव्हा कधी कलानामांची वर्णान्तरे भिन्न असली तरी कला मात्र एकच आहे. अशा कला देताना, वेगळे वर्णान्तर देणाऱ्या ग्रंथाचे नाव कंसात ठेवले आहे. (4) कला-नामांची संस्कृत छाया त्यांचे पुढे स्पष्टीकरण करताना दिली आहे.
Page #110
--------------------------------------------------------------------------
________________ (1) नाया, सम, राज/राय, आणि औप. या ग्रंथातील समान कला अशा आहेत : (1) लेह (2) गणिय, गणित (अ औ) (3) रूव (4) नट्ट, णट्ट (औप) (5) गीय (6) वाइय (7) सरगय (8) पोक्खरगय (नाया, वैप), पुक्खरगय (9) समताल (10) जूय (11) जणवाय (12) अट्ठावय (13) पोरेकच्च (14) दगमट्टिया (15) अन्नविहि, अण्णविहि (अ औ) (16) पाणविहि (17) वत्थविहि (18) सयणविहि (19) अज्जा (20) पहेलिया (21) मागहिया (22) गाहा (23) सिलोग, सिलोय (अ औ, ज्ञाता) (24) आभरणविहि (25) तरुणीपडिकम्म (26) इथिलक्खण, इत्थीलक्खण (सम) (27) पुरिसलक्खण (28) हयलक्खण (29) गयलक्खण (30) गोणलक्खण (31) कुक्कुडलक्खण (32) छत्तलक्खण (33) दंडलक्खण, डंडलक्खण (ज्ञाता) (34) असिलक्खण (35) मणिलक्खण (36) कागिणिलक्खण (नाया). कागणिलक्खण (सम, राय, सुऔ, ज्ञाता), काकणिलक्खण (अऔ) (37) नगरमाण, णगरमाण (राय, राज) (38) वूह (39) पडिवूह, परिवूह (ज्ञाता) (40) चार (41) पडिचार, परिचार (ज्ञाता) (42) जुद्ध (43) निजुद्ध, नियुद्ध (राय) (44) जुद्धाइजुद्ध', जुद्धातिजुद्ध (ज्ञाता, अऔ) (45) मुट्ठिजुद्ध (46) बाहुजुद्ध (47) ईसत्थ, इसत्थ (अऔ) (48) छरुप्पवाय, छरुप्पवाह (अऔ) (49) धणुव्वेय, धणुवेय (राज, राय) (50) हिरण्णपाग, हिरन्नपाग (ज्ञाता) (51) सुवण्णपाग, सुवन्नपाग (सम, ज्ञाता) (52) वट्टखेड (नाया, सम, अऔ), वट्टखेड्ड (राम, राज), वत्तखेड्ड (सुऔ) (53) नालियाखेड (नाया, सम, वैप), णालियाखेड (अ औ) णालिया खेड्ड (राय, राज, सुऔ) (54) पत्तच्छेज्ज (55) कडच्छेज्ज (नाया), कडगच्छेज्ज (ज्ञाता, सम, राय, राज, सुऔ), कडवच्छेज्ज (अऔ) (56) सज्जीव. सजीव (सम, राज) (57) निज्जीव (58) सउणरुय. (2) (अ) नाया, राय, औप या तिन्हीतील समान कला अशा : (1) पासय (नाया), पासग (राज, राय), पासक (अऔ) (2) विलेवणविहि (3) गीइया (4) हिरण्णजुत्ति (5) सुवण्णजुत्ति, सुवन्न-जुत्ति (ज्ञाता) (6) चुण्णजुत्ति, चुन्नजुत्ति (ज्ञाता) (7) वत्थुविज्जा (8) चक्कवूह (9) गरुलवूह (10) सगडवूह (11) लयाजुद्ध. (आ) नाया, सम आणि राय या तिन्हीतील समान कला अशा :(1) अट्ठिजुद्ध (2) सुत्तखेड, सुत्तखेड्ड (राय) (इ) सम, राय आणि औप या तिन्हीतील समान कला अशा :(1) चक्कलक्खण (2) मणिपाग (सुऔ) (3) धातुपाग (सुऔ) (ई) नाया, सम आणि औप या तिन्हीतील समान कला अशा :(1) खंधारमाण (नाया, सुऔ), खंधावारमाण (सम) (3) सम आणि औप या दोन ग्रंथांतील समान कला पुढीलप्रमाणे : (1) गंध जुत्ति (2) चम्मलक्खण (3) खंधावारनिवेस (सम), खंधारनिवेसण (सुऔ) (4) वत्थुनिवेस (सम)१९, वत्थुनिवेसण (सुऔ) (5) नगरनिवेस (सम)११, नगरनिवेसण (सुऔ) (4) एकाच ग्रंथात आढळणाऱ्या कला अशा आहेत :(क) राय / राज मध्ये पुढील कला आहेत :(1) णिद्दाइय (णिद्दाइया) (2) माणवार (3) जुद्धजुद्ध (4) खंधवार, खंदवार (उप) (5) जणवय
Page #111
--------------------------------------------------------------------------
________________ (ख) औप मध्ये पुढीलप्रमाणे कला आहेत :(1) संभव (2) मुत्ताखेड (सुऔ) (3) खुत्ताखेड्ड (अऔ) (ग) सम मध्ये असणाऱ्या कला पुढीलप्रमाणे आहेत : (1) मधुसित्थ (2) मिंढयलक्खण (3) चंदलक्खण (4) सूरचरिय (5) राहुचरिय (6) गहचरिय (7) सोभागकर (8) दोभागकर (9) विज्जागय (10) मंतगय (11) रहस्सगय (12) सभासा (13) वत्थुमाण (14) दंडजुद्ध (15) आससिक्खा (16) हत्थिसिक्खा (17) धम्मखेड (18) चम्मखेड वरील परिगणनाचा सारांश असा :(1) नाया, सम, राज / राय, औप या चारांतील कला (2) तीन ग्रंथांतील समान कला (अ) नाया, राय, औप (आ) नाया, सम, राय (इ) सम, राय, औप (ई) नाया, सम, औप Mrmal (3) सम व औप या दोहोंतील कला (4) एकेका ग्रंथातील कला :(क) राय / राज (ख) औप (ग) सम 3 MO 106 कला बहात्तर कशा होतील ? वर पाहिल्याप्रमाणे चार ग्रंथातील समान 58 कला आणि (अ) मधील तीन ग्रंथांतील समान 11 कला मिळून 69 कला होतात. आता, वरील (आ), (इ) आणि (ई) मध्ये तीन ग्रंथांना समान कला 2,3,1 अशा आहेत : (1) अटिजुद्ध (1) चक्कलक्खण (2) सुत्तखेड (2) मणिपाग (1) खंधावारमाण (3) धातुपाग यातील कोणत्या तीन कला घेऊन 72 ही संख्या साधावी, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर तीन प्रकारांनी देता येईल : (अ) अभयदेवाने सुचविल्याप्रमाणे, वरील 2,3,1 कलांतील एक कला दुसऱ्या कलेत समाविष्ट करावयाचे ठरविले तर मागे आलेल्या 'हिरण्णपाग' मध्ये 'धातुपाग' आणि 'मणिपाग' या कला जातील, आणि 'नगरमाण'मध्ये 'खंधावारमाण' ही कला जाईल. मग (1) अट्ठिजुद्ध (2) सुत्तखेड, व (3) चक्कलक्खण या तीन कला उरतील. या तीन कला व पूर्वीच्या 69 कला मिळून 72 कला होतील (येथे पूर्वीच्या कोणत्या कलेत दुसरी कला घालावी याबद्दल मतभेद होण्याची शक्यता आहे). (आ) चार ग्रंथांना समान असणाऱ्या 58 कला घेऊन, 72 संख्या पुरी करण्यास तीन ग्रंथातील समान कलांमधून 14 कला पुढीलप्रमाणे निवडता येतील (येथेही निवडीबाबत मतभेद
Page #112
--------------------------------------------------------------------------
________________ होण्याची शक्यता आहे) :- (1) पासय (2) विलेवणविहि (3) गीइया (4) हिरण्णजुत्ति (5) सुवण्णजुत्ति (6) चुण्णजुत्ति (7) वत्थुविज्जा (8) चक्कवूह (9) गरुलवूह (10) सगडवूह (11) लयाजुद्ध (12) सुत्तखेड (13) चक्कलक्खण (14) धातुपाग (इ) चार ग्रंथांतील समान 58 कला घेऊन, 72 संख्या पुरी करण्यास तीन, दोन व एका ग्रंथात येणाऱ्या कलांतून पुढील 14 कला निवडता येतील (येथेही निवडीबाबत मतभेद होईल) :-(1) हिरण्णजुत्ति (2) सुवण्णजुत्ति (3) चुण्णजुत्ति (4) वत्थुविज्जा (5) लयाजुद्ध (6) सुत्तखेड (7) धातुपाग (8) चम्मलक्खण (9) खंधावारनिवेस (10) गहचरिय (11) विज्जागम (12) आससिक्खा (13) हत्थिसिक्खा (14) चम्मखेड वरील चर्चेचा मथितार्थ असा होतो :- चार ग्रंथांतील समान अशा 58 कला कळल्या तरी उरलेल्या 14 कला ठरविण्याबाबत मतभेद होईल. अशा स्थितीत '72 कला याच' असे निश्चितपणे सांगणे शक्य होणार नाही, हे उघड आहे. ___ अशा स्थितीतही अभयदेवाच्या म्हणण्याप्रमाणे, ठरवलेल्या 72 कलांत, बहात्तर सोडून