Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
Marathi
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
વર્તમાનતીર્થંકર શ્રીસીમંધરસ્વામી
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
मूळ गुजराती संकलन : डो. नीरूबहन अमीन अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक : श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079 ) 39830100
© All Rights reserved - Shri Deepakbhai Desai
Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : 3000
ऑक्टोबर 2016
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव!
द्रव्य मूल्य : 10 रुपये
मुद्रक
: अंबा ऑफसेट
B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
શ્રીીમંધર સ્વામી
नमो अरिहंताणं नमो सिद्धाण
नमो आयरियाणं
नमो उवज्झायाणं
नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुकारो,
सव्व पावप्पणासणी
मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं इवह मंगलम् १
ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण ?
जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल | मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून | व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि | निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एका तासात विश्वदर्शन | लाभले ! मी कोण ? भगवंत कोण ? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय ? मुक्ती कशाला म्हणतात ? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई | पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा | व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करवीत असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान | प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण ? ' ह्याबद्दलची फोड करून | देताना म्हणायचे की, " हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए. एम. | पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर चौदालोकाचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, | सर्वांमध्ये आहेत ! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत ! माझ्या आत प्रगट झालेले ‘दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो.
"
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी | आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत: च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना ( यात्रा करवीत असत.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?
___ - दादाश्री परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत.
__पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वतःचा आत्मा जागृत होऊ शकतो.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
परम पूज्य 'दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दश: मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे.
अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो.
वाचकांना...
ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळतः 'मानव धर्म' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे.
जिथे जिथे 'चंदुभाऊ ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे.
पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा कोणाला नसते? पण प्राप्त करण्याचा मार्ग सापडणे कठीण आहे. मोक्ष मार्गाच्या ज्ञाताशिवाय त्या मार्गावर कोण घेऊन जाईल?
पूर्वी सुद्धा कित्येक ज्ञानीपुरुष आणि तीर्थंकर होऊन गेलेत आणि त्यांनी कितीतरी लोकांना मोक्षाचे ध्येय सिद्ध करवून दिले. वर्तमानात तरणतारण ज्ञानीपुरुष 'दादाश्री' मार्फत हा मार्ग मोकळा झाला आहे, अक्रम मार्गाच्या माध्यमाने! क्रमाक्रमाने पायऱ्या चढणे आणि अक्रम मार्गाने लिफ्टने चढणे, यात कोणता मार्ग सोपा आहे? पायऱ्या की लिफ्ट? या काळात तर सर्वांना लिफ्टच परवडेल ना!
'या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ती शक्य नाही' असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु दीर्घकाळापासून वाया महाविदेह क्षेत्र, श्री सीमंधर स्वामींच्या दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग तर चालूच आहे ना! संपूज्य दादाश्री त्याच मार्गाने मुमुहूंना मोक्षाला पोहोचविण्यात निमित्त आहेत, आणि मुमुहूंना ह्या मोक्षप्राप्तीची खात्री निश्चयाने प्रतीत होत असते. या काळात या क्षेत्रात तीर्थंकर नाहीत, पण या काळात महाविदेह क्षेत्रात वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवान विराजमान आहेत, आणि ते भरत क्षेत्रातील मोक्षार्थी जीवांना मोक्ष प्राप्त करविण्यासाठी प्रबळ निमित्त आहेत. ज्ञानीपुरुष स्वतः त्या मार्गाने प्राप्ती करुन इतरांना तो मार्ग दाखवितात. प्रत्यक्ष-प्रगट तीर्थंकरांची ओळख होणे, त्यांच्याविषयी भक्तिभाव जागृत होणे, आणि रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करुन शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास(मार्ग) आहे. असे ज्ञानींनी सांगितले आहे.
श्री सीमंधर स्वामींची आराधना जेवढी अधिक प्रमाणात होईल. तेवढेच त्यांच्याबरोबरचे अनुसंधान-सातत्य सविशेष रुपाने होईल. यामुळे त्यांच्याबरोबरचे अनुसंधान प्रगाढ होईल. शेवटी परम अवगाढपर्यंत पोहोचून त्यांच्या चरणकमळातच स्थान प्राप्तीची मोहोर लावली जाते!
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
श्री सीमंधर स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम या भरतक्षेत्रातील सर्व ऋणानुबंधांपासून मुक्ती मिळवली पाहिजे आणि ते अक्रमज्ञानाद्वारा प्राप्त झालेले आत्मज्ञान, आणि पाच आज्ञांचे पालन केल्याने मिळू शकते. त्याचबरोबर श्री सीमंधर स्वामींची अनन्य भक्ति, आराधना रात्रंदिवस करत राहिल्याने त्यांच्यासोबत ऋणानुबंध स्थापित होतो, जो हा देह सुटताच तिथे जाण्याचा मार्ग मोकळा करुन देतो.
नैसर्गिक नियम असा आहे की, ज्याप्रमाणे आंतरिक परिणती असेल त्यानुसार पुढील जन्म निश्चित होतो, सध्या भरतक्षेत्रात पाचवा 'आरा' चालू आहे. सर्व मनुष्य कलियुगी आहेत. अक्रम विज्ञान प्राप्त करुन ज्ञानींच्या आज्ञेचे आराधन करु लागतात तेव्हापासूनच आंतरिक परिणती शीघ्रतेने उच्च स्तराला पोहोचतात. मनुष्य किलयुगीमधून सत्युगी बनतात. आत चौथा आरा प्रवर्तत असतो. बाहेर पाचवा आणि आत चौथा आरा! आतील परिणतींमध्ये परिवर्तन झाल्यामुळे ज्याठिकाणी चौथा आरा चालु असतो त्याठिकाणी मृत्युनंतर हा जीव ओढला जातो. आणि त्यातही विशेष म्हणजे श्री सीमंधर स्वामींच्या भक्तिमुळे त्यांच्यासोबत ऋणानुबंध आधीच बांधून घेतलेले असते, त्यामुळे त्यांच्या निकट, श्रीचरणांत तो जीव ओढला जातो. असे सर्व नियम आहेत निसर्गाचे !
संपूज्य दादाश्री नेहमी सांगत असत की, मूळनायक सीमंधर स्वामींचे मंदिर ठिकठिकाणी उभारले जातील. भव्य मंदिरे निर्माण होतील, घरोघरी सीमंधर स्वामींची पूजा - आरती केली जाईल तेव्हा जगाचा नकाशा काही वेगळाच झालेला असेल !
भगवान श्री सीमंधर स्वामींविषयी थोडी जरी गोष्ट केली तरी लोकांच्या हृदयात त्यांच्याप्रति जबरदस्त भक्तिभावना सुरु होऊन जाते ! रात्रंदिवस दादा भगवंतांच्या साक्षीने सीमंधर स्वामींना नमस्कार करीत रहावे. दररोज सीमंधर स्वामींची आरती आणि चाळीस वेळा नमस्कार करावा.
परम कृपाळु दादाश्री नेहमी सर्व मुमुक्षूंना खालिलप्रमाणे नमस्कार विधी द्वारे श्री सीमंधर स्वामींसोबत अनुसंधान करवून देत असत.
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
‘प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने, वर्तमानात महाविदेह क्षेत्रात विचरत असणारे तीर्थंकर भगवान श्री सीमंधर स्वामींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे'
हे शब्द म्हणजे अनुसंधान नाही, पण त्यावेळी मुमुक्षूंना ते स्वतः श्री सीमंधर स्वामींना नमस्कार करीत आहेत अशी अनुभूती होते, हे अनुसंधान आहे. 'प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने' असा शब्दप्रयोग यासाठी प्रयोजित करण्यात आला आहे की, जोपर्यंत मुमुक्षुचे श्री सीमंधर स्वामींसोबत सरळ तार जोडलेला नाही. तोपर्यंत ज्यांच्या तार निरंतर त्यांच्याशी जोडलेला आहे, असे ज्ञानीपुरुष श्री दादा भगवानांच्या माध्यमाने आपण श्री सीमंधर स्वामींना आपला नमस्कार पोहचवतो. ज्याचे फळ प्रत्यक्ष नमस्कार केल्या इतकेच मिळते. उदाहरणानूसार समजा आपल्याला एखादा संदेश अमेरिकेला पोहोचवायचा आहे, परंतु तो संदेश आपण स्वतः पोहोचवू शकत नाही, म्हणून आपण तो संदेश पोस्ट ऑफिसला सुपुर्द करुन निश्चिंत होऊन जातो. ही जबाबदारी पोस्ट ऑफिसची आहे आणि ते योग्य तऱ्हेने ती पूर्णही करतात. याचप्रमाणे आपला संदेश श्री सीमंधर स्वामींपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पूज्य दादाश्री स्वतःवर घेतात.
दादा भगवानांना साक्षी ठेवून नमस्कार विधी करावी. ज्यांना सम्यक् दर्शन प्राप्त झाले आहे, अशा समकितधारी महात्म्यांनी समजपूर्वक ही नमस्कारविधी केली तर त्याचे फळ अनन्य मिळते ! मंत्र बोलतेवेळी एकएक अक्षर लक्षपूर्वक वाचला पाहिजे. त्यामुळे चित्त पूर्णपणे शुद्ध रहाते. संपूर्ण चित्तशुद्धीपूर्वकचे नमस्कार म्हणजे स्वयं स्वतःला श्री सीमंधर स्वामींच्या मुर्तीस्वरुपाला प्रत्यक्ष नमस्कार करत आहे असे पाहावे. प्रत्येक नमस्कारासोबत स्वतःला साष्टांग नमस्कार करताना दिसले पाहिजे. जेव्हा प्रभुंचे मूर्त स्वरुप दिसते आणि त्याचसोबत प्रभुंचे अमूर्त असे केवळज्ञान स्वरुप, की जे मूर्त स्वरुपाहून भिन्न आहे, हे सुद्धा लक्षात येईल, तेव्हा समजावे की आपण श्री सीमंधर स्वामींच्या निकट पोहोचलो आहोत दादाश्रींच्या श्रीमुखाने श्री सीमंधर स्वामींसोबतच्या संधानाविषयी ऐकल्यावर अनेक लोकांना अशी अनुभूती झालेली आहे.
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
अशी आशा आहे की, ज्यांना दादाश्रींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मिळाला नाही, त्यांना ही पुस्तिका परोक्ष रुपाने संधानाची भूमिका स्पष्ट करवून देईल. जी व्यक्ति खरोखर मोक्षप्राप्तीकरिता इच्छुक असेल, त्याचे श्री सीमंधर स्वामींसोबत अवश्य अनुसंधान होऊन जाईल. यापूर्वी कधीही उत्पन्न झाले नसेल, असे जबरदस्त आकर्षण श्री सीमंधर स्वामी प्रति उत्पन्न झाले, तर समजून जावे की प्रभुंच्या श्रीचरणात स्थान मिळण्याची चाहूल लागली आहेत.
सीमंधर स्वामींची प्रार्थना, विधी आणि सीमंधर स्वामींच्या श्रीचरणात सदैव नतमस्तक राहून त्यांचे अनन्य शरण प्राप्त करण्याची निरंतर भावना करावी. संपूज्य दादाश्रींनी वारंवार सांगितले आहे की आम्ही सुद्धा सीमंधर स्वामींजवळ जाणार आहोत आणि तुम्ही सुद्धा तिथेच पोहोचण्याची तयारी करा. त्याशिवाय एकावतारी किंवा दोन अवतारी होणे हे कठीण आहे! कारण पुढचा जन्म जर पुन्हा याच भरतभूमीवर झाला तर तेव्हा इथे भयंकर पाचवा आरा चालु असेल. तेव्हा इथे मोक्षाची गोष्ट तर दूरच राहिली परंतु पुन्हा मनुष्यजन्म मिळणे हे सुद्धा दुर्लभ आहे ! अशा संयोगात आतापासूनच सावध होऊन, ज्ञानींनी दाखविलेल्या मार्गावर चालून एकावतारी पदाची प्राप्ती करुन घ्यावी! पुन्हा-पुन्हा अशी संधी मिळणे शक्य नाही. वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला पुन्हा पकडू शकत नाही. गेलेली वेळ सुद्धा पुन्हा आणू शकत नाही. जो आलेली संधी गमावतो, त्याला पुन्हा संधी मिळत नाही. म्हणून आजपासूनच चिकाटीने मागे लागावे आणि गात रहावे....
