________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आहेत ना, सीमंधर स्वामी. हे एकमेव वरिष्ठ आहेत आमचे! आम्ही त्यांच्याकडे काहीच मागणी करत नाही. मागणी करुच शकत नाही ना! तुम्ही माझ्याकडे मागणी करु शकता!!
अहो! ते अद्भूत दर्शन प्रश्नकर्ता : आम्ही तर दादाजींचा विझा दाखवू.
दादाश्री : विझा दाखवताच आपोआप काम होईल. तीर्थंकरांना पाहिल्याबरोबरच तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही, पाहताक्षणीच आनंद! संपूर्ण जग विस्मृत होऊन जाईल! जगातील कुठलेही खाणे-पिणे आवडणार नाही. त्यावेळी सर्व संसारी मनोकामना समाप्त होतील. निरावलंब आत्मा प्राप्त होईल! नंतर कसलेही अवलंबन राहणार नाही.
सम्यक् दृष्टी, हाच विझा प्रश्नकर्ता : आपण सांगितले, की तीर्थंकरांचे दर्शन केले तर मनुष्याला केवळज्ञान प्राप्त होते.
दादाश्री : तीर्थंकरांचे दर्शन तर खूप लोकांनी केलेले होते. आपण सगळ्यांनी सुद्धा दर्शन केले होते पण त्यावेळी आपली तयारी नव्हती. दृष्टी परिवर्तन झाले नव्हते. मिथ्या दृष्टी होती. मिथ्या दृष्टी असल्यामुळे मग तीर्थंकर सुद्धा काय करतील? ज्यांची सम्यक् दृष्टी असते त्यांच्यावर तीर्थंकरांची कृपा उतरते.
प्रश्नकर्ता : म्हणजे ज्याची तयारी असते, त्याला तीर्थंकरांचे दर्शन झाले तर मोक्ष प्राप्त होतो?
दादाश्री : म्हणून आता आपल्याला तयार होऊन जायचे आहे. त्याचे कारण एवढेच की तुम्ही तयार होऊन मग विझा घेऊन जा. आणि मग कुठेही गेले तरी तेथे सुद्धा कोणते ना कोणते तीर्थंकर भेटतील.