उरलेल्या 34 कला कशाबशा बसविल्या. उदाहरणार्थ - चुण्णजुत्तिमध्ये गंधजुत्ति (1) जुद्धमध्ये अट्ठिजुद्ध (2) व जुद्धजुद्ध (3) असिलक्खणमध्ये चक्कलक्खण (4) धातुपागमध्ये माणिपाग (5) वत्थुविज्जामध्ये खंधारमाण (6) माणवार (7) खंधावारनिवेस (8) वत्थुनिवेस (9) नगरनिवेस (10) खंधवार (11) वत्थुमाण (12) लयाजुद्धमध्ये दंडजुद्ध (13) जणवायमध्ये जणवय (14) वट्टखेडमध्ये मुत्ताखेड (15) चम्मखेड (16) धम्मखेड (17) पोक्खरगयमध्ये खुत्ताखेड (18) गोणलक्खणमध्ये मिंढयलक्खण (19) तरुणीपडिकम्ममध्ये मधुसित्थ (20) निज्जीवमध्ये णिद्दाइया (21) सउणरुयमध्ये सभासा (22) हयलक्खणमध्ये आससिक्खा (23) गयलक्खणमध्ये हत्थिसिक्खा (24) असे केले तरीसुद्धा सममधील पुढील दहा कला कोणत्या अन्य कलांत अंतर्भूत करता येतील हा प्रश्नच आहे. (1) संभव (2) चंदलक्खण (3) सूरचरिय (4) राहुचरिय (5) गहचरिय (6) सोभागकर (7) दोभागकर (8) विज्जागय (9) मंतगय (10) रहस्सगय. आता, वर्गीकरण करून 72 कला ठरवाव्यात, असे म्हटले तरी कलांची संख्या 106 च रहाणार आणि कलांचेच 72 वर्ग करून त्यांमध्ये 106 कला बसवाव्यात असे म्हटले तरी वर्ग म्हणून कोणती कला घ्यावी व तीच का घ्यावी, हा प्रश्न निर्माण होतोच. अशा स्थितीत 72 कलांची निश्चिती करणे हे काम सोडून देणेच योग्य वाटते. त्यापेक्षा जैनागमांत आढळणाऱ्या 106 कलांचे अर्थ जाणून घेणे हेच अनेक दृष्टींनी योग्य वाटते. कलावाचक शब्दांचे अर्थ जैनांच्या ज्या चार आगमग्रंथांत कलांच्या सूची आहेत, त्या ग्रंथांवरील प्राचीन टीकाकारांनी त्यांचे स्पष्टीकण दिलेले नाही. याला थोडासा अपवाद अभयदेव हा आहे. समवायांगसूत्रावरील आपल्या टीकेत त्याने लेह, गणिय, रूव, नट्ट, आणि वाइय या शब्दांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. उरलेल्या कलांच्या बाबतीत, 'इत्यादिक: कलाविभागो लौकिकशास्त्रेभ्य: अवसेय:' (पृ.८३ब) असे म्हणून तो मोकळा होतो. त्यामुळे हे आगमग्रंथ संपादित करणाऱ्या आधुनिक विद्वानांनी दिलेल्या अर्थांकडे आपणांस वळावे लागते. त्याची माहिती अशी : (अ) डॉ.प.ल.वैद्य आणि श्री.ए.टी.उपाध्ये यांनी स्वतंत्रपणे ‘पएसिकहाणय' संपादित केले आहे. त्यांमध्ये 72 कलांचे अर्थ इंग्रजी भाषेत आहेत.(आ) समवायांगसूत्रातील काही कलांचे मराठीत वर्गीकरण तसेच स्पष्टीकरण 'पूर्णार्घ्य' ग्रंथात सापडते. (इ) ज्ञाताधर्मकथासूत्राच्या मुद्रित आवृत्तीत कलांचे अर्थ गुजराथी भाषेत आहेत. खेरीज नायाधम्मकहाओमधील कलांचे अर्थ एल्.डी.बार्नेट या पंडिताने आपल्या अंतगडदसाओ' या अन्य जैनागमग्रंथाचा
Page #113
--------------------------------------------------------------------------
________________ इंग्रजी भाषांतरात दिले आहेत. याचे कारण असे. अंतगडदसाओ ग्रंथाच्या तिसऱ्या वर्गात, ‘गयसुकुमाल' या कुमाराची कथा आहे. त्याच्या संदर्भात, त्याच्या शिक्षणापासून ते तो भोगसमर्थ' होईपर्यंतचे वर्णन हे मेह' माराप्रमाणे आहे असे म्हटले आहे (तए णं तस्य दारगस्स अमापियरो नामं करेंति गयसुकुमाले त्ति / सेसंजहा मेहे जाव भोसमत्थे जाए यावि होत्था / ) आता, या मेह कुमाराची कथा नायाधम्मकहाओमध्ये प्रथम येते. हा मेह 72 कला शिकतो. त्यांची यादी नायामध्ये आहे. त्या 72 कलांचा अर्थ बार्नेट देतो. बार्नेटने दिलेल्या अर्थांच्या बाबतीतही दोन गोष्टी येथे नमूद करावयास हव्यात :- (1) बार्नेटने ‘विलेवणविहि'चे भाषांतर दिलेले नाही. (2) बार्नेटचे Rules of House Keeping हे शब्द मुळातील कोणत्याही शब्दासाठी नाहीत. तेव्हा नामामधील ‘वत्थविहि' ही कला ‘वत्थुविहि' अशी घेऊन, बार्नेटने हा अर्थ दिला की Rules of Besmearing असे त्याला म्हणावयाचे होते, हे काही सांगता येत नाही. वर उल्लेखिलेले सर्व अर्थ नेहमीच योग्य वाटत नाहीत, तसेच त्यांमध्ये सर्व 106 कलांचा अर्थ आलेला नाही. म्हणून प्रस्तुत लेखात असे केले आहे :- वरील सर्व अर्थ एकत्र करून दिले आहेत, त्यात काही ठिकाणी अधिक माहिती पूरक म्हणून जोडली आहे. काहींचे नवीन अर्थ सुचविले आहेत. आणि ज्या कलांचे अर्थ पूर्वी येऊन गेलेले नाहीत, त्यांचा अर्थ दिलेला आहे. ___कलांचे अर्थ देताना, पुढील पद्धत स्वीकारली आहे :- (1) इंग्रजी अर्थांचे मराठी रूपांतर केले आहे, व मूळ इंग्रजी शब्द टीपांत दिले आहेत. (2) बहुतेक ठिकाणी गुजराथी अर्थ तसाच दिला आहे, तो कळण्यास फारशी अडचण येत नाही. (3) अर्थ ज्यांनी दिले आहेत, त्यांची आद्याक्षरे त्या त्या अर्थांपुढे कंसात ठेवली आहेत. (4) पूर्णार्घ्य ग्रंथात वर्गीकरण करून जसे अर्थ दिले आहेत, तसेच ते योग्य तेथे टीपांत दिले आहेत.(५) वर ज्या क्रमाने कलांचे परिगणन केले आहे त्याच क्रमाने त्यांचा अर्थ दिला आहे. सर्व कलांचे अर्थ (1) चारही ग्रंथांत समान असणाऱ्या कला (1) लेह (लेख) :- लेखन (बा.वै.उ.गु.) निरनिराळ्या लिपीतील व पदार्थांवरील आणि विषयांवरील लेखन, असा अर्थ अभयदेव देतो. त्याला धरून पूर्णाऱ्यामध्ये अर्थ दिला आहे (पृ.७८५). स्वामी, सेवक, पिता इत्यादींना उद्देशून करावयाचे पत्रलेखन२ असाही अर्थ अभयदेव देतो. (2) गणिय (गणित) :- संख्यान (अ), अंकगणित (बा.वै.), अंकगणित, बीजगणित व रेखागणित (=भूमिति) (उ)-मोठ्या संख्यांचा गुणाकार इत्यादि क्रिया तोंडी वा झटपट करणे (आ). (3) रूव (रूप) :- सोंग घेणे.२ (बा.वै.), रंगविणे (वै), नाणी पाडण्याची वा द्रव्यविनिमयाची कला (वै), रूप बदलण्याची कला (उ.गु.), मूर्तिकला व चित्रकला 4 (पू)-येथे रूवचा नाटक असा अर्थ घेण्याचे कारण नाही, कारण तो अर्थ पुढील नट्ट'मध्ये येतो. (4) नट्ट (नाट्य), :- नृत्य (बा.वै.उ.), नाटक (गु), नाट्यकला (अ) नाट्यकलेत नृत्यकलासुद्धा येते असे अभयदेव म्हणतो. तेव्हा नट्ट म्हणजे नाट्यकला वा अभिनयकला आणि नृत्यकला. (कधी गीत, नृत्य आणि वादिन या तीहींना मिळून नाट्य ही संज्ञा दिली जाते. कलानां तिसृणामासां नाट्यमेकीक्रियोच्यते / (जैनांचे) पद्मपुराण, प्रथम भाग (पृ.४७९). हा अर्थ येथे अभिप्रेत नाही. कारण पुढे गीत व वादित्त या कला स्वतंत्रपणे सांगितल्या आहेत.) (5) गीय (गीत) :- गायन (बा.वै.उ.गु.), ताल, सूर, इत्यादि सांभाळून करावयाचे गायन. (6) वाइय (वादित, वादित्र) :- वाद्यसंगीत५ (वै.उ.), संगीत वाद्ये वाजविणे (बा.वै.गु.), वाद्यकला (अ) वाद्ये ही तत (उदा. वीणा) अवनद्ध (उदा. मृदंग), सुषिर (उदा.पोवा), आणि घन (उदा.टाळ) अशी चार प्रकारची मानली जातात. ती वाद्ये वाजविण्याची कला.