'सीमंधर स्वामींचा असीम जय जयकार हो!'
सीमंधर स्वामी कोण आहेत? कुठे आहेत? कसे आहेत? त्यांचे पद काय आहे? तसेच त्यांचे महत्व किती आहे? अशी शक्य तेवढी समग्र माहिती पूज्य दादाश्रींच्या स्वमुखाने निघाली होती. त्याचे इथे संक्षिप्तमध्ये संकलन होऊन प्रकाशित होत आहे. जे मोक्षमार्गांना त्यांच्या आराधनेकरिता अत्यंत उपयोगी सिद्ध होईल!
-डो. नीरुबहन अमीन
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
श्री सीमंधर स्वामींचे जीवनचरित्र आपल्या भारतदेशाच्या ईशान्य दिशेत करोडो किलोमीटराच्या अंतरावर जंबुद्वीपाच्या महाविदेह क्षेत्राची सुरुवात होते. त्यात ३२ 'विजय' (क्षेत्र) आहेत, या विजयांमध्ये आठवी विजय 'पुष्पकलावती' आहे. त्याची राजधानी श्री पुंडरिकगिरी आहे. या नगरीत मागील चोविसीचे सतरावे तीर्थंकर श्री कुन्थुनाथ भगवंतांच्या शासनकाळ आणि अठरावे श्री अरहनाथजींचा जन्म होण्यापूर्वीच्या काळात श्री सीमंधर स्वामी भगवंतांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील श्री श्रेयांस पुंडरिकगिरी नगरीचे राजा होते. सीमंधर स्वामींच्या आईंचे नाव सात्यकी होते.
यथासमय महाराणी सात्यकीने अद्वितीय रुप-लावण्यमय, सर्वांग सुंदर, सुवर्ण कांतीवाले तसेच वृषभाचे लांछन असलेल्या पुत्राला जन्म दिला. (वीर संवतच्या गणनेनुसार चैत्र कृष्णपक्ष दशमीच्या मध्यरात्री.) बाळ जीनेश्वर, की ज्यांना जन्मतःच मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान होते. त्यांचे देहमान पाचशे धनुष्याएवढे आहे. राजकुमारी श्री रुक्मिणी यांना प्रभुंची अर्धांगिनी बनण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले.
भरत क्षेत्रातील विसावे तीर्थंकर श्री मुनिसुव्रत स्वामी तसेच एकविसावे तीर्थंकर श्री नेमीनाथजी यांच्या प्राकट्य काळाच्या मध्यवर्ती काळात, अयोध्येत राजा दशरथाच्या शासनकाळा दरम्यान आणि रामचंद्रजींच्या जन्मापूर्वी श्री सीमंधर स्वामींनी महाभिनिष्क्रमण उदययोगाने फाल्गुन शुक्लपक्षाच्या तृतीयेच्या दिवशी दिक्षा अंगीकारली. दिक्षा घेताच त्यांना चौथे मनःपर्यव ज्ञान प्राप्त झाले. दोषकर्मांची निर्जरा होताच हजार वर्षांच्या छद्मस्थकाळानंतर बाकीच्या चार घाती कर्मांचा क्षय करुन चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी भगवंत केवळज्ञानी आणि केवलदर्शनी झाले. त्यांच्या मात्र दर्शनानेच जीव मोक्षमार्गी बनू लागले.
___ श्री सीमंधर स्वामी प्रभुंच्या कल्याणयज्ञाच्या निमित्तांमध्ये चौऱ्यांशी गणधर, दहा लाख केवळज्ञानी महाराजा, शंभर करोड साधु, शंभर करोड
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
साध्वीजी, नऊशे करोड क्षावक आणि नऊशे करोड श्राविका यांचा समावेश आहे. स्वामींच्या शासन रक्षक यक्षदेव श्री चांद्रायणदेव आणि यक्षिणीदेवी श्री पाचांगुलिदेवी आहेत.
पुढील चोविशीचे आठवे तीर्थंकर श्री उदयस्वामींच्या निर्वाण नंतर तसेच नववे तीर्थंकर श्री पेढाळस्वामींच्या जन्मापूर्वी श्री सीमंधर स्वामी आणि अन्य एकोणीस विहरमान तीर्थंकर भगवंत श्रावण शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या अलौकिक दिवशी चौऱ्यांशी लाखपूर्वचे आयुष्य पूर्ण करुन निर्वाणपद प्राप्त करतील.
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
वर्तमान तीर्थंकरांच्या भक्तिने 'मोक्ष'
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी कोण आहेत ? ते समजविण्याची कृपा करावी !
दादाश्री : सीमंधर स्वामी वर्तमान तीर्थंकर साहेब आहेत. ते ह्या पृथ्वीच्या बाहेरील दूसरे क्षेत्र, महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर साहेब आहेत. जसे ऋषभदेव भगवान झाले, महावीर भगवान झाले.... त्यांच्यासारखे हे सीमंधर स्वामी तीर्थंकर आहेत.
तीन प्रकारचे तीर्थंकर असतात. एक भूतकाळातील तीर्थंकर, एक वर्तमानकाळातील तीर्थंकर आणि एक भविष्यकाळातील तीर्थंकर ! यातील भूतकाळातील तीर्थंकर होऊन गेले. त्यांचे स्मरण केल्याने आपल्याला पुण्यफळ मिळते. त्याशिवाय आता ज्यांचे शासन चालु आहे त्यांच्या आज्ञेत राहिल्याने धर्मध्यान उत्पन्न होते. ते आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे ठरते !
पण जर कधी आपण वर्तमान तीर्थंकरांचे स्मरण केले, तर ती गोष्टच वेगळी असते ! खरी तर वर्तमानाचीच किंमत आहे. रोख रुपये असतील तर त्याचीच किंमत असते. जे नंतर येतील ते रुपये भावी ! आणि (भूतकाळातील तर) जे गेले ते गेले! म्हणजे रोख गोष्ट पाहिजे आपल्याला! म्हणूनच रोख असलेल्यांची ओळख करवून देत आहोत ना! आणि ह्या साऱ्या गोष्टी सुद्धा रोखच आहेत. धीस इज द कॅश बँक ऑफ डिवाइन सोल्युशन ! रोख पाहिजे उधार चालणार नाही. आणि चोवीस तीर्थंकरांना सुद्धा आपण नमस्कार करत असतो ना!
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
संयति पुरुष चौवीस तीर्थंकरांना काय म्हणत होते? भूतपूर्व तीर्थंकर म्हणत होते. अर्थात जे भूतकाळात होऊन गेले ते! आपण वर्तमान तीर्थंकरांना शोधून काढले पाहिजे. कारण भूतकाळातील तीर्थंकरांची भक्ति केल्याने संसारात आपली प्रगती होईल, परंतु मोक्षफळ प्राप्त होत नाही. मोक्षफळ तर आज जे हजर आहेत, तेच देतात.
'नमो अरिहंताणं' आज कोण? आपले लोक जे नवकार मंत्र बोलतात, ते कोणत्या समजुतीने बोलतात? मी त्या लोकांना विचारले, तेव्हा ते मला म्हणाले, 'चोवीस तीर्थंकर हेच अरिहंत आहेत ना!' त्यावर मी म्हणालो, 'तुम्ही जर त्यांना अरिहंत म्हणाल तर मग सिद्ध कोणाला म्हणाल?' ते अरिहंत होते, पण आता तर ते सिद्ध होऊन गेले, मग आता अरिहंत कोण? जे लोक अरिहंतला मानतात, ते 'अरिहंत' कोणाला मानतात? 'नमो अरिहंताणं' बोलतात ना?
हे चोवीस तीर्थंकर आहेत ना, ते अरिहंत म्हटले जात होते, परंतु जोपर्यंत ते जीवंत होते तोपर्यंत. आता तर ते निर्वाण होऊन मोक्षाला गेले, म्हणून ते सिद्ध म्हटले जातात. अर्थात् आता ते 'नमो सिद्धाणं' पदामध्ये आले. यांना अरिहंताणं म्हणत नाही. जे चोवीस तीर्थंकरांना अरिहंत मानतात, त्यांना माहित नाही की ते तर 'सिद्ध' होऊन गेले, म्हणजे हे असे चुकीचे चालले आहे. म्हणून नवकार मंत्र फळ देत नाही. मग मी त्यांना समजावले की अरिहंत हे आता सीमंधर स्वामी आहेत. जे हजर आहे, जीवंत आहेत तेच अरिहंत..
जे तीर्थंकर झाले ते सांगून गेले की, 'आता भरतक्षेत्रात चोवीसी बंद होत आहे, आता येथे तीर्थंकर होणार नाहीत. म्हणून महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर आहेत, त्यांची भक्ति करा! तीथे वर्तमान तीर्थंकर आहेत.' पण आता हे तर लोकांच्या लक्षातच राहिले नाही आणि त्या भूतकाळातील चोवीस तीर्थंकरांनाच तीर्थंकर मानतात!! बाकी भगवंत तर सर्वकाही सांगून गेले आहेत.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
महावीर भगवंतांनी हे सर्व स्पष्ट केले होते! महावीर भगवंतांना माहित होते की आता कोणी अरिहंत तर नाहीत, तेव्हा हे लोक कोणाची भक्ति करतील? म्हणून त्यांनी हे स्पष्ट केले की महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर आहेत आणि त्यांच्यात सीमंधर स्वामी सुद्धा आहेत. हे स्पष्ट केले म्हणून मग ते मान्य झाले. मार्गदर्शन महावीर भगवानांचे होते, नंतर कुंदकुंदाचार्यांनाही तसा योग जुळून आला. अरिहंत म्हणजे वर्तमानात अस्तित्व असले पाहिजे. ज्यांचा निर्वाण होऊन गेला, त्यांना तर सिद्ध म्हटले जाते. निर्वाण झाल्यानंतर त्यांना अरिहंत म्हटले जात नाही.
नवकार मंत्र केव्हा फळ देतो? म्हणनच सांगावे लागले की, 'अरिहंताना नमस्कार करा.' तेव्हा विचारतात की, 'अरिहंत कुठे आहेत आता?' तेव्हा मी सांगितले की 'सीमंधर स्वामींना नमस्कार करा. सीमंधर स्वामी ह्या ब्रह्मांडात आहेत. ते आज अरिहंत आहेत, म्हणून त्यांना नमस्कार करा! ते आज हजर आहेत. अरिहंत रुपात असायला हवे, तेव्हा आपल्याला फळ मिळते.' अतः संपूर्ण ब्रह्मांडात 'अरिहंत जिथे कुठे पण असतील, त्यांना मी नमस्कार करतो.' असे समजून बोलले, तर त्याचे खूप सुंदर फळ मिळते.
प्रश्नकर्ता : परंतु वर्तमानात विहरमान वीस तीर्थंकर तर आहेतच ना?
दादाश्री : हो, त्या वर्तमानातील वीसांना अरिहंत मानले तर तुमचा नवकार मंत्र फळ देईल, नाहीतर फळ मिळणार नाही. म्हणून ह्या सीमंधर स्वामींची भक्ति आवश्यक आहे. आणि तेव्हा मंत्र फळ देईल. कित्येक लोक ह्या वीस तीर्थंकरांना जाणत नसल्यामुळे, किंवा मग 'त्यांचे आणि आमचे काय घेणे-देणे?' असे समजून चोवीस तीर्थंकर (जे आपल्या या भरतक्षेत्रात होऊन गेलेत) त्यांनाच 'हे अरिहंत आहेत' असे मानतात, आज वर्तमानात असायला पाहिजे, तेव्हाच फळ प्राप्त होईल! अशा तर कितीतरी चूका होत असल्यामुळे हे नुकसान होत राहिले आहे.
