________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
लोकांना जे दुःख आहे ते सर्व दूर होतील, पुण्याचा उदयात परिवर्तन होत राहिल. म्हणून मग ह्या बिचाऱ्यांना दुःख राहणार नाही. हे सर्व केवढ्या दु:खात आहेत! प्रत्यक्ष सद्गुरु भेटले आणि त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त झाले तर मोक्ष होईल. आणि जर नाही भेटले तर पुण्य तर भोगेल बिचारा. चांगले कर्म तर बांधेल.
दर्शन करण्याची खरी रीत भगवंतांच्या मंदिरात किंवा देरासरात जाऊन खऱ्या रितीने दर्शन करण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दर्शन करण्याची खरी रीत शिकवतो. बोला, आहे का कुणाला इच्छा?
प्रश्नकर्ता : हो, आहे. शिकवा, दादाजी. उद्यापासूनच त्याप्रमाणे दर्शन करण्यास जाऊ.
दादाश्री : भगवंताच्या मंदिरात जाऊन म्हणावे की 'हे वीतराग भगवंत! तुम्ही माझ्या आतच बसलेले आहात, पण मला (अद्याप) याची
ओळख झालेली नाही. म्हणून आपले दर्शन करीत आहे. मला हे 'ज्ञानीपुरुष' दादा भगवानांनी शिकवले आहे, म्हणून मी याप्रमाणे आपले दर्शन करीत आहे. तर मला माझी स्वत:ची ओळख होईल, अशी आपण कृपा करा' जिथे जाल तिथे अशाप्रकारे दर्शन करा. तसे तर वेगळे-वेगळे नाव दिले गेले आहे. 'रिलेटिवली' (व्यवहारिक दृष्टीने) वेगवेगळे आहेत, 'रियली' सर्व भगवंत एकच आहे.
बस, एकालाच आपल्याला तर फक्त एक तीर्थंकर खूश झाले, म्हणजे पुष्कळ झाले! एका घरी जाण्याची जागा भेटली तरीही भरपूर झाले! सगळ्या घरी कुठे फिरत बसायचे? आणि एकाला पोहोचले म्हणजे सगळ्यांना पोहोचले. आणि जे सगळ्यांना पोहोचवायला गेले ते राहून गेले. आपल्यासाठी एकच चांगले, सीमंधर स्वामी! म्हणजे ते सगळ्यांनाच पोहोचते.