Page #114
--------------------------------------------------------------------------
________________ (7) सरगय-या शब्दाची संस्कृत छाया 'स्वरगत' अशी घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- मौखिक संगीत 16 (वै), आवाजाने संगीत करणे (बा), संगीतातील स्वर ओळखणे (उ.गु.)-सरगय शब्दाची संस्कृत छाया 'शरगत’ आणि ‘स्मरगत' अशीही होते. शरगत म्हणजे बाणविद्या ही पुढे धनुर्वेद या नावाने येते. स्मर म्हणजे मदन, काम. तेव्हा स्मरगत म्हणजे कामकला, प्रेमकला, कामशास्त्र असा अर्थ होतो (आ). (8) पोक्खरगय (पुष्करगत) :- ड्रमने संगीत करणे (बा), ड्रम वाजविणे (वै), पुष्कर हे संगीताचे वाद्य वाजविणे (उ), वाजिव समारवानी कळा (गु). वाद्य ही कला मागे येऊन गेली आहे. तेव्हा पुष्कर वाद्याचे वादन असा अर्थ घेण्यात औचित्य वाटत नाही. म्हणून पुढील अर्थ योग्य वाटतो. पुष्कर म्हणजे पाणी (गीलको), मग पुष्करगत म्हणजे जलतरण, पोहण्याची कला (आ). (9) समताल (समताल) :- झांज/टाळ' यांचे संगीत (वै), झांज/टाळ८ वाजविणे (बा), संगीतातील१८ कालाचे नियमन (उ), समान ताल जाणण्याची कला (गु). मागे वाइय येऊन गेल्याने, झांज/टाळ वाजविणे ही कला स्वतंत्र सांगण्याची जरूरी दिसत नाही. त्यामुळे हाताच्या टाळीने ठेका देणे, अनेक वाद्यांचा समताल९ साधणे/ ओळखणे हा अर्थ बरा वाटतो. (10) जूय (द्यूत) :- द्यूत (बा,वै,उ,गु) जुगार. (11) जणवाय :- या शब्दाची ‘जनवाद' अशी संस्कृत छाया घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- लोकांशी वा लोकांना आवडेल असे संभाषण (बा), समाजातील वक्तृत्व (वे), संभाषण (उ), लोकांबरोबर वादविवाद (गु). ही कला नाम, सम, औप आणि वैप/उपमध्ये आहे, पण राज/राय यांत 'जणवय' असे आहे. शक्यता अशी वाटते की 'जणवय' हा मुद्रणदोष असावा. तथापि जणवय ही स्वतंत्र कला घेतल्यास काय अर्थ होईल हे पुढे सांगितले आहे. येथे जणवाय शब्दाची ‘जनव्रात' अशी संस्कृत छाया होऊ शकते ; त्याचा अर्थ जनसमूह. तेव्हा लोकसमूहावर नियंत्रण ठेवण्याची कला, लोकांचे नेतृत्व करण्याची कला असा अर्थ होतो (आ). (12) अट्ठावय: - या शब्दाची ‘अष्टापद' अशी संस्कृत छाया घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- आठ चौरस२१ असणाऱ्या पटाचा खेळ (बा), आठ चौरसांचा खेळ१ (वै), बुद्धिबळाचा खेळ२९ (वै), आठ चौरस२१ असणारा फाशांचा पट (उ), सोंगट्यांचा पट२२ (चोपाट) (गु) - अट्ठावय शब्दाची संस्कृत छाया ‘अर्थपद' अशी होऊ शकते. त्या शब्दाचा अर्थ 'अर्थशास्त्र' होऊ शकतो. तेव्हा कौटिलीय अर्थशास्त्र सारख्या शब्दांत अर्थशास्त्र शब्दाचा जो अर्थ तोच अर्थ येथे आहे (आ). (13) पोरेकच्च, पोक्खच्च :- पोरेकच्च हा शब्द नाया, वैप/उप, आणि औप यांत आहे. वैपमधील टीपांत 'पोरेकत्त' असाही शब्द दिलेला आहे. राज/रायच्या दोन पोथ्यांत पारेकव्व' असा शब्द आहे. सम.मध्ये पोक्खच्च असा शब्द आहे. आता, पारेकव्व आणि पोक्खच्च हे दोन्हीही शब्द पासममध्ये आढळत नाहीत. पुरस्कृत्य वा पौरस्कृत्य या संस्कृत शब्दांची वर्णान्तरे प्राकृतमध्ये पोरेकत्त, पोरेकच्च आणि पोक्खच्च अशी होऊ शकतात. म्हणून येथे पोरेकच्च व पोक्खच्च ही एकाच कलेची नावे मानलेली आहेत. 'पारेकव्व' हा शब्द मात्र लेखक-प्रमाद किंवा मुद्रणदोष असावा. पोरेकच्च शब्दाचे असे अर्थ दिलेले आहेत :- नगररक्षक२३ (बा), नगररक्षकाची२३ कर्तव्ये (?) (वै), नगररक्षणाचे२३ कर्तव्य अथवा नगररक्षक३-कर्तव्ये (उ), नगररक्षण (गु), या अर्थांमध्ये पौरकृत्य अशी संस्कृत छाया घेतलेली दिसते. परंतु ती घेऊनही पुढील अर्थ होऊ शकतो :- पौरकृत्य म्हणजे नागरिकांची कार्ये म्हणजे त्यांचे कज्जे, तक्रारी इत्यादि सोडविणे म्हणजे न्याय देण्याची कला असा अर्थ होतो (आ). पुरस्कृत्य अशी छाया घेतल्यास, सन्माननीय/माननीय व्यक्तीचा आदरसत्कार/मानसन्मान करण्याचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (14) दगमट्टिया (उदकमृत्तिका) :- मातीबरोबर पाणी मिसळणे (बा,वै), पाणी व माती यांच्या गुणांची
Page #115
--------------------------------------------------------------------------
________________ चाचणी घेणे (उ), पाणी व माती यांच्या संयोगाने नवीन वस्तू बनविणे (गु) ; सजावट व निर्मितीच्या हेतूने पाण्यामध्ये मळलेल्या मातीच्या लगद्यापासून घर, मूर्ति, इत्यादि सुंदराकार वस्तू निर्माण करण्याची कला (पू).-येथे, पाण्यातून माती (=गाळ) बाजूला काढणे म्हणजे पाणी गाळण्याची (Filtering) कला, असाही अर्थ होऊ शकतो (आ). (15) अन्नविहि (अन्नविधि) :- अन्नाचे नियम (बा,वै), अन्न घेण्याचे वा तयार करण्याचे नियम (उ), धान्य नीपजावनानी कळा (गु).-अन्न हे भक्ष्य, चोष्य, लेह्य व पेय असे चार प्रकारचे मानले जाते. त्यात कधी भोज्य हा प्रकार घालून अन्न हे पाच प्रकारचे मानले जाते. अन्न तयार करण्याची कला म्हणजे पाककला. याखेरीज भिन्न ऋतु आणि उपवासदिवस यावेळी कोणते अन्न कसे खावे याचे नियम (आ). (16) पाणविहिः - या शब्दाची ‘पानविधि' अशी संस्कृत छाया घेऊन पुढे अर्थ दिले जातात :- पिण्याचे नियम२६ (बा,वै), पाणी पिणे अथवा२६ वापरणे यांचे नियम (उ), नवं (नवीन) पाणी उत्पन्न करवानी, संस्कारथी शुद्ध करवानी अने उनुं (=गरम) करवानी कळा (गु).-पान म्हणजे मद्यपान असाही अर्थ होतो. प्राचीन काळी मद्यपानाची प्रथा होतीच. तेव्हा पाणविहि म्हणजे मद्यपानाचे नियम (आ). खेरीज, पाणविहि शब्दाची ‘प्राणविधि' अशीही संस्कृत छाया होते. मग, देहातील प्राणक्रिया व्यवस्थित चालू ठेवण्याचे नियम असा अर्थ होतो (आ). (17) वत्थविहि (वस्त्रविधि) :- पोशाखाचे नियम८ (वै), कपडे शिवणे, धुणे व अंगावर घालणे यांची कला२८ (उ),नवांवस्त्र बनाववानी, वस्त्र रंगवानी, वस्त्र शीववानी तथा पहेरवानी कळा (गु) ; विविध प्रकारची वस्त्रे विणण्याची व शिवण्याची कला (पू).-निरनिराळ्या प्रकारचे सूत काढून, विणून, रंगवून शिवणे आणि भिन्न ऋतु, प्रसंग इत्यादीमध्ये योग्य ती वस्त्रे वापरण्याची कला (आ). (18) सयणविहि :- याची संस्कृत छाया ‘शयनविधि' अशी घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- शय्येचे नियम२९ (बा,वै), शय्या तयार करणे आणि वापरणे यांची कला (उ), शय्या बनाववानी, सुवानी युक्ति जाणवी विगेरेनी कळा (गु), शय्येची सजावट करण्याची कला (पू). भिन्न प्रकारच्या-पुष्पशय्या इत्यादि-शय्या तयार करणे, त्यांची सजावट करणे इत्यादि (आ). शयन म्हणजे निद्रा असाही अर्थ आहे. मग निद्रा आणण्याची कला असा अर्थ होईल (आ). तसेच, सयणविहि शब्दाची ‘सदनविधि' अशीही संस्कृत छाया होते. मग, घर सुशोभित करण्याची, घराची अंतर्बाह्य सजावट करण्याची कला, असा अर्थ होईल (आ). (19) अज्जा (आर्या) :- आर्या छंदात रचना वा काव्यरचना (बा,वै,उ) ; संस्कृत तथा प्राकृत भाषांनी आर्या विगेरेना लक्षण जाणवा, बनाववानी कळा (गु). आर्या हे काव्यरचनेसाठीचे वृत्त आहे. (20) पहेलिया (प्रहेलिका) :- कूट? (बा), कूटांची रचना (वै), कूटे३१ बनविणे आणि सोडविणे (उ), प्रहेलिका बांधवानी कळा (गु). प्रहेलिका हा चित्रकाव्याचा एक प्रकार आहे. त्यात दिलेल्या वर्णनावरून ते कशाचे वर्णन आहे हे शोधावयाचे असते. उदा. नरनारी समुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता / अमुखीकुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति / / (उत्तर-बोटांनी वाजविलेली चुटकी). (21) मागहिया :- या शब्दाचा संबंध 'मगध' शब्दाशी जोडून पुढील अर्थ दिले जातात :- मागधी रचना (बा), मागधीची रचना२२ (वै), मागधी भाषेचे किंवा मगध देशाच्या इतिहासाचे ज्ञान (उ), मगध देशानी भाषामां गाथा विगेरे बनाववानी कळा (ग). पासममध्ये 'मागहिआ' म्हणजे एक छंदविशेष असा अर्थ दिला आहे : तो घेतल्यास मागहिआ छंदातील काव्यरचना असा अर्थ होईल. खेरीज हा शब्द मागध (=भाट, स्तुतिपाठक) या शब्दापासूनही साधता येतो. मग, मागहिआ म्हणजे भाटांनी रचलेले स्तुतिगीत. व नंतर सामान्यपणे स्तुतिगीत वा स्तोत्र असा अर्थ होईल (आ). (22) गाहा (गाथा) :- गाथा रचना२३ (बा), गाथेची रचना२३ (वै), गाथाछंदात काव्य रचना२३ (उ), प्राकृत भाषामां गाथा विगेरे बनाववानी कळा (गु). गाथा हा काव रचनेसाठीचा एक छंद आहे. (23) सिलोग (श्लोक) :- श्लोक करणे३४ (बा). पद्यांची रचना३४ (वै). सामान्यपणे पद्ये करणे अथवा३४ अनुष्टुप् छंदात पद्ये करणे (उ), अनुष्टुप् श्लोक बनाववानी३५ कळा (गु), श्लोक म्हणजे सामान्यपणे पद्य अथवा
Page #116