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
नवकार मंत्र बोलतेवेळी त्यासोबत सीमंधर स्वामी लक्षात असायला पाहिजे, तरच तुमचा नवकार मंत्र शुद्ध रुपाने म्हटला गेला असे म्हटले जाईल.
4
लोक मला विचारतात की तुम्ही सीमंधर स्वामींचे नाव का बोलवून घेता ? चोवीस तीर्थंकरांचे बोलायला का नाही सांगत ? मी म्हणालो की चोवीस तीर्थंकरांचे तर बोलतच असतो. पण आम्ही पद्धतशीर बोलतो. आणि सीमंधर स्वामींचे जास्त बोलत असतो, कारण ते वर्तमान तीर्थंकर आहेत आणि 'नमो अरिहतांण' त्यांनाच पोहोचते.
हे तर प्रकट, प्रत्यक्ष, साक्षात् भगवान
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी प्रकट म्हटले जातात का ?
दादाश्री : हो, ते प्रकट म्हटले जातात. प्रत्यक्ष, साक्षात (हजर) आहेत, देहधारी आहेत. आणि सध्या महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर रुपात विचरत(वावरत) आहेत.
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी तर आता महाविदेह क्षेत्रात आहेत, मग ते आमच्यासाठी प्रकट आहेत असे कसे म्हणू शकतो ?
दादाश्री : सीमंधर स्वामी कलक्त्यात असतील आणि आपण त्यांना पाहिलेले नसेल, तरी देखिल ते प्रकट मानले जातात. अशाच प्रकारे या महाविदेह क्षेत्राचेही आहे.
प्रत्यक्ष-परोक्षच्या स्तुतीत फरक
प्रश्नकर्ता : आपण महावीर भगवानांची स्तुती केली, प्रार्थना केली आणि सीमंधर स्वामींची स्तुती केली, प्रार्थना केली तर ह्या दोघांच्या फलश्रुतीत काय फरक पडतो ?
दादाश्री : भगवान महावीर तर स्वतःची स्तुती ऐकतच नाही, तरी
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
सुद्धा जर कोणी सीमंधर स्वामींचे नाव घेत नसेल, पण महावीर भगवानांचे नाव घेत असेल तरीही ते चांगले आहे. परंतु महावीर भगवानांचे ऐकणार कोण? ते स्वत: तर सिद्धगतीत जाऊन बसले!! त्यांना इथे काही देणे-घेणे नसते ना! हे तर आपण स्वत:हून त्यांचे रुपक बनवून बनवून स्थापित करत राहतो. ते आता तीर्थंकर सुद्धा म्हटले जाणार नाहीत. ते तर आता सिद्धच आहेत. हे सीमंधर स्वामी हजर आहेत तेच फळ देवू शकतील.
प्रश्नकर्ता : अर्थात जे फळ मिळते ते 'नमो अरिहंताणं'चेच फळ मिळते, असेच झाले ना? मग 'नमो सिद्धाणं'चे काहीच फळ नाही?
दादाश्री : दूसरे काही फळ मिळत नाही, हे तर आपण असे विचारले की, 'भाऊ, कोणत्या स्टेशनला जायचे आहे ?' तेव्हा आपण नक्की करुन घ्यावे की मुंबईला जायचे आहे. तेव्हा मुंबई आपल्या लक्षात राहते. असेच हे मोक्षात जायचे, सिद्धगतीत जायचे, याकडे लक्ष लागते. बाकी सर्वश्रेष्ठ उपकारी तर अरिहंतच म्हटले जातात. अरिहंत कोणाला म्हणतात? जे हजर असतात. त्यांना जे गैरहजर असतात त्यांना अरिहंत म्हटले जात नाही. प्रत्यक्ष-प्रकट असले पाहिजे. म्हणून तुम्ही सदैव सीमंधर स्वामींना लक्षात ठेवा. तसे तर वीस तीर्थंकर आहेत. पण दूसरी सर्व नावे आपल्या लक्षात राहतील का? त्यापेक्षा आपल्या हिंदुस्तानासाठी जे विशेष महत्वाचे मानले जातात, ते आहेत सीमंधर स्वामी, त्यांच्यावरच लक्ष केंद्रीत करा. आणि त्यांच्यासाठीच जीवन अर्पण करा आता.
दृष्टी, भगवंताच्या दर्शनाची । प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात सीमंधर स्वामींची प्रवृत्ति कोणती आहे?
दादाश्री : त्यांची कसली प्रवृत्ति? बस, ते तर वीतराग भगवंत! लोक त्यांचे दर्शन करतात आणि ते वीतराग भावाने वाणी बोलतात.
प्रश्नकर्ता : देशना? दादाश्री : हो, बस, देशना देतात.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी महाविदेह क्षेत्रात आणखी काय करतात?
दादाश्री : त्यांना तर काहीच करायचे नसते ना. कर्माच्या उदयानुसार, उदयकर्म जे करवतील तसे करतात. त्यांचा स्वत:चा इगोइजम (अहंकार) संपून गेलेला असतो आणि पूर्ण दिवस ते ज्ञानातच राहतात, जसे महावीर भगवान राहत होते तसे. त्यांचे खूप सारे अनुयायी असतात.
फक्त दर्शनानेच मोक्ष प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामींच्या दर्शनाचे वर्णन करा.
दादाश्री : सीमंधर स्वामींचे वय आता दिड लाख वर्ष आहे. ते ऋषभदेव भगवंतांसारखे आहेत, ऋषभदेव भगवान संपूर्ण ब्रम्हांडाचे भगवंत म्हटले जातात. तसेच सीमंधर स्वामी सुद्धा संपूर्ण ब्रह्मांडाचे भगवंत म्हटले जातात. ते आपल्या येथे नाही परंतु दुसऱ्या भूमिवर आहेत. जिथे मनुष्य पोहोचू शकत नाही. (जेव्हा ज्ञानींना काही महत्वाचे विचारायचे असते तेव्हा) ज्ञानी स्वत:ची शक्ति तिथे पाठवतात. ती शक्ति विचारुन परत येते. आपण तिथे स्थूळ देहाने जाऊ शकत नाही, पण जेव्हा तिथे जन्म होतो तेव्हा जाऊ शकतो.
आपल्या इथे भरतक्षेत्रात तीर्थंकरांचा जन्म होत होता, पण अडीच हजार वर्षांपासून बंद झाले आहे! तीर्थंकर म्हणजे अंतिम, 'फूल मून' (पौर्णिमेचा पूर्ण चंद्र). पण तिथे महाविदेहक्षेत्रात तीर्थंकर कायम जन्म घेतात. सीमंधर स्वामी आज तिथे हयात आहेत.
प्रश्नकर्ता : ते अंतर्यामी आहेत का?
दादाश्री : ते आपल्याला पाहू शकतात. आपण त्यांना पाहू शकत नाही, ते पूर्ण जगाला पाहू शकतात.
सीमंधर स्वामी दुसऱ्या क्षेत्रात आहेत, ही बुद्धीच्या पलिकडील गोष्ट
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आहे, पण हे माझ्या ज्ञानात आलेले आहे. हे सामान्य लोकांना समजणार नाही. परंतु आम्हाला एक्झेक्ट (जसे आहे तसे) समजते. त्यांच्या दर्शनानेच लोकांचे कल्याण होईल.
प्रश्नकर्ता : त्यांचा देह कसा असतो! मनुष्यासारखा? आपल्यासारखा?
दादाश्री : देह आपल्यासारखाच, माणसासारखाच आहे. प्रश्नकर्ता : त्यांच्या देहाचे प्रमाण काय आहे?
दादाश्री : प्रमाण खूप मोठे, विशाल असते. त्यांची उंची खूप आहे. त्यांना आयुष्य सुद्धा खूप आहे. प्रत्येक गोष्ट वेगळीच आहे.
महाविदेह क्षेत्र कुठे? कसे? प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी जिथे विचरतात ते महाविदेह क्षेत्र कुठे आहे?
दादाश्री : ते तर आपल्या ह्या भरतक्षेत्रापेक्षा खूपच वेगळे आहे, ईशान्य दिशेत आहे. प्रत्येक क्षेत्र वेगवेगळे आहे. तिथे आपण जाऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्र, हे आपल्या भरतक्षेत्रपेक्षा वेगळे मानले जाते का?
दादाश्री : हो, वेगळे. हे एक महाविदेह क्षेत्रच असे आहे की, जिथे सदैव तीर्थंकर जन्माला येतात. आणि येथे आपल्या क्षेत्रात काही निश्चितकाळातच तीर्थंकर जन्माला येतात, त्या नंतर नाही. आपल्या येथे काही काळापूरते तीर्थंकर नसतातही, पण आता हे जे सीमंधर स्वामी आहेत, ते आपल्यासाठी आहेत. ते अजुन दिर्घ काळापर्यंत राहणार आहेत.
भूगोल, महाविदेह क्षेत्राचे प्रश्नकर्ता : आता महाविदेह क्षेत्राविषयी सविस्तर माहिती सांगा.
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
इतके योजन दूर हा मेरु पर्वत, ह्या ज्या गोष्टी शास्त्रात लिहीलेल्या आहेत, त्या बरोबर आहेत का?
दादाश्री : हो बरोबर आहे. त्यात फरक नाही. त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे. हो, इतक्या वर्षांचे आयुष्य, आणि आणखी किती वर्ष राहतील, असे हे सर्व सुनियोजित आहे. संपूर्ण ब्रह्मांड आहे, त्यात मध्यलोक आहे आणि त्यात पंधरा प्रकारचे क्षेत्र आहेत. मध्यलोक गोलाकार आहे. परंतु लोकांना ह्या दुसऱ्या काही गोष्टी समजत नाही. कारण एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात जाता येत नाही असे क्षेत्र आहेत आत. मनुष्याला जन्म घेण्या लायक आणि राहण्यालायक पंधरा क्षेत्र आहेत. त्यातील एक आपली भूमि आहे. त्या व्यतिरिक्त इतर चौदा आहे. तिथे सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत. आपल्या येथील कलियुगी (मनुष्य) आहेत. आणि तेथे सत्युगी आहेत. काही ठिकाणी कलीयुग आहे आणि काही ठिकाणी सत्युग सुद्धा आहे. अशा प्रकारे मनुष्य आहेत आणि त्यातीथे महाविदेह क्षेत्रात तर आता प्रत्यक्ष सीमंधर स्वामी हजर आहेत. आता त्यांचे वय दिड लाख वर्ष आहे आणि ते आणखी सव्वा लाख वर्ष राहणार आहेत. भगवंत रामचंद्रजींच्या वेळेस ते होते. श्री रामचंद्रजी ज्ञानी होते. ते येथे जन्माला आले होते, पण तरी देखील ते सीमंधर स्वामींना पाहू शकले होते. सीमंधर स्वामी तर त्यांचाही पूर्वीचे, खूप पूर्वीचे आहेत! हे जे सीमंधर स्वामी आहेत त्यांना जगत् कल्याण करायचे आहे.
श्री सीमंधर स्वामी, भरत क्षेत्राच्या कल्याणाचे निमित्त
प्रश्नकर्ता : जसे महाविदेह क्षेत्रात आता वर्तमानात तीर्थंकर विराजमान आहेत, असे दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात तीर्थंकर विराजमान आहेत का?
दादाश्री : पाच भरतक्षेत्रात आणि पाच ऐरावत क्षेत्रात आता कोणी तीर्थंकर विराजमान नाहीत. अन्य पाच महाविदेह क्षेत्र आहेत तिथे आता चौथा आरा चालु आहे, तिथे तीर्थंकर विचरत आहेत. तिथे सदैव चौथा
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आरा असतो. आणि आपल्या इथे तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे आरे बदलत राहतात.
