________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
किंवा आम्ही महावीरांच्या काळी हजर असू आणि अशी परिस्थिती असेल की ते या बाजूला विहार करत येऊ शकत नाही आणि आम्ही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही, परंतु आपण इथे 'महावीर, महावीर' असे नाम स्मरण केले तर आपल्याला प्रत्यक्ष सारखाच लाभ मिळाला असता ना? मिळाला असता की नाही?
प्रश्नकर्ता : हो।
दादाश्री : वर्तमान तीर्थंकरांचे परमाणू ब्रह्मांडात फिरत असतात. वर्तमान तीर्थंकरांचा खूपच लाभ होतो!
प्रश्नकर्ता : मी घरी बसून सीमंधर स्वामींचे स्मरण केले आणि मंदिरात जाऊन स्मरण केले, यात काही फरक पडेल?
दादाश्री : हो, फरक पडतो.
प्रश्नकर्ता : कारण की मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठा केलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे म्हणून? ।
दादाश्री : प्रतिष्ठा केलेली आहे आणि विशेष म्हणजे तिथे देवलोकांचे खूप रक्षण सुद्धा असते ना! म्हणजे तिथे तसे वातावरण असते, त्यामुळे तिथे खूपच प्रभाव पडतो ना? जसे तुम्ही दादांचे मनात नाव घेतले आणि इथे येऊन नाव घेतले, यात तर खूप फरक पडतो ना?
प्रश्नकर्ता : दादाजी, तुम्ही तर जीवंत आहात.
दादाश्री : तसेच ते सुद्धा जीवंत आहेत. जितके जीवंत हे दादाजी आहेत. तितकेच जीवंत ते सुद्धा आहेत. अज्ञानी लोकांना हे दादाश्री जीवंत आहे. आणि ज्ञानींना तर तेही तितकेच जीवंत आहे. कारण की त्यात जो भाग दृश्यस्वरूप आहे, तो सर्व भाग मूर्तीच आहे. मूर्तीशिवाय दूसरे काहीच नाही. पाच इन्द्रियगम्य आहे, त्यात अमूर्त नाममात्रही नाही. सर्वच मूर्त आहे ह्या मूर्तीत फरक नाही, डिफरन्स नाही.