--------------------------------------------------------------------------
________________ अनुष्टुप् छंदातील पद्य असा अर्थ आहे. श्लोक या शब्दाला म्हण किंवा वाक्प्रचार असा एक अर्थ आहे (गोलको), तो घेतल्यास म्हणी तयार करणे व त्यांचा अर्थ जाणून घेणे असा अर्थ होतो. तो अर्थ बरा वाटतो, कारण आत्तापर्यंत आर्या, गाथा या रचनांचा निर्देश झाला आहे (आ). (24) आभरणविहि (आभरणविधि) :- अलंकाराचे नियम (बा,वै), आभूषण तयार करणे व वापरणे (उ.गु.), निरनिराळी-फूल इत्यादींची-आभरणे तयार करणे, माहीत असणे, व ती कशी कशी वापरावीत, यांचे ज्ञान म्हणजे आभरणविधि (आ). (25) तरुणीपडिकम्म (तरुणीप्रतिकर्म) :- स्त्रियांची वेषभूषा२७ (वा), तरुण कुमारीची वेषभूषा (वै), तरुण स्त्रियांचे प्रसाधन (उ), तरुणीनी सेवा८ (गु), तरुणीला स्नान घालणे, तिचे केस विंचरणे, केसांना सुगंधी धूर देणे, केसांची विविध रचना करणे, तिचे अन्य शरीरसंस्कार, वेषभूषा व अलंकारभूषा यांचा समावेश तरुणीपडियममध्ये होतो (आ). (26-36) इत्थिलक्खण (स्त्रीलक्षण), पुरिसलक्खण (पुरुषलक्षण) हयलक्खण (हयलक्षण), गयलक्खण (गजलक्षण), गोणलक्खण (गोलक्षण), कुक्कुडलक्खण (कुक्कुटलक्षण), छत्तलक्खण (छत्रलक्षण), दंडलक्खण (दंडलक्षण), असिलक्खण (असिलक्षण), मणिलक्खण (मणिलक्षण), कागिणिलक्खण (काकिनीलक्षण) :(26-36) या कलांमध्ये क्रमाने स्त्री, पुरुष, घोडा (हय), हत्ती (गय), गाय/बैल (गोण), कोंबडा (कुक्कुड), छत्री/छत्र (छत्त), दंड, तरवार (असि), मणि, आणि कागिणी नावाचे रत्न यांचे लक्षण जाणणे, अशा कला सांगितलेल्या आहेत. लक्षण म्हणजे खाणाखुणा (बा), खुणा व चिह्ने९ (वै,उ), गुण३९ (उ), लक्षण (गु), असे अर्थ दिलेले आहेत. तेव्हा, येथे सांगितलेले पदार्थ आणि प्राणी हे बरे-वाईट, सदोष-निर्दोष, शुभ-अशुभ इत्यादि आहेत. हे ओळखण्याच्या त्यांच्या ठिकाणच्या विशिष्ट खुणा, आकृति, चिह्न इत्यादि होत (आ). येथे, दंड म्हणजे शस्त्र म्हणून वापरावयाची काठी, सोटा, गदा (उ), असा अर्थ दिलेला आहे. साधा दांडका वा दंडुका असाही अर्थ होईल (आ). कागिणि हे एक प्रकारचे 1 रत्न आहे. ___ (37) नगरमाण (नगरमान) :- नगराचे मोजमाप (बा), नगरींची यो जना वा आखणी (वै), नगरयोजना (वै), नगरयोजना (उ), नवूनगर वसाववानुं प्रमाण विगेरे (गु). नवीन नगर वसविताना अथवा जुन्या नगरीला जोडून नवीन नगर वसविताना करावयाची मोजणी, आखणी योजना इत्यादि. (38) वूह (व्यूह) :- सैन्याची विशिष्ट रचना (बा), सैन्याची विशिष्ट 3 उडती/हलती रचना (वै), सैन्याची मांडणी (उ) व्यूह युद्धनी रचना (गु). संचलन वा युद्ध यांसाठी करावयाची सैन्याची विशिष्ट रचना अथवा मांडणी. __ (39) पडिवूह (प्रतिव्यूह) :- (समोरील सैन्याच्या") विरोधी अशी सैन्याची विशिष्ट रचना (बा), सैन्याची विशिष्ट (विरूद्ध) उडती/हलती रचना (वै), (प्रतिपक्षाच्या सैन्या-)विरुद्ध सैन्याची मांडणी (उ), सामावाळाला (=समोरील) सैन्य सन्मुख स्वसैन्य राखवानी कळा (गु), प्रतिपक्ष वा शत्रु समोर असताना, स्वसंरक्षण करण्यास अथवा शत्रूला शह देण्यास, त्याला विरोधी होईल, अशी सैन्याची विशिष्ट प्रकारची व्यवस्था, मांडणी किंवा रचना. (40) चार (चार) :- (सैन्याची) उडती/हलती४५ मांडणी (बा), सैन्याची४५ मांडणी (वै), सैन्यगणनेचा 6 अंदाज (उ), सैन्य चलाववानी कळा (गु). (41) पडिचार (प्रतिचार) :- (सैन्याची) हलती प्रति-मांडणी (बा), प्रति ६–मांडणी (वै), सैन्य मांडणीची कला (उ), सैन्यने सामा सैन्यनी सन्मुख चलाववानी कळों (गु). चार आणि पडिचार म्हणजे सैन्याची हालचाल व शत्रूची चाल पाहून त्याविरुद्ध आपल्या सैन्याची हालचाल, हे अर्थ ठीक आहेत. तथापि येथे पुढील अर्थही लागू पडणारे आहेत :- चार म्हणजे हेर, गुप्तहेर. तेव्हा, चार म्हणजे पूर्व पहाणी वा पहाणी (Reconnaissance) वा हेरगिरि करण्याची कला. आणि मग प्रतिचार म्हणजे शत्रूच्या हेरगिरी विरुद्धची हेरगिरी, असा अर्थ होतो (आ).
Page #117
--------------------------------------------------------------------------
________________ (42) जुद्ध (युद्ध) :- झगडा/मारामारी८ (बा,वै,उ), सामान्य युद्ध (गु). प्रत्यक्ष शत्रूबरोबर युद्ध, झगडा, मारामारी, हाणामारी तसेच स्वतंत्रपणे प्रतिपक्षाबरोबर करता येणारी लठ्ठालठ्ठी वा मारामारी. (43) निजुद्ध (नियुद्ध) :- जोराची मारामारी (बा,वै), जवळून केलेली, वैयक्तिक मारामारी (उ), विशेष युद्ध (गु). निजुद्ध म्हणजे कुस्ती अथवा मल्लयुद्ध. हाच अर्थ जैन वाङ्मयात अन्यत्रही सापडतो. उदा. आख्यानमणिकोश, श्लोक 16-17, पृ.२६१ (आ). (44) जुद्धाइजुद्ध (युद्धातियुद्ध) :- उच्च५० मारामारी (बा,वै), भयंकर५० मारामारी (उ), अत्यंत विशेष युद्ध५९ (गु). (45) मुट्ठिजुद्ध (मुष्टियुद्ध) :- मुष्टि वापरून केलेली हाणामारी. (46) बाहुजुद्ध (बाहुयुद्ध) :- कुस्ती५२ (बा,वै), हातघाईची५२ लढाई (उ), हातांचा वापर करून केलेली हाणामारी. (47) ईसत्थ :- या शब्दाची 'इषु-अस्त्र' अशी संस्कृत छाया घेऊन, बाण सोडणे (बा,वै), धनुष्यबाणाचे शास्त्र (उ), असे अर्थ दिलेले आहेत. या शब्दाची 'ईषदर्थ' अशी संस्कृत छाया घेऊन, 'थोडाने घणुं अने घणाने थोडं देखाडवानी कळा' (गु). असा अर्थ केलेला आहे. येथे, ईसत्थ शब्दात पहिला शब्द ईस (देशी) खुंटा, खिळा, ईश ईश्वर, आणि ईसा नांगराचे एक काष्ठ आणि दुसरा शब्द शास्त्र किंवा अस्त्र, हे शब्द घेता येतात. त्यानुसार पुढील अर्थ होतात. खिळा Dart, तो फुकून वा अन्य प्रकाराने मारण्याची कला, ईश्वराचे शास्त्र म्हणजे ईश्वरवादाचे ज्ञान, नांगराचे काष्ठ यावरून नांगरण्याची कला. एक नक्की की येथे बाण सोडणे वा धनुष्यबाणाचे शास्त्र' हे अर्थ घेता येणार नाहीत, कारण पुढे धनुर्वेद ही स्वतंत्र कला आली आहे (आ). (48) छरुप्पवाय (त्सरुप्रवाद) :- खड्ग पेलणे५४/ चालविणे (बा,वै), खड्गयुद्ध'४ (उ), खड्गनी मूठ बनावना विगेरेनी कळा (गु). त्सरु म्हणजे तरवार वा अन्य शस्त्र यांची मूठ असा अर्थ आहे. मग मठ असणारी शस्त्रे चालविण्याची कला असा अर्थ होतो (आ). येथे 'छरुप्पवाह' असाही पाठभेद आढळतो. प्रवाह म्हणजे 'उत्तम घोडा' असा अर्थ आहे (गीलको) तेव्हा छरुप्पवाह म्हणजे घोड्यावर बसून मूठ असणारी शस्त्रे चालविण्याची कला असा अर्थ होईल (आ). (49) धणुव्वेय (धनुर्वेद) :- धनुष्यविद्या५ (बा), धनुष्यबाणाचे शास्त्र (वै), धनुष्यबाणशास्त्रावरील 5 (वेद) ग्रंथ (उ), धनुष्यबाणनी५६ कळा (गु). (50) हिरण्णपाग (हिरण्यपाक) :- अघडीव सोने मुशीत घालणे (बा,वै), रुपे वितळविणे (उ), रुपानो पाक बनाववानी कळा (गु). (51) सुवण्णपाग (सुवर्णपाक) :- घडीव सोने मुशीत घालणे (बा,वै), सोने वितळविणे (उ), सुवर्णनो पाक बनाववानी कळा (गु). येथे हिरण्ण आणि सुवण्ण असे स्वतंत्र शब्द वापरले असल्याने, त्यांचे भिन्न अर्थ घेणे आवश्यक ठरते. म्हणून हिरण्ण म्हणजे अघडीव सोने, रुपे, अथवा अन्य मौल्यवान धातु, आणि सुवर्ण म्हणजे घडीव सोने असे अर्थ घ्यावे लागतात. (52) वट्टखेड :- या शब्दाची वृत्तक्रीडा' अशी संस्कृत छाया घेऊन, पुढील अर्थ दिलेले दिसतात. गोळ्यांशी खेळ५९ (बा), गोट्यांशी खेळ५९ (वै), चेंडूंशी खेळ५९ (उ) येथे वृत्त म्हणजे गोलपदार्थ असा अर्थ आहे. गुजराती भाषांतरात क्षेत्र खंडवानी (=नांगरण्याची) कला' असा अर्थ आहे. आता वट्ट म्हणजे कासव (पासम) हा अर्थ घेतल्यास, ‘कासवांशी खेळ' असा अर्थ होईल (आ). वट्टखेड शब्दाची वर्त्मक्रीडा' अशीही संस्कृत छाया होते. मग, रस्त्यावर करावयाचा अथवा दाखवावयाचा खेळ, असा अर्थ होईल (आ). (53) नालियाखेड :- या शब्दाची 'नालिका-क्रीडा' अशी संस्कत छाया घेऊन.पढील अर्थ दिले जातात :- कमळांच्या देठांशी खेळ (बा,वै), कमळांचे देठ कापणे, कमळाच्या देठापासून बनविलेले वा कमळाच्या
Page #118