प्रश्नकर्ता : आपल्या इथे तीर्थंकर केव्हा असतात? दादाश्री : इथे तिसऱ्या-चौथा आऱ्यात तीर्थंकर होतात!
प्रश्नकर्ता : आणि तीर्थंकर हे आपल्या इथे हिन्दुस्तानातच होतात, अन्य कोठेही होत नाही?
दादाश्री : ह्याच भूमीवर! या हिन्दुस्तानाच्याच भूमीवर! ह्याच भूमिवर तीर्थंकर होतात, इतर कुठल्याही जागी होतच नाही. चक्रवती सुद्धा ह्याच भूमीवर होतात, अर्धचक्रवती सुद्धा ह्याच भूमीवर होतात. त्रेसष्ठ शलाका पुरुष सुद्धा सर्व इथेच होतात.
प्रश्नकर्ता : ह्या भूमीची काही महत्वता असेल का? दादाश्री : ही भूमि खूप उच्च मानली जाते!
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामींचेच पूजन कशासाठी? अन्य वर्तमान तीर्थंकरांचे पूजन का नाही?
दादाश्री : सगळ्या तीर्थंकरांचे होऊ शकते, पण सीमंधर स्वामींचा हिन्दुस्तानासोबत हिशोब आहे, त्यांची भावना आहे. वीस तीर्थंकरांमधन सीमंधर स्वामींचीच विशेष रुपाने भजना केली पाहिजे, कारण की आपल्या भरतक्षेत्राच्या सर्वात जवळ तेच आहेत आणि भरतक्षेत्राबरोबर त्यांचे ऋणानुबंध आहे.
__वर्तमानात वीस तीर्थंकर आहेत, त्यातील फक्त तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींचेच भरतक्षेत्राबरोबर ऋणानुबंधाचा हिशोब आहे. तीर्थंकरांचा सुद्धा हिशोब असतो. आणि सीमंधर स्वामी तर आज साक्षात प्रकट भगवंत आहेत.
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
10
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
म्हणून तुम्ही आता अरिहंत कोणाला मानायचे? तर सीमंधर स्वामींना आणि जे इतर एकोणीस तीर्थंकर आहेत. ते सर्व अरिहंतच आहेत, पण त्या सर्व तीर्थंकरांसोबत संबंध ठेवण्याची काही आवश्यकता नाही. एकाची आराधना केल्याने सर्वच येऊन जातात. अर्थात सीमंधर स्वामींचे दर्शन करा. 'हे अरिहंत भगवंत! तुम्हीच खरे अरिहंत आहात आता!' असे बोलून नमस्कार करावा.
तिथे आहे मन-वचन-कायेची एकता महाविदेह क्षेत्रात सुद्धा माणसं आहेत. ते आपल्यासारखेच आहेत, देहधारीच आहेत. तेथील माणसांचेही जिव्हाळे आपल्या सारखेच आहे.
प्रश्नकर्ता : तिथे तर खूप आयुष्य असते ना दादाजी?
दादाश्री : हो, जास्त आयुष्य असते, खूपच आयुष्य असते. बाकी, आपल्यासारखीच माणसं आहेत, आपल्या सारखाच व्यवहार आहे. पण ते आपल्या इथे चौथा आयत जसा व्यवहार होता तसा व्यवहार आहे. या पाचव्या आऱ्यातील लोक तर आता खिसे कापायला शिकले आणि आतल्याआत नातेवाईकांची निंदा करण्याचेही शिकले. महाविदेह क्षेत्रात असा व्यवहार नाही.
प्रश्नकर्ता : तिथे सुद्धा अशाच प्रकारचा सर्व संसार आहे का?
दादाश्री : हो, असेच सर्व. ती सुद्धा कर्मभूमी आहे. तेथील लोकांनाही 'मी करतो' असे (चुकीचे) भान असते. त्यांच्यातही अहंकार, क्रोध-मान-माया-लोभ असतो. तिथे आता तीर्थंकर हजर आहेत आणि आपल्या येथे चौथ्या आयत तीर्थंकर असतात. बाकी दसऱ्या सर्व गोष्टी आपल्यासारख्याच असतात. चौथ्या आणि पाचव्या आयात फरक काय? तेव्हा म्हणे, चौथ्या आऱ्यात मन-वचन-कायेची एकता असते आणि पाचव्या आयात ही एकता तुटून गेलेली असते. अर्थात जसे मनात असते, तसे वाणीत नसते आणि जसे वाणीत असते तसे वर्तनात आणत नाही,
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
याचे नाव पाचवा आरा. (ही पाचव्या आऱ्याची लक्षणे) आणि चौथ्या आयात तर जसे मनात असते तसेच वाणीत बोलतात आणि तसेच करतात. चौथ्या आऱ्यात जर एखादा मनुष्य म्हणाला की मला पूर्ण गावाला पेटवून देण्याचे विचार येत आहेत, तेव्हा आपण समजून जावे की, हे कधीतरी रुपकात येणारच आहे. आणि येथे आज जर कोणी म्हणाले की मी तुमचे घर जाळून खाक करेल, तर आपण समजावे की अजुन तर फक्त मनातच आहे पण हे करण्यासाठी तू मला केव्हा भेटशील काय माहित? तोंडाने बोलला असेल तरी सुद्धा त्यात काही बरकत नसते. 'मी तुम्हाला मारुन टाकेल' असे म्हणतो पण ते बोलण्यात काही तथ्य नसते. मन-वचनकायेची एकता राहिलेली नाही. मग बोलल्याप्रमाणे कार्य कसे होऊ शकेल? कार्य होणारच नाही ना! ।
कोणत्या पात्रतेने जाऊ शकतो 'तिथे'? प्रश्नकर्ता : 'तिथे' महाविदेह क्षेत्रात जायचे असेल तर कोणत्या प्रकारे मनुष्य जाऊ शकेल?
दादाश्री : तो 'तिथल्या सारखा झाला असेल' तेव्हा. पाचव्या आयात जर चौथ्या आयसारखे गुण मनुष्याचे झाले तर तिथे जाऊ शकतो. जर कोणी शिवी दिली तरीही मनात शिवी देणाऱ्यासाठी वाईट भाव होत नाही, या पाचव्या आयचे दुर्गुण निघून गेले की तिथे जाऊ शकतो.
प्रश्नकर्ता : साधारणपणे इथून सरळ मोक्षाला जाता येत नाही. आधी महाविदेह क्षेत्रात जायचे मग तिथून मोक्षाला जायचे, असे कशामुळे होते?
दादाश्री : क्षेत्राचा स्वभाव असा आहे की, मनुष्यांची लक्षणे ज्या 'आयच्या' लायक झाली असतील, तिथे ते खेचले जातात. जसे आपल्या इथे चौथ्या आऱ्याच्या लायक झाले असतील, जरी त्यांना हे ज्ञान मिळाले नसेल असे लोकही असतील, तर ते तिथे चौथ्या आऱ्यात खेचले जातात.
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
12
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आणि तेथील मनुष्यांची लक्षणे जर पाचव्या आऱ्याच्या लायक झाली असतील ते इथे पाचव्या आयत (जन्माला) येतात, असा क्षेत्राचा स्वभाव आहे. कुणाला आणावे-पाठवावे लागत नाही. क्षेत्राच्या स्वभावानूसार हे सर्व लोक तीर्थंकरांजवळ पोहोचणार. म्हणून जे सीमंधर स्वामींचे नित्य स्मरण करतात, त्यांची भक्ति-आराधना करतात, असे लोक नंतर त्यांचे दर्शन करतील आणि त्यांच्याजवळ बसतील आणि मोक्ष प्राप्त करतील.
आम्ही ज्यांना ज्ञान देतो, ते एक-दोन अवतारी होतील. नंतर त्यांना सीमंधर स्वामींजवळच जायचे आहे. त्यांचे दर्शन करण्याचे, फक्त तीर्थंकरांचे दर्शन करणेच मात्र बाकी राहिले. बस, दर्शन होताच मोक्ष. म्हणजे बाकी सर्व दर्शन झाले. हे अंतिम दर्शन घेतले की जे ह्या दादाजींपेक्षाही पुढचे दर्शन आहे. हे दर्शन घेतले म्हणजे लगेच मोक्ष!
प्रश्नकर्ता : जितके लोक सीमंधर स्वामींचे दर्शन करतात, ते सर्व नंतर मोक्षाला जातात ना?
दादाश्री : फक्त असे दर्शन केल्याने मोक्षाला जातील असे काही नसते, त्यांची कृपा प्राप्त झाली पाहिजे. तिथे हृदय निर्मळ झाल्यानंतर स्वामींची कृपा उतरत जाते. हे तर त्यांचे ऐकण्यासाठी येतात आणि कानाला खूप मधुर वाटते, पण मग ऐकल्यानंतर पुन्हा जसेच्या तसेच. त्यांना तर फक्त चटणीच आवडत असते. जेवणाचे पूर्ण ताट समोर असेल तरी, फक्त एका चटणीसाठीच ताट धरुन बसून राहिला असेल तर मोक्ष होत नाही.
त्यांच्यासाठी तर समोरुन येते महाविदेह क्षेत्र ज्याला इथे शुद्धत्म्याचे लक्ष (भान) झाले असेल, तो इथे भरत क्षेत्रात राहूच शकत नाही. ज्याला आत्म्याचे लक्ष बसलेले असेल, तो महाविदेह क्षेत्रातच जाऊन पोहोचतो, असा नियम आहे ! इथे दुषमकाळात तो राहूच शकत नाही. ज्याला शुद्धात्म्याचे लक्ष प्राप्त झाले, तो महाविदेह
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
13
क्षेत्रात एक किंवा दोन जन्म घेऊन, तीर्थंकरांचे दर्शन करुन मोक्षात निघून जातो. असा हा सरळ-सोपा मार्ग आहे!
त्यांचे अनुसंधान 'दादा भगवान' मार्फत सीमंधर स्वामींना 'फोन' करायचा असेल तर त्यासाठी फोनचे माध्यम पाहिजे तेव्हा फोन पोहचेल. तर हे माध्यम आहे 'दादा भगवान' (सीमंधर स्वामी सोबत अनुसंधान करण्यासाठी) समजा, महावीर भगवान आज दिल्लीत असतील आणि इथून त्यांचे नाव घेतले तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही? त्याचप्रमाणे हे सुद्धा पोहोचून जाते! हा फोन जरा अर्धा मिनिट उशीरा पोहोचतो, पण पोहोचतो.
सीमंधर स्वामी स्वत:हजर आहेत, पण आपल्या पृथ्वीतलवार नाही, दुसऱ्या पृथ्वीवर आहेत. त्यांच्यासोबत आमचे (दादाश्रींचे) तार वैगेरे सर्व जोडलेले आहेत. म्हणजे संपूर्ण जगाचे कल्याण व्हायलाच पाहिजे. आम्ही तर निमित्त आहोत, ‘दादा भगवान' श्रु (द्वारे) तुम्हाला दर्शन करवतो, ते तिथपर्यंत पोहोचून जाते. म्हणूनच आम्ही एक जन्म सांगितला आहे ना! इथून मग तिथेच जायचे आहे आणि सीमंधर स्वामींजवळच बसायचे आहे. त्या नंतर मुक्ती होईल. म्हणून आजपासूनच ओळख करुन देतो आणि 'दादा भगवान' श्रु नमस्कार करवून घेतो.
सीमंधर स्वामींसोबत आमची इतकी चांगली ओळख आहे की आमच्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही दर्शन केले तर ते थेट त्यांचापर्यंत पोहोचते.
.... ते 'दादा भगवान' द्वारे अवश्य पोहोचतेच
प्रश्नकर्ता : आम्ही भक्ति करतो ती सीमंधर स्वामींपर्यंत कशी पोहोचते? कारण ते तर महाविदेह क्षेत्रात आहेत आणि आपण तर इथे आहोत.
