________________
18
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
काय सोपी गोष्ट आहे ? एकही व्यक्ति स्वतः पाच उत्तरे सुद्धा देऊ शकत नाही! पण ही तर एक्झेक्ट उत्तरे येतात. म्हणूनच सीमंधर स्वामींची भक्ति करतात ना!
या काळात कोणी भावी तीर्थंकर होऊच शकत नाही
प्रश्नकर्ता : आता दादांचे ज्ञान घेतलेले महात्मा आहेत, जे पन्नास हजार असतील. जेवढेही महात्मा आहेत, त्यात थोडे जवळचे असतील, थोडे दूरचे असतील, तर त्यातील किती महात्मा तीर्थंकर होतील?
दादाश्री : यात तीर्थंकरांचा प्रश्नच नाही. यात तीर्थंकर नाही, सर्व केवळी होतील. केवळज्ञानी होऊन मोक्षाला जातील सर्व.
प्रश्नकर्ता : पण तीर्थंकर का होणार नाही?
दादाश्री : तीर्थंकर नाही. ते गोत्र खूप उच्च गोत्र असते, ते गोत्र केव्हा बांधले जाते की जेव्हा चौथ्या आयात तीर्थंकर प्रत्यक्ष हजर असतात तेव्हा बांधले जाते. या काळात नवीन गोत्र बांधू शकत नाही. आणि जुने बांधलेले असेल, तर आम्हाला ते समजते. तीर्थंकर होण्यात काही विशेष फायदा नाही. आपल्याला तर मोक्षाला जाण्यातच फायदा आहे. तीर्थंकरांना सुद्धा मोक्षातच जायचे आहे ना!
प्रश्नकर्ता : किती वर्षात आपले गोत्र बदलते? गोत्र कशाप्रकारे बदलते?
दादाश्री : ते तर जेव्हा चांगला काळ असतो आणि तीर्थंकर स्वतः प्रत्यक्ष हजर असतात, तेव्हा तीर्थंकर गोत्र बांधले जाते.
प्रश्नकर्ता : पण दादाजी आता तर कलियुगानंतर सत्युगच येणार आहे ना, म्हणजे चांगलाच काळ येणार आहे ना!
दादाश्री : नाही, पण जेव्हा तीर्थंकर असतील तेव्हा ना! ते तीर्थंकर येतील त्यापूर्वीच हे महात्मा, आपल्यातील बहुतेक मोक्षाला निघून जातील!