--------------------------------------------------------------------------
________________ देठाचा आकार असणारे वाद्य वाजविणे, एक प्रकारचे द्यूत (उ), कमळना नाळ छेदवानी कळा (गु). नाली म्हणजे तालवाद्य असा अर्थ आहे (गीलको), पण मागे ‘वाइय' येऊन गेले असल्याने, तो अर्थ येथे घेण्याचे कारण नाही. नालीक म्हणजे भाला (गीलको), आणि ‘णालिआ' म्हणजे आपल्या शरीरापेक्षा चार बोटे लांब काठी (पासम), असे अर्थ आहेत. हे दोन अर्थ लक्षात घेऊन, नालियाखेडचे पुढील अर्थ होतात. भाल्याचा खेळ, भाला फेकण्याचा खेळ ; लहान भाल्याच्या टोकाला दोरी बांधून कसरत दाखविण्याचा खेळ ; बोथाटीचा खेळ. तसेच, नालिया शब्दाची संस्कृत छाया 'नाडिका' अशीही होते. नाडिका म्हणजे हातचलाखी, शरीरातील नाडी (आपटे कोश), असा अर्थ आहे. त्याला धरून, हातचलाखीचा खेळ, अथवा शरीरातील विशिष्ट नाड्या दाबण्याची कला, असेही अर्थ होतात (आ). (54) पत्तच्छेज्ज (पत्रच्छेद्य) :- पानांवरील कोरीव काम (बा), पानांप्रमाणे आकृत्या काढणे (वै), बाणाने झाडांवरील१ पानांचा वेध करणे (उ), पत्र छेदवानी कळा (गु)-पत्र म्हणजे झाडाचे पान तसेच धातु इत्यादीचा पत्रा असाही अर्थ आहे. ते लक्षात घेतल्यास पुढील अर्थ होतात. पाने इत्यादी कापून वेगळ्या आकृत्या तयार करणे, वस्त्र इत्यादीवर विविध पानांच्या आकृत्या काढणे ; धातूंचे पत्रे कापणे ; तसेच धातु इत्यादींच्या पत्र्यांवर काम करणे (आ). (55) कडच्छेज्ज/कडगच्छेज्ज (कट-/कटक-च्छेद्य) :- बांगड्यांवर२/कांकणावर कोरीव काम करणे (बा), वर्तुळाकार आकृति काढणे (वे), बांगडीतून/कंकणातून/कड्यामधून बाण सोडणे (3), कडा, १२चूडी, कुंडळ छेदवानी कळा (गु).-कट म्हणजे गवत, बांबूचा पदार्थ, फळी/तक्ता असे अर्थ आहेत (गीलको). कड म्हणजे तासलेले लाकूड, पर्वताचा एक भाग, आणि कडा, असे अर्थ आहेत (पासम). यांना अनुसरून पुढील अर्थ होतात :- गवत कापणे, बांबू छिलणे, फळ्या कापणे, लाकूड तासणे, पर्वताचा एकादा भाग फोडणे. (पर्वताच्या कड्यावर चढणे-उतरणे हा अर्थ होईल काय ?) (आ). (56) सज्जीव (सजीव) :- जीवन६४ देणे (बा,वै), मृत माणसांना जिवंत करण्याच्या मंत्रांचे ज्ञान (उ), मरेलाने (मूर्छा पासेलाने) मंत्रादिक वडे जीवतो करवानी कळा (गु).-बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्याची कला. (शरण आलेल्याला जीवदान देणे असा अर्थ होईल काय ? (आ)). (57) निज्जीव (निर्जीव) :- जीवित५ घेणे (बा), जीवित५ काढून घेणे (वै), सोन्यासारख्या धातूंना औषध या स्वरूपात वापरण्यास योग्य करण्याची कला (उ), जीवताने मंत्रादिक वडे मरेला जेबो करवानी कळा (गु).-येथे निर्जीव हा शब्द बेशुद्धी व मरण या दोन अर्थांनी घेता येईल. मरण हा अर्थ घेतल्यास :- शिरच्छेद, फास, सूळ, जाळणे, बुडविणे, तरवार/भाला खुपसणे, गदा इत्यादींनी मस्तक फोडणे, गळा दाबणे, नाकतोंड दाबो इत्यादींनी जीव घेणे. बेशुद्धी असा अर्थ घेतल्यास :- पीडा/मार, मोहिनी विद्या, मंत्र, औषध इत्यादींनी बेशुद्ध करणे (आ). (58) सउणरुय (शकुन रुत) पक्ष्यांचे ओरडणे (बा), पक्ष्यांचे आवाज (वै), भिन्न भिन्न पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची कला (उ), कागडा, घुबड, विगेरे पक्षीओना शब्द जाणवानी कळा (गु).-तसेच, निरनिराळ्या पक्ष्यांप्रमाणे स्वत:च्या तोंडातून आवाज काढण्याची कला (आ). (2) तीन ग्रंथांत समान असणाऱ्या कला (अ) नाया, राम, औप यांत समान असणाऱ्या कला : 1. पासय (पाशक) :- फाशांनी खेळणे (बा,वै,उ,गु). याच्या जोडीने फास किंवा जाळे तयार करण्याची अथवा फाशी देण्याची कला, असा अर्थ घेता येतो (आ). 2. विलेवणविहि विलेपनविधि :- सुगंधी पेस्टचे नियम (वै), विलेपनाची कळा (उ), विलेपननी वस्तु जाणवी, तैयार करवी चोळवी विगेरेनी कळा (गु).-सुवासिक वा औषधी विलेपने तयार करणे आणि वापरणे
Page #119
--------------------------------------------------------------------------
________________ (आ). 3. गीइया (गीतिका) :- पोवाडा६८ करणे (बा), भावगीते व पोवाडे यांची रचना (वै), गीति वृत्तात गाणी वा काव्य६८ यांची रचना (उ), गीत बनाववानी कळा (गु)-गीति नामक वृत्तात पद्ये करणे वा गीते रचणे. ___ 4. हिरण्णजुत्ति (हिरण्ययुक्ति) :- अघडीव सोने करण्याचा६९ उपाय (बा), अघडीव सोन्याचा शोध व पहेरवा विगेरेनी कळा (गु). 5. सुवण्णजुत्ति (सुवर्णयुक्ति) :- घडीव सोने करण्याचा उपाय (बा), घडीव सोन्याचा शोध व काम (वै), सोन्याची शुद्धी आणि चाचणी०० (उ), रुघु नवु बनावउं तेना अलंकार विगेरे बनाववा तथा पहेरवा विगेरेनी कळा (गु). मागे पाहिल्याप्रमाणे, हिरण्य म्हणजे रुपे वा अन्य मौल्यवान् धातू. सुवर्ण म्हणजे सोने. सोने, रुपे आणि अन्य मौल्यवान् धातू असणारी खनिजे शोधणे, त्यातून धातू वेगळा काढणे, तो शुद्ध करून त्याचा, पत्रा, तार इत्यादि बनविणे, आवश्यकतेनुसार त्यांना छिद्रे पाडणे, त्यांचा कस ओळखणे, इत्यादि कला. खेरीज, युक्ती म्हणजे मिश्रण असाही अर्थ आहे (गीलको), त्यानुसार निरनिराळ्या धातूंच्या मिश्रणाने मिश्र धातू सिद्ध करणे, असाही अर्थ होतो (आ). 6. चुण्णजुत्ति (चूर्ण युक्ति) :- सुगंध आणि चूर्णे (बा), चूर्णाचा वापर (वै), पूड वा चूर्ण तयार करणे (उ) गुलाल अबील विगेरे चूर्ण बनाववानी तथा तेनो उपयोग करवानी कळा (गु) :-सुगंधी तसेच औषधी आणि खाण्यास योग्य अशी चूर्णे (=पुडी) तयार करणे (आ). 7. वत्थुविज्जा (वास्तुविद्या) :- बांधणीची विद्या (बा), बांधणीचे शास्त्र (वै), वास्तुविद्या (उ), घर, दुकान विगेरेवास्तूशास्त्रनी विद्या (गु).-येथे वत्थुविज्जा शब्दाची संस्कृत छाया वस्तुविद्या' अशीही होते ; त्यमुसार पदार्थविज्ञानशास्त्र असा अर्थ होईल (आ). (8-9) चक्कवूह (चक्रव्यूह),ग़रुलवूह-गरुड्यूह) :- चक्र व गरुड यांच्या आकाराप्रमाणे सैन्याची मांडणी करणे. (10) सगडवूह (शकटव्यूह) :- पाचरीप्रमाणे असणारी सैन्याची मांडणी (उ). पण शकटाच्या आकाराची सैन्याची मांडणी हा शब्दश: अर्थ आहे. काही व्यूहांच्या माहितीसाठी मनुस्मृति 7.187-188 वरील कुल्लूक इत्यादींची स्पष्टीकरणे पहावीत. (11) लयाजुद्ध (लतायुद्ध) :- शाखायुद्ध (बा), वेत-युद्ध५ (वै), चाबकाने केलेले युद्ध (उ), लता वडे युद्ध (गु).-लता या शब्दाचे अर्थ चाबूक (आपटेकोश), यष्टि, छडी (पासम) असे आहेत. तेव्हा चाबकाने अथवा छडीने केलेली मारामारी असा अर्थ होतो. 'सो...दारगं लयाए हंतुं पयत्तो' (वसुदेवहिंडि, पृ.७५) मध्ये लता म्हणजे छडी असा अर्थ आहे. तसेच, समवायांगसूत्रात ‘दंडजुद्ध' हा शब्द आहे (आ). (आ) नाया, सम, राय या तीन ग्रंथांतील समान कला (1) अट्ठिजुद्ध :- हा शब्द 'अस्थियुद्ध' असा घेऊन, अस्थियुद्ध 6 (बा,वै), हाडापासून बनवलेल्या शस्त्रांनी युद्ध (उ) ; अस्थि (अथवा) यष्टि वडे युद्ध (गु), असे अर्थ दिले जातात. अट्टि म्हणजे ज्यात बिया झालेल्या नाहीत अशी फळे असाही अर्थ आहे (पासम) मग, अशी हिरवी कठिण फळे फेकून केलेली मारामारी असा अर्थ होईल. अट्ठिजुद्ध हा शब्द ‘अट्ठिय-जुद्ध' असाही घेता येतो. मग एके ठिकाणी स्थिर न रहाता (अट्टिय=अ-स्थित) केलेले युद्ध, असा अर्थ होतो (आ). (2) सुत्तखेड (सूत्रक्रीडा) :- धाग्यांशी/सुतांशी खेळ (बा,वै) दोरांशी खेळ (उ), सुतर (सरळ)७८ छेदवानी कळा (गु)).-सूत वापरून भरतकाम/कशिदा करणे, लोकरीच्या धाग्यांनी हाताने विणकाम करणे, दोरीने
Page #120