दादाश्री : कलक्त्यामध्ये असतील तर पहोचेल की नाही पोहोचेल?
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
14
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
प्रश्नकर्ता : तिथे तर पोहोचते, परंतु हे तर खूपच दूर आहे ना?
दादाश्री : हे कलक्त्यासारखेच आहे. डोळ्याने दिसत नाही ते सर्व कलकत्ता(सारखे)च म्हटले जाईल! ते कलक्त्यात असो की बडोद्यात असो, ते आता डोळ्याने दिसत नाही ना!
प्रश्नकर्ता : आपण जी भक्ति करतो, भाव करतो तर ते सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचते?
दादाश्री : लगेचच पोहोचते. एक प्रत्यक्ष आणि एक परोक्ष. परोक्ष तर कितीतरी दूर असते आणि प्रत्यक्ष तर रुबरु असते की जे या डोळ्याने दिसते!
प्रश्नकर्ता : पण त्या परोक्षचा लाभ किती? परोक्ष आणि प्रत्यक्षच्या लाभात किती फरक?
दादाश्री : परोक्ष तीन मैल दूर असो की लाख मैल दूर असो तरी सुद्धा तेच आहे. अर्थात दूर आहे त्याची काही हरकत नाही.
प्रश्नकर्ता : परंतु जे प्रत्यक्ष आहेत ते विचरत असणारे तीर्थंकर आहे ना?
दादाश्री : मूळात तर प्रत्यक्ष शिवाय काही काम होतच नाही ना!
आता तर त्यांच्याशी तुमची ओळख करुन देत आहोत, आम्ही जे हे दररोज बोलायला सांगतो ना, तर तिथे जावे लागेल. त्यांचे दर्शन कराल, त्या दिवशी मुक्ती! हेच अंतिम दर्शन!
प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात?
दादाश्री : हो, आम्ही तर खटपट करणारे. (कल्याणासाठी खटपट करणारे) आहोत. आमच्याजवळ एकावतारी पद प्राप्त होते. आमच्याजवळ परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सीमंधर स्वामींचे नाव घ्यायला सांगतो
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
____ 15
ना! दररोज सीमंधर स्वामींचे दर्शन, तेथील पंच परमेष्ठींचे, अन्य एकोणीस तीर्थंकरांचे, हे सर्व जे दररोज बोलायला सांगतो, ते एकाच हेतूसाठी की आता तुमचे आराधक पद तिथे आहे. ___ आता येथे, या क्षेत्रात आराधक पद राहिले नाही! म्हणून आम्ही दादा भगवानांच्या साक्षीने तेथील ओळख करवून देतो. मी एका व्यक्तिला सांगितले की 'भाऊ, तुम्ही असे समजा की हे महाविदेह क्षेत्र आहे आणि तुम्ही महाविदेह क्षेत्रात आहात, अशी कल्पना करा. सीमंधर स्वामी तेथे कलक्त्यात आहेत, तर तुम्ही इथून दर्शन करण्यासाठी कलक्त्याला किती वेळा जाल? किती वेळा जाऊ शकाल?
प्रश्नकर्ता : एक वेळा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा.
दादाश्री : हो, जास्तीत जास्त दोन वेळा. तर महाविदेह क्षेत्रात जो लाभ मिळतो, तो लाभ आपल्या या क्षेत्रात दररोज मिळेल असे मी करुन देईल. अशी चावी माझ्याकडे आहे. म्हणून सीमंधर स्वामींनी अशी नोंद घेतली की असे कोणी भक्त झाले नाही की जे दररोज दर्शन करतात! राहतात परदेशात तरी दररोज दर्शन करण्यास येतात! तिथे जाण्यासाठी गाडीची गरज नाही की घोड्याचीही गरज नाही. फक्त दादा भगवान श्रु म्हटले म्हणजे नमस्कार पोहोचले.
माध्यमाशिवाय, पोहोचत नाही
प्रश्नकर्ता : ‘प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने सीमंधर स्वामींना नमस्कार करतो,' हे सीमंधर स्वामींना पोहोचते, ते ‘पाहू' शकतात ही वास्तविकता आहे ना?
दादाश्री : ते पाहताना सामान्य भावाने पाहतात. तीर्थंकर विशेष भावाने पाहत नाही. ह्या दादा भगवानांच्या माध्यमाने म्हटले आहे, म्हणून तिथपर्यंत पोहोचते. पण माध्यमाशिवाय पोहोचत नाही.
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
16
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
भिन्न, मी आणि ‘दादा भगवान' पुस्तकात जसे लिहीले आहे की हे जे दिसतात ते 'ए.एम.पटेल' आहे, मी ज्ञानी पुरुष आहे आणि आत 'दादा भगवान' प्रकट झाले आहेत. ते चौद लोकांचे नाथ आहेत. म्हणजे जे कधी ऐकण्यात आले नसेल असे इथे प्रकट झालेले आहेत. म्हणूनच मी स्वतः भगवान आहे, असे आम्ही कधीही म्हणत नाही. तो तर वेडेपणा आहे, मुर्खता आहे. जगातील लोक भलेही म्हणतील पण आम्ही असे म्हणत नाही की आम्ही भगवान आहोत. आम्ही तर हे स्पष्ट सांगतो, 'मी तर ज्ञानीपुरुष आहे' आणि तीनशे छपन्न डिग्रीवर आहे. अर्थात चार डिग्रीचा फरक आहे. दादा भगवानांची गोष्ट वेगळी आहे. आणि व्यवहारात मी स्वतःला ए.एम.पटेल आहे असे म्हणवतो.
आता ह्या वेगळेपणाची गोष्ट लोकांना जास्त समजत नाही. 'दादा भगवान' तर आत प्रकट झाले आहेत. म्हणून जे हवे ते काम साधून घ्या. असे अगदी स्पष्टपणे सांगतो. क्वचितच असे चौदा लोकांचे नाथ प्रकट होतात. हे मी स्वतः पाहून सांगतो, म्हणून आपले (मोक्षाचे) काम काढून घ्या.
हे नमस्कार तर त्वरितच पोहोचतात हे सर्व लोक सकाळी झोपेतून उठून नमस्कार करतील तर गर्दीच होईल ना? आणि संध्याकाळी तर नुसती गर्दीच असते. म्हणून पहाटे साडे चार ते साडे सहा हे ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते, सर्वात उच्च प्रकारचे मुहूर्त. या वेळेत ज्यांनी ज्ञानींचे स्मरण केले, तीर्थंकरांचे स्मरण केले, शासन देवदेवींचे स्मरण केले तर ते त्या सर्वांना प्रथम स्वीकार होऊन जाते. कारण की नंतर गर्दी वाढू लागते ना! पहिला दर्शक आला, मग दूसरा आला. नंतर गर्दी वाढत जाते. सात वाजल्यापासून गर्दी वाढत जाते. मग बारा वाजता पुष्कळ गर्दी वाढते. म्हणून जो पहिले जाऊन ऊभा राहतो, त्याला भगवंतांचे फ्रेश दर्शन होतात, 'दादा भगवानांच्या साक्षीने सीमंधर स्वामींना नमस्कार करतो' असे बोलले की लगेच ते तिथे सीमंधर
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
स्वामींपर्यंत पोहोचते. त्यावेळी तिथे काहीच गर्दी नसते. नंतर गर्दीत तर भगवंत सुद्धा काय करतील ! म्हणून साडे चार ते साडे सहा, हा तर अपूर्व काळ म्हटला जातो ! ज्याला मोक्षास जायचे असेल त्याने तर ही वेळ चुकवूच नये.
17
प्रश्नकर्ता : तुम्ही जे सकाळी सीमंधर स्वामींना चाळीस वेळा नमस्कार करायचे सांगितले आहे, तर त्यावेळी इथे सकाळ असेल आणि तेथिल वेळेत काय फरक असेल ?
दादाश्री : हे आपण पहायचे नाही. सकाळी सांगण्याचा भावार्थ एवढाच की काम धंदयाला जाण्यापूर्वी नमस्कार केले पाहिजे. आणि जर धंदा नसेल तर वाटेल त्यावेळी दहा वाजता करा, बारा वाजता करा !
तिथे जाऊ शकतो, पण सदेह नाही
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी तर तिथे ( महाविदेह क्षेत्रात) आहेत. तुम्ही तर तेथे रोज दर्शन करण्यास जातात, मग ते कशाप्रकारे ? ते आम्हाला
समजवा.
दादाश्री : आम्ही जातो, परंतु आम्ही दररोज दर्शन करण्यास जाऊ शकत नाही. आम्हा ज्ञानी पुरुषांच्या इथून (खांद्यावरुन) एक प्रकाश निघतो आणि जिथे तीर्थंकर आहेत तिथे जाऊन प्रश्नांचे समाधान मिळवून मग परत येतो. जेव्हा कधी समजूतीमध्ये काही फरक पडतो, समजण्यात काही चूक होते तेव्हा विचारुन येतो. बाकी आम्ही देहासोबत येऊ- जाऊ शकत नाही, महाविदेह क्षेत्र असे नाही !
आमचा सीमंधर स्वामींसोबत तार जुळलेला आहे. आम्ही तिथे प्रश्न विचारतो आणि त्या सर्वांची उत्तरे आम्हाला मिळतात. आतापर्यंत आम्हाला लाखो प्रश्न विचारले गेले असतील आणि आम्ही त्या सर्वांची उत्तरे दिलेली असतील. पण ते सर्व स्वतंत्र रुपाने नाही, सर्व उत्तरे आम्हाला तिथून मिळाली होती. सगळीच उत्तरे देऊ शकत नाही ना ! उत्तर देणे ही
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
18
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
काय सोपी गोष्ट आहे ? एकही व्यक्ति स्वतः पाच उत्तरे सुद्धा देऊ शकत नाही! पण ही तर एक्झेक्ट उत्तरे येतात. म्हणूनच सीमंधर स्वामींची भक्ति करतात ना!
या काळात कोणी भावी तीर्थंकर होऊच शकत नाही
प्रश्नकर्ता : आता दादांचे ज्ञान घेतलेले महात्मा आहेत, जे पन्नास हजार असतील. जेवढेही महात्मा आहेत, त्यात थोडे जवळचे असतील, थोडे दूरचे असतील, तर त्यातील किती महात्मा तीर्थंकर होतील?
दादाश्री : यात तीर्थंकरांचा प्रश्नच नाही. यात तीर्थंकर नाही, सर्व केवळी होतील. केवळज्ञानी होऊन मोक्षाला जातील सर्व.
प्रश्नकर्ता : पण तीर्थंकर का होणार नाही?
दादाश्री : तीर्थंकर नाही. ते गोत्र खूप उच्च गोत्र असते, ते गोत्र केव्हा बांधले जाते की जेव्हा चौथ्या आयात तीर्थंकर प्रत्यक्ष हजर असतात तेव्हा बांधले जाते. या काळात नवीन गोत्र बांधू शकत नाही. आणि जुने बांधलेले असेल, तर आम्हाला ते समजते. तीर्थंकर होण्यात काही विशेष फायदा नाही. आपल्याला तर मोक्षाला जाण्यातच फायदा आहे. तीर्थंकरांना सुद्धा मोक्षातच जायचे आहे ना!
प्रश्नकर्ता : किती वर्षात आपले गोत्र बदलते? गोत्र कशाप्रकारे बदलते?
दादाश्री : ते तर जेव्हा चांगला काळ असतो आणि तीर्थंकर स्वतः प्रत्यक्ष हजर असतात, तेव्हा तीर्थंकर गोत्र बांधले जाते.
प्रश्नकर्ता : पण दादाजी आता तर कलियुगानंतर सत्युगच येणार आहे ना, म्हणजे चांगलाच काळ येणार आहे ना!
दादाश्री : नाही, पण जेव्हा तीर्थंकर असतील तेव्हा ना! ते तीर्थंकर येतील त्यापूर्वीच हे महात्मा, आपल्यातील बहुतेक मोक्षाला निघून जातील!
