________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
स्वामींपर्यंत पोहोचते. त्यावेळी तिथे काहीच गर्दी नसते. नंतर गर्दीत तर भगवंत सुद्धा काय करतील ! म्हणून साडे चार ते साडे सहा, हा तर अपूर्व काळ म्हटला जातो ! ज्याला मोक्षास जायचे असेल त्याने तर ही वेळ चुकवूच नये.
17
प्रश्नकर्ता : तुम्ही जे सकाळी सीमंधर स्वामींना चाळीस वेळा नमस्कार करायचे सांगितले आहे, तर त्यावेळी इथे सकाळ असेल आणि तेथिल वेळेत काय फरक असेल ?
दादाश्री : हे आपण पहायचे नाही. सकाळी सांगण्याचा भावार्थ एवढाच की काम धंदयाला जाण्यापूर्वी नमस्कार केले पाहिजे. आणि जर धंदा नसेल तर वाटेल त्यावेळी दहा वाजता करा, बारा वाजता करा !
तिथे जाऊ शकतो, पण सदेह नाही
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी तर तिथे ( महाविदेह क्षेत्रात) आहेत. तुम्ही तर तेथे रोज दर्शन करण्यास जातात, मग ते कशाप्रकारे ? ते आम्हाला
समजवा.
दादाश्री : आम्ही जातो, परंतु आम्ही दररोज दर्शन करण्यास जाऊ शकत नाही. आम्हा ज्ञानी पुरुषांच्या इथून (खांद्यावरुन) एक प्रकाश निघतो आणि जिथे तीर्थंकर आहेत तिथे जाऊन प्रश्नांचे समाधान मिळवून मग परत येतो. जेव्हा कधी समजूतीमध्ये काही फरक पडतो, समजण्यात काही चूक होते तेव्हा विचारुन येतो. बाकी आम्ही देहासोबत येऊ- जाऊ शकत नाही, महाविदेह क्षेत्र असे नाही !
आमचा सीमंधर स्वामींसोबत तार जुळलेला आहे. आम्ही तिथे प्रश्न विचारतो आणि त्या सर्वांची उत्तरे आम्हाला मिळतात. आतापर्यंत आम्हाला लाखो प्रश्न विचारले गेले असतील आणि आम्ही त्या सर्वांची उत्तरे दिलेली असतील. पण ते सर्व स्वतंत्र रुपाने नाही, सर्व उत्तरे आम्हाला तिथून मिळाली होती. सगळीच उत्तरे देऊ शकत नाही ना ! उत्तर देणे ही