--------------------------------------------------------------------------
________________ आणि दोरीवरून उड्या मारणे हा खेळ, ताणलेल्या दोरावरून चालणे, उभ्या दोरावर हाताच्या उपयोगाने चढणे आणि उतरणे, दोऱ्यांनी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणे, हेही अर्थ होतात (आ). (इ) सम, राय, व औप या तिन्हीतील समान कला (1) चक्कलक्खण (चक्रलक्षण) :- मागे लक्षण' चा अर्थ आलेला आहे. चक्र म्हणजे चाक. हे चाक रथ, गाडी, कुंभार, पवनचक्की इत्यादींचे असू शकेल. तसेच, चक्र हे फेकून मारण्याचे एक शस्त्रही होते (आ). (2) मणिपाग (मणिपाक) :- मागे 'पाक' शब्दाचा अर्थ येऊन गेला आहे. त्याला धरून, वाटोळा पदार्थ (मणि) तयार करण्यास काचेसारखी वस्तू वितळविणे असा अर्थ होईल. मणि म्हणजे रत्न, मोती, स्फटिक, लोहचुंक, काच इत्यादींचा वाटोळा पदार्थ असे अर्थ आहेत (गीलको) ; आणि पाक म्हणजे पक्वता, पक्ति, पूर्णता असाही अर्थ आहे. मग रत्नमणि इत्यादींना पूर्णता आणणे असा अर्थ होईल (आ). __(3) धातुपाग (धातुपाक) :- धातू म्हणजे खनिज धातू (गीलको), शिसे, जस्त हे धातू (पासम), असे अर्थ आहेत. खनिजे व शिसासारखे धातू वितळविणे, ते शुद्ध करणे व त्यांच्या वस्तू तयार करणे असा अर्थ होतो. (आ). (ई) नाया, सम, औप या तिन्हीतील समान कला (1) खंधावारमाण (स्कंधावार-मान) :- शिबिराचे मोजमाप (बा), सैन्यना पडावनु प्रमाण विगेरे (गु).-जवळ पाणवठा इत्यादि तसेच सुरक्षित जागा पाहून, सैन्याच्या संख्येप्रमाणे छावणीची आखणी करणे (आ). (3) दोन ग्रंथांत समान असणाऱ्या कला सम आणि औप या दोहोंतील समान कला (1) गंधजुत्ति (गंधयुक्ति) :- ही विविध प्रकारच्या सुगंधी द्रव्यांच्या रासायनिक संयोगापासून नवनवीन सुगंधी द्रव्य निर्माण करण्याची कला आहे (पू). गंध म्हणजे सुगंधी पदार्थ. निरनिराळी अत्तरे, सुगंधी तेले, उटणी इत्यादि तयार करण्याची युक्ति वा कौशल्य (आ). (2) चम्मलक्खण (चर्मलक्षण) :- लक्षणचा अर्थ मागे आला आहे. चर्म म्हणजे कातडे अथवा ढाल (आ). (3)-(5) खंधावारनिवेस/खंधावारनिवेसण (स्कंधावारनिवेश/स्कंधावारनिवेशन), वत्थुनिवेस/वत्थुनिवेसण (वस्तु-वास्तु-निवेश/निवेशन), नगरनिवेस/नगरनिवेसण (नगरनिवेश/नगरनिवेशन) :- निवेश आणि निवेशन हे शब्द समानार्थी आहेत. निवेश म्हणजे वसविणे, स्थापना. स्कंधावार म्हणजे छावणी, शिबिर, वस्तु म्हणजे एखादा पदार्थ, वास्तु म्हणजे इमारत इत्यादि. नगर म्हणजे शहर. तेव्हा, आराखडा अथवा आखणी करून सैन्यासाठी वा प्रवाशांसाठी छावणी ठोकणे, इमारतींची बांधणी करणे, नगर वसविणे असे अर्थ होतात. वस्तु म्हणजे कट्टा, पार, समाधि, स्तंभ यांसारखा पदार्थ बांधणे वा स्थापन करणे (आ). (4) एका ग्रंथातील कला (क) राय/राजमधील कला (1) णिद्दाइय (णिद्दाइया) (निद्रायित) :- निद्रा म्हणजे झोप. हवे त्यावेळेस वाटेल त्या ठिकाणी झोपी जाणे, झोप सावध ठेवणे, इतरांना झोप आणणे (आ). येथे, णिद्दा/णिद्दाया असा देशी शब्द मूळ घेतल्यास, त्याचा अर्थ 'विशिष्ट वेदना' (पासम) आहे. मग, स्वत:मध्ये अथवा इतरांमध्ये विशिष्ट वेदना निर्माण करणे, असा अर्थ होईल (आ). (2) माणवार :- या राय/राज ग्रंथात ‘खंधवार माणवार' असे शब्द क्रमाने येतात. आता, खंधवार शब्दाला
Page #121
--------------------------------------------------------------------------
________________ जोडून पुढील 'माण' घेतला, तर नाया, सम, औप यांमध्ये असणाऱ्या खंधावारमाणप्रमाणे, येथेही खंधावारमाण ही कला होते. 'माणवार' मधील ‘माण' हा ‘खंधावार'ला जोडून घेतल्यावर उरतो 'वार' शब्द. हा शब्द 'चार' शब्दाऐवजी लेखकाचा प्रमाद असावा. आणि तेथे चार' घेतल्यास, सध्याच्या राज/रायमध्ये न येणारी 'चार' ही कला आपोआपच येते (आ). माणवार असा स्वतंत्र शब्द पासममध्ये नोंदलेला नाही. त्याचा नक्की अर्थ काय असावा हे सांगता येत नाही. माण म्हणजे मन. माण शब्दाने चार प्रकारच्या मोजण्या सूचित होतात :- प्रस्थ, इत्यादि मापांनी मोजणे (मेयमान), हात इत्यादींनी मोजणे (देश-मान), शेर इत्यादि वजनांनी मोजणे (तुलामान), आणि घटियंत्र इत्यादीवरून काल मोजणे (काल-मान). वार म्हणजे कुंभ, घडा (पासम). हे अर्थ घेऊन 'माणवार'चा अर्थ काय करायचा असा प्रश्न पडतो. आता, वार म्हणजे वासर आणि मान म्हणजे कालमान असे घेतल्यास, दिवस इत्यादि मोजणे असा काही तरी अर्थ होईल (आ). तथापि माणवार ही स्वतंत्र कला न घेता, वर सुचविल्याप्रमाणे खंधावारमाण व चार असे घेणे योग्य वाटते (आ). (3) जुद्धजुद्ध (युद्धयुद्ध) :- मागे आलेल्या 'जुद्धाजुद्ध' ऐवजी जुद्धजुद्ध हा लेखक-प्रमाद असावा. आणि तसे मानले नाही तरी जुद्धजुद्ध म्हणजे जोरदार युद्ध असा अर्थ होईल (आ). (4) खंधवार (स्कंधावार) :- ही कला वैप आणि उप मध्ये आहे. शिबिराची योजना (वै), छावणी ठोकण्याची योजना (उ).-सैन्याची छावणी, शिबिर वा तळ आखणे व ठोकणे (आ). (5) जणवय :- हा शब्द मागे आलेल्या 'जणवाय' ऐवजी लेखकदोष अथवा मुद्रणदोष असावा. तसे मानले नाही तर या शब्दाचा अर्थ असा होईल :- जणवय म्हणजे जनपद. जनपद म्हणजे राष्ट्र, जमात, ग्रामीण भाग, जनता/प्रजा असे अर्थ आहेत (आपटे कोश). मग, राष्ट्रात तसेच प्रजेत काय चालले आहे हे जाणून घेणे असा अर्थ होईल. खेरीज, जणवय शब्दाच्या जन-वचस्, जन-वयस्, जनव्रत, आणि जनव्रज अशाही संस्कृत छाया होतात. त्यानुसार लोकसमूह काय बोलतो ; प्रजेचा आचार-विचार कसा आहे, जनतेतील वयोगट कसे आहेत हे जाणून घेणे. तसेच लोकसमूहावर नियंत्रण ठेवणे, त्याला अनुकूल करून घेणे, असाही अर्थ होतो (आ). (ख) औपमधील कला (1) संभव :- या शब्दाचे उत्पत्ति, शक्यता, ऐश्वर्य, परिचय, तुल्य प्रमापता इत्यादि अर्थ आहेत. (गीलको) त्यातील उत्पत्ति' अर्थाला धरून प्रसूतिकर्म' करण्याची कला असा अर्थ होईल. 'शक्यता' या अर्थानुसार शक्यता वर्तविणे असा अर्थ होईल (आ). (2) मुत्ताखेड्ड :- या शब्दाच्या संस्कृत छाया मुक्त-क्रीडा, मुक्तक क्रीडा, मूर्त-क्रीडा, आणि मुक्ताक्रीडा अशा होऊ शकतात. मुक्त म्हणजे आनंदित (गीलको) मग आनंदाने/आनंदासाठी केलेली क्रीडा. मुक्तक म्हणजे फेकून मारण्याचे एक शस्त्र (गीलको) मग गलोल, गोफण इत्यादि द्वारा फेकून मारण्याची क्रीडा. मूर्तक्रीडा म्हणजे (चारचौघात) उघडपणे/मोकळेपणाने करावयाची क्रीडा. मुक्ता म्हणजे मोती आणि वस्त्रविशेष (गीलको) मग मोत्यांचा/मोत्यांशी खेळ, तसेच विशिष्ट प्रकारे हलवून वा फिरवून करावयाची क्रीडा (आ). मुत्ताखेड हा शब्द 'मुद्दा-खेटु' (मुद्राक्रीडा) असा असण्याची शक्यता आहे. मुद्रा म्हणजे हातांचे/बोटांचे विशिष्ट आकार किंवा अवस्था, मग त्याद्वारे विशिष्ट सांकेतिक अर्थ प्रगट करण्याची कला असा अर्थ होईल (आ). ___(3) खुत्ताखेड्ड :- कुत्त (देशी) म्हणजे कुतरा (पासम). कुत्त चे वर्णान्तर खुत्त (जसे-कीलचे वर्णान्तर खील). मग कुत्र्याचे खेळ शिकणे, शिकवणे वा करून दाखविणे असा अर्थ होईल. खुत्त (देशी) म्हणजे पाण्यात बुडणे (पासम). मग पाण्यात बुडून राहण्याचा खेळ (आ). (येथे खत्तखेड्ड आणि खित्त-खेड्ड असे पाठ भेद घेता येतील. खत्त (देशी) म्हणजे खणणे ; मग विशिष्ट प्रकारचा वा प्रकाराने खड्डा खणण्याची क्रीडा (खित्तखेड्ड म्हणजे क्षेत्रक्रीडा म्हणजे मैदानी खेळ-आ).