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
प्रश्नकर्ता : मला अनेकदा असे वाटते की, आम्ही तीर्थंकर का नाही होऊ शकत? की मग सरळ मोक्षातच जाणार ? पण तुमच्याकडून ऐकायला मिळाले की तीर्थंकर गोत्र बांधलेले असेल तरच मोक्षात जाऊ शकतो. तर आता आम्ही गोत्र कसे बांधू शकतो ?
19
दादाश्री : अजुनही तुला लाख वर्षांपर्यंत जन्म घ्यायचे असतील तर बांधू शकशील. तर पुन्हा बांधून देतो आणि मग सातव्या नर्कात खूप वेळा जावे लागेल. अनेकदा नर्कात गेल्यानंतर असे उच्च पद मिळते.
प्रश्नकर्ता : पण जर असे उच्च पद प्राप्त होत असेल, तर नर्कात जाण्यात काय हरकत आहे ?
दादाश्री : राहू दे, तुझी हुशारी राहू दे, गप्प बस! शहाणा होऊन जा. थोडे जरी तप करण्याची वेळ येईल ना, तेव्हा समजेल! आणि तिथे तर केवढे सारे तप करावे लागते. मी नर्काविषयी थोडे जरी सांगितले तर ते ऐकताच मनुष्य मरुन जाईल, एवढे सारे दुःख आहेत तिथे ! आताचे लोक तर ऐकताच मरुन जातील! की अरेरे... ओ हो हो, मी मेलो. निघून जातील. म्हणून असे बोलू नकोस, नाहीतर अशी दैना होईल.
प्राण
चुकूनही त्यांना परोक्ष मानू नका
दुसऱ्या ठिकाणी सीमंधर स्वामींच्या मुर्त्या स्थापलेल्या आहेत, पुष्कळ ठिकाणी स्थापलेल्या आहेत, पण ह्या महेसाणाच्या मिंदरासारखे असले पाहिजे (नंतर सुरत, अहमदावाद, अडालज, राजकोट, भादरण, इत्यादी ठिकाणी श्री सीमंधर स्वामींची अशीच भव्य प्रतिमाजीची प्रतिष्ठा केली आहे) तर ह्या देशाचे खूप कल्याण होईल.
प्रश्नकर्ता: कशाप्रकारे कल्याण होईल ?
दादाश्री : सीमंधर स्वामी जे तीर्थंकर आहेत, जे वर्तमान तीर्थंकर आहे त्यांची मूर्तीरुपाने भक्ति केली. समजा आता महावीर हजर असतील,
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
किंवा आम्ही महावीरांच्या काळी हजर असू आणि अशी परिस्थिती असेल की ते या बाजूला विहार करत येऊ शकत नाही आणि आम्ही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही, परंतु आपण इथे 'महावीर, महावीर' असे नाम स्मरण केले तर आपल्याला प्रत्यक्ष सारखाच लाभ मिळाला असता ना? मिळाला असता की नाही?
प्रश्नकर्ता : हो।
दादाश्री : वर्तमान तीर्थंकरांचे परमाणू ब्रह्मांडात फिरत असतात. वर्तमान तीर्थंकरांचा खूपच लाभ होतो!
प्रश्नकर्ता : मी घरी बसून सीमंधर स्वामींचे स्मरण केले आणि मंदिरात जाऊन स्मरण केले, यात काही फरक पडेल?
दादाश्री : हो, फरक पडतो.
प्रश्नकर्ता : कारण की मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठा केलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे म्हणून? ।
दादाश्री : प्रतिष्ठा केलेली आहे आणि विशेष म्हणजे तिथे देवलोकांचे खूप रक्षण सुद्धा असते ना! म्हणजे तिथे तसे वातावरण असते, त्यामुळे तिथे खूपच प्रभाव पडतो ना? जसे तुम्ही दादांचे मनात नाव घेतले आणि इथे येऊन नाव घेतले, यात तर खूप फरक पडतो ना?
प्रश्नकर्ता : दादाजी, तुम्ही तर जीवंत आहात.
दादाश्री : तसेच ते सुद्धा जीवंत आहेत. जितके जीवंत हे दादाजी आहेत. तितकेच जीवंत ते सुद्धा आहेत. अज्ञानी लोकांना हे दादाश्री जीवंत आहे. आणि ज्ञानींना तर तेही तितकेच जीवंत आहे. कारण की त्यात जो भाग दृश्यस्वरूप आहे, तो सर्व भाग मूर्तीच आहे. मूर्तीशिवाय दूसरे काहीच नाही. पाच इन्द्रियगम्य आहे, त्यात अमूर्त नाममात्रही नाही. सर्वच मूर्त आहे ह्या मूर्तीत फरक नाही, डिफरन्स नाही.
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
प्रश्नकर्ता : पण इथे अमूर्त आहे आणि तिथे मूर्तीत अमूर्त नाही, असे मानतात ना ?
21
दादाश्री : तिथे अमूर्त नाही, पण तिथे मूर्तीत त्यांची प्राणपतिष्ठा केलेली असते, ते तर प्रतिष्ठेप्रमाणे बळ ! यांची तर गोष्टच निराळी आहे ना? प्रत्यक्ष-प्रकट भगवंतांची गोष्टच निराळी ना! प्रकट नसते तेव्हा काहीचे काहीच होऊन जाते.
प्रश्नकर्ता: आणि प्रकट तर नसतातच, खूप काळापर्यंत.
दादाश्री : आणि ते नसतील तर भूतकाळातील तीर्थंकर, आपले चोवीस तीर्थंकर तर आहेतच ना !
वर्तमान तीर्थंकरच हितकारी
प्रश्नकर्ता: दादाजी, हे मंदिर वैगेरे जे बांधत आहे, त्यात वास्तवात आत्म्याचाच भाव करायचा आहे ना ? मग मंदिर आणि इतर सगळ्या गोष्टींचा काय काम आहे ? खरे तर आपल्याला आत्म्याचाच मार्ग शोधायचा आहे ना ?
दादाश्री : मंदिर तर विशेष करुन बांधले गेले पाहिजे. जे गेले त्यांचे मंदिर बांधणे याला काय अर्थ ? सीमंधर स्वामी हजर आहेत, म्हणून त्यांचे दर्शन केल्याने कल्याण होईल. आणि ते प्रत्यक्ष आहेत, म्हणून कल्याण होईल. असे काही घडले तर लोकांचे कल्याण होईल, निमित्त पाहिजे. म्हणजे सीमंधर स्वामींचा संकेत अवश्य फळ देणारे आहे. ज्या लोकांनी ज्ञान घेतले नसेल पण मंदिरात जाऊन फक्त सीमंधर स्वामींचे दर्शन जरी घेतले तरी देखील त्यांना लाभ होईल, म्हणून हे मंदिर उभारण्याचे कार्य होत आहे, नाहीतर आम्ही कशासाठी उभारले असते असे मंदिर ? विनाहेतूची गोष्ट आपल्याला शोभत नाही. आणि हे तर जीवंत तीर्थंकर आहेत, म्हणूनच त्यांची गोष्ट करीत आहोत. इतर भूतकाळातील तीर्थंकरांची गोष्ट करण्यात काही अर्थच नाही. आपल्या येथे तीर्थंकरांचे
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हवे तेवढे दूसरे देरासर (मंदीर) आहेतच. आणि त्यांची गरजही आहे. आपण त्यास नाही म्हणत नाही. कारण की ही तर मूर्तीपूजा आहे, आणि भूतकाळातील तीर्थंकरांची आहे ना!
__ ही ईच्छा आहे 'आमची' जगातील मतभेद कमी करायचे आहेत. जेव्हा मतभेद दूर होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने ही गोष्ट समजता येईल. हे मतभेद तर एवढे सारे केलेले आहेत की ही शिवची एकादशी आणि ही वैष्णवची एकादशी. एकादश्या सुद्धा वेगवेगळ्या करुन ठेवल्या. म्हणून मी मंत्रांना एकत्र करुन टाकले आणि मंदिर वेगळे-वेगळे ठेवले. कारण की ही एक प्रकारची बिलिफ (मान्यता) आहे. पण हे जे मंत्र आहेत ते एकत्र राहू द्या. कारण मन सदैव शांत झाले पाहिजे ना? या लोकांनी हे सगळे मंत्र वाटून टाकले होते. मी या सगळ्यांना एकत्रित करुन अशी प्रतिष्ठा करेल की लोकांचे सर्व मतभेद हळूहळू मिटतील. ही ईच्छा आहे आमची, दूसरी कोणतीच ईच्छा नाही.
हिन्दुस्तानाची ही अशी स्थिती राहयला नको. जैन या स्थितीत रहायला नको. सीमंधर स्वामींचे मंदिर हे मूर्तीचे मंदिर नाही! हे तर अमूर्तचे मंदिर आहे!
आरती सीमंधर स्वामींची सध्या वर्तमानात जे भगवंत बह्मांडात हजर आहे, त्यांची आरती दादा भगवान श्रु (माध्यम द्वारे) हे सर्वजण करतात, आणि मी ती आरती त्यांच्यापर्यंत पोहचवतो. मी सुद्धा त्यांची आरती करतो. दीड लाख वर्षांपासून भगवंत हजर आहेत. त्यांच्यापर्यंत मी पोहोचवतो.
आरतीत सर्व देवी-देवता हजर असतात. ज्ञानी पुरुषांची आरती थेट सीमंधर स्वामींपर्यंत पोहचते. सर्व देवी-देवता काय म्हणतात? की जिथे परमहंसांची सभा असते तिथे आम्ही हजर राहतो. आपली ही आरती कोणत्याही मंदिरात म्हणा तिथे भगवंतांना हजर रहावे लागेल.
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
__23
अनन्य भक्ति, तिथे देऊ शकतो आपल्याला मोक्षात जायचे आहे म्हणून महाविदेह क्षेत्रात जाऊ शकू एवढे पुण्य पाहिजे. येथे तुम्ही सीमंधर स्वामींचे जेवढे कराल, त्यात तुमचे सर्व आले. आणि एवढे केले तरी भरपूर झाले. यात असे नाही की हे कमी आहे. तुम्ही जे (सीमंधर स्वामींसाठी दान देण्याचे) मनात ठरवले असेल आणि ते केले म्हणजे पुष्कळ झाले. मग याहून अधिक करण्याची गरज नाही. मग तुम्ही हॉस्पीटल बनवा किंवा इतर काही करा, ते सर्व वेगळ्या मार्गी जाते. ते सुद्धा पुण्यच आहे, पण ते संसारातच ठेवते आणि हे तर पुण्यानुबंधी पुण्य, जे मोक्षाला जाण्यास मदत करते!
ही अनंत जन्मांची नुकसान भरपाई करायची आहे आणि तीही एकाच जन्मात भरपाई करायची आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तर माझ्या मागे लागले पाहिजे. पण तुमची तेवढी क्षमता नाही. मी त्यांच्यासोबत तुमचा तार (अमुसंधान) जोडून देतो, कारण तिथे जायचे आहे. इथून सरळ मोक्ष होणार नाही. आणखी एक जन्म बाकी राहिल. त्यांच्या जवळ बसायचे आहे, म्हणून अनुसंधान करुन देतो. आणि हे भगवंत संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील.
नाव घेईल, त्याचे दुःख जातील प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामींचे मंदिर उभारण्यामागे तुमचा हा हेतू आहे की (त्यांची भजना करुन) मग अशाप्रकारे सर्वजण पुढे येऊ शकतील?
दादाश्री : सीमंधर स्वामींचे नाव घेतले, तेव्हापासूनच आत परिवर्तन होऊ लागेल.
