________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
27
दादाश्री : हो. बस म्हणजे खऱ्या अर्थाने इथेच तुम्ही निश्चयाने नमस्कार केला पाहिजे, आणि बाकी सर्व भगवंतांना व्यवहाराने नमस्कार करीत आहे. आता सीमंधर स्वामींना निश्चयाने बोलाल तर हरकत नाही, ती तर चांगली गोष्ट आहे. तिथे जर आम्ही निश्चय लिहीले तर सर्व जागी निश्चय लिहावे लागेल.
प्रश्नकर्ता : हो, हो, बरोबर आहे. दादाश्री : फक्त या 'दादा भगवानांना' च निश्चयाने केले!
प्रश्नकर्ता : ‘दादा भगवानांचा असीम जय जयकार हो' असे जे बोलत असतो, त्याप्रमाणे 'सीमंधर स्वामींचा असीम जय जयकार हो' बोलू शकतो का?
दादाश्री : खुशाल बोलू शकता. पण 'दादा भगवानांचा जय जयकार बोलतेवेळी आत जो आनंद होतो, तसा आनंद त्यात होणार नाही. कारण की हे प्रत्यक्ष आहेत, आणि ते प्रत्यक्ष तर तुम्ही पाहू शकत नाही. पण तसे बोलू शकता. सीमंधर स्वामींसाठी जय जयकार वैगेरे जे हवे ते बोलू शकता, कारण की सीमंधर स्वामी आपले शिरोमान्य भगवंत आहेत आणि राहतीलही. जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत शिरोमान्य राहतील. हे तर आम्ही अंगुलिनिर्देश (इशारा) केला आहे, की असे ज्याला बोलता आले, त्याचे कल्याण होईल.
प्रश्नकर्ता : हो, अंगुलिनिर्देश आहे. सर्व बरोबर आहे.
दादाश्री : हे सर्व अंगुलिनर्देश आहे. आतापर्यंत कोणी अंगुलिनिर्देश केलेला नाही ना, काय करावे मग! इतर सर्व गोष्टी केलेल्या असतील पण अंगुलिनिर्देश कोणी केला नाही, की असे करा म्हणून!
प्रश्नकर्ता : हे तर मी त्या दिवशी बोललो होतो ना, तेव्हा एका भाऊंनी मला सांगितले की असे बोलू शकत नाही. निश्चयाने बोलू शकत नाही, म्हणून मी विचारले.