Page #122
--------------------------------------------------------------------------
________________ येथे मुत्ताखेड्ड आणि खुत्ताखेड्ड हे स्वतंत्र शब्द कलासूचक मानून होणारे अर्थ वर दिले आहेत. तथापि हे दोनशब्द म्हणजे इतर ग्रंथात आढळणाऱ्या 'सुत्तखेड्ड' ऐवजी लेखनदोष असण्याची शक्यता वाटते. (ग) सममध्ये असणाऱ्या कला (1) मधुसित्थ (मधुसिक्थ) :- हा शब्द पूर्णाऱ्या मध्ये पृ.७८६ वर मधुसिक्भ असा मुद्रित आहे ; तो उघड उघड मुद्रणदोष आहे. मधुसिक्थ म्हणजे तळहात, पाय रंगविण्यासाठी लागणारी मेंदी तयार करण्याची कला' आहे (पू), हा अर्थ 'स्त्रियांच्या पायाला लावण्याची मेंदी वगैरे' या पासमने दिलेल्या अर्थाला धरून आहे. तसेच, महुसित्थ म्हणजे मेण (पासम) ; मग मेण व मेणाचे पदार्थ तयार करणे. खेरीज, मधुसिक्थक म्हणजे एक प्रकारचे विष (आपटेकोश) मग विष तयार करण्याची कला असा अर्थ होईल (आ). __ हा शब्द मधु आणि सित्थ असाही घेता येईल. मधु म्हणजे मध, मद्य, मेण, साखर, असे अर्थ आहेत (गीलको), आणि सिक्थ म्हणजे भाताचे शीत, घास (गीलको), धान्यकण, धनुष्याची दोरी (पासम) असे अर्थ आहेत. त्यानुसार धनुष्याच्या दोरीला मेणाची पुटे चढविणे, साखर घालून साखरभात करणे, धान्यापासून मद्य तयार करणे, असेही अर्थ होऊ शकतील (आ). (2) मिंढयलक्खण :- मिंढय म्हणजे मेंढा (मिंढय म्हणजे मेढ़क (=शिश्न) असाही अर्थ आहे). (3) चंदलक्खण (चंद्रलक्षण) :- चंद्र म्हणजे आकाशातील चंद्र, कापूर, पाणी, लाल मोती, छत, एलची असे अर्थ आहेत (गीलको). ___मागील मेंढयलक्खण'च्या साहचर्याने चंदलक्खण शब्द झाला असावा. पुढील (4)-(6) मधील कलांप्रमाणे येथे चंदचरिय' असे असण्याची शक्यता वाटते. तसे घेतल्यास चंद्राच्या गतीचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (4)-(6) सूरचरिय (सूर्यचरित) राहुचरिय (राहुचरित) गहचरिय (ग्रहचरित) :- सूर्य, राहू, व अन्य मंगळ, शनि इत्यादि ग्रहांच्या गती इत्यादींचे ज्ञान (आ). (7)-(8) सोभागकर (सौभाग्यकर), दोभागकर (दुर्भाग्यकर) :- बरे वाईट घडवून आणणाऱ्या शंख, रत्ने इत्यादि विशिष्ट वस्तूंचे ज्ञान किंवा मंत्र तंत्राचे ज्ञान (आ). (9) विज्जागय (विद्यागत) :- बहात्तर कलांच्या यादीत येणाऱ्या धनुर्विद्या इत्यादि सोडून, उरलेल्या करपल्लवी विद्या, योगविद्या इत्यादींचे ज्ञान असा अर्थ होईल (आ) येथे विज्जागम शब्दाची 'वैद्यगत' अशी संस्कृत छाया घेऊन वैद्याप्रमाणे औषधांचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (10) मंतगय (मंत्रगत) :- बहात्तर कलांमधील काहींमध्ये मंत्राचे ज्ञान अपेक्षित आहे. ते सोडून गारूडमंत्र, वशीकरणमंत्र, इत्यादि मंत्रांचे ज्ञान असा अर्थ होईल (आ). (11) रहस्सगय (रहस्यगत) :- रहस्य म्हणजे गुप्त, झाकलेली गोष्ट. तेव्हा, आपले व दुसऱ्याचे रहस्य गुप्त ठेवणे, दुसऱ्यांची रहस्ये जाणून घेणे, झाकलेल्या गोष्टी ओळखणे, गुप्त गोष्टींचा अर्थ लावणे, गुप्त किंवासांकेतिक गोष्टी तयार करणे व इतरांच्या ओळखणे, असे अर्थ होतील (आ). (12) सभासा :- या शब्दाच्या संस्कृत छाया समभासद, सभाष्यक, आणि स्वभाषा अशा होऊ शकतात. मग त्यांचे अर्थ असे :- सभेतील सदस्य या नात्याने काही गोष्टी गुप्त ठेवणे, विशिष्ट नियम पाळणे, नियमानुसर भाषण करणे, इत्यादींचे ज्ञान. स्पष्टीकरणात्मक भाष्यग्रंथांसह निवडलेल्या मूलभूत पुस्तकांचे अध्ययन करणे. स्व चे सर्वांगीण ज्ञान करून घेणे ; म्हणजे आपल्या भाषेचे उपभाषांसह तत्सदृश अन्य भाषांचे ज्ञान असणे. उदा. प्राकृतचे ज्ञान म्हणजे संस्कृतसह प्राकृत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भाषांचे ज्ञान होय (आ). (13) वत्थुमाण (वस्तुमान, वास्तुमान) :- वस्तुमान म्हणजे वस्तूचे मोजमाप. वास्तुमान म्हणजे वास्तुविद्या अथवा सिद्ध असणाऱ्या वास्तूंचे मोजमाप काढता येणे (आ). (14) दंडजुद्ध (दण्डयुद्ध) :- छडी, दंडुका, काठी, सोटा, गदा अशासारख्या वस्तूंनी केलेली हाणामारी
Page #123
--------------------------------------------------------------------------
________________ (आ). (15)-(16) आससिक्खा (अश्वशिक्षा), हत्थिसिक्खा (हस्तिशिक्षा) :- घोडे व हत्ती यांना नानाप्रकारचे प्रशिक्षण देणे (आ). (17) धम्मखेड (धर्मक्रीडा) :- धर्म या शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. त्यांमध्ये धनुष्य असा एक अर्थ आहे (गीलको). तो घेतल्यास धनुष्यक्रीडा असा अर्थ होईल. पण सममध्ये मागे धणुव्वेय, इसत्थ या कल आलेल्या आहेत. त्यामुळे हा अर्थ येथे योग्य वाटत नाहीत. तेव्हा धर्म म्हणजे वरवरचे, दांभिक धर्माचरण असा अर्थ घेता येईल. मनुस्मृति 7.154 मध्ये राजाच्या पाच प्रकारच्या गुप्तहेरांचा निर्देश येतो. त्यात खोटेखोटे धर्माचरण करणारा 'तापस' हेर आहे. तो येथे अभिप्रेत असावा (आ). शक्यता अशी वाटते की येथे धर्मक्रीडा असा शब्द नसूम घर्मक्रीडा असा शब्द असावा. आता धर्म म्हणजे उन्हाळा, उष्णता, घाम, कढई असे अर्थ आहेत (गीलको). मग कढई वापरून खेळण्याचा खेळ, उन्हाळ्यात खेळावयाचे खेळ, उन्हात खेळावयाचे खेळ, घाम फोडणारे खेळ, असे अर्थ होऊ शकतील (आ). (18) चम्मखेड (चर्मक्रीडा) :- चर्म म्हणजे चामडे, ढाल.८६ ज्यात कातडे अगर ढाल वापरले जाते असे ढाल-तरवार, वेतचर्म, इत्यादि खेळ असा अर्थ होईल (आ). अन्य कलांशी तुलना ___या लेखाच्या प्रारंभी कुवलयमाला ग्रंथातील तसेच हिंदु आणि बौद्ध कला यांचा उल्लेख केला होता. त्या कलांशी जैनागमग्रंथातील कलांची तुलना आता संक्षेपाने केली आहे. कुवलयमालातील व जैनागमातील कला कुवलयमाला व जैनागम यांमध्ये पुढील 8 कला समान आहेत : (1) गणिय (2) गंधजुत्ति (3) गयलक्खण (हत्थीणं लक्खणं) (4) जूय (5) धणुव्वेय (6) नट्ट (7) पत्तच्छेज्ज, आणि (8) हयलक्खण (तुरयाणं लक्खणं). खेरीज गीय आणि गंधव्व, वत्थविहि आणि वत्थकम्म, आणि सयणविहि आणि सयनसंविहाण या तीन कलांतही साम्य दिसते. हिंदु आणि बौद्धकला व जैनकला (1) हिंदु, बौद्ध आणि जैन ग्रंथांत सापडणाऱ्या कलांमध्ये, या तिघांना समान अशा पाच कला पुढीलप्रमाणे आहेत :- (1) गंधजुत्ति (2) गीय (3) नट्ट (4) पत्तच्छेज्ज (5) वाइय. (2) हिंदुकला व जैनकला यांत समान पुढील पाच कला आहेत :-(1) जुद्ध (2) जूय (3) पहेलिया (4) वत्थुविज्जा (5) सुत्तखेड.. खेरीज आभरणविहि आणि भूषणयोजन, सयणविहि आणि शयनरचना, नालियाखेड (हातचलाखी) व हस्तलाघव, या तीन हिंदू व जैनकलांत साम्य दिसते. (3) बौद्ध आणि जैनकलांत समान असणाऱ्या दहा कला पुढीलप्रमाणे आहेत :- (1) इत्थिलक्खण (2) ईसत्थ (3) गयलक्खण (4) गोणलक्खण (5) धणुव्वेय (6) पुरिसलक्खण (7) मिंढयलक्खण (अजलक्षण) (8) रूप (9) सउणरुयं (शकुनिरुत), आणि (10) हयलक्खण (अश्वलक्षण). खेरीज जूय आणि अक्षक्रीडा, अट्ठावय (अर्थशास्त्र) आणि अर्थविद्या या दोन बौद्ध आणि जैनकलांत साधर्म्य आहे.
Page #124
--------------------------------------------------------------------------
________________ समारोप जैनागमातील वर उल्लेखिलेल्या कला मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आणि राजकीय जीवनाशी कमीजास्त प्रमाणात संबंधित असल्याने त्यावरून तत्कालीन सामाजिक जीवनाची थोडीफार कल्पना येऊ शकते. टीपा 1. भासंको, खंड 2, प्रथमावृत्ती, पुणे 1964, पृ.१६१-१६२ ; श्रीमद्भागवत, भाग 7, प्र. यंदे मुंबई, 1928, शेवटचे पृष्ठ ; लोकप्रभा साप्ताहिक, मुंबई, 27 नोव्हेंबर, 1977, पृ.४४ 2. ललितविस्तर, सं.डॉ.प.ल.वैद्य, दरभंगा 1958, पृ.१०८ 3. या कलांच्या सूची स्थलाभावी दिल्या नाहीत. 4. भासंको, खंड 2, प्रथमसवृत्ती, पुणे 1964 5. अभयदेव, समवायांगसूत्र मुद्रित पोथी, पृ.८३अ-८३ब 6. ही कला राज/राय पोथ्यांत नाही पण वैप आणि उप यांत आहे. 7. ही कला दोरा मध्ये नाही. 8. 'चार' ही कला राज/राय मध्ये नाही. 9. जुद्धाइजुद्ध हा सम च्या मुद्रित पोथीत मुद्रणदोष आहे. 10. चक्कलक्खण ही कला वैपमध्ये नाही. 11. निवेस आणि निवेसण या दोन शब्दांच्या अर्थांत फरक नसल्याने, या शब्दांनी बोधित होणारी कला एकच आहे. 12. लेखनं अक्षरविन्यासः / सलेखः द्विधा लिपिभेदात्... तथाविधविचित्र-उपाधि-भेदतः वा पत्र-वल्क-काष्ठ दन्त-लोह-ताम्र-रजतादयो अक्षराणां आधारः / विषयापेक्षया अपि अनेकधा स्वामिभृत्य-पितृ-पुत्रगुरूशिष्य-भार्या-पति-शत्रु-मित्रादीनां लेखविषयाणां अपि अनेकत्वात् / अभयदेव 13. Impersonation, painting, art of coinage or money changing art of changing appearances. 14. लेप्य-शिला-सुवर्ण-मणि वस्त्र, चित्तादिषु रूपनिर्माणम् अभयदेव. 84. Instrumental music, making music with instruments or playing upon musical instruments. 16. Vocal music, making music with voice. 17. Making music with the drum, playing upon drums. 18. Music of cymbals, making music with cymbals, regulating musical time. 19. नृत्य, गीत, वाद्य, स्वरगत, पुष्करगत, समताल या सर्व कलांचा विषय संगीत आहे. (पू, पृ.७८६) 20. Popular conversation, public oratory. 21. Play of the eight-square board, play ofeight squares, board of chase, a dice-board having eight squares. डॉ. वैद्यांच्या भाषांतरातील chase ही चूक असून, तो शब्द chess असा हवा. 22. द्यूत, जनवाद, पोक्खच्च व अष्टापद ह्या कला द्यूतक्रीडेचे प्रकार होत (पू, पृ.७८६). येथे उल्लेखिलेली पोक्खच्च ही कला पृ.७८५ वरील कलांच्या यादीत दिलेली नाही हे लक्षात घ्यावे. तसेच, जणवाय आणि पोक्खच्च यांना द्यूतक्रीडेचे प्रकार' मानता येईल का हे शंकास्पद आहे. 23. City police, duties of city police (?), duty of protecting a city, police duties. 24. Mixing of water with clay, testing the qualities of water and soil. 25. Rules of food, rules of taking or preparing food. 26. Rules of drink, rules about drinking or using water.
