________________
16
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
भिन्न, मी आणि ‘दादा भगवान' पुस्तकात जसे लिहीले आहे की हे जे दिसतात ते 'ए.एम.पटेल' आहे, मी ज्ञानी पुरुष आहे आणि आत 'दादा भगवान' प्रकट झाले आहेत. ते चौद लोकांचे नाथ आहेत. म्हणजे जे कधी ऐकण्यात आले नसेल असे इथे प्रकट झालेले आहेत. म्हणूनच मी स्वतः भगवान आहे, असे आम्ही कधीही म्हणत नाही. तो तर वेडेपणा आहे, मुर्खता आहे. जगातील लोक भलेही म्हणतील पण आम्ही असे म्हणत नाही की आम्ही भगवान आहोत. आम्ही तर हे स्पष्ट सांगतो, 'मी तर ज्ञानीपुरुष आहे' आणि तीनशे छपन्न डिग्रीवर आहे. अर्थात चार डिग्रीचा फरक आहे. दादा भगवानांची गोष्ट वेगळी आहे. आणि व्यवहारात मी स्वतःला ए.एम.पटेल आहे असे म्हणवतो.
आता ह्या वेगळेपणाची गोष्ट लोकांना जास्त समजत नाही. 'दादा भगवान' तर आत प्रकट झाले आहेत. म्हणून जे हवे ते काम साधून घ्या. असे अगदी स्पष्टपणे सांगतो. क्वचितच असे चौदा लोकांचे नाथ प्रकट होतात. हे मी स्वतः पाहून सांगतो, म्हणून आपले (मोक्षाचे) काम काढून घ्या.
हे नमस्कार तर त्वरितच पोहोचतात हे सर्व लोक सकाळी झोपेतून उठून नमस्कार करतील तर गर्दीच होईल ना? आणि संध्याकाळी तर नुसती गर्दीच असते. म्हणून पहाटे साडे चार ते साडे सहा हे ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते, सर्वात उच्च प्रकारचे मुहूर्त. या वेळेत ज्यांनी ज्ञानींचे स्मरण केले, तीर्थंकरांचे स्मरण केले, शासन देवदेवींचे स्मरण केले तर ते त्या सर्वांना प्रथम स्वीकार होऊन जाते. कारण की नंतर गर्दी वाढू लागते ना! पहिला दर्शक आला, मग दूसरा आला. नंतर गर्दी वाढत जाते. सात वाजल्यापासून गर्दी वाढत जाते. मग बारा वाजता पुष्कळ गर्दी वाढते. म्हणून जो पहिले जाऊन ऊभा राहतो, त्याला भगवंतांचे फ्रेश दर्शन होतात, 'दादा भगवानांच्या साक्षीने सीमंधर स्वामींना नमस्कार करतो' असे बोलले की लगेच ते तिथे सीमंधर