प्रश्नकर्ता : सद्गुरुंशिवाय तर पोहचू शकत नाही ना? दादाश्री : सद्गुरु तर मोक्षाला जाण्याचे साधन असतात. पण ह्या
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
लोकांना जे दुःख आहे ते सर्व दूर होतील, पुण्याचा उदयात परिवर्तन होत राहिल. म्हणून मग ह्या बिचाऱ्यांना दुःख राहणार नाही. हे सर्व केवढ्या दु:खात आहेत! प्रत्यक्ष सद्गुरु भेटले आणि त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त झाले तर मोक्ष होईल. आणि जर नाही भेटले तर पुण्य तर भोगेल बिचारा. चांगले कर्म तर बांधेल.
दर्शन करण्याची खरी रीत भगवंतांच्या मंदिरात किंवा देरासरात जाऊन खऱ्या रितीने दर्शन करण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दर्शन करण्याची खरी रीत शिकवतो. बोला, आहे का कुणाला इच्छा?
प्रश्नकर्ता : हो, आहे. शिकवा, दादाजी. उद्यापासूनच त्याप्रमाणे दर्शन करण्यास जाऊ.
दादाश्री : भगवंताच्या मंदिरात जाऊन म्हणावे की 'हे वीतराग भगवंत! तुम्ही माझ्या आतच बसलेले आहात, पण मला (अद्याप) याची
ओळख झालेली नाही. म्हणून आपले दर्शन करीत आहे. मला हे 'ज्ञानीपुरुष' दादा भगवानांनी शिकवले आहे, म्हणून मी याप्रमाणे आपले दर्शन करीत आहे. तर मला माझी स्वत:ची ओळख होईल, अशी आपण कृपा करा' जिथे जाल तिथे अशाप्रकारे दर्शन करा. तसे तर वेगळे-वेगळे नाव दिले गेले आहे. 'रिलेटिवली' (व्यवहारिक दृष्टीने) वेगवेगळे आहेत, 'रियली' सर्व भगवंत एकच आहे.
बस, एकालाच आपल्याला तर फक्त एक तीर्थंकर खूश झाले, म्हणजे पुष्कळ झाले! एका घरी जाण्याची जागा भेटली तरीही भरपूर झाले! सगळ्या घरी कुठे फिरत बसायचे? आणि एकाला पोहोचले म्हणजे सगळ्यांना पोहोचले. आणि जे सगळ्यांना पोहोचवायला गेले ते राहून गेले. आपल्यासाठी एकच चांगले, सीमंधर स्वामी! म्हणजे ते सगळ्यांनाच पोहोचते.
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
म्हणून सीमंधर स्वामींचे नित्य ध्यान करा. 'प्रभू, सदैव आपले अनन्य शरण द्या असे मागा.
25
प्रतिकृतीने इथेच प्राप्ती
प्रश्नकर्ता: पण दादा, सीमंधर स्वामींना असे वाटत असेल ना की हे दादाजी माझे काम करीत आहेत.
दादाश्री : असे नाही, पण तुम्ही स्मरण केले तर तुम्हाला त्याचे फळ मिळेल. सिद्ध भगवंतांचे स्मरण केले तर फळ मिळत नाही. हे देहधारी आहेत. तुम्ही एका जन्मात तिथे जाऊ शकाल. तेथे त्यांचा देहाला तुम्ही हाताने स्पर्श सुद्धा करु शकाल.
प्रश्नकर्ता: हो, दादाजी. आम्हाला ही संधी मिळेल ना !
दादाश्री : सर्वकाही मिळेल. का नाही मिळणार ? सीमंधर स्वामींच्या नावाचा तर तुम्ही जय जयकार करता, सीमंधर स्वामींना तुम्ही नमस्कार करता. तिथे तर जायचेच आहे आपल्याला. म्हणूनच आपण त्यांना सांगतो की, 'साहेब! तुम्ही भले तिथे बसलेले आहात, आम्ही तुम्हाला पाहू शकत नाही, परंतु आम्ही येथे तुमची प्रतिकृती बनवून आपले नित्य दर्शन करीत असतो.' बाराफुटाच्या मूर्तीला स्थापन करुन आपण त्यांचे दर्शन करु, शकतो. मुखाने नाम स्मरण करतो परंतु जीवंत भगवंतांची प्रतिकृती असेल तर ते जास्त चांगले आहे. गेले त्यांची सही कामी येत नाही, त्यांची प्रतिकृती करण्यात काय अर्थ ? पण हे तर कामात येतील. हे तर अरिहंत भगवंत !
प्रश्नकर्ता : हे सगळेजण जेव्हा दादा भगवानांचे कीर्तन करत होते, तेव्हा आपणही काहीतरी बोलून कीर्तन करत होते, ते कोणाचे होते ?
दादाश्री : मी सुद्धा बोलत होतो ना! मी दादा भगवानांना नमस्कार करीत आहे. दादा भगवानांची तीनशे साठ डिग्री आहे. माझी (ज्ञानीपुरुष
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
ए.एम.पटेलची) तीनशे छपन्न डिग्री आहे. मला चार डिग्री कमी पडते. म्हणूनच मी प्रथम बोलण्याची सुरुवात केली की ज्यामुळे हे सगळेजण बोलतील. कारण त्यांचीही डिग्री कमी आहे ना!
प्रश्नकर्ता : ज्यांना आपण 'दादा भगवान' म्हणतात ते आणि हे 'सीमंधर,' यांच्यात नेमका काय संबंध आहे ?
दादाश्री : ओहोहो! ते तर एकच आहे. पण या सीमंधर स्वामींना दाखविण्याचे कारण हेच आहे की सध्या मी देहासहित आहे म्हणून मला तिथे जाण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत सीमंधर स्वामींचे दर्शन होत नाही, तोपर्यंत मुक्त होऊ शकत नाही. एक जन्म बाकी राहील. मुक्ती तर जे स्वतः मुक्त झाले आहेत, त्यांच्या दर्शनाने मिळते. तसे तर मी सुद्धा मुक्त झालेलो आहे, परंतु ते संपूर्ण मुक्त आहेत. लोकांना आमच्यासारखे सांगत नाही, की इथे या आणि तिथे या. मी तुम्हाला ज्ञान देईल. ते अशी खटाटोप करीत नाही. 'सीमंधर स्वामींचा असीम जय जयकार हो' बोलू शकतो?
प्रश्नकर्ता : ‘सीमंधर स्वामींना निश्चयाने नमस्कार करतो' हे जे आपण बोलतो, तर हे निश्चयानेच बोलायचे असते की व्यवहाराने बोलायचे असते?
दादाश्री : निश्चयाने. आणि देह तर लहान मोठा असू शकतो आम्हाला देहासोबत काही घेणे-देणे नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे 'मी सीमंधर स्वामींना निश्चयाने नमस्कार करतो' असे जे बोलतो ते बरोबर आहे ना?
दादाश्री : बरोबर आहे. व्यवहाराने म्हणजे देहाने आणि या नमस्कार विधीत जे इतर सर्व गोष्टी आहेत, ते सर्व व्यवहाराने आहे. येथे फक्त हा एकच नमस्कार निश्चयाने आहे.
प्रश्नकर्ता : दादा भगवानांचे निश्चयाने आहे?
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
27
दादाश्री : हो. बस म्हणजे खऱ्या अर्थाने इथेच तुम्ही निश्चयाने नमस्कार केला पाहिजे, आणि बाकी सर्व भगवंतांना व्यवहाराने नमस्कार करीत आहे. आता सीमंधर स्वामींना निश्चयाने बोलाल तर हरकत नाही, ती तर चांगली गोष्ट आहे. तिथे जर आम्ही निश्चय लिहीले तर सर्व जागी निश्चय लिहावे लागेल.
प्रश्नकर्ता : हो, हो, बरोबर आहे. दादाश्री : फक्त या 'दादा भगवानांना' च निश्चयाने केले!
प्रश्नकर्ता : ‘दादा भगवानांचा असीम जय जयकार हो' असे जे बोलत असतो, त्याप्रमाणे 'सीमंधर स्वामींचा असीम जय जयकार हो' बोलू शकतो का?
दादाश्री : खुशाल बोलू शकता. पण 'दादा भगवानांचा जय जयकार बोलतेवेळी आत जो आनंद होतो, तसा आनंद त्यात होणार नाही. कारण की हे प्रत्यक्ष आहेत, आणि ते प्रत्यक्ष तर तुम्ही पाहू शकत नाही. पण तसे बोलू शकता. सीमंधर स्वामींसाठी जय जयकार वैगेरे जे हवे ते बोलू शकता, कारण की सीमंधर स्वामी आपले शिरोमान्य भगवंत आहेत आणि राहतीलही. जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत शिरोमान्य राहतील. हे तर आम्ही अंगुलिनिर्देश (इशारा) केला आहे, की असे ज्याला बोलता आले, त्याचे कल्याण होईल.
प्रश्नकर्ता : हो, अंगुलिनिर्देश आहे. सर्व बरोबर आहे.
दादाश्री : हे सर्व अंगुलिनर्देश आहे. आतापर्यंत कोणी अंगुलिनिर्देश केलेला नाही ना, काय करावे मग! इतर सर्व गोष्टी केलेल्या असतील पण अंगुलिनिर्देश कोणी केला नाही, की असे करा म्हणून!
प्रश्नकर्ता : हे तर मी त्या दिवशी बोललो होतो ना, तेव्हा एका भाऊंनी मला सांगितले की असे बोलू शकत नाही. निश्चयाने बोलू शकत नाही, म्हणून मी विचारले.
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
दादाश्री : नाही. असे बोलले असाल तरी हरकत नाही. त्यामुळे काही पाप लागणार नाही. पण या ज्ञानी पुरुषांच्या सांगितल्याप्रमाणे बोलले, तर त्यात खूप फरक पडतो. बोलले असाल त्याचे जोखिम नाही. त्यासाठी प्रतिक्रमण करावे लागणार नाही. सीमंधर स्वामींचे फक्त नाव जरी घेतले ना, तरीही त्याला फायदा होईल.
जिथे प्यॉरिटी, तिथे तयारी आमचे काय ध्येय काय आहे? मी तर स्वत:च्या पैशांचे कपडे घालतो. ह्या नीरुबहन सुद्धा त्यांच्या स्वतःच्या पैशांचे कपडे घालतात. कोणाची एक पई सुद्धा घ्यायची नाही आणि जगत् कल्याणासाठी सर्व प्रकारची तयारी आहे. जवळपास पन्नास हजार समकितधारी माझ्याजवळ आहेत आणि त्यात दोनशे ब्रह्मचारी आहेत. ते सर्व जगत् कल्याणासाठी तयार होऊन जातील.
आज्ञा बनवते, महाविदेहासाठी लायक हे ज्ञान घेतल्यानंतर तुमचा हा जन्मच महाविदेह क्षेत्रात जाण्यासाठी लायक ठरत राहिला आहे. मला काही करण्याची गरज नाही. नैसर्गिक नियमच आहे.
प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात कशाप्रकारे जाऊ शकतो? पुण्याने ?
दादाश्री : आमच्या ह्या आज्ञा पालन केल्यामुळे या जन्मात पुण्य बांधलेच जात आहे. ते महाविदेह क्षेत्रात घेऊन जाते. आज्ञा पाळल्याने धर्मध्यान उत्पन्न होते, ते सर्व फळ देईल. तुम्ही जेवढी आज्ञा पालन करता त्याप्रमाणे पुण्य बांधले जाते. ते मग तिथे तीर्थंकरांकडे गेल्यावर त्याचे फळ उपभोगायला मिळेल.
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी आम्हा महात्म्यांचे कचऱ्यासारखे आचार पाहून त्यांच्याजवळ ठेवतील का?
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
29
दादाश्री : त्यावेळी असे आचार राहणार नाही. आता जे तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करता, त्याचे फळ तेव्हा मिळेल. आणि आताचा हा जो कचरा माल आहे, तो तुम्ही मला विचारल्या शिवाय भरला होता, तो आता निघत आहे.
प्रश्नकर्ता : दादाजी, सीमंधर स्वामींचे स्मरण केल्याने, सीमंधर स्वामींजवळ जाऊ शकु असे निश्चित होऊ शकते का?
