Book Title: The Current Living Tirthankara Shree Simandhar Swami Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ श्री सीमंधर स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम या भरतक्षेत्रातील सर्व ऋणानुबंधांपासून मुक्ती मिळवली पाहिजे आणि ते अक्रमज्ञानाद्वारा प्राप्त झालेले आत्मज्ञान, आणि पाच आज्ञांचे पालन केल्याने मिळू शकते. त्याचबरोबर श्री सीमंधर स्वामींची अनन्य भक्ति, आराधना रात्रंदिवस करत राहिल्याने त्यांच्यासोबत ऋणानुबंध स्थापित होतो, जो हा देह सुटताच तिथे जाण्याचा मार्ग मोकळा करुन देतो. नैसर्गिक नियम असा आहे की, ज्याप्रमाणे आंतरिक परिणती असेल त्यानुसार पुढील जन्म निश्चित होतो, सध्या भरतक्षेत्रात पाचवा 'आरा' चालू आहे. सर्व मनुष्य कलियुगी आहेत. अक्रम विज्ञान प्राप्त करुन ज्ञानींच्या आज्ञेचे आराधन करु लागतात तेव्हापासूनच आंतरिक परिणती शीघ्रतेने उच्च स्तराला पोहोचतात. मनुष्य किलयुगीमधून सत्युगी बनतात. आत चौथा आरा प्रवर्तत असतो. बाहेर पाचवा आणि आत चौथा आरा! आतील परिणतींमध्ये परिवर्तन झाल्यामुळे ज्याठिकाणी चौथा आरा चालु असतो त्याठिकाणी मृत्युनंतर हा जीव ओढला जातो. आणि त्यातही विशेष म्हणजे श्री सीमंधर स्वामींच्या भक्तिमुळे त्यांच्यासोबत ऋणानुबंध आधीच बांधून घेतलेले असते, त्यामुळे त्यांच्या निकट, श्रीचरणांत तो जीव ओढला जातो. असे सर्व नियम आहेत निसर्गाचे ! संपूज्य दादाश्री नेहमी सांगत असत की, मूळनायक सीमंधर स्वामींचे मंदिर ठिकठिकाणी उभारले जातील. भव्य मंदिरे निर्माण होतील, घरोघरी सीमंधर स्वामींची पूजा - आरती केली जाईल तेव्हा जगाचा नकाशा काही वेगळाच झालेला असेल ! भगवान श्री सीमंधर स्वामींविषयी थोडी जरी गोष्ट केली तरी लोकांच्या हृदयात त्यांच्याप्रति जबरदस्त भक्तिभावना सुरु होऊन जाते ! रात्रंदिवस दादा भगवंतांच्या साक्षीने सीमंधर स्वामींना नमस्कार करीत रहावे. दररोज सीमंधर स्वामींची आरती आणि चाळीस वेळा नमस्कार करावा. परम कृपाळु दादाश्री नेहमी सर्व मुमुक्षूंना खालिलप्रमाणे नमस्कार विधी द्वारे श्री सीमंधर स्वामींसोबत अनुसंधान करवून देत असत.Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50