Page #125
--------------------------------------------------------------------------
________________ 27. अन्नविधी व पानविधी ह्या निरनिराळ्या प्रकारांचे खाद्य, स्वाद्य, लेह्य व पेय पदार्थ तयार करण्याच्या कला __ आहेत (पू, पृ.७८६). 28. Rules of dress,art of sewing, washing and putting on clothes. 29. Rules of bed, art of making and using a bed. 30. Arya verses, composition in arya metre. 31. Riddling ; composition of riddles, making and solving riddles. 32. Magadhi composition, composition of magadhi, knowledge of magadhi language or of the history of magadha country. 33. Gatha composition, composition of gatha, composing poetry in gatha metre. 38. Slolka-making, composition of verses, composing verses in general or verses in anushtup metre. 35. आर्या, प्रहेलिका, मागधिका, गाथा व श्लोक या याच नावाच्या छंदांविषयी व काव्यरीतीसंबंधी रचनाविषयक कला आहेत (पू, पृ.७८६). 36. Rules of ornament, making and putting on ornaments. 37. Attiring of damsels, attiring of young maids, adorning young women. 38. आभरणविधी व तरुणी प्रतिकर्म ह्या आभूषणे, अलंकार व तरुणीच्या अंतरंगांसंबंधीच्या कला आहेत (पू, पृ.७८६). येथे 'अंतरंगासंबंधीच्या' हा शब्द 'अलंकारासंबंधीच्या' या शब्दाऐवजी मुद्रण दोष असावा असे वाटते. 39. Points, marks and signs; characteristics, qualities. 40. Stick, club or mace used as weapon. 41. स्त्रीलक्षण ते चर्मलक्षण पर्यंतच्या 14 कला स्त्री, पुरुष, व इतर वस्तू यांची शुभाशुभ लक्षणे जाणण्यासाठी व __ त्यांच्यातील गुणदोष ओळखण्यासाठी उपयोगी पडतात (पू, पृ.७८६). 42. Measurement of cities, planning of cities, townplanning 83. Column, flying column, marshalling an army. 88. Counter-column, flying counter-column, arranging the army against an army. 84. Flying column, columns of army, estimating the strength of an army. 46. Flying counter-column, counter-columns, art of arranging an army. 47. चार, प्रतिचार, व्यूह व प्रतिव्यूह या चार संग्रामविद्या आहेत. आघाडीवर फौजेचा मोहरा बदलणे, शत्रु सैन्याचा हल्ला निष्फळ करण्यासाठी उपयुक्त अशी आपल्या सैन्याची रचना बदलणे, चक्रव्यूह पद्धतीने सैन्यरचना करणे, व शत्रुसैन्याची व्यूहरचना फोडण्यासाठी व्यवस्था करणे इत्यादि कलांचा यात समावेश होतो (पू, पृ.७८६). 48. Fighting. 49. Heavy fighting, close fight, personal struggle. 40. Supreme fighting, fierce fighting. 51. युद्ध, निर्युद्ध व जुद्दाइजुद्ध हे युद्धकलेचे प्रकार होत (पू, पृ.७८७) येथे जुद्दाइजुद्ध हा जुद्धाइजुद्ध ऐवजी मुद्रणदक्षे आहे. पूर्णार्घ्य पुढे सांगतो :- अश्वशिक्षा ते मुष्टियुद्ध कला होत्या (पृ.७८७). 52. Wrestling, hand to hand fight. 43. Arrow-shooting, arrow-throwing, science of archery. 48. Wielding the sword, fencing. 55. Lore of the bow, science of archery, the work (veda) on the science of archery.
Page #126
--------------------------------------------------------------------------
________________ 56. ईसत्थ, छरुण्यवाय :- सुरी, कट्यार, खड्ग इत्यादि निर्मितीच्याही कला असत (पू, पृ.७८७) येथे छरुण्यवाय हा मुद्रणदोष आहे. 57. Casting of unwrought gold, melting silver. 58. Casting of wrought gold, melting gold. 59. Play with cells, play with pebbles, play with balls. &0. Play with lotus-stalks, cutting of lotuses, playing on a wind-instrument made of or having the shape of a lotus-stalk, or a kind of gambling. 61. Engraving leaves, drawing leaf-like figures, piercing leaves of trees with an arrow. 62. Engraving bracelets, drawing circular figures, discharging an arrow through a bracelet. 63. पद्मच्छेद्य व कटकच्छेद्य :- पाने व गवत यांचा छेद करून त्यापासून सुंदर वस्तू बनविण्यासंबंधीच्या या कला होत्या (पू, पृ.७८७) येथे पत्रच्छेद्य ऐवजी पद्मच्छेद्य हा मुद्रणदोष आहे. 64. Giving, life, knowledge of charms to revive dead persons. 65. Taking life, taking away life, art of making metals (such as gold) fit to be used as medicines. 66. Birds cries, cries of birds, art of recognising the notes of different birds. 67. Rules of scented paste, art of anointing 68. Ballad-making, compositions of lyrics or ballada, composing songs or poetry of giti metre. 69. Means of preparing unwrought gold, metallurgy of unwrought gold, testing silver or any precious metal. 70. Means of preparing wrought gold, metallurgy of wrought gold, testing and purifying gold. 71. येथे गुजराती भाषांतरात हिरण्यसाठी सुवर्ण आणि सुवर्णसाठी 'रुपु' असे शब्द वापरले आहेत. पण मागीलप्रमाणे येथेही हिरण्यासाठी रुपु आणि सुवर्णसाठी सुवर्ण असे शब्द वापरावयास हवे होते. 72. Perfumes and powders, use of powders, preparing powders. 73. Lore of building, science of building, art of architecture. 74. A form of military array resembling a wedge. 75. Branch-fighting, cane-fighting, fighting with a whip. 76. Bone-fighting, fighting with weapons made of bones. 77. Play with threads, play with ropes. 78. सूत्रक्रीडा, वृत्तक्रीडा, धर्मक्रीडा व चर्मक्रीडा हे क्रीडाप्रकार होत (पू, पृ.७८७). 79. Measurement of camps. 80. स्कंधावारमान ते नगरनिवेश ह्या सहा कलांत सैन्याचा तळ उभारणे, त्यासाठी योग्य भूमी, (व) किल्ला इत्यादीसठि भूमी निश्चित करणे इत्यादींचा समावेश होतो (पू, पृ.७८७). 81. युक्तिरेषा तु कौशलम् / रविषेणकृत पद्मपुराण, खंड 1, पृ.४८. 82. Planning of camps, planning of encampments. 83. चंद्रलक्षण ते ग्रहचरित या चार कला ज्योतिषशास्त्रासंबंधीच्या आहेत (पू, पृ.७८६). 84. सौभाग्यकर ते मंत्रगत या चार कला मंत्रतंत्रविषयक आहेत (पू, पृ.७८६). 85. आससिक्खा ते मुष्टियुद्ध कला होत्या (पू, पृ.७८७). 86. धर्मक्रीडा व चर्मक्रीडा हे क्रीडाप्रकार होत (पू, पृ.७८७). 87. प्रस्तुत लेखाचा विस्तार वाढेल या भीतीने या विषयाची चर्चा येथे केलेली नाही.
Page #127
--------------------------------------------------------------------------
________________ ग्रंथसूची 1. औपपातिकसूत्र, अभयदेवसूरिकृत वृत्तिसह (मुद्रितपोथी), प्रकाशक-भुरालाल कालिदास, द्वितीय आवृत्ती, सुरत, वि.सं.१९९४ 2. औपपातिकसूत्र, संपादक-एन्.जी.सुरू, पुणे 1931 3. कुवलयमाला, (उद्योतनकृत) सं.ए.एन्.उपाध्ये, मुंबई 1959 4. गीर्वाणलघुकोश, संपादक-ज.वि.ओक, पुणे, शके 1837 5. ज्ञाताधर्मकथांगसूत्र, प्रथम विभाग, (मुद्रित पोथी), गुजराती भाषांतरासह, भावनगर, वि.सं.१९८५ 6. नायाधम्मकहाओ, संपादक-एन्.व्ही.वैद्य, पुणे 1940 7. पएसिकहाणय, संपादक-डॉ.प.ल.वैद्य, पुणे 1934 8. पएसिकहाणय, संपादक-ए.टी.उपाध्ये, बेळगाव, 1936 9. पद्मपुराण (रविषेणकृत), प्रथमभाग, संपादक-पन्नालाल जैन, काशी, 1958 10. पाइद्यसद्दमहण्णव, संपादक-सेठ, कलकत्ता, संवत् 1985 11. पूर्णार्घ्य, संपादक-सुमतिबाई शहा, सोलापूर, वीरनिर्वाण संवत् 2504 12. राजप्रश्नीय, मलयगिरिकृत वृत्तिसह, (मुद्रित पोथी), अहमदाबाद, (प्रकाशन वर्ष दिले नाही). 13. रायपसेणइयसूत्र, संपादक-दोशी, मुद्रित पोथी, अहमदाबाद, वि.सं.१९९४ 14. ललितविस्तर, संपादक-डॉ.प.ल.वैद्य, दरभंगा, 1958 15. वसुदेवहिंडि (संघदासकृत), प्रथम खंड, भावनगर, 1931 16. समवायांगसूत्र, अभयदेवसूरिकृत विवरणासह, (मुद्रित पोथी) (प्रकाशनस्थळ व वर्ष देणारे पान उपलब्ध पोथीत फाटले होते). 17. संस्कृत-इंग्लिश-कोश, संपादक-व्ही.एस्.आपटे, दिल्ली 1959 अ औ आ आपटेकोश उप औप संक्षेप -- अभयदेव, समवायांगसूत्रावरील वृत्ती - अभयदेवकृत वृत्तिसह औपपातिकसूत्र - आपटे के.वा. - आपटे व्ही.एस्. संपादित संस्कृत-इंग्लिश-कोश - उपाध्ये ए.टी. - उपाध्ये ए.टी. संपादित पएसिकहाणय - औपपातिकसूत्र - गुजराती भाषांतर, ज्ञानाधर्मकथांगसूत्राचे - ज्ञानाधर्मकथांगसूत्र - नायाधम्मकहाओ - पएसिकहाणय - पाइय-सद्द-महण्णव - पूर्णार्घ्य - बार्नेट - राजप्रश्नीय - रायपसेणइयसुत्त ज्ञाना नाया पासम बा राय
Page #128
--------------------------------------------------------------------------
________________ - वैद्य प.ल. - वैद्य प.ल. संपादित पएसिकहाणय - समवायांगसूत्र - सुरु-संपादित औपपातिकसूत्र सम सुऔ **********