दादाश्री : जायचे आहे, हे तर नक्कीच आहे. यात दुसरे काही नाही, पण सदैव स्मरण राहिल्याने आत दूसरा नवीन काही घुसत नाही. सदैव दादांचे स्मरण राहिले किंवा तीर्थंकरांचे स्मरण राहिले तर मग आत माया प्रवेश करत नाही! आता इथे माया येऊ शकत नाही.
जबाबदारी कोणाची घेतली? आमचा सीमंधर स्वामींसोबत संबंध आहे. आम्ही सर्व महात्म्यांच्या मोक्षची जबाबदारी घेतली आहे. जो आमची आज्ञा पाळेल, त्याची जबाबदारी आम्ही घेतो.
हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर एक अवतारी होऊन सीमंधर स्वामींजवळ जाईल आणि तिथून मोक्ष प्राप्त होईल, कोणाचे दोन अवतार (जन्म) पण होतील पण चार अवतारांपेक्षा जास्त तर नाहीच होणार, जर आमची आज्ञा पाळली तर. येथेच मोक्ष होईल. 'येथे तुम्हाला एक जरी चिंता झाली तरी दावा दाखल करा' असे आम्ही म्हणतो. हे तर वीतराग विज्ञान आहे. चोवीस तीर्थंकरांचे एकत्रित विज्ञान आहे.
फक्त सीमंधर स्वामीच आमचे एकमेव वरिष्ठ प्रश्नकर्ता : आमचे रक्षणकर्ता तर तुम्ही आहात पण तुमचे वरिष्ठ कोण आहे ? तुमच्याजवळ जो पण येईल त्याच्यासोबत तर तुम्हाला कायदेशीरच चालावे लागते ना?
दादाश्री : खूपच कायदेशीर! आणि आमचे वरिष्ठ तर हे जे बसले
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आहेत ना, सीमंधर स्वामी. हे एकमेव वरिष्ठ आहेत आमचे! आम्ही त्यांच्याकडे काहीच मागणी करत नाही. मागणी करुच शकत नाही ना! तुम्ही माझ्याकडे मागणी करु शकता!!
अहो! ते अद्भूत दर्शन प्रश्नकर्ता : आम्ही तर दादाजींचा विझा दाखवू.
दादाश्री : विझा दाखवताच आपोआप काम होईल. तीर्थंकरांना पाहिल्याबरोबरच तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही, पाहताक्षणीच आनंद! संपूर्ण जग विस्मृत होऊन जाईल! जगातील कुठलेही खाणे-पिणे आवडणार नाही. त्यावेळी सर्व संसारी मनोकामना समाप्त होतील. निरावलंब आत्मा प्राप्त होईल! नंतर कसलेही अवलंबन राहणार नाही.
सम्यक् दृष्टी, हाच विझा प्रश्नकर्ता : आपण सांगितले, की तीर्थंकरांचे दर्शन केले तर मनुष्याला केवळज्ञान प्राप्त होते.
दादाश्री : तीर्थंकरांचे दर्शन तर खूप लोकांनी केलेले होते. आपण सगळ्यांनी सुद्धा दर्शन केले होते पण त्यावेळी आपली तयारी नव्हती. दृष्टी परिवर्तन झाले नव्हते. मिथ्या दृष्टी होती. मिथ्या दृष्टी असल्यामुळे मग तीर्थंकर सुद्धा काय करतील? ज्यांची सम्यक् दृष्टी असते त्यांच्यावर तीर्थंकरांची कृपा उतरते.
प्रश्नकर्ता : म्हणजे ज्याची तयारी असते, त्याला तीर्थंकरांचे दर्शन झाले तर मोक्ष प्राप्त होतो?
दादाश्री : म्हणून आता आपल्याला तयार होऊन जायचे आहे. त्याचे कारण एवढेच की तुम्ही तयार होऊन मग विझा घेऊन जा. आणि मग कुठेही गेले तरी तेथे सुद्धा कोणते ना कोणते तीर्थंकर भेटतील.
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींना प्रार्थना
हे निरागी, निर्विकारी, सच्चिदानंद स्वरूप, सहजानंदी, अनंतज्ञानी, अनंतदर्शी, त्रैलोक्य प्रकाशक, प्रत्यक्ष-प्रकट ज्ञानीपुरूष श्री दादा भगवानांच्या साक्षीने आपणास अत्यंत भक्तीपूर्वक नमस्कार करून, आपले अनन्य शरण स्विकारत आहे. हे प्रभू ! मला आपल्या चरणकमळात स्थान देऊन अनंतकाळाच्या भयंकर भटकंतीचा अंत आणण्याची कृपा करा, कृपा करा, कृपा करा.
हे विश्ववंद्य असे प्रकट परमात्म स्वरूप प्रभू ! आपले स्वरूप तेच माझे स्वरूप आहे. परंतु अज्ञानतेमुळे मला माझे परमात्म स्वरूप समजत नाही. म्हणून आपल्या स्वरूपातच मी माझ्या स्वरूपाचे निरंतर दर्शन करू अशी मला परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
हे परमतारक देवाधिदेव, संसाररूपी नाटकाच्या आरंभ काळापासून आज दिवसाच्या अद्यक्षणापर्यंत कोणत्याही देहधारी जीवात्म्याच्या मन-वचनकायेच्या प्रति जे अनंत दोष केले आहेत, त्या प्रत्येक दोषाला पाहून, त्याचे प्रतिक्रमण करण्याची मला शक्ति द्या. त्या सर्व दोषांची मी आपल्यापाशी क्षमायाचना करत आहे. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करत आहे. हे प्रभू ! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि माझ्याकडून पुन्हा असे दोष कधीही होऊ नयेत यासाठी दृढ निर्धार करत आहे. त्यासाठी मला जागृति द्या, परम शक्ति द्या, परम शक्ति द्या, परम शक्ति द्या.
___ आपल्या प्रत्येक पावन पदचिन्हांवर तीर्थाची स्थापना करणारे हे तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी प्रभू ! संसारातील सर्व जीवांप्रति संपूर्ण अविराधक भाव आणि सर्व समकिती जीवांप्रति संपूर्ण आराधक भाव माझ्या हृदयात सदा संस्थापित राहो, संस्थापित राहो, संस्थापित राहो ! भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील सर्व क्षेत्रांतील सर्व ज्ञानी भगवंतांना माझा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो ! हे प्रभू ! आपण माझ्यावर अशा कृपेचा वर्षाव करा की ज्यामुळे मला ह्या भरतक्षेत्रातील
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
आपल्या प्रतिनिधी समान कोणी ज्ञानी पुरूषाचा, सत् पुरूषाचा सत् समागम होवो आणि त्यांचा कृपाधिकारी बनून आपल्या चरणकमळांपर्यंत पोहोचण्याची पात्रता प्राप्त करू.
हे शासन देवी-देवता ! हे पांचागुलि यक्षिणीदेवी तसेच हे चांद्रायण यक्षदेव ! हे श्री पद्मावती देवी ! मला श्री सीमंधर स्वामींच्या चरणकमळात स्थान मिळविण्याच्या मार्गात कोणतेही विघ्न न येवो, असे अभूतपूर्व रक्षण प्रदान करण्याची कृपा करा आणि केवळज्ञान स्वरूपातच राहण्याची परम शक्ति द्या, परम शक्ति द्या, परम शक्ति द्या!
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
श्री सीमंधर स्वामींची आरती
जय 'सीमंधर स्वामी, प्रभु तीर्थंकर वर्तमान, महाविदेह क्षेत्रे विचरता, (२) भरत ऋणानुबंध.
जय...
‘दादा भगवान' साक्षीए, पहोंचाडुं नमस्कार ( २ ) ... (स्वामी) प्रत्यक्ष फळ पामुं हुं, (२) माध्यम ज्ञान अवतार.
जय...
पहेली आरती स्वामीनी, ॐ परमेष्टि पामे (२) ... (स्वामी) उदासीन वृत्ति वहे, (२) कारण मोक्ष सेवे.
जय...
बीजी आरती स्वामीनी, पंच परमेष्टि पामे (२) ...(स्वामी) परमहंस पद पामी, (२) ज्ञान - अज्ञान लणे.
त्रीजी आरती स्वामीनी, गणधर पद पामे (२) निराश्रित बंधन छूटे, (२) आश्रित ज्ञानी थये.
चोथी आरती स्वामीनी, तीर्थंकर भावि (२) स्वामी सत्ता 'दादा' कने, (२) भरत कल्याण करे.
पंचमी आरती स्वामीनी, केवळ मोक्ष लहे (२) परम ज्योति भगवंत 'हुं', (२) अयोगी सिद्धपदे.
जय...
... (स्वामी)
जय...
***
... (स्वामी)
जय...
. (स्वामी)
जय...
एक समय स्वामी खोळे जे, माथुं ढाळी नमशे ( २ )...(स्वामी) अनन्य शरणुं स्वीकारी, (२) मुक्तिपदने वरे.
जय...
सीमंधर स्वामीना असीम जय जयकार हो
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्तिद्या
** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
o
(दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी १. भोगतो त्याची चूक
११. पाप-पुण्य २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार ३. जे घडले तोच न्याय
१३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार ४. संघर्ष टाळा
१४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ५. मी कोण आहे ?
१५. मानव धर्म ६. क्रोध
१६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ७. चिंता
१७. सेवा-परोपकार ८. प्रतिक्रमण
१८. दान ९. भावना सुधारे जन्मोजन्म
१९. त्रिमंत्र १०. कर्माचे विज्ञान
२०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति
२१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध
२३. दान ५. मैं कौन हूँ?
२४. मानव धर्म ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२७. निजदोष दर्शन से... निर्दोष ९. टकराव टालिए
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय
२९. क्लेश रहित जीवन ११. चिंता
३०. गुरु-शिष्य १२. क्रोध
३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण
३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ?
३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार
३४. पाप-पुण्य १६. अंत:करण का स्वरूप ३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ?
३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र
३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके
प्रकाशित झाली आहे. * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार
अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद - कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.- गांधीनगर, गुजरात 382421, फोन : (079) 39830100 अहमदाबाद: दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे उस्मानपुरा, अहमदाबाद- 380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल - मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335
गोधरा
राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद - राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी ( सर्कल), पोस्ट : मालियासण, जि. राजकोट. फोन : 9924343478
सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर - राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9737048322
अमरेली
मोरबी
भुज
अंजार
: त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा जि. - पंचमहाल. फोन : 9723707738
मुंबई कोलका
जयपुर
इन्दौर
रायपुर
पटना
बेंगलूर पूणे
: त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 : त्रिमंदिर, पो-जेपुर ( मोरबी), नवलखी रोड, जि. - मोरबी, फोन : 9924341188
: त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : 9924345588 : त्रिमंदिर, अंजार - मुंद्रा रोड, सीनोग्रा पाटीया जवळ, सीनोग्रा गाँव, ता. अंजार. फोन : 9924346622
: 9323528901
: 9830093230
: 8290333699
: 9039936173
: 9329644433
: 7352723132
: 9590979099
: 7218473468
U.S.A. : +1877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) Kenya : +254 722 722063
: 9810098564
दिल्ली चेन्नई
: 9380159957
: 9425024405
भोपाल जबलपुर : 9425160428 भिलाई : 9827481336 अमरावती : 9422915064 हैदराबाद : 9885058771 जालंधर : 9814063043
UAE
: +971 557316937 Singapore : +65 81129229 Australia : +61 421127947 New Zealand : +64210376434 Website : www.dadabhagwan.org
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________ सीमंधर स्वामी घरोघरी सीमंधर स्वामींची पूजा आणि आरती होईल आणि जागोजागी सीमंधर स्वामींची मंदिरे उभारली जातील, तेव्हा दुनियेचा नकाशा काही वेगळाच असेल. -दादाश्री Printed in India Price 10 dadabhagwan.org