________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
दादाश्री : नाही. असे बोलले असाल तरी हरकत नाही. त्यामुळे काही पाप लागणार नाही. पण या ज्ञानी पुरुषांच्या सांगितल्याप्रमाणे बोलले, तर त्यात खूप फरक पडतो. बोलले असाल त्याचे जोखिम नाही. त्यासाठी प्रतिक्रमण करावे लागणार नाही. सीमंधर स्वामींचे फक्त नाव जरी घेतले ना, तरीही त्याला फायदा होईल.
जिथे प्यॉरिटी, तिथे तयारी आमचे काय ध्येय काय आहे? मी तर स्वत:च्या पैशांचे कपडे घालतो. ह्या नीरुबहन सुद्धा त्यांच्या स्वतःच्या पैशांचे कपडे घालतात. कोणाची एक पई सुद्धा घ्यायची नाही आणि जगत् कल्याणासाठी सर्व प्रकारची तयारी आहे. जवळपास पन्नास हजार समकितधारी माझ्याजवळ आहेत आणि त्यात दोनशे ब्रह्मचारी आहेत. ते सर्व जगत् कल्याणासाठी तयार होऊन जातील.
आज्ञा बनवते, महाविदेहासाठी लायक हे ज्ञान घेतल्यानंतर तुमचा हा जन्मच महाविदेह क्षेत्रात जाण्यासाठी लायक ठरत राहिला आहे. मला काही करण्याची गरज नाही. नैसर्गिक नियमच आहे.
प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात कशाप्रकारे जाऊ शकतो? पुण्याने ?
दादाश्री : आमच्या ह्या आज्ञा पालन केल्यामुळे या जन्मात पुण्य बांधलेच जात आहे. ते महाविदेह क्षेत्रात घेऊन जाते. आज्ञा पाळल्याने धर्मध्यान उत्पन्न होते, ते सर्व फळ देईल. तुम्ही जेवढी आज्ञा पालन करता त्याप्रमाणे पुण्य बांधले जाते. ते मग तिथे तीर्थंकरांकडे गेल्यावर त्याचे फळ उपभोगायला मिळेल.
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी आम्हा महात्म्यांचे कचऱ्यासारखे आचार पाहून त्यांच्याजवळ ठेवतील का?